ads
ads
भारत-पाक चर्चा रद्द

भारत-पाक चर्चा रद्द

►इम्रान सरकारचाही खरा चेहरा दिसला ►भारताचा स्पष्ट आरोप, वृत्तसंस्था…

शहरी नक्षलवादाला राहुल गांधींचा पाठिंबा

शहरी नक्षलवादाला राहुल गांधींचा पाठिंबा

►अमित शाह यांचा आरोप, वृत्तसंस्था रायपूर, २१ सप्टेंबर –…

तोयबाच्या पाच अतिरेक्यांचा खातमा

तोयबाच्या पाच अतिरेक्यांचा खातमा

►भारतीय जवानांची मोठी कामगिरी, वृत्तसंस्था श्रीनगर, २१ सप्टेंबर –…

बुरहान वाणीवर पाकने काढले टपाल तिकीट

बुरहान वाणीवर पाकने काढले टपाल तिकीट

इस्लामाबाद, २० सप्टेंबर – आम्ही दहशतवादाचे पाठीराखे नाहीत, असा…

जैश, तोयबापासून भारताला मोठा धोका

जैश, तोयबापासून भारताला मोठा धोका

►पाकने उपलब्ध केली सुरक्षित भूमी ►अमेरिकेची स्पष्ट भूमिका, वृत्तसंस्था…

वैमानिकाने कौशल्याने ३७० प्रवाशांना वाचविले

वैमानिकाने कौशल्याने ३७० प्रवाशांना वाचविले

►एअर इंडियाच्या विमानातील इंधन आले होते संपत ►अमेरिकेच्या वादळाचाही…

डीजे, डॉल्बीवर बंदी कायम

डीजे, डॉल्बीवर बंदी कायम

वृत्तसंस्था मुंबई, २१ सप्टेंबर – मुंबई उच्च न्यायालयाने डॉल्बीवरील…

वित्त आयोगाने राज्याला आर्थिक शक्ती प्रदान करावी

वित्त आयोगाने राज्याला आर्थिक शक्ती प्रदान करावी

►सुधीर मुनगंटीवार यांची मागणी, तभा वृत्तसेवा मुंबई, २० सप्टेंबर…

वित्त आयोगाकडून अर्थव्यवस्थेवर आधी चिंता, नंतर प्रशस्तीपत्रक

वित्त आयोगाकडून अर्थव्यवस्थेवर आधी चिंता, नंतर प्रशस्तीपत्रक

तभा वृत्तसेवा – मुंबई, २० सप्टेंबर राज्याच्या अर्थव्यवस्थेबाबत दोनच…

रा.स्व.संघ : हिंदुबंधुत्वापासून विश्‍वबंधुत्वापर्यंत

रा.स्व.संघ : हिंदुबंधुत्वापासून विश्‍वबंधुत्वापर्यंत

॥ सारांश : ल.त्र्यं. जोशी | संघस्थापनेपासूनचा हा धावता…

साद समाजपुरुषाची!

साद समाजपुरुषाची!

॥ संवाद : सोमनाथ देशमाने | स्वातंत्र्यदिनाच्या दिवशी लाल…

गॉड आणि सैतान

गॉड आणि सैतान

॥ जागता पहारा : भाऊ तोरसेकर | कठुआ, उन्नाव…

मोरूच्या मावशीची ‘एक्झिट’

मोरूच्या मावशीची ‘एक्झिट’

मुंबईच्या गिरणगावाने अनेक कलाकार रंगभूमी आणि रुपेरी पडद्याला दिले,…

‘सिमरन’मधील नवीन गाणे प्रदर्शित

‘सिमरन’मधील नवीन गाणे प्रदर्शित

अभिनेत्री कंगना राणावत लवकरच सिमरन या चित्रपटाद्वारे प्रेक्षकांच्या भेटीला…

चिरंजीवीसोबत सिनेमा करण्यास ऐश्‍वर्याचा नकार?

चिरंजीवीसोबत सिनेमा करण्यास ऐश्‍वर्याचा नकार?

ऐश्‍वर्या राय बच्चनची सध्या बॉलीवूडमध्ये सेकंड इनिंग सुरू आहे.…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:16 | सूर्यास्त: 18:21
अयनांश:
Home » आंतरराष्ट्रीय, ऑस्ट्रेलिया » अंटार्क्टिकात तुटला अतिविशाल हिमनग

अंटार्क्टिकात तुटला अतिविशाल हिमनग

►निसर्गातील महत्त्वपूर्ण घडामोड
►समुद्राच्या पातळीत होणार वाढ,
पॅरिस, १४ जुलै –
दक्षिण ध्रुवावर असणार्‍या अंटार्क्टिकात मोठा हिमनग अंटार्क्टिकापासून तुटून वेगळा झाला आहे. या अतिविशाल हिमनगाचा आकार पाच हजार ८०० चौरस किलोमीटर असून, या हिमनगाचे वजन एक लाख कोटी टन आहे. अंटार्क्टिका समुद्राला आतापर्यंत पडलेला हा सर्वात मोठा तडा असल्याचे जाणकारांनी सांगितले. ही निसर्गातील अतिशय महत्त्वपूर्ण घडामोड असून, याचे पर्यावरणविषयक परिणाम शास्त्रज्ञ तपासत आहेत. नासाच्या संशोधकांनी उपग्रहाच्या माध्यमातून अभ्यास केला होता. काही महिन्यांपूर्वी या अभ्यासानुसार अंटार्टिकामध्ये स्थित्यंतराची शक्यता वर्तविली होती. समुद्रातून दोन दिवसांपूर्वी मोठा हिमनग वेगळा झाला असावा, असे संशोधकांनी म्हटले आहे. मुख्य समुद्रापासून हा हिमनग वेगळा झाल्याने समुद्राला मोठा तडा गेल्याचे दिसत आहे.
संशोधकांच्या म्हणण्यानुसार, हिमनग वेगळा झाल्याने समुद्राच्या पातळीत बरीच वाढ होईल. तसेच दक्षिण ध्रुवावर जाणार्‍या जहाजांच्या प्रवासात अडथळा निर्माण होऊ शकतो. या हिमखंडाला ‘ए६८’ असे नाव देण्यात येण्याची शक्यता आहे. हा हिमखंड अंटार्क्टिकापासून तुटत असल्याचे नासाच्या ‘ऍक्वा मोडीस’ या उपग्रहाने टिपले होते. तसेच युरोपीय अवकाश संस्थेच्या सेंटीनेल-१ उपग्रहद्वारे हा हिमखंड तुटत असल्याचे निरीक्षण वर्षभरापासून नोंदविण्यात येत होते.
‘हा मोठा हिमनग तुटेल याकडे आमचे गेल्या अनेक महिन्यांपासून होते. अखेरीस तो हिमनग तुटला. पण हा हिमनग तुटायला बराच काळ लागल्याचे आश्चर्य वाटले’, असं ब्रिटनच्या स्वानसी विद्यापीठातील प्राध्यापक आंद्रियन लकमन यांनी सांगितले आहे. हिमखंड तुटल्याच्या परिणामाचा आणि हिमखंडाच्या भवितव्याचा अभ्यास सुरूच ठेवणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. आता या हिमनगाचे काय होणार, त्याचे परिणाम काय होणार, असे प्रश्न आता विचारले जात आहेत.
हा हिमनग अनेक तुकड्यांमध्ये विभागला जाण्याची शक्यता वर्तविली जाते आहे. या हिमखंडामुळे समुद्रपातळी लगेच वाढण्याची शक्यता नाही, असे काही शास्त्रज्ञांना वाटते. मात्र, सागरी वाहतुकीला धोका निर्माण होईल, असे मतही त्यांनी व्यक्त केले आहे. (वृत्तसंस्था)

Posted by : | on : Jul 14 2017
Filed under : आंतरराष्ट्रीय, ऑस्ट्रेलिया.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in आंतरराष्ट्रीय, ऑस्ट्रेलिया (490 of 494 articles)


पेपर गेट प्रकरणाचे पडसाद;• शरीफांच्या उत्तराधिकार्‍याचा शोध, इस्लामाबाद, १३ जुलै - देशविदेशातील बड्या व्यक्तींची अवैध संपत्ती उघड करणार्‍या पनामा पेपर ...

×