ads
ads
गुंतवणूकदारांचा अजूनही मोदींवर विश्‍वास

गुंतवणूकदारांचा अजूनही मोदींवर विश्‍वास

►निर्देशांकाची ६२९ अंकांची भरारी ►निवडणूक निकालांचा परिणाम नाही, मुंबई,…

तीनही मुख्यमंत्री निवडणार राहुल

तीनही मुख्यमंत्री निवडणार राहुल

►मध्यप्रदेशात कमलनाथ, राजस्थानात गहलोत, तर छत्तीसगडमध्ये भूपेश बघेल यांची नावे…

पीक विमा योजनेसाठी राज्यात विक्रमी नोंदणी

पीक विमा योजनेसाठी राज्यात विक्रमी नोंदणी

नवी दिल्ली, १२ डिसेंबर – प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत…

मध्यम पल्ल्याच्या क्षेपणास्त्र चाचणीबाबत इराणचा दुजोरा

मध्यम पल्ल्याच्या क्षेपणास्त्र चाचणीबाबत इराणचा दुजोरा

तेहरान, ११ डिसेंबर – पाश्‍चात्त्य देशांनी व्यक्त केलेल्या तीव्र…

अफगाणमधील शांततेसाठी भारताची भूमिका महत्त्वाची

अफगाणमधील शांततेसाठी भारताची भूमिका महत्त्वाची

►पाकची प्रथमच जाहीर कबुली, इस्लामाबाद, ११ डिसेंबर – अफगाणिस्तानात…

मल्ल्यार्पण होणार लंडन न्यायालयाचा आदेश

मल्ल्यार्पण होणार लंडन न्यायालयाचा आदेश

►मोदी सरकारचा आणखी एक विजय, लंडन, १० डिसेंबर –…

मोकाट कुत्र्यांपासून जनतेच्या रक्षणाची जबाबदारी प्रशासनाचीच

मोकाट कुत्र्यांपासून जनतेच्या रक्षणाची जबाबदारी प्रशासनाचीच

मुंबई, १२ डिसेंबर – मोकाट कुत्र्यांपासून जनतेचे रक्षण करण्याची…

धुळ्यात भाजपाला स्पष्ट बहुमत; अनिल गोटे धुळीत!

धुळ्यात भाजपाला स्पष्ट बहुमत; अनिल गोटे धुळीत!

►महापालिकेत ५० जागांवर विजय, धुळे, १० डिसेंबर – पोल…

दुष्काळ निवारणासाठी आठ हजार कोटी हवे

दुष्काळ निवारणासाठी आठ हजार कोटी हवे

►मुख्यमंत्री फडणवीस यांची केंद्राकडे मागणी, नवी दिल्ली, ७ डिसेंबर…

हिंदूंनी कुठपर्यंत प्रतीक्षा करायची?

हिंदूंनी कुठपर्यंत प्रतीक्षा करायची?

॥ विशेष : आशुतोष अडोणी | श्रीरामजन्मभूमीवरील भव्य मंदिर…

काँग्रेसमुक्त भारत अंतीम टप्प्यात!

काँग्रेसमुक्त भारत अंतीम टप्प्यात!

॥ संवाद : सोमनाथ देशमाने | राहुल भोवती संशयाचे…

उथळ पाण्याचा खळखळाट

उथळ पाण्याचा खळखळाट

॥ जागता पहारा : भाऊ तोरसेकर | ही जागरुकता…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:50 | सूर्यास्त: 17:52
अयनांश:
Home » अमेरिका, आंतरराष्ट्रीय » अतिरेक्यांना गौरविणार्‍या देशाशी चर्चा कशी करायची?

अतिरेक्यांना गौरविणार्‍या देशाशी चर्चा कशी करायची?

►सुषमा स्वराज यांचा रोखठोक सवाल
►दहशतवाद हेच पाकचे अधिकृत धोरण,
संयुक्त राष्ट्रसंघ, २९ सप्टेंबर –

Sushma Swaraj 6

Sushma Swaraj 6

भारतीय भूमीत निष्पाप लोकांचे बळी घेणार्‍या, भारतीय जवानांवर हल्ले करणार्‍या अतिरेक्यांचा गौरव करणार्‍या देशासोबत भारत चर्चा कशी करू शकतो, असा रोखठोक सवाल भारताच्या परराष्ट्र व्यवहार मंत्री सुषमा स्वराज यांनी आज शनिवारी केला. आंतरराष्ट्रीय दहशतवादावर निर्णायक भूमिका घेण्यात संयुक्त राष्ट्रसंघ सपशेल अपयशी ठरला. यामुळेच आमच्या शेजारील देश टपाल तिकिटाद्वारे दहशतवाद्यांना गौरवित आहे, असा जबरदस्त हल्ला सुषमा स्वराज यांनी केला.
संयुक्त राष्ट्रसंघाच्या ७३ व्या आमसभेत त्यांनी पाकिस्तानचा कठोर शब्दात समाचार घेतला. भारत आणि पाकमधील द्विपक्षीय चर्चा भारतानेच मोडीत काढली, हा पाकचा आरोप म्हणजे निव्वळ खोटारडेपणा असल्याची चपराकही स्वराज यांनी हाणली. पाकसोबत शांतता चर्चा करण्यासाठी भारताने आतापर्यंत वारंवार पुढाकार घेतला आहे, पण त्या प्रत्येक वेळी पाकने भारतात दहशतवादी हल्ले केले आहेत. अशा स्थितीत शांतता चर्चा कशी होऊ शकते. चर्चेचे दार बंद केल्याचा आरोप आमच्यावर केला जात आहे, पण तो खोटा आहे. कारण, आमच्यासाठी चर्चा म्हणजे सर्वच ज्वलंत मुद्दे निकाली काढण्याचा एकमेव मार्ग आहे. आम्ही वारंवार चर्चेसाठी पुढाकार घेतला, पण माघारी यावे लागले, याचे कारण पाकचा व्यवहार आहे, असे स्वराज यांनी स्पष्ट केले.
पाकमध्ये सत्तांतर झाल्यानंतर नवे पंतप्रधान इम्रान खान यांनी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिले आणि द्विपक्षीय चर्चा सुरू करण्याची विनंती केली. याच आमसभेच्या अनुषंगाने माझी व पाकचे विदेश मंत्री शाह मेहमूद कुरेशी यांची भेट व्हावी, अशी इच्छाही त्यांनी व्यक्त केली. आम्ही त्यास तयारीही दर्शवली. पण, काय झाले. अवघ्या काही तासात बातमी आली की, पाक आयएसआयच्या आदेशावरून अतिरेक्यांनी आमच्या तीन पोलिसांचे अपहरण करून हत्या केली. हे चर्चेच्या इच्छेचे संकेत आहेत काय, असा स्पष्ट सवाल स्वराज यांनी विचारला.
लादेनचा खातमा, हाफिझचे काय?
भारतासह दक्षिण आशियातील इतर काही देशांविरोधात दहशतवादी कारवायांना प्रोत्साहन देणे, हेच पाक सरकारचे अधिकृत धोरण झाले आहे. अमेरिकेवरील ९/११ च्या भीषण हल्ल्याचा सूत्रधार आणि अल् कायदाचा म्होरक्या ओसामा बिन लादेन पाकिस्तानातच लपलेला होता. अमेरिकेने शोध घेऊन त्याचा खातमा केला. मुंबईवरील २६/११ च्या हल्ल्याचा सूत्रधार हाफिझ सईद अजूनही पाकमध्ये सभ्य नागरिकासारखा मुक्तपणे वावरत आहे. त्याला पाक सरकारची सुरक्षा आहे. अशा स्थितीत भारताने काय करायला हवे, याकडे त्यांनी जगाचे लक्ष वेधले.
…तर संपूर्ण जग शिकार ठरेल
दहशतवादाचा कायमचा नायनाट करण्यात आपण अपयशी ठरलो, तर नजीकच्या भविष्यात संपूर्ण जग दहशतवादाचे शिकार झाल्याशिवाय राहणार नाही. आज संपूर्ण जगापुढेच दहशतवादाचे आणि पर्यावरणातील बदलाचे भीषण संकट उभे आहे. या दोन्ही संकटांवर मात करण्याची नितांत गरज आहे. जगभरात दहशतवाद कुठे जलद गतीने, तर कुठे संथ गतीने प्रवेश करीत आहे. जगाने हा धोका वेळीच ओळखावा आणि जागतिक सहकार्यातून ठोस पावले उचलावी, असेही त्यांनी सांगितले.
भारताने १९९६ मध्ये आंतरराष्ट्रीय दहशतवादावरील सर्वंकष जाहीरनाम्याचा मसुदा संयुक्त राष्ट्रसंघासमोर ठेवला होता. मात्र, सामान्य भाषेवर संयुक्त राष्ट्रसंघात सहमती न झाल्यामुळे आजपर्यंत हा केवळ एक मसुदाच ठरला आहे, अशी घणाघाती टीका त्यांनी संयुक्त राष्ट्रसंघावर केली. एकीकडे आपण दहशतवादाविरोधात लढण्याची भाषा करतो, तर दुसरीकडे आपण त्याची साधी व्याख्याही करू शकत नसल्याचा दुटप्पीपणा त्यांनी अधोरेखित केला. या दुटप्पीपणामुळेच स्वातंत्र्याचे नायक असल्याचे दर्शवून संयुक्त राष्ट्रसंघाचा सदस्य असलेला देश डोक्यावर बक्षीस असलेल्या अतिरेक्यांना आर्थिक रसद आणि शस्त्रास्त्रांचा पुरवठा करीत असल्याचे त्यांनी सांगितले.
संयुक्त राष्ट्रसंघाने सक्षम व्हावे
संयुक्त राष्ट्रसंघ सक्षम न झाल्यास बहुराष्ट्रीयवादाची संकल्पना कोलमडून पडेल, असा इशारा आज भारताने दिला आहे. दीर्घ काळापासून भारत, ब्राझील, जर्मनी आणि जपान संयुक्त राष्ट्रसंघाच्या सुरक्षा परिषदेला सुधारणा करण्याचे आवाहन करीत आहे. संयुक्त राष्ट्रसंघाच्या स्थायी सदस्यपदाबाबत या चारही देशांचे एकमत आहे.
बुरहानवरील टपाल तिकिटाकडे वेधले लक्ष
काश्मिरातील अतिरेकी बुरहान वानीवर पाकिस्तानने काढलेले टपाल तिकीट हे दोन्ही देशांच्या परराष्ट्र व्यवहार मंत्रालय पातळीवर संयुक्त राष्ट्रात होणारी चर्चा रद्द होण्यामागील एक कारण असल्याचे त्यांनी सांगितले. अतिरेक्यांची आणि त्यांची पाठराखण करणार्‍यांची यादी तपासून चालणार नाही, हे मागील पाच वर्षांपासून दरवर्षी आम्ही या मंचावर सांगत आलो आहोत. आंतरराष्ट्रीय कायद्याच्या माध्यमातून त्यांची जबाबदारी निश्‍चित करण्याची गरज आहे, असा घणाघात त्यांनी यावेळी केला.

Posted by : | on : 30 Sep 2018
Filed under : अमेरिका, आंतरराष्ट्रीय.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय
  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न
  • अमित पांघळला बॉक्सिंगचे सुवर्ण अमित पांघळला बॉक्सिंगचे सुवर्ण
  • तेजिंदरपालला सुवर्णपदक तेजिंदरपालला सुवर्णपदक

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in अमेरिका, आंतरराष्ट्रीय (73 of 436 articles)

Imran Khan1
पाकच्या नागरिकांना इम्रान खान यांचे आवाहन , इस्लामाबाद, २९ सप्टेंबर - दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर असलेल्या पाकिस्तानमधील धरणे उभारण्यासाठी १४ अब्ज डॉलर्सचा ...

×