ads
ads
महाआघाडी देशविरोधी

महाआघाडी देशविरोधी

►पंतप्रधान मोदी यांचा विरोधकांवर हल्लाबोल, सिलवासा, १९ जानेवारी –…

भाजपाच दलितांचा उद्धारकर्ता

भाजपाच दलितांचा उद्धारकर्ता

►६० वर्षांत काँग्रेसने दलितांना काय दिले? ►नितीन गडकरी यांचा…

दिल्लीतील सरकार बदलवा

दिल्लीतील सरकार बदलवा

►विरोधकांच्या महारॅलीत ममता बॅनर्जींचा आक्रोश ►पंतप्रधानपदी कोण, निवडणुकीनंतर निर्णय,…

आणिबाणी जाहीर करण्याची ट्रम्प यांची धमकी

आणिबाणी जाहीर करण्याची ट्रम्प यांची धमकी

►मेक्सिको सीमेवरील भिंतीचा वाद पेटणार, वॉशिंग्टन, १० जानेवारी –…

विक्रम मिस्री चीनमधील नवे राजदूत

विक्रम मिस्री चीनमधील नवे राजदूत

►पदभार स्वीकारताच केली द्विपक्षीय मुद्यांवर चर्चा, बीजिंग, ८ जानेवारी…

शटडाऊन सुरूच ठेवेन, आणिबाणीचाही पर्याय खुला

शटडाऊन सुरूच ठेवेन, आणिबाणीचाही पर्याय खुला

►डोनाल्ड ट्रम्प यांचा काँगे्रस सभागृहाला इशारा ►मेक्सिकोच्या सीमेवर भिंत…

डान्सबार बंदीसाठी नवा अध्यादेश

डान्सबार बंदीसाठी नवा अध्यादेश

मुंबई, १८ जानेवारी – राज्यातील डान्सबार पुन्हा सुरू करण्याचा…

समृद्धी महामार्गासाठी स्टेट बँक देणार ८५०० कोटींचे कर्ज

समृद्धी महामार्गासाठी स्टेट बँक देणार ८५०० कोटींचे कर्ज

►९५ टक्के भूसंपादन पूर्ण, मुंबई, १७ जानेवारी – स्टेट…

ओबीसी महामंडळांसाठी ७३६ कोटी!

ओबीसी महामंडळांसाठी ७३६ कोटी!

•तरुणांना मिळणार १० ते ५० लाखांचे कर्ज •सावित्रीबाई फुले…

भारताचा पुरुषार्थ प्रकट होण्यास…

भारताचा पुरुषार्थ प्रकट होण्यास…

॥ विशेष : डॉ. मनमोहन वैद्य | सह सरकार्यवाह,…

ऑगस्टा वेस्टलँड

ऑगस्टा वेस्टलँड

॥ चतुरस्त्र : स्वाती तोरसेकर | ऑगस्टा विषयाला हात…

तिसरी आघाडी की तीन आघाड्या?

तिसरी आघाडी की तीन आघाड्या?

॥ जागता पहारा : भाऊ तोरसेकर | भाजपा वा…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 07:02 | सूर्यास्त: 18:13
अयनांश:
Home » आंतरराष्ट्रीय, आशिया » इंडोनेशियाचे प्रवासी विमान समुद्रात कोसळले, १८९ मृत

इंडोनेशियाचे प्रवासी विमान समुद्रात कोसळले, १८९ मृत

►उड्डाणानंतर १३ मिनिटांनी संपर्क तुटला,
जकार्ता, २९ ऑक्टोबर –

Lion Air Crash Indonesia Plane

Lion Air Crash Indonesia Plane

इंडोनेशियाच्या लायन एअरवेजचे बोईंग ७३७ जेटी ६१० प्रवासी विमान आज सकाळी उड्डाणानंतर १३ व्या मिनिटांनी समुद्रात कोसळले. अपघातात कर्मचार्‍यांसह सर्व १८९ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. बचाव पथकाला विमानाचे अवशेष सापडले असून, इंडोनेशियातील ही सर्वांत मोठी विमान दुर्घटना समजण्यात येत आहे.
सूत्रानुसार, इंडोनेशियाची राजधानी जकार्ताहून पांगकल पिनांग शहराकडे जाणार्‍या जेटी ६१० विमानाने आज, सोमवारी सकाळी ६.३३ वाजता उड्डाण केले. त्यानंतर १३ मिनिटांनी त्याचा हवाई वाहतूक नियंत्रण कक्षाशी संपर्क तुटला. त्यावेळीच विमान कोसळण्याची शक्यता वर्तवली जात होती.
अखेर देशाच्या हवाई विभागाच्या अधिकार्‍यांनी विमान कोसळल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला. शोध आणि सुरक्षा यंत्रणाचे प्रवक्ता युसुफ लतिफ यांनी सांगितले की, विमान कोसळल्यानंतर ते ३० ते ४० मीटर खोल पाण्यात बुडाले. तपास यंत्रणांनी तत्काळ विमानाचा शोध सुरू केला. यात सर्वांचा मृत्यू झाल्याचे आढळून आले. डीजीसीएचे सिंधू रहायू यांनी सांगितले की, १८९ जणांमध्ये १७९ प्रौढ, एक चिमुकला, दोन नवजात बाळ, दोन पायलट आणि पाच फ्लाईट अटेंडंन्ट यांचा समावेश होता. विमान कोसळण्यापूर्वी पायलटने अगोदरच्या विमानतळावर परतण्याची परवानगी मागितली होती. मात्र, त्यापूर्वीच ते कोसळले.
दिल्लीचा भव्य सुनेजा पायलट
नवी दिल्ली : लायन एअरवेजचे अपघातग्रस्त विमान दिल्लीतील मयूरविहारचे रहिवासी ३१ वर्षीय वैमानिक भव्य सुनेजा हे भारतीय वंशाचे होते. त्यांचे शिक्षण एल्कॉन पब्लिक स्कू लमधून झाले होते. २००९ मध्ये त्यांनी वैमानिकाचा परवाना मिळवला होता. २०११ मध्ये लायन एअरवेजमध्ये रुजू झाले. त्यांना बोईंग-७३७ उडवण्याचा चांगला अनुभव होता. विशेष म्हणजे एवढ्या वर्षात कोणताही अपघात झाला नव्हता. वैमानिक क्षेत्रात त्यांनी चांगला रेकॉर्ड ठेवला होता. भव्य यांना ६००० तासांच्या, तर को-पायलटला ५००० तासांच्या उड्डाणाचा अनुभव होता. अपघातात त्यांचाही मृत्यू झाला आहे.

Posted by : | on : 30 Oct 2018
Filed under : आंतरराष्ट्रीय, आशिया.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास
  • हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस
  • भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय
  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in आंतरराष्ट्रीय, आशिया (65 of 388 articles)

Khaleda Zia
ट्रस्टमधील घोटाळाप्रकरण, ढाका, २९ ऑक्टोबर - बांगलादेशच्या माजी पंतप्रधान खलिदा झिया यांच्यासह तिघांना झिया चॅरिटेबल ट्रस्टमधील घोटाळ्याप्रकरणी न्यायालयाने सात वर्षांच्या ...

×