ads
ads
नक्षल समर्थकांच्या पत्रातील ‘तो’ क्रमांक दिग्विजयसिंहांचाच

नक्षल समर्थकांच्या पत्रातील ‘तो’ क्रमांक दिग्विजयसिंहांचाच

►पुणे पोलिसांची पुष्टी, चौकशी होणार, पुणे, १९ नोव्हेंबर –…

अटकाने, लटकाने, भटकानेवाल्या संस्कृतीमुळे देशाचे नुकसान

अटकाने, लटकाने, भटकानेवाल्या संस्कृतीमुळे देशाचे नुकसान

►पंतप्रधान मोदी यांचा जोरदार पलटवार, नवी दिल्ली, १९ नोव्हेंबर…

आरबीआय मंडळाची नऊ तास वादळी बैठक

आरबीआय मंडळाची नऊ तास वादळी बैठक

►अनेक मुद्यांवर समझोत्याचे संकेत, मुंबई, १९ नोव्हेंबर – केंद्र…

काश्मीर पाकिस्तानचेच शाहिद आफ्रिदीची सारवासारव

काश्मीर पाकिस्तानचेच शाहिद आफ्रिदीची सारवासारव

इस्लामाबाद, १८ नोव्हेंबर – पाकिस्तानमधील राज्यकर्त्यांना देशाचा भाग असलेले…

अमेरिका भारताला देणार २४ पाणबुडीभेदी हेलिकॉप्टर्स

अमेरिका भारताला देणार २४ पाणबुडीभेदी हेलिकॉप्टर्स

►२०० अब्ज डॉलर्सचा व्यवहार, वॉशिंग्टन, १७ नोव्हेंबर – चीन…

मल्ल्यासाठी तिहारच योग्य

मल्ल्यासाठी तिहारच योग्य

►ब्रिटनच्या न्यायालयाचे शिक्कामोर्तब, लंडन, १७ नोव्हेंबर – सार्वजनिक आणि…

विधानसभा कामकाजास ‘वंदे मातरम’ने सुरुवात

विधानसभा कामकाजास ‘वंदे मातरम’ने सुरुवात

मुंबई, १९ नोव्हेंबर – महाराष्ट्र विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनाच्या कामकाजास…

मराठा आरक्षणावर उद्या हायकोर्टात सुनावणी

मराठा आरक्षणावर उद्या हायकोर्टात सुनावणी

मुंबई, १९ नोव्हेंबर – मराठा आरक्षणाचा प्रश्‍न तातडीने निघाली…

मराठा समाजाला स्वतंत्र प्रवर्गात आरक्षण

मराठा समाजाला स्वतंत्र प्रवर्गात आरक्षण

►अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला मुख्यमंत्री फडणवीस यांची घोषणा ►मागासवर्ग आयोगाच्या तिन्ही…

तापमानवाढीचा धोका वाढतोय

तापमानवाढीचा धोका वाढतोय

॥ विशेष : अ‍ॅड. गिरीश राऊत | विकास पृथ्वीची…

अपनी अकल लगाओ!

अपनी अकल लगाओ!

॥ मानसरंग : मयुरेश डंके | गेटवे ऑफ इंडिया,…

राफेल सुनावणी : अर्धे नुकसान, अर्धा फायदा

राफेल सुनावणी : अर्धे नुकसान, अर्धा फायदा

॥ सारांश : ल.त्र्यं. जोशी | एक बाब मात्र…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:36 | सूर्यास्त: 17:48
अयनांश:
Home » आंतरराष्ट्रीय, आशिया » इब्राहिम सोलिह मालदीवचे नवे राष्ट्राध्यक्ष

इब्राहिम सोलिह मालदीवचे नवे राष्ट्राध्यक्ष

►भारतसमर्थक म्हणून ओळख; चीनला धक्का,
माले, २४ सप्टेंबर –

Maldives President Ibrahim Solih

Maldives President Ibrahim Solih

राष्ट्राध्यक्ष निवडणुकीत मालदिवियन डेमोक्रेटिक पार्टी (एमडीपी) चे नेते इब्राहिम मोहम्मद सोलिह यांचा विजय झाला असून, मालदीवचे नवे राष्ट्राध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. विशेष म्हणजे ते भारतसमर्थक मानले जातात.
इब्राहिम मोहम्मद सोलिह यांनी काल, रविवारी झालेल्या निवडणुकीत आपले सर्वात मोठे प्रतिस्पर्धी आणि विद्यमान राष्ट्राध्यक्ष अब्दुल्ला यामीन यांना पराभूत केले. राष्ट्राध्यक्ष निवडणुकीत एकूण ८८ टक्के मतदान झाले असून, मतमोजणीत त्यांना ५८.३ टक्के मते मिळाली. ५४ वर्षीय सोलिह यांना एकू ण २ लाख ६२ हजार मतांपैकी १ लाख ३३ हजार ८०८ मते मिळालीत. यामीन यांना ९५ हजार ५२६ मते मिळाल्याचे निवडणूक यंत्रणेने जाहीर केले. निवडणुकीत या दोन नेत्यांच्या व्यतिरिक्त इतर कुणीही स्पर्धेत नव्हते.
निवडणुकीपूर्वी पोलिसांनी अब्दुल्ला यामीन यांच्या आदेशावरून विरोधी पक्ष एमडीपीच्या मुख्यालयात तपासणी केली होती. मात्र, यावेळी कुणालाही अटक केली नव्हती. पक्षाचे अध्यक्ष मोहम्मद नशीद यांनी याबाबत सांगितले की, देशातील जनतेला विकासाकडे नेणारी लोकशाही हवी आहे. त्यांनी आमच्या पक्षाला दिलेला कौल हा यशस्वी लोकशाहीकडे नेणाराच आहे.
वादग्रस्त यामीन
२०१३ मध्ये यामीन मालदीवचे राष्ट्राध्यक्ष झाले होते. त्यांच्या कार्यकाळात राजकीय पक्ष, विरोधक, न्यायालये आणि माध्यमांवर विविध प्रकारचे अंकुश लावण्यात आले. सत्तेचा गैरवापर केल्याप्रकरणी यामीन यांच्या विरोधात महाभियोग चालवण्याचा प्रयत्नही करण्यात आला. यामीन यांनी मात्र आपल्या विरोधात असलेल्या खासदारांवरच कारवाई केली. त्यापैकी काहींना देश सोडावा लागला, तर काहींना तुरुंगात डांबण्यात आले. याचवर्षी मालदीवच्या सर्वोच्च न्यायालयाने सरकारला राजकीय कै द्यांच्या सुटकेचे आदेश दिले होते. यामीन यांनी आदेश धुडकावून १५ दिवसांची आणिबाणी लागू केली होती.
दरम्यान, यामीन यांनी निवडणुकीपूर्वी आपल्या सर्व विरोधकांना तुरुंगात डांबले होते. काहींना देश सोडणे भाग पडले. त्यामुळे मूळात ही निवडणूकच बेकायदा असल्याचे त्यांच्या विरोधकांनी म्हटले होते. आंतरराष्ट्रीय प्रसारमाध्यमांनीही या निवडणुकीवर टीका केली होती.
भारतासाठी महत्त्वपूर्ण
मालदीवमधील आणिबाणी काळात विरोधी पक्षनेता आणि माजी राष्ट्रपती मोहम्मद नशीद यांनी लष्करी हस्तक्षेप करण्याची मागणी भारत सरकारकडे केली होती. भारतानेही त्या देशातील राजकीय संकटाबाबत चिंता व्यक्त केली. मात्र, त्यानंतर दोन्ही देशात तणाव निर्माण झाला. कारण राष्ट्राध्यक्ष अब्दुल्ला यामीन हे चीनसमर्थक होते. त्यांच्या कार्यकाणात चीनने बांधकाम आणि सेवाक्षेत्रात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केली. याशिवाय सव्वाचार लाख लोकसंख्या असलेल्या या देशात चीनने ‘वन बेल्ट वन रोड’ योजनेअंतर्गत गुंतवणुकीला सुरुवात केली. तसेच, २०११ पर्यंत मालदीवमध्ये चीनचा कोणताही दूतावास नव्हता. मात्र, त्याने लष्करी तळ उभारण्याचा प्रयत्न चालवला होता. या सर्व बाबींतून चीनने भारताला घेरण्याचा डाव रचला होता. आता सोलिह यांच्या विजयाने त्यावर पाणी फे रले गेले आहे, असे समजले जात आहे.

Posted by : | on : 25 Sep 2018
Filed under : आंतरराष्ट्रीय, आशिया.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न
  • अमित पांघळला बॉक्सिंगचे सुवर्ण अमित पांघळला बॉक्सिंगचे सुवर्ण
  • तेजिंदरपालला सुवर्णपदक तेजिंदरपालला सुवर्णपदक
  • महाराष्ट्राच्या राहीचा सुवर्णभेद महाराष्ट्राच्या राहीचा सुवर्णभेद

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in आंतरराष्ट्रीय, आशिया (53 of 409 articles)


स्वराज घेणार ३० द्विपक्षीय बैठका, वृत्तसंस्था न्यू यॉर्क, २४ सप्टेंबर - संयुक्त राष्ट्रसंघाच्या याच आठवड्यात होणार्‍या ७३ व्या आमसभेत पाकिस्तानला ...

×