ads
ads
विद्यापीठांमध्ये २५ टक्के जागा वाढविणार; सवर्ण आरक्षणासाठी तरतूद

विद्यापीठांमध्ये २५ टक्के जागा वाढविणार; सवर्ण आरक्षणासाठी तरतूद

►जावडेकर यांची घोषणा, नवी दिल्ली, १५ जानेवारी – आगामी…

९० हजार कोटींची चोरी वाचविल्याने मला हटविण्याचा कट

९० हजार कोटींची चोरी वाचविल्याने मला हटविण्याचा कट

•पंतप्रधान मोदी यांचा विरोधकांवर हल्ला, बालनगिर, १५ जानेवारी –…

सामूहिक धर्मांतर थांबायलाच हवे

सामूहिक धर्मांतर थांबायलाच हवे

•ख्रिश्‍चनांच्या कार्यक्रमातच राजनाथसिंह यांनी सुनावले, नवी दिल्ली, १५ जानेवारी…

आणिबाणी जाहीर करण्याची ट्रम्प यांची धमकी

आणिबाणी जाहीर करण्याची ट्रम्प यांची धमकी

►मेक्सिको सीमेवरील भिंतीचा वाद पेटणार, वॉशिंग्टन, १० जानेवारी –…

विक्रम मिस्री चीनमधील नवे राजदूत

विक्रम मिस्री चीनमधील नवे राजदूत

►पदभार स्वीकारताच केली द्विपक्षीय मुद्यांवर चर्चा, बीजिंग, ८ जानेवारी…

शटडाऊन सुरूच ठेवेन, आणिबाणीचाही पर्याय खुला

शटडाऊन सुरूच ठेवेन, आणिबाणीचाही पर्याय खुला

►डोनाल्ड ट्रम्प यांचा काँगे्रस सभागृहाला इशारा ►मेक्सिकोच्या सीमेवर भिंत…

ओबीसी महामंडळांसाठी ७३६ कोटी!

ओबीसी महामंडळांसाठी ७३६ कोटी!

•तरुणांना मिळणार १० ते ५० लाखांचे कर्ज •सावित्रीबाई फुले…

स्वायत्त संस्थांमध्ये राजकीय हस्तक्षेप नको

स्वायत्त संस्थांमध्ये राजकीय हस्तक्षेप नको

►नितीन गडकरी यांचे प्रतिपादन ►साहित्य संमेलनाचे सूप वाजले, यवतमाळ/…

ज्येष्ठ विनोदी अभिनेते किशोर प्रधान यांचे निधन

ज्येष्ठ विनोदी अभिनेते किशोर प्रधान यांचे निधन

मुंबई, १२ जानेवारी – मराठी रंगभूमी आणि चित्रपटातून आपल्या…

श्री सिद्धरामेश्‍वरांची सोलापूरची अभेदयात्रा

श्री सिद्धरामेश्‍वरांची सोलापूरची अभेदयात्रा

॥ तरंग : दीपक कलढोणे | चित्तशुद्धीचे प्रतिक असणारा…

भव्य कुंभ, दिव्य कुंभ!

भव्य कुंभ, दिव्य कुंभ!

॥ विशेष : श्रीनिवास वैद्य | तीर्थराज प्रयागमध्ये माघ…

तर्कशास्त्राची ऐशीतैशी

तर्कशास्त्राची ऐशीतैशी

॥ जागता पहारा : भाऊ तोरसेकर | कालपरवाच सोहराबुद्दीन…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 07:02 | सूर्यास्त: 18:11
अयनांश:
Home » आंतरराष्ट्रीय, आशिया » इम्रान खान पाकचे नवे ‘सुल्तान’

इम्रान खान पाकचे नवे ‘सुल्तान’

२२ वे पंतप्रधान म्हणून घेतली शपथ,
वृत्तसंस्था
इस्लामाबाद, १८ ऑगस्ट –

Imran Khan 1

Imran Khan 1

पाकिस्तानचे २२ वे पंतप्रधान म्हणून इम्रान खान यांनी आज शनिवारी शपथ घेतली. क्रिकेटमधून निवृत्त होऊन २२ वर्षांपूर्वी राजकारणात आलेल्या इम्रानच्या हातात आज संपूर्ण पाकची सत्ता आली आहे.
राष्ट्राध्यक्ष मामनून हुसैन यांनी राष्ट्रपती भवनात आयोजित कार्यक्रमात आज सकाळी १० वाजून ४० मिनिटांनी इम्रान खान यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. इम्रान खान यांच्या पाकिस्तान तेहरिक-ए-इन्साफ पार्टीला सार्वत्रिक निवडणुकीत सर्वाधिक जागा मिळाल्या आहेत. शुक्रवारी या पक्षाने संसदेत १७८ सदस्यांच्या पाठबळासह आपले बहुमत सिद्ध केले होते.
सकाळी साडेनऊ वाजता शपथविधीचा कार्यक्रम सुरू होणार होता, पण ४० मिनिटे तो उशिरा सुरू झाला. राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सुरुवात झाली. यानंतर कुराणचे वाचन करण्यात आले. पंतप्रधानपदाची शपथ घेताना काही उर्दू शब्दांचा उच्चार करताना इम्रान खान अडखळत होते. यावेळी लष्करप्रमुख जनरल कमर बाजवा, काँगे्रसचे नेते नवज्योतसिंग सिद्धू, पाकचे माजी क्रिकेटपटू रमीझ राजा, वसीम अक्रम यांच्यासह अनेक अतिथी उपस्थित होते. सिद्धू यांनी इम्रानच्या स्तुतीत शेरोशायरीही केली.
‘पाकिस्तानसाठी आज नवी सकाळ झाली आहे. ही सकाळ पाकचे भवितव्य बदलविणार आहे. इम्रान खान यांच्या नेतृत्वात भारत आणि पाकमध्ये मैत्रीच्या नव्या पर्वाला सुरुवात होणार आहे,’ असे सिद्ध म्हणाले.
सदिच्छा दूत म्हणून आलो
सिद्धू यांनी पाकच्या नव्या पंतप्रधानांकरिता भेट म्हणून काश्मिरी शाल नेली. भारताचा सदिच्छादूत म्हणून आपण पाकसाठी प्रेमाचा संदेश घेऊन आल्याचे त्यांनी सांगितले. मित्राच्या आमंत्रणामुळे येथे आलो. माझ्यासाठी हा क्षण खुप खास आहे. खेळाडू आणि कलाकार दोन देशांमधील मतभेद मिटवतात, असेही ते म्हणाले.
जन. बाजवाशी सिद्धूची गळाभेट
शपथविधी सोहळा सुरू होण्याआधी सिद्धू यांनी पाकचे लष्करप्रमुख जन. कमर बाजवा यांची गळाभेट घेतली. भारताविरोधात दहशतवादी कारवायांना सातत्याने प्रोत्साहन देणार्‍या पाकी लष्करप्रमुखांना सिद्धूंनी दिलेल्या अलिंगनामुळे काँग्रेसमध्ये अस्वस्थता पसरली आहे. एकीकडे पाकिस्तान भारतीय सीमेवर गोळीबार करीत आहे आणि तिकडे काँग्रेस नेते सिद्धू पाकच्या लष्कर प्रमुखांना झप्पी देत आहे, यावरून भारतात त्यांच्यावर टीकेची झोड उठली होती.
रशिद अल्वी म्हणतात…
काँग्रेसचे प्रवक्ते रशिद अल्वी यांनी सिद्धूंच्या कृतीवर नाराजी व्यक्त केली. सिद्धूंनी आमचा सल्ला घेतला असता तर आम्ही त्यांना पाकमध्ये जाऊ दिले नसते. ते मित्रत्वाच्या नात्याने तिथे गेले आहेत, पण मैत्री देशापेक्षा मोठी नाही. पाकी सैनिकांच्या गोळीबारात भारतीय जवान मारले जात आहेत. अशा स्थितीत सिद्धूंनी पाकच्या लष्करप्रमुखांची गळाभेट घेणे अतिशय चुकीचे आहे, असे अल्वी म्हणाले. यानंतर त्यांनी केंद्र सरकारवरही टीका केली. सरकारने परवानगी दिल्यामुळेच सिद्धू पाकला गेले. सरकारने त्यांना परवानगी नाकारायला हवी होती, असेही ते म्हणाले.
अरीफ अल्वी राष्ट्राध्यक्षपदाचे उमेदवार
इम्रान खान यांनी पंतप्रधानपदाची शपथ घेतल्यानंतर त्यांच्या पक्षाने डॉ. अरीफ अल्वी यांचे नाव पाकचे नवे राष्ट्राध्यक्षपदाचे उमेदवार म्हणून घोषित केले. ४ सप्टेंबर रोजी या पदासाठी निवडणूक होणार आहे. विद्यमान राष्ट्राध्यक्ष मामनून हुसैन यांचा कार्यकाळ ३१ ऑगस्ट रोजी पूर्ण होणार आहे.

Posted by : | on : 19 Aug 2018
Filed under : आंतरराष्ट्रीय, आशिया.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस
  • भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय
  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न
  • अमित पांघळला बॉक्सिंगचे सुवर्ण अमित पांघळला बॉक्सिंगचे सुवर्ण

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in आंतरराष्ट्रीय, आशिया (127 of 388 articles)


संशय वृत्तसंस्था वॉशिंग्टन, १८ ऑगस्ट - चीनची बॉम्बर विमाने पुढील काही दिवसांत अमेरिकन तळांवर हल्ला करू शकतात, असे अमेरिकेची सर्वोच्च ...

×