ads
ads
जेकेएलएफवर बंदी

जेकेएलएफवर बंदी

•फुटीरतावाद्यांवर मोदी सरकारचा आणखी एक वार, नवी दिल्ली, २२…

नरेंद्र मोदी वाराणसी, गांधीनगरहून अमित शाह उमेदवार

नरेंद्र मोदी वाराणसी, गांधीनगरहून अमित शाह उमेदवार

•राजनाथसिंह लखनौ •नितीन गडकरी नागपुरातून लढणार •भाजपाच्या १८४ उमेदवारांची…

विक्रमी मतांनी निवडून येईल : गडकरी

विक्रमी मतांनी निवडून येईल : गडकरी

नवी दिल्ली, २२ मार्च – आगामी लोकसभा निवडणुकीत मी…

भारतावर पुन्हा हल्ला केला तर महागात पडेल

भारतावर पुन्हा हल्ला केला तर महागात पडेल

•अमेरिकेचा पाकिस्तानला इशारा, वॉशिंग्टन, २२ मार्च – पुलवामा हल्ला…

सहा महिन्यांत नीरवचे प्रत्यार्पण

सहा महिन्यांत नीरवचे प्रत्यार्पण

•भारतीय तपास यंत्रणांना विश्‍वास, लंडन, २२ मार्च – पंजाब…

नीरवला अटक; मोदी सरकारच्या प्रयत्नांना यश

नीरवला अटक; मोदी सरकारच्या प्रयत्नांना यश

•स्कॉटलंड यार्डची कारवाई, लंडन, २० मार्च – पंजाब नॅशनल…

रणजितसिंह मोहिते पाटील भाजपात

रणजितसिंह मोहिते पाटील भाजपात

•रणाआधीच भाजपाची जीत, मुंबई, २० मार्च – सोलापूर जिल्ह्यातील…

दाऊद शरण यायला तयार होता, पवारांनी दुर्लक्ष केले

दाऊद शरण यायला तयार होता, पवारांनी दुर्लक्ष केले

•प्रकाश आंबेडकरांचा गंभीर आरोप, मुंबई, १९ मार्च – कुख्यात…

शेतकर्‍यांना सर्वाधिक मदत युती सरकारच्या काळात

शेतकर्‍यांना सर्वाधिक मदत युती सरकारच्या काळात

•मुख्यमंत्री फडणवीस यांची स्पष्टोक्ती, औरंगाबाद, १७ मार्च – काँगे्रसप्रणित…

१७ व्या लोकसभेचा महाकुंभ!

१७ व्या लोकसभेचा महाकुंभ!

॥ विशेष : सुधीर पाठक | १७ व्या लोकसभेसाठीचा…

निवडणुकीपूर्वीच महागठबंधनाचा बँडबाजा

निवडणुकीपूर्वीच महागठबंधनाचा बँडबाजा

॥ सारांश : ल.त्र्यं. जोशी | महागठबंधन याचा अर्थच…

जबरदस्त तडाखा कसा द्यायचा आम्ही जाणतो!

जबरदस्त तडाखा कसा द्यायचा आम्ही जाणतो!

॥ रोखठोक : हितेश शंकर | पुलवामातील दहशतवादी हल्ल्यात…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:28 | सूर्यास्त: 18:36
अयनांश:
Home » अमेरिका, आंतरराष्ट्रीय » पाकला काश्मीरचे तुणतुणे वाजवू द्या : भारत

पाकला काश्मीरचे तुणतुणे वाजवू द्या : भारत

►सुषमा स्वराज घेणार ३० द्विपक्षीय बैठका,
वृत्तसंस्था
न्यू यॉर्क, २४ सप्टेंबर –

Uno

Uno

संयुक्त राष्ट्रसंघाच्या याच आठवड्यात होणार्‍या ७३ व्या आमसभेत पाकिस्तानला नेहमीप्रमाणे काश्मीरचे तुणतुणे वाजवू द्या. तसेही पाकजवळ काश्मीरशिवाय दुसरा मुद्दा नाही. हे जागतिक व्यासपीठ कोणत्याही द्विपक्षीय मुद्याला प्राधान्य देत नाही, त्यामुळे काश्मीरप्रश्‍नी पाकला नेहमीप्रमाणेच उत्तर मिळणार आहे, अशी स्पष्ट भूमिका भारताने आज सोमवारी विशद केली.
संयुक्त राष्ट्रसंघाच्या आमसभेत केवळ जागतिक मुद्यांनाच प्राधान्य दिले जाते. भारताने आजवर नेहमीच या व्यासपीठावर केवळ जागतिक मुद्देच उपस्थित केले आहे, तिथेच पाकने मात्र प्रत्येक वर्षी फक्त काश्मीरचा राग आळवला आहे. प्रत्येक देश सार्वभौम आहे आणि त्यानुसार त्यांच्या मनात जे येईल, तो मुद्दा उपस्थित करण्याचा त्यांना अधिकार आहे, असे भारताचे येथील स्थायी राजदूत सय्यद अकबरुद्दिन यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.
काही देशांना फक्त एकाच मुद्यावर खिळून राहण्याची सवय झाली असते. पाकचेही तसेच आहे. त्या देशाला काश्मीरशिवाय दुसरे काहीच दिसत नाही. एकाच मुद्यावर रडगाणे गाण्यात ते धन्यता मानत असतात. यावेळी पाककडून आम्हाला अशीच अपेक्षा आहे. त्यांना त्यांचे काम करू द्या, आम्ही आपले काम करणार आहोत, असे त्यांनी स्पष्ट केले.
सुषमा स्वराज घेणार ३० द्विपक्षीय बैठका; संयुक्त राष्ट्राच्या आमसभेत व्यस्त कार्यक्रम
याच आठवड्याच्या अखेरीस सुरू होत असलेल्या संयुक्त राष्ट्रसंघाच्या आमसभेच्या काळात भारताच्या परराष्ट्र व्यवहार मंत्री सुषमा स्वराज अतिशय व्यस्त राहणार आहेत. सार्क आणि ब्रिक्स यासारख्या राष्ट्रसमुहाच्या बैठकांमध्ये उपस्थित राहण्यासोबतच अन्य देशांतील समपदस्थांसह त्या सुमारे ३० द्विपक्षीय बैठका घेणार आहेत.
७३ व्या आमसभेसाठी सुषमा स्वराज येत्या शनिवारी न्यू यॉर्क येथे दाखल होणार आहेत. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सोमवारी आयोजित केलेल्या मादकद्रव्यविरोधी बैठकीत त्या सहभागी होणार आहेत. मादक द्रव्यांच्या तस्करांवर जागतिक कारवाई करण्याचे आवाहन या बैठकीतून करण्यात येणार असून, सुमारे १२० सदस्य राष्ट्रांचे प्रतिनिधी यात उपस्थित राहणार आहेत.
या एक आठवड्याच्या काळात सुषमा स्वराज यांच्यासोबत द्विपक्षीय चर्चा करण्यासाठी ३० पेक्षा जास्त देशांच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांकडून विनंती प्राप्त झाली असून, स्वराज यांनी मान्य केली असल्याची माहिती परराष्ट्र व्यवहार मंत्रालयातील संयुक्त राष्ट्र विभागाचे अतिरिक सचिव दिनेश पटनायक यांनी येथील भारतीय दूतावासात पत्रकारांशी बोलताना दिली.
नेल्सन मंडेला शांतता परिषदेतही स्वराज उपस्थित राहणार आहेत. याशिवाय, दक्षिण आफ्रिकेचे राष्ट्राध्यक्ष सीरिल रामाफोसा यांच्यातर्फे सोमवारी आयोजित स्वागत समारंभातही त्या सहभागी होतील. पर्यावरणातील बदलावर होणार्‍या परिषदेला संबोधित करण्यासोबतच अलिप्त राष्ट्र चळवळ अर्थात् नामच्या पॅलेस्टाईन येथे आयोजित बैठकीतही त्या उपस्थित राहणार आहेत. २७ सप्टेंबर रोजी सार्कची बैठक होणार असून, या बैठकीतही त्या सहभागी होतील, असे पटनायक यांनी सांगितले.

Posted by : | on : 25 Sep 2018
Filed under : अमेरिका, आंतरराष्ट्रीय.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास
  • हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस
  • भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय
  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in अमेरिका, आंतरराष्ट्रीय (170 of 457 articles)


२० सप्टेंबर - आम्ही दहशतवादाचे पाठीराखे नाहीत, असा वारंवार दावा करणार्‍या पाकिस्तानचा खोटारडेपणा पुन्हा एकदा उघडकीस आला आहे. २०१६ मध्ये ...

×