ads
ads
नक्षल समर्थकांच्या पत्रातील ‘तो’ क्रमांक दिग्विजयसिंहांचाच

नक्षल समर्थकांच्या पत्रातील ‘तो’ क्रमांक दिग्विजयसिंहांचाच

►पुणे पोलिसांची पुष्टी, चौकशी होणार, पुणे, १९ नोव्हेंबर –…

अटकाने, लटकाने, भटकानेवाल्या संस्कृतीमुळे देशाचे नुकसान

अटकाने, लटकाने, भटकानेवाल्या संस्कृतीमुळे देशाचे नुकसान

►पंतप्रधान मोदी यांचा जोरदार पलटवार, नवी दिल्ली, १९ नोव्हेंबर…

आरबीआय मंडळाची नऊ तास वादळी बैठक

आरबीआय मंडळाची नऊ तास वादळी बैठक

►अनेक मुद्यांवर समझोत्याचे संकेत, मुंबई, १९ नोव्हेंबर – केंद्र…

काश्मीर पाकिस्तानचेच शाहिद आफ्रिदीची सारवासारव

काश्मीर पाकिस्तानचेच शाहिद आफ्रिदीची सारवासारव

इस्लामाबाद, १८ नोव्हेंबर – पाकिस्तानमधील राज्यकर्त्यांना देशाचा भाग असलेले…

अमेरिका भारताला देणार २४ पाणबुडीभेदी हेलिकॉप्टर्स

अमेरिका भारताला देणार २४ पाणबुडीभेदी हेलिकॉप्टर्स

►२०० अब्ज डॉलर्सचा व्यवहार, वॉशिंग्टन, १७ नोव्हेंबर – चीन…

मल्ल्यासाठी तिहारच योग्य

मल्ल्यासाठी तिहारच योग्य

►ब्रिटनच्या न्यायालयाचे शिक्कामोर्तब, लंडन, १७ नोव्हेंबर – सार्वजनिक आणि…

विधानसभा कामकाजास ‘वंदे मातरम’ने सुरुवात

विधानसभा कामकाजास ‘वंदे मातरम’ने सुरुवात

मुंबई, १९ नोव्हेंबर – महाराष्ट्र विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनाच्या कामकाजास…

मराठा आरक्षणावर उद्या हायकोर्टात सुनावणी

मराठा आरक्षणावर उद्या हायकोर्टात सुनावणी

मुंबई, १९ नोव्हेंबर – मराठा आरक्षणाचा प्रश्‍न तातडीने निघाली…

मराठा समाजाला स्वतंत्र प्रवर्गात आरक्षण

मराठा समाजाला स्वतंत्र प्रवर्गात आरक्षण

►अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला मुख्यमंत्री फडणवीस यांची घोषणा ►मागासवर्ग आयोगाच्या तिन्ही…

तापमानवाढीचा धोका वाढतोय

तापमानवाढीचा धोका वाढतोय

॥ विशेष : अ‍ॅड. गिरीश राऊत | विकास पृथ्वीची…

अपनी अकल लगाओ!

अपनी अकल लगाओ!

॥ मानसरंग : मयुरेश डंके | गेटवे ऑफ इंडिया,…

राफेल सुनावणी : अर्धे नुकसान, अर्धा फायदा

राफेल सुनावणी : अर्धे नुकसान, अर्धा फायदा

॥ सारांश : ल.त्र्यं. जोशी | एक बाब मात्र…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:36 | सूर्यास्त: 17:48
अयनांश:
Home » अमेरिका, आंतरराष्ट्रीय » मानवतेच्या कल्याणासाठी हिंदूंची एकजूट आवश्यक

मानवतेच्या कल्याणासाठी हिंदूंची एकजूट आवश्यक

►वर्चस्व गाजवणे हिंदूंचा स्वभाव नाही •
►दुसर्‍या जागतिक हिंदू संमेलनात सरसंघचालकांचे प्रतिपादन,
वृत्तसंस्था
शिकागो, ८ सप्टेंबर –

Mohan Bhagwat World Hindu Chicago

Mohan Bhagwat World Hindu Chicago

इतरांवर वर्चस्व गाजवणे हा हिंदूंचा स्वभाव नाही. जगाला सुंदर बनविणे, हेच हिंदू समाजाचे कर्तव्य आहे, असे स्पष्ट करताना, हिंदू समाजाला मूळ सिद्धांत आणि आध्यात्मिकतेचा विसर पडल्यानेच गेल्या हजारो वर्षांपासून हिंदूंचे शोषण होत आहे. समाजाची प्रगती करायची असेल, तर जगभरातील हिंदूंनी एकत्र येऊन मानवजातीच्या उत्थानासाठी स्वत:ला वाहून घ्यावे, असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांनी येथे केले.
अमेरिकेतील शिकागो येथे स्वामी विवेकानंद यांच्या ऐतिहासिक भाषणाला ११ सप्टेंबर रोजी १२५ वर्षे पूर्ण होणार आहेत. यानिमित्त शिकागो येथे शुक्रवारी आयोजित विश्‍व हिंदू संमेलनात सरसंघचालक मार्गदर्शन करीत होते. आपल्याजवळ ज्ञान आणि विवेक भरपूर आहे; पण एकत्र येऊन कसे कार्य करायला हवे, नेमक्या याच सिद्धांताचा आपल्याला विसर पडला आहे. जगातील सर्वच समाजांचा विचार केल्यास सर्वाधिक प्रतिभावान लोक हिंदू समाजात आहेत. पण ते कधीच एकत्र येत नाहीत, असे डॉ. मोहनजी भागवत यांनी सुमारे २५०० प्रतिनिधींची उपस्थिती असलेल्या या संमेलनात सांगितले.
सरसंघचालक म्हणाले की, हिंदू एकत्र आले तरच हिंदू समाजाची भरभराट आणि प्रगती होऊ शकते. आम्हाला कुणावरही वर्चस्व गाजविण्याची मुळीच इच्छा नाही. साध्या कीटकालाही ठार मारायचे नाही तर त्यावर नियंत्रण मिळवायचे, हीच हिंदू धर्माची शिकवण आहे. इतर लोक हिंदूंचा विरोध करीत असले तरी दुसर्‍यांचा विरोध करण्याची हिंदूंची मानसिकता नाही. विरोध करणार्‍याला कुठलीही इजा न पोहोचविता, त्याला प्रभावित करणे हिंदुत्व विचारांनी सहज शक्य होऊ शकते.
आपण गुलामगिरीत वावरणार्‍या समाजाचा भाग नाही आणि आपला समाज मागासलेलाही नाही. देशभरातील गरिबांची काळजी हिंदू घेत असतो. आपण सर्व तेच करीत आहोत. या जगात अस्पृश्य काहीच नाही. प्रत्येक कार्य हे सिद्धांत आणि तत्त्वाशी निगडित असायला हवे, असे विचारही मोहनजींनी मांडले.
हिंदू समाजातील ऐक्याच्या अभावावर चिंता व्यक्त करताना ते म्हणाले, हा समाज आजवर कधीच एकत्र येऊ शकला नाही आणि हिंदूंनी एकत्र येणे ही तर आजच्या काळातील कठीण बाब झालेली आहे. आदर्शवादाची भावना असणे, ही फार चांगली गोष्ट आहे. मी स्वत: देखील आधुनिकतेच्या विरोधात नाही, तर भविष्याचा समर्थक आहे. हिंदू धर्म हा प्राचीन असला तरी आधुनिकतेची कास धरणारा आहे, असे सरसंघचालकांनी स्पष्ट केले.
आपल्या अहंकारावर नियंत्रण प्राप्त करून परिणाम स्वीकारण्यासाठी स्वत:ला तयार ठेवणे, हाच संपूर्ण जगाला एकत्रित ठेवण्याचा महत्त्वाचा सिद्धांत आहे, असे सांगताना त्यांनी महाभारतातील एक उदाहरण दिले. भगवान श्रीकृष्ण आणि धर्मराज युद्धिष्ठिर यांच्यात कधीच मतभेद नव्हते, याकडे लक्ष वेधले.
या संमेलनात ज्येष्ठ अभिनेते अनुपम खेर आणि अन्य मान्यवर उपस्थित होते. यावेळी अनुपम खेर म्हणाले की, मी देखील हिंदू आहे आणि अर्धवट ज्ञान व दुर्लक्षितपणामुळे जगातील हा सर्वात जुना आणि शांततेचा संदेश देणारा धर्म उद्ध्वस्त करण्याचा जो प्रयत्न होत आहे, हे बघून मला दु:ख होते. सहिष्णुता हा स्वामी विवेकानंदांनी दिलेला मंत्र आहे. आजही काश्मिरी पंडित २८ वर्षांपासून आपल्याच देशात विस्थापितांचे जीवन जगत आहेत आणि तरीही ते सहिष्णु आहेत, याकडे त्यांनी संमेलनाचे लक्ष वेधले. तसेच, या संमेलनाचे समन्वयक अभय अस्थाना म्हणाले की, हा काही इव्हेंट नव्हे, ही एक सामाजिक चळवळ आहे. या चळवळीला संपूर्ण जगातील हिंदूंनी अत्युच्च शिखरावर गुणवैशिष्ट्यांसह नेले पाहिजे.
संमेलनाध्यक्ष कोठारी
विश्‍व हिंदू संमेलनाचे अध्यक्ष एस. पी. कोठारी आपले विचार मांडताना म्हणाले, काही लोकांनी या संमेलनाला विरोध दर्शविला. त्यांचे म्हणणे होते की, यातील काही आयोजक हे सामाजिक आणि धार्मिक विघटनवादी असल्याने अनेक प्रतिनिधींना त्यांनी सांगितले की, या संमेलनाला जाऊ नये. माझे त्यांना सांगणे होते की, आधी माझे भाषण ऐका आणि ते घृणा पसरविणारे आहे काय, हे पहा. आम्ही त्यांची मागणी फेटाळून लावली. विश्‍व हिंदू संमेलनाची आणि त्यात सहभागी होणार्‍या संघटनांची त्यांना संपूर्ण माहिती नसल्यानेच ते अशा प्रकारची भूमिका विशद करीत होते, असे त्यांनी स्पष्ट केले. प्रजासत्ताक सुरिनामचे उपराष्ट्राध्यक्ष अश्‍वनी अधिन म्हणाले की, आम्ही हिंदू या नात्याने आमचे मिशन कदापि त्यागणार नाही. हिंदू हे नेहमी त्याग आणि सेवेचे मिशनरी राहिले आहेत. शांतता, परस्पर सद्भाव आणि अध्यात्म हे शब्द सामान्य जनांच्या गळी लवकर उतरत नसल्याने हिंदू समाजाने त्यांना योग्य मार्गाने घेऊन जाण्याची जबाबदारी पार पाडायची आहे. जनतेच्या मनात हे शब्द रुजविण्याची गरज आहे.

Posted by : | on : 9 Sep 2018
Filed under : अमेरिका, आंतरराष्ट्रीय.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न
  • अमित पांघळला बॉक्सिंगचे सुवर्ण अमित पांघळला बॉक्सिंगचे सुवर्ण
  • तेजिंदरपालला सुवर्णपदक तेजिंदरपालला सुवर्णपदक
  • महाराष्ट्राच्या राहीचा सुवर्णभेद महाराष्ट्राच्या राहीचा सुवर्णभेद

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in अमेरिका, आंतरराष्ट्रीय (65 of 409 articles)

Arif Alvi
इस्लामाबाद, ५ सप्टेंबर - राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीत डॉ. आरिफ अल्वी यांच्या विजयाची औपचारिक घोषणा पाकिस्तानच्या निवडणूक आयोगाने केली आहे. या निवडणुकीत ...

×