ads
ads
भारत-पाक चर्चा रद्द

भारत-पाक चर्चा रद्द

►इम्रान सरकारचाही खरा चेहरा दिसला ►भारताचा स्पष्ट आरोप, वृत्तसंस्था…

शहरी नक्षलवादाला राहुल गांधींचा पाठिंबा

शहरी नक्षलवादाला राहुल गांधींचा पाठिंबा

►अमित शाह यांचा आरोप, वृत्तसंस्था रायपूर, २१ सप्टेंबर –…

तोयबाच्या पाच अतिरेक्यांचा खातमा

तोयबाच्या पाच अतिरेक्यांचा खातमा

►भारतीय जवानांची मोठी कामगिरी, वृत्तसंस्था श्रीनगर, २१ सप्टेंबर –…

बुरहान वाणीवर पाकने काढले टपाल तिकीट

बुरहान वाणीवर पाकने काढले टपाल तिकीट

इस्लामाबाद, २० सप्टेंबर – आम्ही दहशतवादाचे पाठीराखे नाहीत, असा…

जैश, तोयबापासून भारताला मोठा धोका

जैश, तोयबापासून भारताला मोठा धोका

►पाकने उपलब्ध केली सुरक्षित भूमी ►अमेरिकेची स्पष्ट भूमिका, वृत्तसंस्था…

वैमानिकाने कौशल्याने ३७० प्रवाशांना वाचविले

वैमानिकाने कौशल्याने ३७० प्रवाशांना वाचविले

►एअर इंडियाच्या विमानातील इंधन आले होते संपत ►अमेरिकेच्या वादळाचाही…

डीजे, डॉल्बीवर बंदी कायम

डीजे, डॉल्बीवर बंदी कायम

वृत्तसंस्था मुंबई, २१ सप्टेंबर – मुंबई उच्च न्यायालयाने डॉल्बीवरील…

वित्त आयोगाने राज्याला आर्थिक शक्ती प्रदान करावी

वित्त आयोगाने राज्याला आर्थिक शक्ती प्रदान करावी

►सुधीर मुनगंटीवार यांची मागणी, तभा वृत्तसेवा मुंबई, २० सप्टेंबर…

वित्त आयोगाकडून अर्थव्यवस्थेवर आधी चिंता, नंतर प्रशस्तीपत्रक

वित्त आयोगाकडून अर्थव्यवस्थेवर आधी चिंता, नंतर प्रशस्तीपत्रक

तभा वृत्तसेवा – मुंबई, २० सप्टेंबर राज्याच्या अर्थव्यवस्थेबाबत दोनच…

रा.स्व.संघ : हिंदुबंधुत्वापासून विश्‍वबंधुत्वापर्यंत

रा.स्व.संघ : हिंदुबंधुत्वापासून विश्‍वबंधुत्वापर्यंत

॥ सारांश : ल.त्र्यं. जोशी | संघस्थापनेपासूनचा हा धावता…

साद समाजपुरुषाची!

साद समाजपुरुषाची!

॥ संवाद : सोमनाथ देशमाने | स्वातंत्र्यदिनाच्या दिवशी लाल…

गॉड आणि सैतान

गॉड आणि सैतान

॥ जागता पहारा : भाऊ तोरसेकर | कठुआ, उन्नाव…

मोरूच्या मावशीची ‘एक्झिट’

मोरूच्या मावशीची ‘एक्झिट’

मुंबईच्या गिरणगावाने अनेक कलाकार रंगभूमी आणि रुपेरी पडद्याला दिले,…

‘सिमरन’मधील नवीन गाणे प्रदर्शित

‘सिमरन’मधील नवीन गाणे प्रदर्शित

अभिनेत्री कंगना राणावत लवकरच सिमरन या चित्रपटाद्वारे प्रेक्षकांच्या भेटीला…

चिरंजीवीसोबत सिनेमा करण्यास ऐश्‍वर्याचा नकार?

चिरंजीवीसोबत सिनेमा करण्यास ऐश्‍वर्याचा नकार?

ऐश्‍वर्या राय बच्चनची सध्या बॉलीवूडमध्ये सेकंड इनिंग सुरू आहे.…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:16 | सूर्यास्त: 18:21
अयनांश:
Home » अमेरिका, आंतरराष्ट्रीय » युनोचे माजी महासचिव कोफी अन्नान कालवश

युनोचे माजी महासचिव कोफी अन्नान कालवश

वृत्तसंस्था
संयुक्त राष्ट्रसंघ, १८ ऑगस्ट –

Kofi Annan

Kofi Annan

संयुक्त राष्ट्रसंघाचे माजी महासचिव आणि शांततेच्या नोबेल पुरस्काराचे मानकरी कोफी अन्नान यांचे आज शनिवारी अल्पआजाराने निधन झाले. ते ८० वर्षांचे होते. त्यांच्या निधनावर जगभरातील नेत्यांनी दु:ख व्यक्त केले आहे.
गेल्या काही दिवसांपासून कोफी अन्नान वृद्धापकाळाशी संबंधित आजारांनी ग्रस्त होते. त्यांच्यावर येथील रुग्णालयात उपचार सुरू होते. आज सकाळी त्यांची प्राणज्योत मालवली, अशी माहिती त्यांच्या कुटुंबीय सदस्यांनी व अन्नान फाऊंडेशनच्या पदाधिकार्‍यांनी दिली.
१९६२ ते १९७४ आणि १९७४ ते २००६ इतका प्रदीर्घ काळ ते संयुक्त राष्ट्रात कार्यरत होते. ८ एप्रिल १९३८ रोजी गोल्ड कोस्ट म्हणजेच आताचा घाना या देशात त्यांचा जन्म झाला होता. १९७७ मध्ये कोफी अन्नान यांनी संयुक्त राष्ट्रसंघाच्या विविध संघटनांमध्ये समन्वय राखण्यासाठी संयुक्त राष्ट्र विकास समूहाची स्थापना केली होती.
कोफी अन्नान यांना २००१ मध्ये शांततेच्या नोबेल पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. १९६२ मध्ये कोफी अन्नान यांनी जागतिक आरोग्य संघटनेत बजेट अधिकारी म्हणून कारकीर्द सुरू केली. या पदावर ते तीन वर्षे कार्यरत होते. १९६५ ते १९७२ या कालावधीत त्यांनी इथियोपियाची राजधानी असलेल्या अद्दिस अबाबा येथे संयुक्त राष्ट्रसंघाच्या इकॉनॉमिक कमिशन फॉर आफ्रिकेसाठी काम केले. अन्नान यांनी जागतिक स्तरावर शांतता प्रस्थापित करण्यावर लक्ष केंद्रित केले आणि त्यासाठीच आपले आयुष्य वेचले. याशिवाय गरिबीचे उच्चाटन कसे करता येईल, गरीब जनतेला समाजाच्या मुख्य प्रवाहात कसे आणता येईल, हा उद्देश समोर ठेवून त्यांनी समाजकार्य केले.
संयुक्त राष्ट्रसंघाचे महासचिवपद म्हणजे, जगातील सर्वात मोठा राजनयिक अधिकारी असेच आहे या पदावर विराजमान होणारे कोफी अन्नान हे पहिले कृष्णवर्णीय आफ्रिकन व्यक्ती ठरले आहेत. १९९७ ते २००६ या काळात ते संयुक्त राष्ट्रसंघाचे महासचिव होते. यानंतर त्यांनी सीरियातील संयुक्त राष्ट्राचे विशेष दूत म्हणूनही यशस्वी कामगिरी पार पाडली होती. त्यांच्या प्रयत्नामुळेच शांततापूर्ण तोडगा निघणे शक्य झाले होते.
गुटेरस यांना दु:ख
संयुक्त राष्ट्रसंघाचे विद्यमान महासचिव अ‍ॅन्टोनियो गुटेरस यांनी अन्नान यांच्या निधनावर दु:ख व्यक्त केले आहे. ते संपूर्ण जगासाठीच मार्गदर्शक तत्त्व होते. त्यांच्या निधनाने मला फार मोठा धक्का बसला, असे गुटेरस यांनी जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे.
पंतप्रधान मोदींना दु:ख
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोफी अन्नान यांच्या निधनावर दु:ख व्यक्त केले आहे. सदैव मानवतावादी दृष्टिकोनातून जगाच्या समस्या सोडविण्यावर अन्नान यांनी भर दिला आहे. आंतरराष्ट्रीय शांतता व सुरक्षेविषयी ते नेहमीच जागरूक असायचे. जागतिक शांततेतील योगदानासाठी ते नेहमीच स्मरणात राहणार आहेत. त्यांच्या परिवाराच्या दु:खात मी सहभागी आहे, असे मोदी यांनी आपल्या शोकसंदेशात म्हटले आहे.

Posted by : | on : Aug 19 2018
Filed under : अमेरिका, आंतरराष्ट्रीय.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in अमेरिका, आंतरराष्ट्रीय (24 of 494 articles)

Sushma Swaraj1
स्वराज यांचे प्रतिपादन ►जागतिक हिंदी संमेलनाला सुरुवात, पोर्ट लुईस, १८ ऑगस्ट - भाषा आणि संस्कृती परस्परांशी संलग्न असल्याने हिंदीचे तिच्या ...

×