ads
ads
कायद्याने राममंदिर मान्य!

कायद्याने राममंदिर मान्य!

►मुस्लिम पक्षकार अन्सारीची भूमिका, अयोध्या, २० नोव्हेंबर – अयोध्येतील…

एकाला फाशी, दुसर्‍याला जन्मठेप

एकाला फाशी, दुसर्‍याला जन्मठेप

►१९८४ मधील शीखनरसंहार; ३४ वर्षांनंतर निकाल, नवी दिल्ली, २०…

भक्तांची श्रद्धा चिरडू देणार नाही : अमित शाह

भक्तांची श्रद्धा चिरडू देणार नाही : अमित शाह

नवी दिल्ली, २० नोव्हेंबर – स्वामी अय्यप्पांच्या भक्तांशी केरळ…

काश्मीर पाकिस्तानचेच शाहिद आफ्रिदीची सारवासारव

काश्मीर पाकिस्तानचेच शाहिद आफ्रिदीची सारवासारव

इस्लामाबाद, १८ नोव्हेंबर – पाकिस्तानमधील राज्यकर्त्यांना देशाचा भाग असलेले…

अमेरिका भारताला देणार २४ पाणबुडीभेदी हेलिकॉप्टर्स

अमेरिका भारताला देणार २४ पाणबुडीभेदी हेलिकॉप्टर्स

►२०० अब्ज डॉलर्सचा व्यवहार, वॉशिंग्टन, १७ नोव्हेंबर – चीन…

मल्ल्यासाठी तिहारच योग्य

मल्ल्यासाठी तिहारच योग्य

►ब्रिटनच्या न्यायालयाचे शिक्कामोर्तब, लंडन, १७ नोव्हेंबर – सार्वजनिक आणि…

मराठा आरक्षणावरून विरोधकांमध्ये फूट

मराठा आरक्षणावरून विरोधकांमध्ये फूट

मुस्लिम आरक्षणावरून सभागृहात गदारोळ, राजदंड पळवला, मुंबई, २० नोव्हेंबर…

विधानसभा कामकाजास ‘वंदे मातरम’ने सुरुवात

विधानसभा कामकाजास ‘वंदे मातरम’ने सुरुवात

मुंबई, १९ नोव्हेंबर – महाराष्ट्र विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनाच्या कामकाजास…

मराठा आरक्षणावर उद्या हायकोर्टात सुनावणी

मराठा आरक्षणावर उद्या हायकोर्टात सुनावणी

मुंबई, १९ नोव्हेंबर – मराठा आरक्षणाचा प्रश्‍न तातडीने निघाली…

तापमानवाढीचा धोका वाढतोय

तापमानवाढीचा धोका वाढतोय

॥ विशेष : अ‍ॅड. गिरीश राऊत | विकास पृथ्वीची…

अपनी अकल लगाओ!

अपनी अकल लगाओ!

॥ मानसरंग : मयुरेश डंके | गेटवे ऑफ इंडिया,…

राफेल सुनावणी : अर्धे नुकसान, अर्धा फायदा

राफेल सुनावणी : अर्धे नुकसान, अर्धा फायदा

॥ सारांश : ल.त्र्यं. जोशी | एक बाब मात्र…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:36 | सूर्यास्त: 17:48
अयनांश:
Home » आंतरराष्ट्रीय, आशिया » राजापक्ष यांनी पंतप्रधानपदाची सूत्रे स्वीकारली

राजापक्ष यांनी पंतप्रधानपदाची सूत्रे स्वीकारली

श्रीलंकेतील घडामोडींना पुन्हा नवे वळण,
कोलंबो, २९ ऑक्टोबर –

Sri Lanka Map

Sri Lanka Map

श्रीलंकन संसदेचे अध्यक्ष कारू जयसूर्या यांनी रानिल विक्रमासिंगे हेच पंतप्रधान असल्याचा निर्वाळा दिल्यानंतरही राष्ट्राध्यक्ष मैत्रिपाला सीरिसेना यांनी नियुक्त केलेले महिंदा राजापक्ष यांनी आज सोमवारी पंतप्रधान म्हणून पदभार स्वीकारला. यामुळे श्रीलंकेतील राजकीय पेचाला नवे वळण मिळाले आहे.
राजापक्ष यांनी पंतप्रधान कार्यालयातील सचिवालयात जाऊन पदाची सूत्रे हाती घेतली. राष्ट्राध्यक्ष सीरिसेना यांनी गेल्या शुक्रवारी रात्री उशिरा विक्रमासिंगे यांची पंतप्रधानपदावरून हकालपट्टी करीत, राजापक्ष यांना या पदावर नियुक्त केले होते. यावर आक्षेप घेत विक्रमासिंगे यांनी सरकारचे बहुमत सिद्ध करण्यासाठी संसदेचे विशेष अधिवेशन बोलावण्यात यावे, अशी मागणी केल्यानंतर सीरिसेना यांनी लगेच संसद १६ नोव्हेंबरपर्यंत निलंबित केली होती. रविवारी संसदेचे अध्यक्ष कारू जयसूर्या यांनी, विक्रमासिंगे हेच पंतप्रधान असल्याचा निर्वाळा देत, अध्यक्षांचे मत विचारात घेतल्याशिवाय संसद विसर्जित करता येत नाही, असे स्पष्ट केले होते.
काही मंत्र्यांचाही शपथविधी
दरम्यान, राजापक्ष यांनी पंतप्रधानपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर सायंकाळी त्यांचा शपथविधी पार पडला. त्यांच्यासोबत काही वरिष्ठ मंत्र्यांनीही पद व गोपनीयतेची शपथ घेतली.
श्रीलंकेची घटना काय सांगते
२०१५ मध्ये या देशाने स्वीकारलेल्या १९ व्या घटनेदुरुस्तीनुसार, राष्ट्राध्यक्षांना पंतप्रधानपदावरील व्यक्तीला तडकाफडकी बडतर्फ करण्याचा कुठलाही विशेषाधिकार नाही. मंत्रिमंडळ बरखास्त करण्यात आल्यानंतरच पंतप्रधानांना बडतर्फ केले जाऊ शकते. याशिवाय, संसद बहुमताने पंतप्रधानांना राजीनामा मागू शकते. राष्ट्राध्यक्ष केवळ पंतप्रधानांच्या शिफारसीवरून त्यांच्या मंत्रिमंडळातील मंत्र्याला हटवू शकतात. याशिवाय, सरकारने संसदेत आपले बहुमत गमावले असेल, तर त्या स्थितीत पंतप्रधानांकडील अधिकार काढले जाऊ शकतात, असेही घटनेत नमूद आहे.
मी अजूनही बहुमतात : विक्रमासिंगे
दरम्यान, संसदेत माझे सरकार अजूनही बहुमतात असल्याचा दावा विक्रमासिंगे यांनी केला. संसदेचे अधिवेशन बोलावण्याचा अध्यक्षांना अधिकार आहे आणि उद्या मंगळवारी ते याबाबतचा निर्णय घेण्याची शक्यता आहे, असेही ते म्हणाले.
रणतुंगा यांना अटक
श्रीलंकेत राजकीय अस्थिरता सुरू असतानाच पेट्रोलियम मंत्री अर्जुन रणतुंगा रविवारी आपल्या कार्यालयात गेले, झालेल्या निषेध आंदोलनात त्यांच्या अंगरक्षकाने गोळीबार केला होता. यात एकाच मृत्यू, तर अन्य दोघे जखमी झाले होते. या प्रकरणी रणतुंगा यांना पोलिसांनी आज अटक केली आहे.

Posted by : | on : 30 Oct 2018
Filed under : आंतरराष्ट्रीय, आशिया.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न
  • अमित पांघळला बॉक्सिंगचे सुवर्ण अमित पांघळला बॉक्सिंगचे सुवर्ण
  • तेजिंदरपालला सुवर्णपदक तेजिंदरपालला सुवर्णपदक
  • महाराष्ट्राच्या राहीचा सुवर्णभेद महाराष्ट्राच्या राहीचा सुवर्णभेद

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in आंतरराष्ट्रीय, आशिया (20 of 409 articles)

Hafiz Saeed
२७ ऑक्टोबर - २६/११ च्या मुंबई बॉम्बस्फोटाचा सूत्रधार आणि संयुक्त राष्ट्राने दहशतवादी म्हणून घोषित केलेल्या हाफिज सईदच्या पाकिस्तानातील संस्थांवरील बंदी ...

×