ads
ads
वढेरांची विदेशातही संपत्ती; ईडीला आढळले पुरावे

वढेरांची विदेशातही संपत्ती; ईडीला आढळले पुरावे

►काँग्रेसला जोरदार दणका, नवी दिल्ली, ८ डिसेंबर – काँग्रेसच्या…

पूर्णत्वाचे प्रमाणपत्र असलेल्या फ्लॅटसवर जीएसटी नाही

पूर्णत्वाचे प्रमाणपत्र असलेल्या फ्लॅटसवर जीएसटी नाही

►अर्थमंत्रालयाची घोषणा, खरेदीदारांना दिलासा, नवी दिल्ली, ८ डिसेंबर –…

घुसखोरांसाठी भारत धर्मशाळा नाही : अमित शाह

घुसखोरांसाठी भारत धर्मशाळा नाही : अमित शाह

नवी दिल्ली, ८ डिसेंबर – या देशातील प्रत्येक संसाधनांवर…

फ्रान्समधील आंदोलन पॅरिस हवामान कराराचीच परिणती

फ्रान्समधील आंदोलन पॅरिस हवामान कराराचीच परिणती

►डोनाल्ड ट्रम्प यांचा हल्ला, वॉशिंग्टन, ९ डिसेंबर – अमेरिकेचे…

भारत, अमेरिका संरक्षण क्षेत्रात जागतिक भागीदार

भारत, अमेरिका संरक्षण क्षेत्रात जागतिक भागीदार

►निर्मला सीतारामन यांच्या पाच दिवसांच्या दौर्‍याची सांगता, वॉशिंग्टन, ८…

तेल कपातीपूर्वी ओपेक घेणार नरेंद्र मोदींचा सल्ला

तेल कपातीपूर्वी ओपेक घेणार नरेंद्र मोदींचा सल्ला

►सौदी अरबचे तेलमंत्री खालिद अल फलिह यांची माहिती ►ट्रम्प…

दुष्काळ निवारणासाठी आठ हजार कोटी हवे

दुष्काळ निवारणासाठी आठ हजार कोटी हवे

►मुख्यमंत्री फडणवीस यांची केंद्राकडे मागणी, नवी दिल्ली, ७ डिसेंबर…

भाजपा-सेनेत ‘मिले सूर मेरा तुम्हारा’

भाजपा-सेनेत ‘मिले सूर मेरा तुम्हारा’

►मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरे यांच्या गाडीतून प्रवास •►दोन्ही नेत्यांचे नगारा…

मराठा आरक्षण कायद्याला स्थगिती नाही : उच्च न्यायालय

मराठा आरक्षण कायद्याला स्थगिती नाही : उच्च न्यायालय

►पुढील सुनावणी १० डिसेंबरला, मुंबई, ५ डिसेंबर – राज्यपालांच्या…

हिंदूंनी कुठपर्यंत प्रतीक्षा करायची?

हिंदूंनी कुठपर्यंत प्रतीक्षा करायची?

॥ विशेष : आशुतोष अडोणी | श्रीरामजन्मभूमीवरील भव्य मंदिर…

काँग्रेसमुक्त भारत अंतीम टप्प्यात!

काँग्रेसमुक्त भारत अंतीम टप्प्यात!

॥ संवाद : सोमनाथ देशमाने | राहुल भोवती संशयाचे…

उथळ पाण्याचा खळखळाट

उथळ पाण्याचा खळखळाट

॥ जागता पहारा : भाऊ तोरसेकर | ही जागरुकता…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:48 | सूर्यास्त: 17:51
अयनांश:
Home » अमेरिका, आंतरराष्ट्रीय » संयुक्त राष्ट्र मानवाधिकार परिषदेवर भारताचा मोठा विजय

संयुक्त राष्ट्र मानवाधिकार परिषदेवर भारताचा मोठा विजय

►तीन वर्षांचा राहणार कार्यकाळ,
संयुक्त राष्ट्रसंघ, १३ ऑक्टोबर –

Uno United Nations Building

Uno United Nations Building

संयुक्त राष्ट्र मानवाधिकार परिषदेवर नवीन सदस्यांच्या निवडीसाठी शुक्रवारी घेण्यात आलेल्या निवडणुकीत भारताने मोठा विजय प्राप्त केला आहे. आशिया-पॅसिफिक वर्गवारीत भारताला सर्वाधिक १८८ मते मिळाली. पुढील वर्षी १ जानेवारीपासून भारताचा सुरू होणारा कार्यकाळ तीन वर्षांसाठी राहणार आहे.
१९३ सदस्यीय संयुक्त राष्ट्राच्या आमसभेने मानवाधिकार परिषदेवर नव्या सदस्य देशांची निवड करण्यासाठी शुक्रवारी मतदान घेतले. यात १८ नवे सदस्य दणदणीत मताधिक्याने विजयी झाले. या परिषदेवर निवडून येण्यासाठी कोणत्याही देशाला किमान ९७ मते प्राप्त करणे आवश्यक असते. पाच प्रादेशिक वर्गवारीतून या निवडणुकीत एकूण १८ नव्या सदस्य देशांची निवड करण्यात आली आहे.
भारताने आशिया-पॅसिफिक गटातून या जागेसाठी अर्ज भरला होता. भारतासोबतच या गटातून बहरिन, बांगलादेश, फिजी आणि फिलिपाईन्स या देशांनीही अर्ज भरले होते. भारताची निवड आधीपासूनच निश्‍चित मानली जात होती. भारत यापूर्वी या परिषदेत २०११ ते २०१४ आणि २०१४ ते २०१७ या कालावधीत निवडून आला होता. भारताची शेवटची कारकीर्द ३१ डिसेंबर २०१७ रोजी संपली होती. सलग दोन कारकीर्दी पूर्ण झाल्या असल्याने भारताला नियमानुसार तातडीने निवडणूक लढविता आली नव्हती.
या ऐतिहासिक विजयानंतर भारताचे संयुक्त राष्ट्र संघातील स्थायी राजदूत सय्यद अकबरुद्दिन यांनी सर्व सदस्य देशांचे आभार मानताना, भारताच्या मोठ्या विजयाची माहिती दिली. या निवडणुकीत सर्व सदस्य देशांमध्ये भारताला सर्वाधिक मते मिळाली आहेत. आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताची भूमिका आणि महत्त्वच यातून सिद्ध होते, असे त्यांनी वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितले.
भारतापाठोपाठ फिजीला १८७, बांगलादेशला १७८ आणि बहरिन व फिलिपाईन्सला १६५ मते मिळाली आहेत. या सर्व नव्या सदस्य राष्ट्रांचा कार्यकाळ १ जानेवारीपासून सुरू होणार असून, तो तीन वर्षांचा राहणार आहे.

Posted by : | on : 14 Oct 2018
Filed under : अमेरिका, आंतरराष्ट्रीय.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न
  • अमित पांघळला बॉक्सिंगचे सुवर्ण अमित पांघळला बॉक्सिंगचे सुवर्ण
  • तेजिंदरपालला सुवर्णपदक तेजिंदरपालला सुवर्णपदक
  • महाराष्ट्राच्या राहीचा सुवर्णभेद महाराष्ट्राच्या राहीचा सुवर्णभेद

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in अमेरिका, आंतरराष्ट्रीय (48 of 429 articles)

Pakistan Map Flag
निर्मात्यांची मागणी, कराची, १३ ऑक्टोबर - भारतीय चित्रपटांवर पाकिस्तानात पूर्ण बंदी घालण्यात यावी, अशी मागणी पाकिस्तान चित्रपट निर्माता संघटनेने सरकारकडे ...

×