ads
ads
पाकला जाणारे पाणी रोखणार!

पाकला जाणारे पाणी रोखणार!

•व्यास, रावी, सतलज नद्यांतून जात होते •नितीन गडकरी यांची…

ईपीएफच्या व्याजदरात वाढ

ईपीएफच्या व्याजदरात वाढ

•चालू आर्थिक वर्षासाठी ८.६५ टक्के व्याज, नवी दिल्ली, २१…

वनजमिनींवरील अतिक्रमण सक्तीने काढण्याचे आदेश

वनजमिनींवरील अतिक्रमण सक्तीने काढण्याचे आदेश

•वनवासींचे दावे सर्वोच्च न्यायालयाने फेटाळले •राज्यातील साडेबावीस हजार कुटुंबांना…

बांगलादेशात गोदामाला आग

बांगलादेशात गोदामाला आग

•८१ मृत, ढाका, २१ फेब्रुवारी – बांगलादेशची राजधानी ढाकामधील…

पुलवामा हल्ला ही भयानक घटना : ट्रम्प

पुलवामा हल्ला ही भयानक घटना : ट्रम्प

•न्यूझीलंडच्या संसदेत हल्ल्याचा निषेध ठराव, वॉशिंग्टन, २० फेब्रुवारी –…

भारत-पाक तणावावर संयुक्त राष्ट्राची नाराजी

भारत-पाक तणावावर संयुक्त राष्ट्राची नाराजी

नवी दिल्ली, २० फेब्रुवारी – पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर भारत…

पुराव्यांच्या फोटो प्रती ग्राह्य नाहीत : उच्च न्यायालय

पुराव्यांच्या फोटो प्रती ग्राह्य नाहीत : उच्च न्यायालय

•मालेगावप्रकरणी एनआयएची कानउघडणी, मुंबई, २० फेब्रुवारी – गहाळ पुरावे…

‘मातोश्री’च्या स्वार्थासाठी केलेली युती

‘मातोश्री’च्या स्वार्थासाठी केलेली युती

•नारायण राणे यांचा आरोप, मुंबई, १९ फेब्रुवारी – शिवसेनेने…

भाजपा-सेना सगळ्या निवडणुका एकत्र लढणार

भाजपा-सेना सगळ्या निवडणुका एकत्र लढणार

•लोकसभेसाठी २५-२३ आणि विधानसभेसाठी समसमान जागावाटप •अखेर शिवसेना-भाजपा युतीवर…

राष्ट्रविकासाचा अर्थपूर्ण संकल्प

राष्ट्रविकासाचा अर्थपूर्ण संकल्प

॥ मानसरंग : मयुरेश डंके | २०१९ सालचा अर्थसंकल्प…

शककर्ते शिवराय

शककर्ते शिवराय

॥ प्रासंगिक : कुणाल नरसापूरकर | ‘स्वभावो दुरतिक्रम:’ असे…

मांजराची मुलायम पावले

मांजराची मुलायम पावले

॥ जागता पहारा : भाऊ तोरसेकर | भाजपाची मदत…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:50 | सूर्यास्त: 18:29
अयनांश:
Home » अमेरिका, आंतरराष्ट्रीय » सेल्फीच्या वेडापायी सात वर्षांत जगभरात २५९ मृत्यू

सेल्फीच्या वेडापायी सात वर्षांत जगभरात २५९ मृत्यू

वॉशिंग्टन, ७ ऑक्टोबर –

Selfi

Selfi

२०११ ते २०१७ या काळात सेल्फी घेण्याच्या नादात जगभरात २५९ लोकांनी आपला जीव गमावल्याचे एका जागतिक सर्वेक्षणातून स्पष्ट झाले आहे.
युएस नॅशनल लायब्ररी ऑफ मेडिसिनच्या संशोधकांनी धोकादायक स्थळांवर सेल्फी घेण्यास प्रतिबंध घालण्याची मागणी केली आहे. त्यात उंच पर्वत, गगनचुंबी इमारती, तलाव अशा ठिकाणांचा समावेश आहे. अशाच ठिकाणांवर सर्वाधिक मृत्यू झाले आहेत.
बुडून मृत्यू, वाहतुकीमुळे झालेले मृत्यू आणि उंचावरून पडून झालेले मृत्यू ही महत्त्वाची कारणे यामागे सांगितली जात आहेत. पण यात प्राण्यांच्या हल्ल्यात, विजेच्या धक्क्यात, गोळीबारात होणार्‍या मृत्यूंचे प्रमाणही बरेच होते.
यावर्षी जुलै महिन्यात १९ वर्षीय गॅविन झिमरमॅन ऑस्ट्रेलियातील साऊथ वेल्समध्ये एका कड्यावर सेल्फी घेत होता, तेव्हा त्याचा मृत्यू झाला. कॅलिफोर्नियातील योस्माईट नॅशनल पार्कमध्ये सप्टेंबर महिन्यात टोमेर फ्रँकफर्टर या इसमाचा मृत्यू झाला. सेल्फी घेण्याच्या नादात २५० मीटर अंतरावर तो खाली कोसळला. जानेवारी महिन्यात पालघर जिल्ह्यातील डहाणूच्या पारनाका किनार्‍यावर बोट उलटून झालेल्या अपघातात तीन विद्यार्थिनींचा मृत्यू झाला होता. सेल्फी काढण्याच्या नादात सगळे विद्यार्थी बोटीत एकीकडे आले नि बोट उलटली, अशी प्राथमिक माहिती हाती लागली होती. अशा प्रकारच्या बातम्या एकत्रित करून हे सर्वेक्षण करण्यात आले.
भारत, रशिया, अमेरिका आणि पाकिस्तान या देशांत सेल्फीमुळे होणार्‍या मृत्यूचे प्रमाण सर्वांत जास्त असल्याचे यात नमूद करण्यात आले असून मृतांपैकी पुरुषांचे प्रमाण ७२.५ टक्के असल्याचे म्हटले आहे. याआधी हे सर्वेक्षण विकिपीडिया आणि ट्विटरच्या माध्यमातून करण्यात आले होते. पण संशोधकांना त्यातून योग्य ते परिणाम मिळाले नव्हते.
नवीन सर्वेक्षणानुसार मृतांचा आकडा वाढल्याचेही समोर आले आहे. २०११ मध्ये हा आकडा फक्त तीन होता. २०१६ मध्ये हा आकडा ९८ होता तर २०१७ मध्ये हाच आकडा ९३ होता.
पण संशोधकांच्या मते हा आकडा जास्त असू शकतो. सेल्फी हे मृत्यूचे कारण असू शकते, हे तेव्हा कुणीही ध्यानात घेत नव्हते. सेल्फीमुळे होणारे मृत्यू फारसे कुणी ध्यानात घेत नाही. मात्र, त्याकडे लक्ष देण्याची गरज आहे, असे या अहवालात नमूद करण्यात आले आहे. रस्त्यावर सेल्फी घेताना अपघाती मृत्यू झाला तर मृत्यूच्या कारणाची नोंद रस्ते अपघात म्हणून होते, सेल्फीचा उल्लेख नसतो. त्यामुळे या मृत्यूंचे महत्त्व जाणवत नाही. म्हणूनच या मृत्यूंच्या मागची कारणे आणि उपाय शोधण्याची गरज आहे, अशी अपेक्षाही या अहवालात व्यक्त करण्यात आली आहे.

Posted by : | on : 8 Oct 2018
Filed under : अमेरिका, आंतरराष्ट्रीय.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास
  • हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस
  • भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय
  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in अमेरिका, आंतरराष्ट्रीय (104 of 411 articles)

Nobel Peace Prize To Denis Mukwege And Nadia Murad For Fighting Sexual Violence
५ ऑक्टोबर - जगभरातील संघर्ष आणि युद्धाच्या काळात महिलांवर होणार्‍या लैंगिक अत्याचाराविरोधात लढा देणारे काँगोचे डॉ. डेनिस मुक्वेगे आणि इसिसच्या ...

×