भाजपाच्या ‘मिशन २०१९’चा श्रीगणेशा

भाजपाच्या ‘मिशन २०१९’चा श्रीगणेशा

•►अमित शाह यांनी दिले ३५० जागांचे लक्ष्य, नवी दिल्ली,…

उषाताई चाटी कालवश

उषाताई चाटी कालवश

►आज मोक्षधाम येथे होणार अंत्यसंस्कार, नागपूर, १७ ऑगस्ट –…

राहुल गांधी भाषण करत नाहीत, केवळ रडतात: रविशंकरप्रसाद

राहुल गांधी भाषण करत नाहीत, केवळ रडतात: रविशंकरप्रसाद

►भाजपा, संघावरील आरोपांचा घेतला खरपूस समाचार, नवी दिल्ली, १७…

६५० दशलक्ष वर्षांपूर्वी अस्तित्वात आला पहिला पशू

६५० दशलक्ष वर्षांपूर्वी अस्तित्वात आला पहिला पशू

►•वैज्ञानिकांच्या अभ्यासातील निष्कर्ष, मेलबर्न, १७ ऑगस्ट – आपल्या भूतलावर…

भारताची विस्तारवादी वृत्तीच द्विपक्षीय संबंधात अडसर

भारताची विस्तारवादी वृत्तीच द्विपक्षीय संबंधात अडसर

►स्वातंत्र्यदिनी पाकच्या उलट्या बोंबा, इस्लामाबाद, १४ ऑगस्ट – काश्मीरसह…

अमेरिकेवर अणुबॉम्ब टाकून बेचिराख करू

अमेरिकेवर अणुबॉम्ब टाकून बेचिराख करू

►कोरियाच्या जनतेचे धमकावणारे प्रत्युत्तर, प्यॉंगयॉंग, १० ऑगस्ट – आमच्या…

राज्याच्या मुख्यमंत्रिपदी मीच राहणार

राज्याच्या मुख्यमंत्रिपदी मीच राहणार

►मुख्यमंत्री फडणवीस यांचे सूतोवाच,• प्रदेशाध्यक्षपदी रावसाहेब दानवेच, मुंबई, १७…

राज्य मंत्रिमंडळात कोरे, शेलार यांची वर्णी शक्य

राज्य मंत्रिमंडळात कोरे, शेलार यांची वर्णी शक्य

मुंबई, १३ ऑगस्ट – राज्यात मंत्रिमंडळ विस्ताराचे वेध लागले…

पं. दीनदयालजींच्या विचारातूनच शाश्‍वत विकासाकडे वाटचाल: मुख्यमंत्री

पं. दीनदयालजींच्या विचारातूनच शाश्‍वत विकासाकडे वाटचाल: मुख्यमंत्री

►विधानसभेत उपाध्याय यांच्या कार्याचा गौरव, मुंबई, १० ऑगस्ट –…

स्वातंत्र्यदिन,काश्मिरी जनता आणि दहशतवाद…!

स्वातंत्र्यदिन,काश्मिरी जनता आणि दहशतवाद…!

मकरंद कुळकर्णी | काश्मिरी जनतेने भारतीय लष्कराच्या क्षमतेवर विश्‍वास…

निर्गुणाचा शोध निर्गुणात हरपला…

निर्गुणाचा शोध निर्गुणात हरपला…

•तरंग : दीपक कलढोणे | २० एप्रिल १९३९ रोजी…

३७० कलम संपले तर?

३७० कलम संपले तर?

•उलट तपासणी : भाऊ तोरसेकर | नाक दाबले की…

रणबीरच्या फिरण्यावर बंदी

रणबीरच्या फिरण्यावर बंदी

संजय दत्तच्या आयुष्यावर आधारित चित्रपटात रणबीर कपूर ६ वेगवेगळ्या…

प्रियांका ठरली जगातील दुसरी सुंदर महिला!

प्रियांका ठरली जगातील दुसरी सुंदर महिला!

जगातील सर्वात सुंदर महिलांमध्ये बॉलिवूडच्या देसी गर्लला म्हणजेच प्रियांका…

रितेश बनला ‘बँक चोर’

रितेश बनला ‘बँक चोर’

यशराज फिल्मच्या ‘बँक चोर’ या चित्रपटाद्वारे मराठमोळा अभिनेता रितेश…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:11 | सूर्यास्त: 18:49
अयनांश:
Home » आध्यात्मिक » भक्ती-शक्तीची युती

भक्ती-शक्तीची युती

चंद्रशेखर पंडित

sapta_chakrasईश्‍वर ही एक शक्ती आहे, पण तो स्वत:ची शक्ती स्वत: उपयोगात आणू शकत नाही. कुणालातरी ती शक्ती उपयोगात आणून त्याचे कार्य करावे लागते, तरच ते कार्य होते अन्यथा नाही. डॉ. कार्ल स्टोल्झ, प्रा. वेसले कॉलेज, अमेरिका यांच्या Autosuggestion in private prayer, page No.128 वर म्हणतात, ”Human will and efforts are always using Laws of God, thereby realizing a multitude of effects which the system, left to itself, would never produce, yet in such a way that no Law is broken.” या नैसर्गिक शक्ती, नियम स्वत:हून काहीच करू शकत नाहीत. कुणालातरी यांचा उपयोग स्वत:च्या फायद्याकरिता करून घ्यावा लागतो. निसर्गाची, ईश्‍वराची शक्ती, नियम व मनुष्याची दृढ इच्छाशक्ती व प्रयत्न या दोघांच्या संयोगाने, एकत्रिकरणानेच कोणतेही काम होऊ शकते. फक्त एका गोष्टीने काम होणार नाही. आपण स्वत: खूप आळशी असल्याने स्वत:च प्रयत्न न करता देवाला आपल्यासाठी प्रयत्न करावयास सांगतो. पण, देव हा आपला मुका नोकर नाही की जो पूजेतून त्याला जे काही मागू ते तो आपल्याला गुपचूप आणून देईल. बीज न पेरता, पिकाची देखभाल न करता खूप पिकाची आशा करण्यासारखे हे आहे. प्रयत्न न करता फक्त पूजेतून केलेली मागणी देव कधीच पूर्ण करत नसतो, कारण हे त्याच्या नियमात बसत नाही. त्याचे नियम न मोडता जर त्याची शक्ती उपयोगात आणण्याकरिता तुम्ही सतत प्रयत्नशील असले, तरच तुमची मागणी पूर्ण होईल.
वाफ आणि वाफर – पाण्याला गरम केले की, त्याची वाफ ही नैसर्गिक शक्तीने, नियमाने होते. पण, हीच निसर्गाच्या शक्तीने उत्पन्न झालेली वाफ स्वत:हून रेल्वे इंजीन, वाफर (वाफेवर चालणारे जहाज) चालवू शकत नाही. त्याकरिता मानवाने त्याच्या इच्छाशक्तीद्वारे व अथक प्रयत्न करून जे यंत्र, तंत्र विकसित केले आहेत, त्याद्वारे ती वाफ रेल्वे इंजीन, वाफर चालवून हजारो लोकांना, हजारो टन सामान, हजारो कि. मी.पर्यंत घेऊन जाऊ शकते. एकटे यंत्र रेल्वे इंजीन चालवू शकत नाही व एकटी वाफसुद्धा इंजीन चालवू शकत नाही. तिथे दोघेही पाहिजेत. अशा प्रकारे निसर्गाच्या नियमांचा, ईश्‍वरीय शक्तीचा आपल्याला प्रयत्नाद्वारे उपयोग करून घ्यावा लागतो. तो उपयोग आपोआप होत नाही. ईश्‍वराच्या भरोशावर राहून होत नाही.
ईश्‍वरी अवतारामध्येसुद्धा असेच सांगितलेले आहे. जसे रामाने विश्‍वामित्र ऋषींसोबत जाऊन भक्तांना त्रास देणार्‍या, यज्ञात विघ्न आणणार्‍या असुरांचा आपल्या सामर्थ्याने वध केला. पण, जोपर्यंत प्रभू रामचंद्र तेथे गेले नाही तोपर्यंत त्या ईश्‍वराचे भक्त अनेक वर्षांपासून त्याची भक्ती, पूजा करीतच होते. पण, फक्त भक्ती केल्यानेच त्यांचे संकट ईश्‍वराने आपोआप दूर केले नाही, तर प्रभू रामचंद्राच्या रूपात असणार्‍या मनुष्याने आपल्या शक्तीने ते दूर केले. जिथे प्रभू रामचंद्र गेले नाही तिथल्या भक्तांचे संकट ते पूजा करत असूनसुद्धा दूर झाले नाही. म्हणून कोणतेही कार्य सिद्धीस जाण्याकरिता भक्ती आणि शक्ती यांच्या युतीची, ऐक्याची गरज आहे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज त्यांच्या, ‘राष्ट्रसंतांची भाषणे’ या पुस्तकात पान क्र. ११ वर म्हणतात- ‘‘शास्त्र (पूजा) आणि श्रम यांच्या एकोप्यानेच कोणतेही काम सिद्धीस जाऊ शकते.’’
गैरहिंदू राज्यकर्त्यांनी १००० वर्षांपेक्षा जास्त काळ भारतावर आपली जुलमी सत्ता गाजविली. या १००० वर्षांच्या काळात त्यांनी भारतीय जनतेला अतोनात त्रास दिला, छळले, दु:ख दिले. या १००० वर्षांच्या काळातसुद्धा लोक ईश्‍वराची पूजा करतच होते. पण, ईश्‍वराने त्यांचे दु:ख दूर केले नाही. जोपर्यंत महात्मा गांधी, नेताजी सुभाषचंद्र बोस, स्वातंत्र्यवीर सावरकर, मदनलाल धिंग्रा, लोकमान्य टिळक, भगतसिंग, लाला लजपतराय, बिपिनचंद्र पाल, दादाभाई नौरोजी आदी सर्व स्वातंत्र्यवीरांनी ईश्‍वरीय शक्तीचा उपयोग जुलमी राज्यकर्त्यांना हटविण्याकरिता केला नाही तोपर्यंत आपले दु:ख, कष्ट दूर झाले नाही. आपल्या धर्माच्या भाषेत स्वातंत्र्याकरिता प्रयत्न करणार्‍या या सर्वांना ईश्‍वरी अवतारच म्हटले पाहिजे. कारण त्यांच्या प्रयत्नांमुळेच आपले दु:ख, त्रास दूर झालेले आहे. म्हणून ईश्‍वरीय शक्ती, ईश्‍वरपूजा केल्यानेच आपले संकट आपोआप दूर करत नाही. जोपर्यंत आपण स्वत: किंवा इतर दुसरा कुणीही मनुष्य संकट दूर करण्याकरिता प्रयत्न करणार नाही, ईश्‍वराने दिलेल्या शक्तीचा उपयोग संकट निवारणार्थ करणार नाही तोपर्यंत फक्त पूजा केल्याने आपले दु:ख, संकट आपोआप दूर होणार नाही, हे सदैव लक्षात ठेवले पाहिजे. योग्य पद्धतीने केलेल्या पूजेमुळे आपल्याला दु:ख सहन करण्याचे मानसिक सामर्थ्य प्राप्त होते, हेही तितकेच खरे आहे. या पूजेच्या बळावरच भारतीय जनता १००० वर्षांपर्यंत जुलमी राज्यकर्त्यांचे जुलूम सहन करत आनंदाने(?) व ईश्‍वराच्या भरोशावर राहिली.
भक्तांची सेवा हीच भगवंताची सेवा- अनेक मंदिरांचे आपण बारकाईने निरीक्षण केले, तर भक्तांचे मंदिरात येण्यात, त्यांचा भक्तिभाव वाढविण्यात, मंदिराच्या व्यवस्थापनाचाही मोठा सहभाग असतो. मंदिराचे व्यवस्थापन मंडळ जर कार्यक्षम असेल, भक्तांच्या सेवेतच ईश्‍वरसेवा आहे असे समजणारे असेल, तर त्या मंदिरात भक्तिभावाला पोषक असेच वातावरण असते. मंदिर स्वच्छ असते, वातावरण शांत असते, दर्शनाच्या रांगा अनुशासित व शिस्तबद्ध असतात. त्यामुळे भक्तांना गर्दीचा, धक्काबुक्कीचा त्रास होत नाही. थंड व स्वच्छ पाण्याची मुबलकता, पुजारी व स्वयंसेवक कमी वेळात दर्शन करवून देण्याकरिता पैसे मागत नाही, पूजा, अभिषेकाकरिता वैयक्तिक रीत्या सांगत नाही किंवा दबाव टाकत नाही, भक्तांशी आपुलकीने बोलतात. अशा पोषक वातावरणातच आपले पूजेत मन रमते व आपण देवाशी काही वेळ एकरूप होऊ शकतो व त्यामुळे पूजेचे परिणाम दिसायला लागतात व आपण म्हणतो देव आपल्यावर प्रसन्न झाला आहे. लोक त्या देवतेला अधिक मानतात, त्या मंदिरात अधिक गर्दी होते. या सर्व प्रक्रियेमध्ये त्या देवापेक्षा मंदिर प्रशासनाने आपल्या प्रयत्नातून केलेल्या मंदिरातील वातावरणनिर्मितीचा मोठा वाटा असतो.
आमचे शेगावचे संत गजानन महाराज यांच्या मंदिरात असेच उत्तम भक्तानुकूल प्रशासन असून, ते भक्तवत्सल असल्यामुळे हजारो लोक दररोज परगावहून येथे दर्शनाकरिता येतात. गुरुवारी, रविवारी ही गर्दी लाखाच्या पुढे जाते. ही गर्दी मी पाहिलेल्या स्वयंभू देवस्थान जसे अष्टविनायक, ज्योतिर्लिंग, चार धाम मंदिरात होणार्‍या गर्दीपेक्षा संख्येने जास्त आहे. अशा प्रकारे मंदिरातसुद्धा मानवी प्रयत्न व ईश्‍वरी नियम यांच्या संयोगानेच पूजेचे फळ मिळताना दिसत आहे. ज्या मंदिरात अशा प्रकारचे वातावरण व व्यवस्था नसते त्या मंदिरात पूजेचे फळ अल्पप्रमाणात मिळते किंवा मिळत नाही.

शेअर करा

Posted by on Oct 22 2016. Filed under आध्यात्मिक. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

“भक्ती-शक्तीची युती” या बातमीला 1 प्रतिक्रिया

  1. SAMBHAJI BHOITE

    मा पंडितजी फार छान लेख, ध्यानवाद

प्रतिक्रिया नोंदवा

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

मागील बातम्या, लेख शोध

Search by Date
Search by Category
Search with Google
More in आध्यात्मिक (18 of 19 articles)


बोधीनाथ वैलाणस्वामी मेलबोर्न, ऑस्ट्रेलियामध्ये झालेल्या विश्व धर्म परिषदेत "योगाभ्यास: परधर्मीयांचे हिंदु धर्मांत धर्मांतर करण्याचा गुपित प्रयत्न, की मन आणि शरीर ...