कठुआ बलात्कार प्रकरण : मीडियाला प्रत्येकी १० लाखांचा दंड

कठुआ बलात्कार प्रकरण : मीडियाला प्रत्येकी १० लाखांचा दंड

►पीडितेचे नाव जाहीर केल्याने कोर्टाचा संताप ►पुढील सुनावणी २५…

हिंद महासागरात दिसल्या चिनी युद्धनौका

हिंद महासागरात दिसल्या चिनी युद्धनौका

►भारतीय नौदलाचे ‘अनोखे’ स्वागत, वृत्तसंस्था नवी दिल्ली, १८ एप्रिल…

देशात चलन तुटवडा नाही

देशात चलन तुटवडा नाही

►बँकांमध्ये पुरेशा प्रमाणात पैसा •: अरुण जेटली यांची स्पष्टोक्ती,…

तंत्रज्ञानामुळे विश्‍वासार्हता, पारदर्शकता वाढली : नरेंद्र मोदी

तंत्रज्ञानामुळे विश्‍वासार्हता, पारदर्शकता वाढली : नरेंद्र मोदी

►स्वीडनमधील भारतीयांशी संवाद, वृत्तसंस्था स्टॉकहोम, १८ एप्रिल – डिजिटल…

शिष्टाचार बाजूला सारून नरेंद्र मोदी यांचे स्वीडनमध्ये स्वागत

शिष्टाचार बाजूला सारून नरेंद्र मोदी यांचे स्वीडनमध्ये स्वागत

वृत्तसंस्था स्टॉकहोम, १७ एप्रिल – भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी…

व्हॉटसअ‍ॅपवरील फोटोमधून मिळवले बोटांचे ठसे

व्हॉटसअ‍ॅपवरील फोटोमधून मिळवले बोटांचे ठसे

►ड्रग व्यापारी गजाआड, ब्रिटिश पोलिसांची कमाल, वृत्तसंस्था लंडन, १७…

भूमिधारी शेतकरी होणार भूमिस्वामी

भूमिधारी शेतकरी होणार भूमिस्वामी

►राज्य शासनाचा महत्त्वपूर्ण निर्णय ►फेरबदलाची रक्कम माफ, वृत्तसंस्था मुंबई,…

सरकारजमा होणार भ्रष्ट लोकप्रतिनिधींची संपत्ती

सरकारजमा होणार भ्रष्ट लोकप्रतिनिधींची संपत्ती

वृत्तसंस्था मुंबई, १८ एप्रिल – लोकप्रतिनिधी किंवा लोकसेवकांनी भ्रष्ट…

कबीर कला मंच रडारवर

कबीर कला मंच रडारवर

►कार्यकर्त्यांच्या घरांवर छापे ►मुंबई, पुणे, नागपुरात कारवाई ►नवी दिल्लीतही…

मर्जी आपली, भवितव्यही आपले

मर्जी आपली, भवितव्यही आपले

॥ संवाद : सोमनाथ देशमाने | मोदी सरकारने राष्ट्रहिताशी…

अस्वस्थपर्व…!

अस्वस्थपर्व…!

॥ विशेष : सुधीर पाठक | भगतसिंग मार्क्सवादी होते.…

आत्महत्येची पुर्वतयारी?

आत्महत्येची पुर्वतयारी?

॥ उलट तपासणी : भाऊ तोरसेकर | म्हणजेच विरोधकांचा…

‘सिमरन’मधील नवीन गाणे प्रदर्शित

‘सिमरन’मधील नवीन गाणे प्रदर्शित

अभिनेत्री कंगना राणावत लवकरच सिमरन या चित्रपटाद्वारे प्रेक्षकांच्या भेटीला…

चिरंजीवीसोबत सिनेमा करण्यास ऐश्‍वर्याचा नकार?

चिरंजीवीसोबत सिनेमा करण्यास ऐश्‍वर्याचा नकार?

ऐश्‍वर्या राय बच्चनची सध्या बॉलीवूडमध्ये सेकंड इनिंग सुरू आहे.…

रणबीरच्या फिरण्यावर बंदी

रणबीरच्या फिरण्यावर बंदी

संजय दत्तच्या आयुष्यावर आधारित चित्रपटात रणबीर कपूर ६ वेगवेगळ्या…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:08 | सूर्यास्त: 18:42
अयनांश:
Home » आरोग्य » मधामुळे बर्‍या होतात मुख कर्करोगाच्या जखमा!

मधामुळे बर्‍या होतात मुख कर्करोगाच्या जखमा!

=भारतीय वैज्ञानिकांचे अभ्यासपूर्ण संशोधन=
वृत्तसंस्था
कोलकाता, २९ नोव्हेंबर –
Honey dripping from a wooden honey dipper isolated on white backमुख कर्करोगाच्या जखमा मधामुळे पूर्णपणे बर्‍या होऊ शकतात, असा अभ्यासपूर्ण शोध भारतीय वैज्ञानिकांनी लावला आहे. संपूर्ण जगासाठीच हा शोध अतिशय उपयुक्त ठरणार आहे.
आयआयटी खडगपूर येथील केमिकल अभियंते, जैव-तंत्रज्ञान तज्ज्ञ आणि डॉक्टरांच्या चमूने अनेक वर्षांपासून हा अभ्यास केला आहे. या अभ्यासात त्यांनी रेशिम आणि मधापासून तयार करण्यात आलेली उपचारपद्धती विकसित केली. आयआयटीतील वैद्यकीय विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या प्रयोगशाळेत या उपचार पद्धतीचा प्रयोगही करण्यात आला. या उपचारामुळे केवळ मुखाच्या कर्करोगाच्या जखमाच झपाट्याने बर्‍या होतात असे नाही, तर मुखाचा कर्करोग पुन्हा उद्‌भवण्याची शक्यताही धुसर होत असते.
कोणत्याही प्रकारच्या जखमा तातडीने भरणारे उत्तम साधन म्हणून मधाची ओळख तशीही फार आधीपासून आहे. कर्करोगरोधक आणि बॅक्टेरियारोधक गुणधर्म मधात आहेत. मध आणि रेशम यांना बायोमेट्रिकल पद्धतीने एकत्र करण्यात आले, अशी माहिती या अभ्यासात सहभागी असलेल्या एक संशोधक मोनिका राजपूत यांनी वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितले.
या प्रयोगात सूक्ष्म तंत्रज्ञानाची कल्पना आआयटी खडगपूरचे प्राध्यापक रविव्रत मुखर्जी यांच्या डोक्यातून, तर मधाचा वापर करण्याची कल्पना ज्योतिर्मय चॅटर्जी यांच्या डोक्यातून आली. मुखाचा कर्करोग झाल्यानंतर अनेक रुग्णांना शस्त्रक्रियाच करावी लागते. शरीराचा प्रभावित भाग काढून घेण्यात आल्यानंतर तिथे जखम होत असते, ज्यात काही कर्करोगीय किंवा कर्करोगपूर्व पेशी राहून गेलेल्या असतात. त्यामुळे पुन्हा एकदा त्याच जागेवर कर्करोग होण्याची शक्यता फार जास्त असते. पण, आमच्या या अभिनव प्रयोगामुळे कर्करोगाच्या या जखमा पूर्णपणे नियंत्रित होत असल्याचे सिद्ध झाले आहे, असे या अभ्यासाच्या सहसंशोधिका नंदिनी भंडारू यांनी सांगितले.
कर्करोगावरील शस्त्रक्रियेनंतर त्या जागेवर उरणार्‍या जखमा बर्‍या करण्यासाठी तसेच पुन्हा कर्करोग उद्‌भवण्याचा धोका करण्यासाठी सध्या बाजारात कोणतीही उपचारपद्धती उपलब्ध नाही. पण, आमच्या या अभ्यासपूर्ण संशोधनामुळे कर्करोग रुग्णांना मोठा दिलासा मिळणार आहे, असेही त्या म्हणाल्या.

Posted by : | on : Nov 29 2016 | Filed under : आरोग्य.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0.
Both comments and pings are currently closed.

प्रतिक्रिया नोंदवा

Marathi/English, press Ctrl+g  

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in आरोग्य (1 of 6 articles)


इस्लामाबाद, [३ डिसेंबर] – एखादी अनपेक्षित घटना पाहिली किंवा ऐकली की, लगेचच आपल्या मनावर ताण येतो, पोटात गोळा उठतो. यातून ...

×