संसदेचे पावसाळी अधिवेशन १७ जुलैपासून

संसदेचे पावसाळी अधिवेशन १७ जुलैपासून

तभा वृत्तसेवा नवी दिल्ली, २४ जून – संसदेचे पावसाळी…

पंतप्रधान तीन देशांच्या दौर्‍यावर रवाना

पंतप्रधान तीन देशांच्या दौर्‍यावर रवाना

नवी दिल्ली, २४ जून – पंतप्रधान नरेंद्र मोदी आज…

मानसरोवर भाविकांना चीनने प्रवेश नाकारला

मानसरोवर भाविकांना चीनने प्रवेश नाकारला

►रस्ता खराब असल्याचे कारण पुढे केले, गंगटोक, २४ जून…

दहशतवाद्यांना केलेल्या मदतीमुळे पाक अडचणीत

दहशतवाद्यांना केलेल्या मदतीमुळे पाक अडचणीत

►३६ विकसित देश घेणार झाडाझडती ►मुंबई हल्ल्यानंतर टाकले होते…

भारत हा सद्‌वर्तनी, सद्‌गुणी लोकांचा देश

भारत हा सद्‌वर्तनी, सद्‌गुणी लोकांचा देश

►डोनाल्ड ट्रम्प यांनाही सत्यता मान्य, वॉशिंग्टन, २४ जून –…

भारताला मिळणार २२ गार्डियन ड्रोन्स

भारताला मिळणार २२ गार्डियन ड्रोन्स

►पंतप्रधान मोदींचा अमेरिका दौरा, नवी दिल्ली, २३ जून –…

शेतकर्‍यांचे चांगभले!

शेतकर्‍यांचे चांगभले!

►३४ हजार २२ कोटींची अभूतपूर्व कर्जमाफी ►देशाच्या इतिहासातील सर्वात…

शहीद संदीप जाधव, श्रावण मानेंवर लष्करी इतमामात अंत्यसंस्कार

शहीद संदीप जाधव, श्रावण मानेंवर लष्करी इतमामात अंत्यसंस्कार

औरंगाबाद/कोल्हापूर, २४ जून – पाकिस्तानी सैन्याच्या भ्याड हल्ल्यात शहीद…

खासगी वाहनांनाही ‘स्कूल बस’ परमिट

खासगी वाहनांनाही ‘स्कूल बस’ परमिट

►परिवहन विभागाची हायकोर्टात माहिती, मुंबई, २४ जून – शाळेऐवजी…

नव्या राष्ट्रपतींची चाहुल

नव्या राष्ट्रपतींची चाहुल

•उलट तपासणी : भाऊ तोरसेकर | मोदी या निवडणूकीसाठी…

रामनाथ कोविंद : समाजचिंतक ते राष्ट्रपती

रामनाथ कोविंद : समाजचिंतक ते राष्ट्रपती

योगिता साळवी | सत्ताधारी पक्षात राज्यपाल कुणाला बनवावे या…

स्वतंत्र गोरखालँडची मागणी

स्वतंत्र गोरखालँडची मागणी

प्रा. अविनाश कोल्हे | गोरखा समाजाची मागणी स्वातंत्र्यपूर्व काळापासून…

रणबीरच्या फिरण्यावर बंदी

रणबीरच्या फिरण्यावर बंदी

संजय दत्तच्या आयुष्यावर आधारित चित्रपटात रणबीर कपूर ६ वेगवेगळ्या…

प्रियांका ठरली जगातील दुसरी सुंदर महिला!

प्रियांका ठरली जगातील दुसरी सुंदर महिला!

जगातील सर्वात सुंदर महिलांमध्ये बॉलिवूडच्या देसी गर्लला म्हणजेच प्रियांका…

रितेश बनला ‘बँक चोर’

रितेश बनला ‘बँक चोर’

यशराज फिल्मच्या ‘बँक चोर’ या चित्रपटाद्वारे मराठमोळा अभिनेता रितेश…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
रवी उदय: 06:05 | अस्त: 19:19
अयनांश:
Home » आसमंत » अजब अनाथालय…!

अजब अनाथालय…!

टेहळणी : डॉ. सच्चिदानंद शेवडे

img_20160927_131527289_hdrनुकताच श्रीलंकेला जाऊन आलो. हा चिमुकला शेजारी देश अत्यंत प्रेक्षणीय आहे. हिरवे हिरवे, गार गालिचे, हरित तृणांच्या मखमालीचे, या काव्यपंक्तींची आठवण होणारे दृष्य सर्वत्र दिसत होते. काही वर्षांपूर्वी एलटीटीईच्या दहशतवादाखाली हा देश भरडला जात होता यावर विश्वास बसू नये असेच वातावरण सर्वत्र होते. मुंबई येथील हार्मनी टूर्सच्याकौस्तुभ जोशी यांनी श्रीलंकेत आमचे ‘अपरिचित रामायण’ आयोजित केले होते. जेथे मुक्काम असेल त्या हॉटेलमध्ये सभागृह अथवा चक्क आकाशाच्या छताखालील हिरवळीवर प्रतिदिनी ही फिरती रामकथा उत्तरोत्तर रंगत गेली.
वाटेतील प्रेक्षणीय स्थळे पाहताना त्याचा आधीच अभ्यास व तत्संबंधीची पुस्तके वाचून गेलो असल्याने गृहपाठबऱ्यापैकी तयार होता. बाहेर भटकंती करताना हे महत्वाचे असते. जो अपरिचित प्रदेश आपण पाहायला जात आहोत, त्याबद्दल माहिती घेऊन ठेवली की तो पाहण्यात खरी मजा येते. कित्येक जण अशा यात्रांना जातात आणि प्रवास करताना बाहेरचे जग निरखण्यापेक्षा अन्य वेळघालवू साधनात रमून जातात. त्यामुळे खऱ्या अर्थाने जे पाहायला आपण आलो आहोत त्याचा आनंद हरवून बसतात. यात्रेच्या दैनंदिन स्थलदर्शन माहितीवर केवळ विसंबून चालत नाही. ते लोक तुम्हाला जे दाखवणार आहेत आणि जिथे तुमचा मुक्काम होणार आहे तेवढेच देतात. किंबहुना त्यांच्याकडून तीच अपेक्षा असते. अधिकाची माहिती आपण वेगवेगळ्या स्रोतातून करून घ्यावी. आता तर पुस्तकांव्यतिरिक्त नेट हे उत्तम साधन झाले आहे.
आपल्याकडे हत्तीला शुभ मानले आहे. गजांतलक्ष्मी सारखे शब्द हे त्यामुळे निर्माण झाले आहेत. बौद्धांमध्ये हत्तीला,मृत पितरांचे प्रतिक समजत असल्याने खूप महत्व आहे. एका जातक कथेनुसार तथागत एका पूर्वजन्मात सहा सुळे असलेले हत्ती होते आणि ते हत्तींचे राजे होते. गौतम जन्माला येण्याचा संकेतही महामायेला एका स्वप्नदृष्टांतामुळे मिळाला. सफेद हत्ती सोंडेत कमळ धरून तिच्या गर्भाशयात शिरल्याचे स्वप्न तिने पाहिले होते.
दाम्बुलाकडून कोलंबोकड़े जाण्याच्या मार्गावर केगालजवळ पिन्नावेला येथे एक छान अनाथालय आहे.ते अत्यन्त प्रेक्षणीय आहे. आता अनाथालयात प्रेक्षणीय काय असे वाटेल. तर मुद्दाम सांगतो की, तुम्ही समजता तसे नव्हे,हे हत्ती अनाथालय आहे. पूर्वी पोर्तुगीजांनी हत्ती निर्यात केले. इंग्रजांनी तसे करणे बंद केले.पण डोंगराळ भागात शेतीला उपद्रव देणारे हत्ती मुक्तपणे मारले,कधी हौस म्हणून मारले.पण पुढेही हत्ती विषारी पदार्थ व बंदुकीची शिकार होत राहिले.१९९० मध्ये १४००० असलेली हत्तीसंख्या २००५ मध्ये ४००० इतकी घसरली. बळी पडलेल्या हत्तीची बालके सैरभैर होत असत.काय करावे हे त्यांना कळत नसे. तीकुठेही जात व बहुतेक वेळा उपासमारीने मरत. यावर उपाय म्हणून येथील सरकारने १९७५ मध्ये हे अनाथालय चालु केले. पुढे घटत्या हत्तीसंख्येमुळे येथे हत्तीपैदास प्रकल्प सुरु केला. आज हत्ती संख्या हळूहळू पण निश्चित वाढते आहे. दिवसातून ४ वेळा पिलाना दूध पाजले जाते. ही गजशावके अगदी लहान मुलांसारखी वागतात, ते पाहून गंमत वाटते. एका वेळी दोघांना लोकांमध्ये आणून दुध पाजले जाते. तिथे जायला त्यांना बाहेर काढले की एकमेकांना धक्काबुक्की करत दुध पिण्याच्या जागेकडे तीधाव घेतात. तिथे दुध पाजणारे बाटल्या घेऊन उभे असतात. जमलेल्या लोकांना दिसावे आणि फोटो काढता यावेत म्हणून त्या रिंगणात सतत जागा बदलत दुध पाजतात. त्या माणसांच्या मागे धावताना ती पिल्ले लाडिक चिंघाडतात. हलकेचढुशी देण्याचा प्रयत्न करतात. तो माणूस जास्त सावध असतो. हत्तीची ढुशी कितीही प्रेमाची असली तरी माणसाला सहन होणारी नव्हे! तोंडघशी पडायला व्हायचे.हत्तीणीचा गर्भारपणाचा काळ सर्वात मोठा म्हणजे सुमारे बावीस महिन्याचा असतो. त्यामुळे नवजात शावक तीन वर्षांचे होईपर्यंत ती संगमोत्सुक होत नाही. कारण तोवर ते शावक तिच्या अंगावर पित असते. हत्तीचे तसे नसते. तो वर्षातून ठराविक वेळी माजावर येतो आणि मादी मिळाली नाही तर बेफाम होतो. असे हत्ती घरादारांची, बाग-शेतांची, झाडे-झुडपांची नासधूस करतात. अगदी माणूस दिसला तरी त्याला मारतात. अशा मस्तवाल झालेल्या हत्तींना कित्येक वेळा ‘रोग’ असे जाहीर करून मारून टाकले जाते.
श्रीलंकेत मात्र माणसाळलेल्या हत्तींची कुटुंबव्यवस्था १९९४ पासून खूप काळजी घेऊन चालवली जाते. चोवीस एकराच्या जागेत आरंभी लहान शावके होती, पुढे मोठ्या हत्तींची भर पडली. आम्ही गेलो तेव्हा किमान चार हत्ती माजावर आले होते. त्यांना साखळदंडांनी बांधून ठेवले होते. येणाऱ्या पर्यटकांवर त्यांनी हल्ला करू नये म्हणून ही काळजी घेतली होती. अन्य हत्ती मात्र मस्त मोकाट फिरत होते. अर्थाततिथे असलेल्या रक्षकांचे त्यांच्यावर लक्ष होते.मोठ्या हत्तीसाठी ८० किलो चारा व २ किलो धान्याचे खाद्य असते. रोज दोन वेळा महाओया नदीवर त्यांचे मुक्त स्नान असते. स्नानासाठी जाताना अगदी घाईने हा सर्व लवाजमा लगबगीने जाताना दिसतो. तेथील हॉटेलमध्ये बसून पर्यटकांना हत्तीस्नान पाहता येते.एकूण हा सर्व कार्यक्रम मजेदार असतो. कोणी पाण्यात शिरताच मस्तपैकी आडवा पडतो, तर कुणी पाण्यात न शिरता कडेने चालत राहतो. कुणी पलीकडे जाऊन माती अंगावर उडवत राहतो तर कुणी झाडाचा पाला ओरबाडून खातो. काहींना पाण्यात ढकलावे लागते तर काहीजण सोडलेल्या फवाऱ्याखाली शांत उभे राहून भिजतात पण पाण्यात शिरत नाहीत. असा भरपूर वेळ गेला की खुणेची शिट्टी वाजते. ती ऐकली की काहीजण लगेच बाहेर पडून चालू लागतात. काहीजण शिट्टी ऐकू आली नाही असे दाखवत टंगळमंगळ करतात. पुन्हा शिट्टी वाजते आणि तरीही ऐकले नाही तर एखादा माहूत पाण्यात उतरतो, मग मात्र लगबगीने उरलेले नग पाण्याबाहेर निघतात.श्रीलंकनसरकार हत्ती मैत्री शिबिर आयोजित करते. तुमच्या राहण्या-जेवणासकट सोय असते.महिना-दोन महिने राहून हत्तीमैत्री करता येते. त्यांना खाऊ-पिऊ घालता येते.फ़क्त हजारो रुपये डॉलर्स वा पौंडात मोजावे लागतात इतकेच..!!

शेअर करा

Posted by on Oct 23 2016. Filed under आसमंत. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

प्रतिक्रिया नोंदवा

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

मागील बातम्या, लेख शोध

Search by Date
Search by Category
Search with Google
More in आसमंत (530 of 536 articles)


कर्नल सुनील वासुदेवराव देशपांडे (निवृत्त) आज संपूर्ण जगाला संदेश गेला आहे की, मोदी सरकार शक्तिशाली व दमदार सरकार आहे. धमक्यांना ...