कायदा मोडणार्‍यांना संरक्षण देऊ नका : सर्वोच्च न्यायालय

कायदा मोडणार्‍यांना संरक्षण देऊ नका : सर्वोच्च न्यायालय

►गोरक्षणाबाबत खंडपीठासमोर सुनावणी , नवी दिल्ली, २१ जुलै –…

व्यंकय्या नायडू यांचा विजय निश्‍चित

व्यंकय्या नायडू यांचा विजय निश्‍चित

►उपराष्ट्रपतिपदाची निवडणूक, तभा वृत्तसेवा नवी दिल्ली, २१ जुलै –…

रामनाथ कोविंद मंगळवारी राष्ट्रपतिपदाची सूत्रे स्वीकारणार

रामनाथ कोविंद मंगळवारी राष्ट्रपतिपदाची सूत्रे स्वीकारणार

►प्रणव मुखर्जी यांना उद्या संसदेत निरोप , तभा वृत्तसेवा…

पाकिस्तानची आर्थिक रसद बंद

पाकिस्तानची आर्थिक रसद बंद

►अमेरिकेचे दोन दिवसात दोन धक्के, वॉशिंग्टन, २१ जुलै –…

चिनी प्रसारमाध्यमे म्हणतात, स्वराज संसदेत खोटे बोलल्या

चिनी प्रसारमाध्यमे म्हणतात, स्वराज संसदेत खोटे बोलल्या

►चीनची भारताला पुन्हा युद्धाची धमकी, बीजिंग, २१ जुलै –…

शरीफ यांच्याविरोधातील सुनावणी संपली

शरीफ यांच्याविरोधातील सुनावणी संपली

►आता निकालाची प्रतीक्षा, इस्लामाबाद, २१ जुलै – पनामा पेपर्स…

कॉंग्रेस-राष्ट्रवादी सरकारचा कर्जमाफी घोटाळा?

कॉंग्रेस-राष्ट्रवादी सरकारचा कर्जमाफी घोटाळा?

►मुंबईतील दीड लाख शेतकर्‍यांना कर्ज माफी ►२८७ कोटी वाटले,…

विश्‍वजित कदम, अविनाश भोसले यांच्या कार्यालयांवर धाडी

विश्‍वजित कदम, अविनाश भोसले यांच्या कार्यालयांवर धाडी

►आयकर विभागाची कार्यवाही, पुणे, २१ जुलै – उद्योजक अविनाश…

आता उसाला लागंल ठिबक सिंचन!

आता उसाला लागंल ठिबक सिंचन!

मुंबई, १८ जुलै – यापुढे जर शेतकर्‍यांना ऊस लागवड…

इतिहास घडवणारी भेट

इतिहास घडवणारी भेट

अनय जोगळेकर | इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी म्हटले…

दलित की भारतीय?

दलित की भारतीय?

रमेश पतंगे | खरे सांगायचे, तर आता राजकारणातून दलित…

‘जमाते पुरोगामी’ बेपत्ता?

‘जमाते पुरोगामी’ बेपत्ता?

•उलट तपासणी : भाऊ तोरसेकर | जमाते पुरोगामीची देशातल्या…

रणबीरच्या फिरण्यावर बंदी

रणबीरच्या फिरण्यावर बंदी

संजय दत्तच्या आयुष्यावर आधारित चित्रपटात रणबीर कपूर ६ वेगवेगळ्या…

प्रियांका ठरली जगातील दुसरी सुंदर महिला!

प्रियांका ठरली जगातील दुसरी सुंदर महिला!

जगातील सर्वात सुंदर महिलांमध्ये बॉलिवूडच्या देसी गर्लला म्हणजेच प्रियांका…

रितेश बनला ‘बँक चोर’

रितेश बनला ‘बँक चोर’

यशराज फिल्मच्या ‘बँक चोर’ या चित्रपटाद्वारे मराठमोळा अभिनेता रितेश…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
रवी उदय: 06:03 | अस्त: 19:01
अयनांश:

अमेरिकेतील सत्तासमर

•परराष्ट्रकारण : वसंत काणे |

अध्यक्षीय लढतीचे वृत्तसमालोचन कसे करायचे? एक धरसोड वृत्तीचा, बोलभांड आणि दुसरा व्यवहारवादी, प्रसिद्धीपासून दूर राहाण्याची भूमिका घेऊन चालणारा, नीरस तपशील मांडणारा असेल तर पत्रकारांनी काय करावे? दोघांनाही न्याय कसा द्यावा? खरे असे आहे की, मतदारांपैकी बहुतेकांचे मत अगोदरच निश्‍चित झालेले असते. फारच थोडे कुंपणावर असतात, पण तेच निवडणुकीचे भवितव्य ठरविणार आहेत. त्यांचे प्रबोधन कसे करावे?

trump-clintonहिलरी क्लिटंन व डोनाल्ड ट्रंप यांच्यातील दुसर्‍या अध्यक्षीय वादविवादात सीरियाबाबतचे धोरण, ट्रंप टेप्स, बेकारी, स्थलांतर या विषयांवर गरमागरम चर्चा झाली. त्यात पहिल्या फेरीप्रमाणे हिलरी क्लिटंन यांचाच वरचष्मा राहिला, असे वृत्त आहे. बडे समीक्षक, प्रसार माध्यमे, केवळ डेमोक्रॅट पक्षाचे धुरीणच नव्हे डोनाल्ड ट्रंप यांच्या रिपब्लिकन पक्षाचे काही नेतेसुद्धा त्यांच्याविरुद्ध दंड थोपटून उभे आहेत. पण सध्यातरी डोनाल्ड ट्रंप टसचे मसही होताना दिसत नाहीत. याचे कारण असे सांगितले जाते की त्यांचा मतदार असा बोलका किंवा बोलभांड नाही. तो जोपर्यंत त्यांची साथ सोडत नाही, तोपर्यंत तरी स्पर्धेतून माघार घेतील, असे दिसत नाही. या निमित्ताने काही जुन्या आठवणी जाग्या होत आहेत. त्यापैकी एक आठवण रोनाल्ड रीगन या नावाच्या अमेरिकन अध्यक्षाची आहे.
रोनाल्ड रीगन या मुळात अभिनेता असलेल्या राजकारण्याने १९८१ ते १९८९ अशी आठ वर्षे अमेरिकेचे ४० वे अध्यक्ष म्हणून कारकीर्द गाजवली. या अगोदर कॅलिफोर्निया या अमेरिकेतील सर्वात मोठ्या राज्याचे (जणू आपला उत्तर प्रदेश) ते गव्हर्नर होते. हॉलीवूडमधला नट, एक युनियन लीडर आणि यशस्वी राजकारणी म्हणून त्यांचा राजकीय प्रवास जगावेगळा म्हणावा / मानला जावा असा आहे. राजकारणात अभिनयकौशल्याला महत्त्वाचे स्थान असते, हे खरे पण अभिनेता राजकारणीही काही कमी नाहीत. आपल्या येथे आंध्रातील एन. टी. रामाराव व तामिळनाडूतील जयललिता ही भारतातील उदाहरणे तर आपल्या चांगलीच लक्षात राहावीत, अशी आहेत.
रीगन यांच्या कारकीर्दीची वैशिष्ट्ये-
अमेरिका व रशियासोबतच्या शीतयुद्धाची इतिश्री, रशियाशी करार, नुसती शस्त्र कपातच नव्हे, तर अण्वस्त्रांचीही कपात, उद्ध्वस्त करा बर्लिन भिंत, म्हणून रशियाला ठणकावणारा अमेरिकन अध्यक्ष, पुढे २६ डिसेंबर १९९१ ला बर्लिन वॉलचे पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळणे (कारकीर्द संपल्यानंतर तीन वर्षांनी) व रशियाचे जनरल सेक्रेटरींनी स्वहस्तेच सोव्हिएत रशियाची शकले घडवून आणणे या जागतिक राजकीयदृष्ट्या महत्त्वाच्या घडामोडींच्या आठवणी रोनाल्ड रीगन यांच्या आठ वर्षांच्या कारकीर्दीशी निगडित आहेत, असे म्हटले व मानले जाते. पण या सर्व घटनांची आठवण आता कशाला?
नटव्या अध्यक्षाची कारकीर्द-
हा नटवा, अमेरिकेचे अध्यक्षपद काय सांभाळणार?  अशी रीगनवर टीका होत असे. यावर, ‘मी तज्ज्ञांची सल्लागार समिती नेमून राजशकट हाकीन’, असे रीगन यांचे उत्तर असे. अमेरिकन जनतेला अनुभवांती या उद्गारांची खात्री पटली.
रोनाल्ड रीगन व डोनाल्ड ट्रंप – रिपब्लिकन पक्षाच्या अध्यक्षपदाच्या उमेदवाराबद्दल सुद्धा (डोनाल्ड ट्रंप) काहीशी वेगळी पण अशीच टीका आज होताना दिसते आहे. तीन तीन लग्ने करणारा, वर्णवर्चस्ववादी, उद्धट, बोलभांड, जुगाराच्या (कायदेशीर असले म्हणून काय झाले) अड्‌ड्यांच्या (कॅसिनो) देशभरातील अनेक मालिकांचा स्वामी, व्यवसायाने कंत्राटदार, टोलेजंग इमारती, अलिशान निवासस्थाने, प्रसिद्ध गोल्फ कोर्स व ट्रम्प टॉवर्स (आपल्या पुण्याजवळही ट्रंप टॉवर आहे, असे ऐकतो) व हॉटेल्सची जगभर साखळी उभारणारा, स्वस्तुतिखोर ट्रंप कुणीकडे आणि विद्वान, कायदेपंडित, राजकारणाचा प्रगाढ अनुभव असलेली, जागतिक कीर्तीची हिलरी क्लिटंन कुणीकडे?
वॉशिंग्टन पोस्टची शोधपत्रकारिता-
या शिवाय २००५ च्या ट्रंप टेप्स वॉशिंग्टन पोस्टने (?) उघड करून अमेरिकेत धमाल उडवून दिली आहे. यातील संवादात महिलांच्या अंगप्रत्यंगांची, सौंदर्याची वर्णने, योग्य व महत्त्वाचे पद व चाल असेल तर महिला कशा काहीही करायला तयार होतात याची, रसभरित चर्चा डोनाल्ड ट्रंप यांनी केलेली ऐकायला मिळते. ‘असा’ अध्यक्ष अमेरिकेला चालेल का, असा प्रश्‍न क्लिटंन समर्थकच नव्हे, तर डोनाल्ड ट्रंप यांच्या रिपब्लिकन पक्षाचे काही नेतेही उपस्थित करीत आहेत. डोनाल्ड ट्रंप यांनी दिलगिरी व्यक्त करीत २००५ सालच्या माझ्या समवयस्कांबरोबरच्या, नटनट्यांच्या कार्यक्रमाला जातानाच्या, वय आणि प्रसंग सुलभ संभाषणाबद्दल टीका आत्ता ११ वर्षांनी होते आहे पण हिलरी क्लिटंन यांचे पती बिल क्लिटंन अध्यक्षपदी असताना त्यांनी काय दिवे लावले होते हे मी सांगणार नाही, असे सांगत व ते तर हे सर्व प्रकार प्रत्यक्षात करीत होते त्याचे काय? असा प्रश्‍न उपस्थित केला आहे. हा प्रश्‍न उपस्थित करूनच डोनाल्ड ट्रंप थांबलेले नाहीत, तर पीडित महिलांनी आपले तोंड उघडल्यानंतर हिलरी क्लिटंन त्यांना कसे ‘सळो की पळो’ करून सोडीत असत, ते सांगत डोनाल्ड ट्रंप यांनी पलटवार केला आहे. ‘स्वेच्छेचा स्त्रीपुरुष सैलसंबंध, चलता है’, असे म्हणून अमेरिकन लोक, त्यातही तरुण मंडळी गृहीत धरून चालतात, असे म्हणतात. अतिरेकी टीकेचा (प्रोटेस्टिंग टु मच) उलटा परिणाम होतानाही अनेकदा आढळून आला आहे. असे असले तरी पॉप्युलर व्होट मध्ये हिलरी क्लिटंन आघाडीवर असतील, असे निदान आजतरी दिसते आहे. पॉप्युलर व्होट म्हणजे अख्ख्या अमेरिकेतील मतदारांची मते. पन्नास टक्क्यांपेक्षा अधिक मतदारांचा कौल हिलरी क्लिटंन यांच्या बाजूने राहील, असे गृहीत धरले तरी अमेरिकेत अध्यक्षनिवडीचा तो आधार नाही.
मग, अध्यक्षाची निवड होते तरी कशी?
अमेरिकेत एकूण लहान-मोठी ५० राज्ये (प्रांत) असून त्यांच्या वाट्याला लोकसंख्येच्या प्रमाणात इलेक्टर्स आलेले असतात. या इलेक्टर्सची एकूण  संख्या ५३८ असून ज्या उमेदवाराचे २७० इलेक्टर्स निवडून येतील, तो उमेदवार अमेरिकेचा अध्यक्ष म्हणून निवडून येतो. मग त्याला पॉप्युलर व्होट्समध्ये आघाडी असो वा नसो. इलेक्टर्सची निवड राज्यनिहाय होते. ८ नोव्हेंबर २०१६ ला अमेरिकन मतदार मतदान करतील. प्रत्येक राज्यात ज्या उमेदवाराला  ५० टक्क्यांपेक्षा किंचितही जास्त मते मिळतील, त्याचे सर्वच्या सर्व इलेक्टर्स निवडून आले असे मानले जाईल. या मतांनाच पॉप्युलर व्होट्स असे म्हणतात. यावरून एक मुद्दा लक्षात येतो तो हा की, कोणत्याही राज्यात ९९ टक्के पॉप्युलर व्होट्स मिळाल्यास जो परिणाम होईल, तोच परिणाम ५०.१ टक्के पॉप्युलर व्होट्स मिळाल्यासही होणार आहे. पॉप्युलर व्होट्सच्या टक्केवारीनुसार इलेक्टर्सची वाटणी उमेदवारांमध्ये केली जात नाही. या नियमानुसार (विनर टेक्स ऑल) उमेदवारांचे प्रचारतंत्र कसे बदलते ते पाहणे जसे रंजक आहे, तसेच ते ते बोधप्रद व निर्णायकही कसे आहे, ही बाब लवकर लक्षात येत नाही.
विनर टेक्स ऑल- हा मुद्दा आणखी स्पष्ट होण्यासाठी एक प्रत्यक्ष उदाहरण घेऊ. फ्लोरिडा हे अमेरिकेतील महत्त्वाचे राज्य आहे ते या दृष्टीने की निकालाला कलाटणी देण्याचे सामर्थ्य ज्या मोजक्या राज्यांमध्ये आहे, त्यात या राज्याचा समावेश होतो. या राज्याच्या वाट्याला २९ इलेक्टर्स आहेत. २००८ व २०१२ मध्ये डेमोक्रॅट पक्षाने या राज्यात जवळजवळ ५० टक्यांपेक्षा जास्त मते घेतली होती तर रिपब्लिकन पक्षाने ४९ टक्यांपेक्षा जास्त पण ५० टक्यांपेक्षा अगदी थोडी कमी मते घेतली होती, पण विनर टेक्स ऑल या नियमानुसार डेमोक्रॅट पक्षाचे सर्व म्हणजे २९ इलेक्टर्स निवडून आले होते. २०१२ मध्ये डेमोक्रॅट पक्षाला जेमतेम एक टक्याची बढत मिळाली होती. मतदानाचा कल  २०१२ प्रमाणेच राहील हे गृहीत धरल्यास हे राज्य २०१६ साली ५० टक्यापेक्षा थोडीशीच जास्त मते मिळवून डोनाल्ड ट्रंप यांना रिपब्लिकन पक्षाकडे खेचून आणायचे आहे. म्हणजे केवळ एक टक्का मते आपल्याकडे वळवायची आहेत. अमेरिकन मतदार पक्षनिष्ठ (लॉयल) मतदार मानला जातो. त्यामुळे हा एक टक्का मिळवण्यासाठी रिपब्लिकन पक्षाला, तसेच हा एक टक्का तसाच कायम ठेवण्यासाठी डेमोक्रॅट पक्षाला जिवाचे रान करावे लागणार आहे. अमेरिकेत अशी लहान-मोठी आठ-दहा राज्ये असून त्यांना स्विंग स्टेट्स (निकाल बदलवण्याची क्षमता असलेले राज्य) असे म्हणतात. उरलेली ४० राज्ये या ना त्या पक्षाचे बालेकिल्ले म्हणून मानली जातात. दोन्ही पक्षांचा प्रचाराचा भर स्विंग स्टेट्सवर आणि त्यातील कुंपणावरच्या मतदारांवर (अनडिसायडेड व्होट्स) राहाणार हे उघड आहे. पण राजकीय गणिते इतकी सोपी व बाळबोध नसतात, हेही लक्षात ठेवावयास हवे. एखादा मुद्दा असा असतो त्यामुळे ही अनिश्‍चित मते कुणाकडे झुकतील, ते सांगता येत नाही. चुकीच्या ईमेल्स, क्लिटंन फाउंडेशनला मिळालेल्या देणग्या, अतिरेकी घुसण्याची शक्यता लक्षात घेऊनही मुस्लिम स्थलांतरितांबाबत घ्यायची भूमिका, बेकारी, समलिंगी व्यक्तींबाबतचे धोरण असे बरेच मुद्दे आहेत, त्यापैकी कोणता मुद्दा ऐन मतदानाचे दिवशी भारी पडेल, हे कुणी सांगावे? असेच डोनाल्ड ट्रंप यांचे बाबतीतही म्हणता येईल. ‘आपलीच परिस्थिती डबघाईला आली आहे, ती अगोदर सुधारा. जागतिक राजकारण गेलं चुलीत’, हे प्रचाराचे एक महत्त्वाचे व मतदारांना भावणारे सूत्र डोनाल्ड ट्रंप यांनी पकडले आहे.
स्विंग स्टेट्स- जवळ जवळ चाळीस राज्ये एकतर रिपब्लिकन पक्ष किंवा डेमोक्रॅट पक्ष यांच्याकडे परंपरागत झुकलेली आहे. हा झुकाव ५०.१ टक्के असला काय किंवा ९९ टक्के असला काय, परिणाम तोच आहे. ज्या दहा राज्यात आजवर दोन/चार टक्क्यांच्या फरकाने कुणी ना कुणी आजवर आघाडी घेतली होती, ती राज्ये ८ नोव्हेंबर २०१६ ला काय करतात, हे महत्त्वाचे असून त्या राज्यातील (स्विंग स्टेट्स) मतदारांवर दोन्ही पक्ष आपले लक्ष केंद्रित करीत आहेत. आता सगळ्यांचे पाय वळणार आहेत ओहायओ (१८ इलेक्टोरल व्होट्स), नॉर्थ कॅरोलिना, (१५ इलेक्टोरल व्होट्स),  पेनसिल्व्हानिया (२० इलेक्टोरल व्होट्स) या सारख्या मोठ्या स्टेट्सकडे.
पुतळ्यांचे पीक-  ट्रंपना त्यांच्याच भाषेत उत्तर द्यायला सुरुवात झाली आहे. अमेरिकेत पुतळेच पुतळे उभारण्यास सुरुवात झाली आहे. या पूर्वी कधीही पाहिले नसतील असे पुतळे. कुणाचे म्हणाल तर डोनाल्ड ट्रंप यांचे.  मग त्यात विशेष काय? अहो, ते पूर्णाकृती पुतळे पूर्णपणे विवस्त्र आहेत. जणू ‘असा आहे हा ट्रंप’, असे पुतळे उभारणार्‍यांना म्हणायचे आहे. अमेरिकेत संपूर्ण देशभर असे पुतळे रातोरात उभारले जात आहेत. अमेरिकन लोकांचीही कमाल आहे! काही त्यांच्यासोबत चक्क सेल्फी काढत आहेत! पार्कांचे/ बगीच्यांचे/ रस्ते व्यवस्थापनाचे अधिकारी मात्र ते पुतळे तत्परतेने काढून/कापून टाकीत आहेत. कारण काय? तर पूर्वानुमती न घेता पुतळे उभारले म्हणून. नग्न पुतळा उभारला म्हणून नाही? एक पुतळा कापून काढल्यानंतर पाय तसेच उरले तेव्हा एक महिला म्हणाली, ‘तेही घेऊन जा की, ते सुद्धा नकोत’.
टोकाचा प्रचार- रिपब्लिकन पक्षाच्या अध्यक्षीय पदाच्या अधिकृत उमेदवाराचे नग्न पुतळे देशभरातील मोठमोठ्या शहरांत ठिकठिकाणी उभारले जात आहेत. कुणाच्या सुपीक डोक्यातील ही कल्पना आहे? त्या गटाचे नाव आहे ‘इंडेक्लाईन.’ त्यांना ही कल्पना एका रिऍलिटी शो वरून सुचली. ‘दी ऍप्रेंटिस’, नावाची ही टी व्ही रिऍलिटी सीरिज होती. ही सीरिज डोनाल्ड ट्रंप यांनी होस्ट केली होती, असे म्हणतात. त्या मालिकेतील एका दृश्यावरून पुतळे उभारण्याची ही कल्पना सुचली असावी, असा काहींचा अंदाज आहे. अमेरिकेतील राजकीय आणि सैनिकी सर्वोच्च पद डोनाल्ड ट्रंप यांना कधीही बळकावता येऊ नये, म्हणून आपली ही मोहीम आहे, असे या गटाचे म्हणणे आहे. यासाठी एका खास मूर्तिकाराची योजना करण्यात आली होती. डोनाल्ड ट्रंप यांचा चेहरा अतिशय उग्र व कडक असून पोट ढेरपोटे दाखविले आहे. डोनाल्ड ट्रंप यांची उमेदवारी अमेरिकेच्या राजकीय इतिहासातील सर्वात कुप्रसिद्ध व शिवराळ व्यक्तिमत्त्वाची उमेदवारी आहे, असे या विवस्त्र पुतळ्यांच्या निमित्ताने या गटाला जनतेसमोर मांडायचे आहे. अमेरिकेत हे सर्व चालते. खुद्द ओबामा यांना ‘कुत्ता’ म्हणणारे अँकर्सही आहेत.
कधीकाळी ही भूमी आमची होती-  डोनाल्ड ट्रंप यांच्या निवडणूक प्रचार समितीने यावर कोणतीही प्रतिक्रिया देण्यास नकार दिला आहे. पुतळा तोडतानाचे व्हिडीओ व्हायरल झाले आहेत. न्यूयार्कच्या डेमोक्रॅट मेयरची प्रतिक्रिया मासलेवाईक आहे, तो म्हणतो, ‘हे सर्व खूपच भीतिदायक आहे. पण तसे  पाहिले तर कपडे परिधान केलेले डोनाल्ड ट्रंपही मला आवडत नाहीतच, म्हणा.’ पोलिस गोळीबारात ठार झालेल्या आफ्रिकन-अमेरिकन नागरिकांची नावे सुद्धा अन्य काही ठिकाणी विमानांच्या वापरात नसलेल्या धावपट्‌ट्यांवर लिहिलेली आढळतात. त्यासोबत मजकूर असतो, ‘कधीकाळी ही भूमी आमची होती.’
ही चाल नक्की कुणाची?-  तशीही आफ्रिकन-अमेरिकन व्होट बँक डोनाल्ड ट्रंप यांच्या विरोधातच आहे. यांची टक्केवारी दहा टक्क्यांच्या आतच असेल. पण या निमित्ताने गोर्‍यांची व्होट बँक आपोआप तयार होत आहे, हे पुतळे उभारणार्‍यांना कळत नसेल का? का तसे घडावे म्हणूनच हे प्रकार घडवले जात आहेत. राजकारण्यांच्या लीला अगाध असतात, असेच सर्वसामान्यांनी म्हणावे, अशी स्थिती आहे खरी.
टेम्प्टेशन नव्हे ट्रम्प्टेशन-  ते काहीही असले तरी ट्रंप यांच्या प्रचार तंत्राला यश मिळताना दिसत आहे. ‘टेम्प्टेशन’ हा शब्द सगळ्यांच्या परिचयाचा आहे. जनमानसावर ट्रंप यांची जी मोहिनी पडते आहे तिला उद्देशून ‘ट्रम्प्टेशन’ हा नवीन शब्द वृत्तसृष्टीने तयार केला आहे.
सावधगिरीचा उपाय म्हणून म्हणा किंवा उद्या पराभव पदरी आला तर करावयाचे समर्थन म्हणून म्हणा, या निवडणुकीत पक्षपात होईल, असा कांगावखोर संशय ट्रंप वारंवार व्यक्त करीत आहेत. टीका करणार्‍या पत्रकारांची ओळखपत्रे रद्द करण्याची धमकी तर ते सतत देत असतात. कारस्थानी, कपटी, खोटारडी, भ्रष्टाचारी अशी शेलकी विशेषणे हिलरी क्लिटंन यांच्यासाठी ते वापरतात, पण मतदारांबाबत बोलतानाचा त्यांचा कनवाळूपणा वाखाणण्यासारखा आहे. यात बेकायदा प्रवेश करणारे लक्षावधी स्थलांतरितही आता समाविष्ट आहेत. कारण त्यांचे एकेकाळचे तेवढेच भाईबंद आज अमेरिकेतील नागरिकत्व प्राप्त करून या निवडणुकीत मतदार झाले आहेत. पुतळ्यांचा विषय मात्र त्यांनी स्वत: व रिपब्लिकन पक्षाने सुद्धा अनुल्लेखाने टाळला आहे.
मात्र, याउलट हिलरी क्लिटंन धापा टाकीत टाकीत नोकर्‍यांबाबत बोलत मध्यमवर्गीयांचा पाठिंबा मिळवण्याच्या खटाटोपात आहेत. ट्रंप यांची आश्‍वासने पोकळ आहेत अशी अलिप्त व कुंपणावरील रिपब्लिकन मतदारांची खात्री पटावी म्हणून हिलरी क्लिटंन आपली योजना अभ्यासपूर्वक व  तपशीलवार मांडीत असतात. पण ही टाळी घेणारी वाक्ये नसतात. ट्रंप यांचे करभरणा विवरणपत्र जाहीर न करणे, श्‍वेतवर्चस्ववादी भूमिका, रशियाशी संधान या पलीकडे त्यांच्या टीकेची मजल जात नाही. टाळ्या व हशा मिळवत आणि भाषणादरम्यान श्रोत्यांचा प्रतिसाद मिळवत त्यांची करमणूक करण्याची क्षमता जास्त कुणात आहे? लक्ष खेचून घेण्याचे सामर्थ्य जास्त कुणात आहे? यात आज तरी ट्रंप आघाडीवर आहेत.
जास्त प्रसिद्धी ट्रंपच्या बाजूला-  ट्रंप यांनी नुकतेच एक टोमणा मारणारे विधान केले. रशियाने  हिलरी क्लिटंन यांच्या ईमेल्स हॅक कराव्यात असेही म्हटले. हिलरी क्लिटंन यांना राक्षसिणीची उपमा दिली. नाटोला असलेला पाठिंबा काढून घेण्याची धमकी दिली. रशियाचे अध्यक्ष पुतिन यांचेशी त्यांचे सूत जुळताना दिसते आहे. ज्या मुस्लिम-अमेरिकन जोडप्याचा मुलगा इराकमध्ये अमेरिकेच्या बाजूने लढताना वीरगतीला गेला, त्यांच्याशी ट्रंप यांचे वंशपरंपरागत वैर दिसते. हे जोडपे डेमोक्रॅट पक्षाच्या अधिवेशनात उपस्थित झाले होते. हा ट्रंप यांना हिलरी क्लिटंन यांचा प्रसिद्धी स्टंट वाटला. वर्ल्ड ट्रेड सेंटर उद्ध्वस्त झाल्यापासून अमेरिकन जनमत इस्लामविरोधी झाले आहे. त्यामुळे ट्रंप यांची ही चाल यशस्वी होताना दिसते आहे. वृत्तसृष्टीही, नापसंती व्यक्त करीत का होईना, त्यांना चालता बोलता प्रसिद्धी देते आहे. त्या मानाने हिलरी क्लिटंन यांची भाषा मवाळ असते. त्यांच्या मुद्देसूद भाषणांचे प्रसिद्धीमूल्य कमीच असणार. या विषम स्थितीमुळे वृत्तसृष्टीत द्विधा मन:स्थिती निर्माण झाली आहे. अध्यक्षीय लढतीचे वृत्तसमालोचन कसे करायचे? एक धरसोड वृत्तीचा, बोलभांड आणि दुसरा व्यवहारवादी, प्रसिद्धीपासून दूर राहाण्याची भूमिका घेऊन चालणारा, नीरस तपशील मांडणारा असेल तर पत्रकारांनी काय करावे? दोघांनाही न्याय कसा द्यावा? खरे असे आहे की, मतदारांपैकी बहुतेकांचे मत अगोदरच निश्‍चित झालेले असते. फारच थोडे कुंपणावर असतात, पण तेच निवडणुकीचे भवितव्य ठरविणार आहेत. त्यांचे प्रबोधन कसे करावे? ट्रंप एकतर चुकीचे तरी बोलत असतात, नाहीतर शिव्या तरी देत असतात. सतत गर्जना करीत असतात.
वृत्तसृष्टीने तटस्थता सोडली- सध्या बहुतेक सगळी वृत्तपत्रे डोनाल्ड ट्रंप यांच्या विरुद्ध उघड भूमिका घेऊन उभी ठाकली आहेत. डोनाल्ड ट्रंप यांना जी वारेमाप प्रसिद्धी मिळत आहे मग ती नकारात्मक का असेना. यावर एक उपाय वृत्तसृष्टीने नव्याने शोधून काढला आहे. याला फेअरनेस डॉक्ट्रिन असे नाव असून ते अमलात आणावयास हवे, असा विचार समोर येतो आहे. यानुसार रेडिओ व टीव्ही वर दोन्ही पक्षांना समसमान वेळ देण्याचे बंधन आहे. पण ट्रंप यांची चुकीची व वाद निर्माण करणार्‍या वक्तव्यांनाही हिलरी क्लिटंन यांच्या सौम्य व मुद्देसूद वक्तव्यांनाही तेवढाच वेळ देता येईल का?/ यावा का? न्यूयॉर्क टाईम्सचे तर म्हणणे असे आहे की ट्रंप यांच्या वाट्याला आलेल्या वार्तांकनाचे डॉलरमधले मूल्य हिलरी क्लिटंनपेक्षा कितीतरी जास्त आहे. यासाठी त्यांना एक छदामही खर्च करावा लागलेला नाही. एक पक्ष जर सतत चुकीची विधाने वारेमाप करीत असेल तर त्यालाही तेवढाच वेळ मिळावा का, वृत्तपत्रात तेवढीच जागा मिळावी का? म्हणूनच तर कदाचित न्यूयॉर्क टाईम्ससकट अनेकांनी हिलरी क्लिटंन यांची उमेदवारी समर्थित (एंडॉर्स) करून  तटस्थतेच्या वृत्तपत्रीय संकेताला तिलांजली दिली नसेल ना?

शेअर करा

Posted by on Oct 30 2016. Filed under आसमंत, परराष्ट्रकारण : वसंत काणे, स्तंभलेखक. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

प्रतिक्रिया नोंदवा

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

मागील बातम्या, लेख शोध

Search by Date
Search by Category
Search with Google
More in आसमंत, परराष्ट्रकारण : वसंत काणे, स्तंभलेखक (796 of 831 articles)


•उलट तपासणी : भाऊ तोरसेकर | पाकिस्तानच्या धोरणकर्त्यांना चिंता आहे, ती मोदी आणि संघाची. भारतीय सेनेसाठी निर्णय घेण्याचे अधिकार मोदी ...