कायदा मोडणार्‍यांना संरक्षण देऊ नका : सर्वोच्च न्यायालय

कायदा मोडणार्‍यांना संरक्षण देऊ नका : सर्वोच्च न्यायालय

►गोरक्षणाबाबत खंडपीठासमोर सुनावणी , नवी दिल्ली, २१ जुलै –…

व्यंकय्या नायडू यांचा विजय निश्‍चित

व्यंकय्या नायडू यांचा विजय निश्‍चित

►उपराष्ट्रपतिपदाची निवडणूक, तभा वृत्तसेवा नवी दिल्ली, २१ जुलै –…

रामनाथ कोविंद मंगळवारी राष्ट्रपतिपदाची सूत्रे स्वीकारणार

रामनाथ कोविंद मंगळवारी राष्ट्रपतिपदाची सूत्रे स्वीकारणार

►प्रणव मुखर्जी यांना उद्या संसदेत निरोप , तभा वृत्तसेवा…

पाकिस्तानची आर्थिक रसद बंद

पाकिस्तानची आर्थिक रसद बंद

►अमेरिकेचे दोन दिवसात दोन धक्के, वॉशिंग्टन, २१ जुलै –…

चिनी प्रसारमाध्यमे म्हणतात, स्वराज संसदेत खोटे बोलल्या

चिनी प्रसारमाध्यमे म्हणतात, स्वराज संसदेत खोटे बोलल्या

►चीनची भारताला पुन्हा युद्धाची धमकी, बीजिंग, २१ जुलै –…

शरीफ यांच्याविरोधातील सुनावणी संपली

शरीफ यांच्याविरोधातील सुनावणी संपली

►आता निकालाची प्रतीक्षा, इस्लामाबाद, २१ जुलै – पनामा पेपर्स…

कॉंग्रेस-राष्ट्रवादी सरकारचा कर्जमाफी घोटाळा?

कॉंग्रेस-राष्ट्रवादी सरकारचा कर्जमाफी घोटाळा?

►मुंबईतील दीड लाख शेतकर्‍यांना कर्ज माफी ►२८७ कोटी वाटले,…

विश्‍वजित कदम, अविनाश भोसले यांच्या कार्यालयांवर धाडी

विश्‍वजित कदम, अविनाश भोसले यांच्या कार्यालयांवर धाडी

►आयकर विभागाची कार्यवाही, पुणे, २१ जुलै – उद्योजक अविनाश…

आता उसाला लागंल ठिबक सिंचन!

आता उसाला लागंल ठिबक सिंचन!

मुंबई, १८ जुलै – यापुढे जर शेतकर्‍यांना ऊस लागवड…

इतिहास घडवणारी भेट

इतिहास घडवणारी भेट

अनय जोगळेकर | इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी म्हटले…

दलित की भारतीय?

दलित की भारतीय?

रमेश पतंगे | खरे सांगायचे, तर आता राजकारणातून दलित…

‘जमाते पुरोगामी’ बेपत्ता?

‘जमाते पुरोगामी’ बेपत्ता?

•उलट तपासणी : भाऊ तोरसेकर | जमाते पुरोगामीची देशातल्या…

रणबीरच्या फिरण्यावर बंदी

रणबीरच्या फिरण्यावर बंदी

संजय दत्तच्या आयुष्यावर आधारित चित्रपटात रणबीर कपूर ६ वेगवेगळ्या…

प्रियांका ठरली जगातील दुसरी सुंदर महिला!

प्रियांका ठरली जगातील दुसरी सुंदर महिला!

जगातील सर्वात सुंदर महिलांमध्ये बॉलिवूडच्या देसी गर्लला म्हणजेच प्रियांका…

रितेश बनला ‘बँक चोर’

रितेश बनला ‘बँक चोर’

यशराज फिल्मच्या ‘बँक चोर’ या चित्रपटाद्वारे मराठमोळा अभिनेता रितेश…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
रवी उदय: 06:03 | अस्त: 19:01
अयनांश:

गर्दीचे सौंदर्य…

•तरंग : दीपक कलढोणे |

कृतार्थ जीवन जगून कांही तासांकरिता जगाचा निरोप घेणार्‍या सूर्यनारायणाला पश्‍चिमक्षितिजाच्या स्टेशनावर पोहोचवायला जमलेली निळ्या-जांभळ्या, लाल-पिवळ्या, नारिंगी रंगाच्या ढगांची गर्दी चांगली. अवघ्या जगाच्या कल्याणासाठी निरभ्र आकाशात दाटून आलेल्या कृष्णमेंघांची गर्दी चांगली. या गर्दीतले ढग गरजतात जरुर.. परंतु त्या गरजण्याने शक्तीमाता वीज निर्माण व्हावी. पाऊस पडावा. ही आस कृष्णमेघांच्या रुपेरी काळजात दडलेली असते. अशा गर्दीतले चांगूलपण माणूस आपल्या गर्दीत केंव्हा भिनवणार..!!

cloudवाहनांनी गजबजलेला रस्ता. गर्दी नुसती..! अहाहा..! सारीच वाहने किती वेगवान..! माणसाने वेगाच्या बाबतीत खूपच प्रगती केलीय. माणूस म्हणून असा कांहीसा अहंकार जागृत झाला ना..! असंही वाटून गेलं की, या आणि अशाच बर्‍याचशा अहंकारापोटी माणसाने सृष्टीत बरीच कांही उलथापालथ करुन ठेवलीय. चित्ता नावाच्या सर्वात वेगवान वाघाच्या प्रजातीची समाधी आता पुस्तकातील पानावर माणसानंच छापून ठेवलीय. गेला चित्ता..! काळाच्या पडद्याआड. आता ते उमदं जनावर निर्माण करणं माणसाच्या हातात नाही. सृष्टीकर्त्याची निर्मिती होती ना ती..! कशी जमेल माणसाला..?
त्या अवलिया बालकृष्णानं खेळायला म्हणून माती हातात घेतली. समिंदराचं पाणी घालून चिखल केला.. आणि उडवले ना चिखलाचे गोळे..! इकडे तिकडे. त्याच्या मनाला वाटेल तेथे भिरकावले. त्याच्या हातानं सहज म्हणून त्यानं चिखलाचे शितोंडे उडवले नि त्याची झाली पृथ्वी. कुठे जमीन झाली तर कुठे पर्वत..! कुठे दर्‍या झाल्या तर कुठे डोंगर. कोठे नद्या वाहू लागल्या. सार्‍यांचा झाला एकच समुद्र. समुद्राला कोठे आहे सीमा..? समुद्राच्या कडेनं वसलेल्या देशांनी आपापल्या सीमा म्हणून पाण्यावर रेषा मारुन ठेवल्यात झाले..!
या जमिनीवर आता माणसांची गर्दी असते म्हणे..! गर्दी करुन रहाणे किंवा गर्दी करणे हा माणसाचा स्वभावच झाला जणु..! बर्‍याचदा गर्दीचं भान सुटतं. मग माणसं भांडायला लागतात एकमेकांशी..! एकेकट्याला रहायला सांगितलं तर माणूस राहू शकत नाही. कळप त्याला प्रीयच आहे. कळपांची होते गर्दी.
एकदा का गर्दी झाली की माणसाचं भान सुटायला लागतं. आपण कशासाठी गर्दी केलीय? याचा नेमका विसर पडतो. संयमाचा बांध सुटतो. गर्दीत ढकलाढकली सुरु होते. बरोबरच आहे नं..! प्रत्येकाचा वेग वेगळा. सगळ्यांच्या वेगावर नियंत्रण मिळवणारी गर्दी नावाची परिस्थिती ज्याला आवडत नाही, अशी माणसे मग भांडू लागतात. मग एखाद्या बँकेच्या ए.टी.एम्. सेंटरवरची गर्दी असो, नाही तर सिनेमाच्या तिकिटांच्या रांगेतली गर्दी असो. विनावाहक विनाथांबा बसचे तिकिट काढण्यासाठी असलेल्या रांगेतली गर्दी असो. नाहीतर रेल्वेस्टेशनवर आयत्या वेळेला आलेल्या माणसांची तिकिटांसाठीची गर्दी असो. कोठे कांही झालेले असो..! काय झालेय? हे पहायलाही माणसे गर्दीच करतात. गर्दी माणसाला आवडते की आवडत नाही ? हा खरा तर कूटप्रश्‍नच आहे.
कुणाला स्वत:च्या भावनांनुसार सोयीस्कर धक्के देण्यासाठी गर्दी आवडते. तर कुणाला आपल्यामधील मर्दानगीचे प्रदर्शन करण्यासाठी गर्दीइतके दुसरे व्यासपीठ या विश्वात नाही असे वाटत असते. एकूणच गर्दी..! गर्दी..!! आणिक गर्दी..!!! गर्दी होणे आणि गर्दीत भांडण होणे. ही वस्तूस्थिती नेहमीच सर्वत्र अनुभवायला मिळते. झालीच भांडणे, तर भांडणाचे खापर कोणाच्या डोक्यावर फोडायचे..? याचाही नंतर विचार केला जातो. हा विचार गर्दीत नसणारेही उचलून धरतात. मग सर्वत्र सुरु होते गोंधळलेल्या विचारांची गर्दी.. आणि विचारांच्या गर्दीतले वेगळे भांडण..!
गर्दी. नवयुगातील माणसाच्या आयुष्याला पुरुन आणि उरुन ठेवणारी अपरिहार्य गोष्ट. एकांत हवा असणारी माणसेही चुकून गर्दीच्याच ठिकाणी जातात. गर्दीतला नकोसा एकांत अनुभवतात. रांगांच्या गर्दीत बेमालूम मिसळलेल्या माणसाला आपला नंबर येईपर्यंत तसा एकांतच असतो. पण हा एकांत माणसाला सहन होत नाही. आपल्या कामाचा वेग नेहमीच अधिक असावा, असं गर्दीतच माणसाला जास्त वाटतं. संयम सुटत जातो. मानवतेच्या परंपरागत नात्यांच्या गाठीही सुटत जातात. सुट्या सुट्या झालेल्या धाग्यांचा नेहमी गुंताच निर्माण होतो. वस्त्र बनण्यासाठी धाग्यांमधील नातेही कसे एकमेकांच्या हातात हात गुंफलेले लागते. धाग्यांची विण घट्ट असायला लागते. तशी ती रहात नाही. गर्दीमध्ये मानवतेचे धागे विस्कटण्याचेच प्रमाण जास्त असते. गर्दीचा स्वभाव असतो तो..!
एखादा अपघात घडल्यावरही पहाणारांचीच गर्दी जास्त असते. मदत करणारे हात बर्‍याचदा कमी आढळतात. हेही गर्दीचे एक आगळेवेगळे वैशिष्ट्य असते. खूप मोठे नैसर्गिक संकट आल्यावर मात्र गर्दीला ‘आयुष्य‘ नावाच्या अनाकलनीय गोष्टीचा खरा अर्थ समजतो. प्रत्येक जिवाला आपापला जीव प्यारा असतो ना..! मग उरत नाही कोणता भेद. मग भांडण उरते ते केवळ स्वत:चेच स्वत:शी. आपापला जीव वाचवताना आपलीच लढाई सुरु होते. ही लढाई चालू असताना माणसाला माणूसकीचा गंध जाणवायला लागतो. तेंव्हा माणूस इतरांनाही जमेल तशी मदत करायला लागतो. मोठी मजा असते माणसाची. गर्दीच्या शंभर ठिकाणांपैकी नव्व्याण्णव ठिकाणी भांडणारा माणूस संकटकाळी मात्र भांडण करायचेच विसरुन जातो. संकटकालीन भयानक परिस्थितीत मात्र माणसांची गर्दी सुंदर दिसते..
गर्दी आणि गर्दीच्या स्वभावाचा विचार करताना डोक्यात विचारांचीही गर्दीच झाली. कशाची गर्दी अधिक सुंदर..? याचा विचार मनात गर्दी करु लागला. एकेक उत्तरे आपापले बोट वरती करुन सांगू लागली. गोड्या पाण्याच्या सुंदर सरोवरात दाटलेली अमृतरुचीर थेंबाची गर्दी चांगली. वहाणार्‍या नदीतल्या एकमेकांचे जीवन गतीमान करत पुढे जाताना अवतीभोवतीचा काठ सुजलाम् सुफलाम् करणारी थेंबाची गर्दी चांगली. पोटात रत्नांचा खजिना घेऊन जीवनात मिठाचे महत्व सांगणारी सागरातील क्षारयुक्त पाण्याच्या थेंबांची गर्दी चांगली. तपोवृद्ध व त्यागी वडाच्या झाड-फांद्यावर प्रभातवेळी गाणार्‍या पाखरांची गर्दी चांगली. पोटासाठी परोपकारी औदुंबराच्या पानावर जमणार्‍या पक्ष्यांची गर्दी चांगली. सायंकाळी पिंपळाच्या पानापानातून किलबिलणारी मुक्कामाला जमलेल्या पाखरांची गर्दी चांगली. साध्याच परंतु धाब्याच्या घरातील खांडा-खणांच्या बेचक्यामध्ये घरटी करुन रहाणारी, निष्पाप व निरुपद्रवी चिमण्यांची गर्दी चांगली.
कृतार्थ जीवन जगून कांही तासांकरिता जगाचा निरोप घेणार्‍या सूर्यनारायणाला पश्‍चिमक्षितिजाच्या स्टेशनावर पोहोचवायला जमलेली निळ्या-जांभळ्या, लाल-पिवळ्या, नारिंगी रंगाच्या ढगांची गर्दी चांगली. अवघ्या जगाच्या कल्याणासाठी निरभ्र आकाशात दाटून आलेल्या कृष्णमेंघांची गर्दी चांगली. या गर्दीतले ढग गरजतात जरुर.. परंतु त्या गरजण्याने शक्तीमाता वीज निर्माण व्हावी. पाऊस पडावा. ही आस कृष्णमेघांच्या रुपेरी काळजात दडलेली असते. अशा गर्दीतले चांगूलपण माणूस आपल्या गर्दीत केंव्हा भिनवणार..!!

शेअर करा

Posted by on Nov 20 2016. Filed under आसमंत, तरंग : दीपक कलढोणे, स्तंभलेखक. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

प्रतिक्रिया नोंदवा

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

मागील बातम्या, लेख शोध

Search by Date
Search by Category
Search with Google
More in आसमंत, तरंग : दीपक कलढोणे, स्तंभलेखक (747 of 831 articles)


•आदरांजली : माधव भांडारी | जयवंतीबेन कृतार्थ आयुष्य जगल्या. ज्या पक्षाचे काम करणे म्हणजे अग्निपरीक्षेला सामोरे जाणे अशी परिस्थिती होती, ...