अडवाणींची स्वत:हून माघार

अडवाणींची स्वत:हून माघार

►चिन्मयानंद यांची माहिती, नवी दिल्ली, २५ जून – भाजपाचे…

‘ती’ काळरात्र कधीच विसरू शकत नाही

‘ती’ काळरात्र कधीच विसरू शकत नाही

►आणिबाणीवर पंतप्रधानांची ‘मन की बात’मधून टीका, नवी दिल्ली, २५…

मानवरहित रेल्वेफाटकांवर ‘हूटर’ यंत्रणा

मानवरहित रेल्वेफाटकांवर ‘हूटर’ यंत्रणा

►इस्रोची उपग्रह आधारित चिप प्रणाली , नवी दिल्ली, २५…

पंतप्रधानांचे अमेरिकेत शाही स्वागत

पंतप्रधानांचे अमेरिकेत शाही स्वागत

►आज राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांना भेटणार • •►‘मोदी, मोदी’च्या घोषणांनी…

युनोच्या महत्त्वाच्या संस्थेवर नीरू चंदा नियुक्त

युनोच्या महत्त्वाच्या संस्थेवर नीरू चंदा नियुक्त

वॉशिंग्टन, २५ जून – संयुक्त राष्ट्राच्या अखत्यारीत असलेल्या ‘इंटरनॅशनल…

दहशतवाद्यांना केलेल्या मदतीमुळे पाक अडचणीत

दहशतवाद्यांना केलेल्या मदतीमुळे पाक अडचणीत

►३६ विकसित देश घेणार झाडाझडती ►मुंबई हल्ल्यानंतर टाकले होते…

कर्जमाफीचा निर्णय ऐतिहासिक, पण समाधानकारक नाही : उद्धव ठाकरे

कर्जमाफीचा निर्णय ऐतिहासिक, पण समाधानकारक नाही : उद्धव ठाकरे

►शेतकर्‍यांवरील गुन्हे मागे घतले नाही तर बघतो!, नाशिक, २५…

शेतकर्‍यांचे चांगभले!

शेतकर्‍यांचे चांगभले!

►३४ हजार २२ कोटींची अभूतपूर्व कर्जमाफी ►देशाच्या इतिहासातील सर्वात…

शहीद संदीप जाधव, श्रावण मानेंवर लष्करी इतमामात अंत्यसंस्कार

शहीद संदीप जाधव, श्रावण मानेंवर लष्करी इतमामात अंत्यसंस्कार

औरंगाबाद/कोल्हापूर, २४ जून – पाकिस्तानी सैन्याच्या भ्याड हल्ल्यात शहीद…

नव्या राष्ट्रपतींची चाहुल

नव्या राष्ट्रपतींची चाहुल

•उलट तपासणी : भाऊ तोरसेकर | मोदी या निवडणूकीसाठी…

रामनाथ कोविंद : समाजचिंतक ते राष्ट्रपती

रामनाथ कोविंद : समाजचिंतक ते राष्ट्रपती

योगिता साळवी | सत्ताधारी पक्षात राज्यपाल कुणाला बनवावे या…

स्वतंत्र गोरखालँडची मागणी

स्वतंत्र गोरखालँडची मागणी

प्रा. अविनाश कोल्हे | गोरखा समाजाची मागणी स्वातंत्र्यपूर्व काळापासून…

रणबीरच्या फिरण्यावर बंदी

रणबीरच्या फिरण्यावर बंदी

संजय दत्तच्या आयुष्यावर आधारित चित्रपटात रणबीर कपूर ६ वेगवेगळ्या…

प्रियांका ठरली जगातील दुसरी सुंदर महिला!

प्रियांका ठरली जगातील दुसरी सुंदर महिला!

जगातील सर्वात सुंदर महिलांमध्ये बॉलिवूडच्या देसी गर्लला म्हणजेच प्रियांका…

रितेश बनला ‘बँक चोर’

रितेश बनला ‘बँक चोर’

यशराज फिल्मच्या ‘बँक चोर’ या चित्रपटाद्वारे मराठमोळा अभिनेता रितेश…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
रवी उदय: 05:55 | अस्त: 19:02
अयनांश:

चीनचे आर्थिक आक्रमण थांबवा

राष्ट्ररक्षा : ब्रि. हेमंत महाजन |

ban-chinaचिनी मालावर बहिष्काराच्या समाजमाध्यमांतून हाकाट्या सुरू आहेत. चीनी वस्तूंवर बहिष्कार घाला, यासाठी सातत्याने राबविण्यात येत असलेल्या मोहिमेचा प्रभाव दिसू लागला आहे. चिनी वस्तूंच्या विक्रीत ४० टक्क्यांनी घसरण झाली असल्याचे एका पाहणीत दिसून आले आहे. हा लेख वाचाणार्‍या प्रत्येक नागरिकाने आपल्या कमीत कमी १० मित्रांना आणि १० नातेवाईंकांना पण बहिष्काराचे आव्हान केले पाहिजे. ज्यामुळे आपल्याला या लढाईत १०० % यश मिळेल.
भारत-पाकिस्तान संबंधात तणाव निर्माण झाल्यानंतर आणि चीन करीत असलेल्या भारतविरोधी कारवायांच्या पार्श्‍वभूमीवर भारतात चीनविरोधी भावना निर्माण झाली असून, त्यातून चिनी उत्पादनांवर बहिष्कार सुरू झाला आहे. ‘सेंटर फॉर सायन्स अँड एन्व्हायर्न्मेंट’ प्रमाणे चिनी बनावटीच्या ५७ टक्के खेळण्यांमध्ये प्रमाणाबाहेर विषारी रसायने आढळली होती. पालकांनी एकत्र येऊन या खेळण्यांवर बंदी घालण्यासाठी दबाव आणला पाहिजे.
या मोहिमेमुळे चीनचे पित्त खवळले असून प्रस्तुत ग्लोबल टाईम्सच्या स्तंभांमधून भारताच्या नावे कडाकडा बोटे मोडली गेली आहेत. भारत केवळ भुंकू शकतो, करू काहीही शकत नाही, तिथे प्रचंड भ्रष्टाचार आहे, पैसे आहेत, पण ते सारे भ्रष्टाचारी लोकांनी दडवून ठेवले आहेत, (हे खरे आहे) वीज-पाणी यांचा पत्ता नाही, नरेन्द्र मोदी यांचे ‘मेक इन इंडिया’चे स्वप्न म्हणूनच अव्यवहार्य आहे, चिनी उद्योजकांनी भारतात गुंतवणूक करण्याचा विचार चुकून देखील करू नये, यासारखी प्रचंड आदळआपट या चिनी माध्यमाने केली आहे.
मेक इन इंडियाला यश लाभावे
यंदाच्या दिवाळीत, बाजारात उपलब्ध होणार्‍या चिनी वस्तू नाकारत, आपल्या देशातल्या लोकांनी तयार केलेला माल विकत घ्या, एवढे आवाहनच केले, तर चिनी हादरायची वेळ आली. आमचा देश मेक इन इंडियाची भाषा बोलू लागला, तर चिनी त्याची खिल्ली उडवताहेत. ती घोषणा कशी फसवी आहे, हे सांगण्याचा प्रयत्न करताहेत.
त्यांच्या देशात तयार केलेली उत्पादने, आम्हाला देण्याची सध्याची रीत मेक इन इंडियाच्या संकल्पनेत बाद ठरणार आहे. इथून पुढे त्यांना त्यांचा कारखाना भारतात उभारावा लागेल. त्यांचे तंत्रज्ञान घेऊन इथे यावे लागेल. त्या प्रक्रियेत सहभागी होणारी माणसं आमची असतील. जागतिक व्यापार संघटनेच्या नियमानुसार सरकार चिनी मालाची आयात थांबवू शकत नाही. त्यामुळे सरकार जी गोष्ट करू शकत नाही त्याला जनतेने मदत करावी. भारताने घातलेल्या बहिष्काराची नोंद चीनने घेतली आहे. आणि त्यांनी यामुळे भारत चीन संबंधांवर परिणाम होईल अशा प्रकारची धमकी दिली आहे. अर्थात या धमकीला न घाबरता अशा प्रकारचा बहिष्कार चालू ठेवला पाहिजे.
भारतातले चिनी समर्थक
पॉप्युलर ब्रँड्‌सचे बनावट अथवा देशी ब्रँड्‌स बनविण्यात चीन माहीर आहे. ऍप्पलच्या आयफोन स्टोअर्सपासून ते स्टारबक्स कॉफी हाऊसपर्यंत चीनने सर्व ब्रँड्‌स देशी स्वरूपात बनवले आहेत. फेमस ब्रँड्सच्या बनावट स्टोअर्स आणि प्रॉडक्ट्‌सचा व्यवसाय चीनमध्ये जोरात चालतो.
कमी दर, मोठ्या प्रमाणातील सहज उपलब्धता अशा अनेक कारणांमुळे चिनी वस्तूंची मोठ्या प्रमाणातील मागणी भारतात आहे. कमी दरात चैनीच्या वस्तू उपलब्ध होत असल्याने त्याला मागणीही भरपूर आहे. कमी दरातील उत्तमोत्तम वस्तू विकत घेण्याच्या ग्राहकांच्या हक्कांबाबत बोलणारे लोकही कमी नाहीत. काही लोकांकडून चीनच्या विरोधातली भाषा बोलणार्‍याच्या विरोधात कंबर कसून उभे राहाण्याच्या नादात आता चिनी वस्तू विकणार्‍यांचे कसे होईल, या चिंतेचा भावनिक व्यापार मांडला जाऊ लागला आहे.
रोजगार, नवीन तंत्रज्ञान उपलब्ध होत असेल, तर त्याचे स्वागत
चीन आम्हाला देतो ते प्रॉडक्ट असते, टेक्नॉलॉजी नाही. तंत्रज्ञान तो देश आम्हाला देणारही नाही. कारण त्याला प्रॉडक्ट विकण्यात स्वारस्य आहे. इतक्या वर्षांत संगणकाचे सुटे भाग तयार करण्याचे तंत्रज्ञान आम्ही स्वत: विकसित करू शकलो नाही किंवा दुसर्‍या कुठल्या देशाकडून ते घेण्याची गरजही आम्हाला वाटली नाही, हा आमच्या देशातल्या कालपर्यंतच्या राज्यकर्त्यांच्या दूरदृष्टीच्या अभावाचा दोष आहे.
चिनी स्मार्ट फोनची निर्माती जगातील तिसरी मोठी कंपनी वावोने गेल्या महिन्यातच आपले उत्पादन केंद्र भारतात सुरू केले. चिनी जिओनी, शिओमी या अन्य निर्मात्यांनीही भारताच्या मेक इन इंडिया मोहिमेला सकारात्मक प्रतिसादाचा मानस जाहीर केला आहेत. चिनी मायक्रोमॅक्सने तिच्या फोनसाठी कच्चा माल चीनमधून आयात होत असला, तरी येथे जुळणी करून तयार होणारी उत्पादने भारताच्या बाजारातील विक्रीसह रशियाला निर्यातही होतात. भारतात उत्पादन करणार्‍या या कंपन्या, नागपुरात सुरू होणारा चीनच्या कंपनीचा रेल्वे डबे निर्मिती कारखाना आणि चिनी वस्तूंवर बहिष्कार या दोन वेगवेगळ्या बाबी आहेत.
कारखान्यामुळे नवीन तंत्रज्ञान देशात येत असेल व त्यामुळे रोजगार उपलब्ध होत असेल, तर त्याचे स्वागतच केले पाहिजे, पण ज्या वस्तू भारतात निर्माण होतात, पण केवळ स्वस्त आहेत म्हणून विदेशी वस्तूंची विक्री होत असेल व त्यामुळे भारतीय कारखाने बंद पडत असतील तर त्याचा रोजगाराला फटका बसतो, यामुळेच चिनी बनावटीच्या वस्तूंना विरोध आहे.
घुसखोरी नव्हे, आक्रमणच
भारतातील अनेक अभ्यासक, जॉर्ज फर्नांडिसांसारखे संरक्षणमंत्री चीनला पाकिस्तानपेक्षा मोठा शत्रू मानायचे. चीनची घराघरातील वस्तुरूपातली आर्थिक घुसखोरी पाहता, ते खरेही होते, आजही आहे. ही चिनी घुसखोरी नव्हे, आक्रमण थांबायलाच हवे हे अनेक अभ्यासकांना काही वर्षांपासून वाटायला लागले आहे. चिनी वस्तूंनी आपल्या घरात केलेले घर अनेकांना अस्वस्थ करून टाकत आहे. चिनी वस्तूंवर बहिष्कार अशा स्वरूपाची आंदोलने अनेक आघाड्यांवर केली जाऊ लागली आहेत. पण चिनी अर्थसल्लागारही काही स्वस्थ बसणार नाहीत. भारतासारखी मोठ्ठी आणि सहज उपलब्ध झालेली बाजारपेठ सहजासहजी ते सोडणार नाहीत.
चीनच्या औद्योगिक धोरणाने भारतातील उद्योगांवर केलेले हे आक्रमणच भयंकर आहे. चीनची ताकद वाढणे आपल्यासाठी घातकच आहे. ही बाब अनेकांना विविध क्षेत्रांत काम करणार्‍यांना आता कळली आहे. अनेक स्थानांवरून चिनी आक्रमण थोपविले जात आहे. यश मिळताना दिसते आहे. ते वाढावे, चिनी वस्तूंचे आपल्या जीवनातून उच्चाटन व्हावे, अशीच इच्छा कोणत्याही भारतीय माणसाची असणार आहे.
चीनला गरज भारताची
चीनची अर्थव्यवस्था निर्यातीवर अधिक निर्भर आहे. या देशाच्या सकल राष्ट्रीय उत्पादनापैकी ६० टक्के हिस्सा हा निर्यातीचा आहे. त्यातही भारताचा वाटा एकूण आशियाई देशांमध्ये अधिक आहे. चीनमध्ये तयार केलेल्या मोबाइल, लॅपटॉप, खते, दूरसंचार क्षेत्रातील विविध साहित्य अशा छोट्या वस्तूंची येथील बाजारपेठ मोठी आहे. भारत हा चीनला कापड, तेल पदार्थ, मशीन आदी वस्तू निर्यात करत असला तरी चलनात हे प्रमाण कमी पडते. व्यापाराच्या दृष्टीने भारत-चीन हे जगातील एक मोठे भागीदार देश आहेत. हॉंगकॉंग, शांघाय अशी व्यापारउदिमात आयकॉन असलेली शहरे सागरी किनार्‍यालगतची आहेत. परिणामी या देशाचा सागरी व्यापारही अधिक आहे. पर्यटन, सी फुड्स याद्वारे या देशाचे स्वत:चे पोट तर भरतेच शिवाय निर्यातीसारखा मोठा आणि तेही विदेशी चलनातील उत्पन्न स्रोत या देशाला लाभला आहे.
चीनवर आर्थिक हल्ला करा
आता आपण चीनवर आर्थिक हल्ला केला पाहिजे. चीन स्टीलचे उत्पादन करते. भारताने स्टीलचे उत्पादन वाढवले तर चीनची निर्यात कमी होईल. भारतीय लोक चिनी बनावटीचे स्मार्ट फोन विकत घेतात. त्या दर्जाचे भारतीय बनावटीचे फोन तयार केले पाहिजे किंवा इतर देशांतून फोन विकत घ्यावे. याकरिता आपल्या उद्योगांना अधुनिकतेची कास धरायला हवी. चीन त्यांच्या देशातील उद्योगधंद्यांना पाठबळ देते आहे त्यानुसार भारतीय उद्योगांनाही पाठबळ देऊन जागितक दर्जाने बनावे लागेल. त्यासाठी काळ जावा लागेल.
सध्या देशात पर्यटनाचा ओघ वाढत आहे. पर्यटनासाठी भारतीयांनी चीन सीमारेषेवरही जावे, त्यामुळे तिथल्या जनतेला आर्थिक मदत होईल आणि त्यांची आर्थिक परिस्थिती सुधारण्यास हातभार लागेल. लडाख आणि अरुणाचल प्रदेश इथे सीमेजवळ आर्थिकदृष्ट्या परवडत नसल्यामुळे भारतीय जनता राहात नाही. आपली जनता जर सीमावर्ती भागात राहू लागली तर चिनी घुसखोरीची माहिती आपल्याला लगेच मिळेल व त्यांना लगेच सीमेपलीकडे हाकलता येईल. थोडक्यात पाकिस्तान आणि चीन यांनी आपल्याविरुद्ध विविध पद्धतीने दहशतवाद सुरू केला आहे. चीन किंवा पाकिस्तानला त्याच भाषेत आपण उत्तर देणे गरजेचे आहे.
स्वतंत्र बलुचिस्तान चळवळीचे नेते दाद बलुच यांनी भारतीय वर्तमान पत्राला दिलेल्या मुलाखतीत पाकिस्तान चीन यांच्यातील ग्वाडार बंदर ते बलुचिस्तान दरम्यान होणारा आर्थिक सहकार्य परिक्षेत्र हा दहशतवादी कॉरिडॉर असल्याचे सांगितले. चीन बलुची लोकांवर दहशत गाजवून तिथल्या नैसर्गिक गोष्टींची लूट करत आहे. हजारो टन सोने, तांबे, लोखंड, कोळसा खाण सामुग्री चीन स्वतःच्या देशात पाठवत आहे. चीन कशाप्रकारे पाकिस्तानात आर्थिक दहशतवाद माजवत आहे ही माहिती आपण जगासमोर आणायला पाहिजेत.
भारतीय लघुउद्योग उत्पादनाला चालना देण्याची गरज
चिनी वस्तू या लघु उद्योगांतून बनविल्या जातात. चिनी स्त्रिया या वस्तू घरी बनवतात. त्यामुळे त्यांची किंमत अत्यंत कमी आहे. चिनी उद्योगांनी मानवी हातांचा व योग्य वापर करून त्यांची उत्पादने इतकी स्वस्त करून टाकली आहेत की मोठमोठे भारतीय उद्योजक चिनी उत्पादकांच्या दरात त्या वस्तूंचे उत्पादन करूच शकत नाहीत. कारखाने टाकण्यापेक्षा चीनवरून आयात केलेल्या मालाला आपले फक्त लेबल लावून विकणेच फायदेशीर ठरू शकते.
आपल्या उद्योजकांची मानसिकताच बदलली आहे. चिनी वस्तू जर स्वस्तात मिळतात तर आपण त्या वस्तू कशाला बनवायच्या? या विचाराने आपण चिनी वस्तूंचे कंटेनरच्या कंटेनर खरेदी करतो वा स्मगल करतो, त्यावर आपले लेबल लावतो आणि बाजारात विकतो. त्यात भरपूर पैसे कमावतो. पण यामुळे आपण चिनी अर्थव्यवस्थेला हातभार लावतो आहोत.
आपल्याकडे बेकारी वाढलेली आहे. सामाजिक सुरक्षितता धोक्यात येत आहे. चीनशी जर आपल्याला मुकाबला करावयाचा असेल तर आपणही त्यांच्याप्रमाणे लघुउद्योग निर्माण करावयाला पाहिजे. त्यासाठी स्वस्तात जागा, भांडवल, कच्चा माल उपलब्ध करून दिले पाहिजे. कर कमी केले पाहिजेत. यामुळे आपणसुद्धा दर्जेदार वस्तू बनवू शकू. आता हा सर्व प्रकार रोखण्यासाठी सरकारनेच पुढाकार घेऊन, भारतीय लघुउद्योग उत्पादनाला चालना देण्याची गरज आहे.
सर्वांना विनंती आहे की कोणतीही चिनी बनावटीची वस्तू अजीबात खरेदी करू नका. व्यापारी मित्रांनी पण चिनी माल स्वस्त मिळतोय् म्हणून खरेदी अथवा विक्री करू नका. कारण आपल्याला चीनला आणि पर्यायाने पाकिस्तानला नेस्तनाबूत करण्याची एक संधी आहे.

शेअर करा

Posted by on Nov 13 2016. Filed under आसमंत, राष्ट्ररक्षा : ब्रि. हेमंत महाजन, स्तंभलेखक. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

प्रतिक्रिया नोंदवा

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

मागील बातम्या, लेख शोध

Search by Date
Search by Category
Search with Google
More in आसमंत, राष्ट्ररक्षा : ब्रि. हेमंत महाजन, स्तंभलेखक (690 of 759 articles)


रमेश पतंगे | लॉ कमिशनने ७ ऑक्टोबर रोजी १६ बिंदूंची एक प्रश्‍नावली आपल्या वेबसाईटवर टाकली आणि मुस्लिम समाजातील तिहेरी तलाक ...