रामनाथ कोविंद देशाचे १४ वे राष्ट्रपती

रामनाथ कोविंद देशाचे १४ वे राष्ट्रपती

नवी दिल्ली, २० जुलै – राष्ट्रपतिपदासाठी झालेल्या निवडणुकीत अपेक्षेप्रमाणे…

‘राष्ट्रपती भवनात मी सामान्यांचा प्रतिनिधी’

‘राष्ट्रपती भवनात मी सामान्यांचा प्रतिनिधी’

नवी दिल्ली, २० जुलै – डॉ. राजेंद्रप्रसाद, सर्वपल्ली राधाकृष्णन,…

प्रथमच एक स्वयंसेवक रायसीनावर

प्रथमच एक स्वयंसेवक रायसीनावर

श्यामकांत जहागीरदार नवी दिल्ली, २० जुलै – राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीत…

अणुचाचणी करू नका!

अणुचाचणी करू नका!

►अमेरिकेने पाकला देऊ केले होते पाच अब्ज डॉलर्स :…

पाकी प्रसारमाध्यमेही अविश्‍वसनीयच

पाकी प्रसारमाध्यमेही अविश्‍वसनीयच

►भारतीय जवानांबाबतचे वृत्त चीननेच ठरवले खोटे, बीजिंग, १९ जुलै…

सिंध प्रांतातही आझादीचे नारे

सिंध प्रांतातही आझादीचे नारे

लाहोर, १८ जुलै – गुलाम काश्मीर आणि बलुचिस्तानमध्ये पाकिस्तानपासून…

आता उसाला लागंल ठिबक सिंचन!

आता उसाला लागंल ठिबक सिंचन!

मुंबई, १८ जुलै – यापुढे जर शेतकर्‍यांना ऊस लागवड…

राज्यात मान्सून सक्रिय

राज्यात मान्सून सक्रिय

►सर्वच भागात दमदार पाऊस, ►नाशिक परिसरात मुसळधार, ►शेतकरी सुखावला,…

सामाजिक बहिष्कार आता गुन्हा

सामाजिक बहिष्कार आता गुन्हा

►फडणवीस सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय ►देशातील ठरले पहिलेच राज्य, मुंबई,…

इतिहास घडवणारी भेट

इतिहास घडवणारी भेट

अनय जोगळेकर | इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी म्हटले…

दलित की भारतीय?

दलित की भारतीय?

रमेश पतंगे | खरे सांगायचे, तर आता राजकारणातून दलित…

‘जमाते पुरोगामी’ बेपत्ता?

‘जमाते पुरोगामी’ बेपत्ता?

•उलट तपासणी : भाऊ तोरसेकर | जमाते पुरोगामीची देशातल्या…

रणबीरच्या फिरण्यावर बंदी

रणबीरच्या फिरण्यावर बंदी

संजय दत्तच्या आयुष्यावर आधारित चित्रपटात रणबीर कपूर ६ वेगवेगळ्या…

प्रियांका ठरली जगातील दुसरी सुंदर महिला!

प्रियांका ठरली जगातील दुसरी सुंदर महिला!

जगातील सर्वात सुंदर महिलांमध्ये बॉलिवूडच्या देसी गर्लला म्हणजेच प्रियांका…

रितेश बनला ‘बँक चोर’

रितेश बनला ‘बँक चोर’

यशराज फिल्मच्या ‘बँक चोर’ या चित्रपटाद्वारे मराठमोळा अभिनेता रितेश…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
रवी उदय: 06:03 | अस्त: 19:01
अयनांश:
Home » आसमंत » याला म्हणतात विचारवंत!

याला म्हणतात विचारवंत!

विश्‍वसंचार : मल्हार कृष्ण गोखले

dr-patricia-croneइस्लामी धर्मसंस्थापक मुहंमद यांचा जन्म सन ५७१ साली झाला. अरबस्तान म्हणजे आजच्या सौदी अरेबिया या देशात, कुरैश जमातीतल्या बानी हाशीम या घराण्यात मुहंमद जन्मले. त्यांचं जन्मस्थान असलेलं मक्का हे शहर, आशिया आणि युरोप यांच्या दरम्यानच्या व्यापारी मार्गावरचं एक महत्त्वाचं ठाणं होतं. आयुष्याच्या चाळीसाव्या वर्षापर्यंत स्वतः मुहंमदसुद्धा व्यापारातच गुंतलेले होते. सन ६११ मध्ये त्यांना मक्केजवळच्या हीर नावाच्या टेकडीवर जिब्रिल या देवदूताचं दर्शन झालं. त्याने मुहंमदांना ईश्‍वरी संदेश वाचण्याची आज्ञा केली. अशा ईश्‍वरी संदेशांचा संग्रह म्हणजेच कुराण. कुराण किंवा कुर्आन या अरबी शब्दाचा अर्थच मुळी ‘मोठ्याने वाचन करणे’ असा आहे.
पुढील २०-२१ वर्षांत मुहंमदांनी आपली, इस्लाम म्हणजे शरणागती किंवा ईश्‍वराला संपूर्ण शरण जाणे, ही उपासना पद्धती अरबस्तानात सर्वत्र पसरवली. म्हणजे अगोदर प्रचलित असलेल्या ज्यू आणि ख्रिश्‍चन उपासना पद्धती, कधी सामोपचाराने, पण बरेचदा बळाने मोडून काढून, आपलीच एकमेव पद्धती सर्वत्र प्रचलित केली; आणि ही गोष्ट धर्म, उपासना, साधना एवढ्यापुरती मर्यादित नव्हती, तर राज्य म्हणजेच शासन आणि प्रशासन हेही त्यांनी आपल्याच हातात घेतलं. म्हणजे मुहंमद हे इस्लामचे संस्थापक, सर्वोच्च धर्मगुरू जसे होते, तसेच आपल्या इस्लामी अनुयायांचे शासक-राजा देखील होते. यालाच अरबी भाषेत म्हणतात,‘खलिफा.’
पण खरा चमत्कार पुढेच आहे. सन ६३२ मध्ये मुहंमद मरण पावले. त्यानंतर अरबांमध्ये त्यांचा वारस कोण, यावरून प्रचंड यादवी माजली; आणि तरीही इस्लामी अरब आक्रमकांनी विलक्षण वेगाने झेप घेतली. प्रथम ते तांबडा समुद्र ओलांडून आफ्रिका खंडात शिरले. ऍबिसीनिया म्हणजे आजच्या इथिओपियापासून ईजिप्त, लीबिया, ट्युनिशिया, अल्जिरिया ते मोरोक्कोपर्यंतचा भूमध्य समुद्राच्या दक्षिणेकडचा प्रदेश त्यांच्या झंजावातासमोर पाचोळ्यासारखा उडाला. तिथल्या प्राचीन संस्कृती, उपासना पद्धती, तिथले वंश कायमचे नष्ट झाले किंवा नाममात्र उरले. मग अरब उत्तरेकडे घुसले. पॅलेस्टाईन, बॅबिलोनिया यांचा फडशा पाडत त्यांनी आशिया मायनर म्हणजे आजचा तुर्कस्तान काबीज केला. रोमनांच्या बायझंटाईन साम्राज्याची राजधानी कॉन्स्टंटिनोपल इस्लामी इस्तंबूल बनली. मग अरब पूर्वेकडे घुसले. पर्शिया ऊर्फ इराणचं अतिशय विशाल असं ससानियन साम्राज्य त्यांच्या पुढ्यात होतं. त्यांनी त्याचा चक्काचूर उडवला आणि ते भारताचा दरवाजा ठोठावू लागले. हा मजकूर वाचत असताना आपण संदर्भ म्हणून मुद्दाम जगाचा नकाशा पहा, मुहंमदांच्या मृत्यूनंतर जेमतेम शंभर वर्षांत अरबांनी ही प्रचंड भरारी मारली. पुढे आफ्रिकेतून जिब्राल्टरमार्गे अरब युरोपात स्पेनमध्ये घुसले. अनेक विद्वानांचं असं म्हणणं आहे की, अशीच धडक त्यांनी सरळ उत्तरेकडे चालू ठेवली असती, तर त्यांनी इंग्लंडही सहज जिंकलं असतं. पण ते पूर्वेकडे म्हणजे युरोपच्या अंतर्भागाकडे वळले आणि तिथेच ख्रिश्‍चनांनी त्यांची घोडदौड यशस्वीपणे रोखली.
ते कसंही असो. पण संप्रदाय आधारित राज्यस्थापना झाल्यापासून अवघ्या शंभर वर्षांत अरबांनी, तत्कालीन ज्ञात जगातला अर्धा भूभाग पादाक्रांत केला, ही वस्तुस्थिती उरतेच. हे त्यांना कसं जमलं? इस्लामच्या स्थापनेपूर्वी, व्यापारात गुंतलेल्या, असंख्य टोळ्यांमध्ये विभाजित होऊन आपसात मारामार्‍या करण्यात दंग असलेल्या अरबांमध्ये एकदम ही जबरदस्त शक्ती कुठून निर्माण झाली; हा जगभरातील विद्वानांचा अभ्यासाचा, चिंतनाचा विषय आहे. अनेकांनी याबाबत आपापल्या चिंतनानुसार लेखन केलेलं आहे नि आजही करीत आहेत. कारण संपूर्ण जग आपल्या टाचेखाली आणण्याची इस्लामी महत्त्वाकांक्षा आजही उणावलेली नाही.
पॅट्रिशिया क्रोन या अशाच एक विदुषी होत्या. त्या मूळच्या डॅनिश म्हणजे डेन्मार्कच्या होत्या. आपल्याकडच्या आई-बापांच्या पोरांविषयी उच्चतम आकांक्षा म्हणजे त्यांनी डॉक्टर किंवा इंजिनीअर व्हावं आणि खोर्‍याने पैसा खेचावा. पॅट्रिशियाचे वडील वेगळ्या विचारांचे होते. आपल्या मुलांना मातृभाषेखेरीज आणखी किमान दोन आंतरराष्ट्रीय भाषा आल्या पाहिजेत, अशी त्यांची इच्छा होती. त्यानुसार पॅट्रिशिया उच्चशिक्षणासाठी प्रथम पॅरिसला आणि तेथून लंडनला आल्या. ते १९७४ साल होतं. तिथपासून १९९७ सालपर्यंत किंग्ज कॉलेज, वॉरबर्ग इन्स्टिट्यूट, लंडन विद्यापीठ, ऑक्सफर्ड विद्यापीठ आणि केंब्रिज विद्यापीठ ही सगळी आधुनिक ज्ञानमंदिरं पॅट्रिशिया बाईंनी आपल्या अध्ययन नि अध्यापनाने दणाणून सोडली.
त्यांनी सुरूवातीला, युरोपमधील राज्यं आणि चर्च यांचे संबंध म्हणजेच राज्यसत्ता आणि धर्मसत्ता यांचे संबंध, अशा विषयावर संशोधन केलं. मग त्या इस्लामकडे वळल्या. इस्लामच्या सुरुवातीच्या काळातला जो काही ज्ञात इतिहास आहे, जो या लेखाच्या प्रारंभी थोडक्यात दिला आहे, तो सगळा अरबी साधनांवरून मांडलेला आहे. त्यात असंख्य विसंगती, घोटाळे, अतिशयोक्ती आहेत. पण मग त्यावेळेला खुद्द अरबस्तानात आणि इतरत्र अनेक संप्रदाय, अनेक राज्यं, अनेक संस्कृती होत्या. त्यांनी इस्लामबद्दल काय नोंदवून ठेवलंय्? म्हणजेच बिगर अरबी, बिगर इस्लामी समकालीन दस्तावेज इस्लामी संप्रदायाबद्दल काय म्हणतात? कोणता अभिप्राय नोंदवतात? तत्कालीन घटनांक़डे कशा दृष्टीने पाहतात?
पॅट्रिशिया बाईंनी इस्लामच्या अभ्यासासाठी असा पूर्णपणे वेगळा मार्ग निवडला. त्यासाठी त्यांनी ग्रीक, आर्मेनियम, पर्शियन, कॉप्टिक, सीरियाक, आर्माईक अशा अनेक भाषांमधल्या समकालीन साधनांचा कसून अभ्यास केला. त्यातून त्यांचा ‘हॅगरिझम ः मेकिंग ऑफ दी इस्लामिक वर्ल्ड’ हा अभिनव ग्रंथ निर्माण झाला. मायकेल कुक हे त्यामध्ये त्यांचे सहलेखक होते.
त्यांचा निष्कर्ष थोडक्यात असा की, इस्लामपूर्व अरब हे मुख्यतः ज्यू उपासनेच्या असंख्य संप्रदायांचे अनुयायी होते. त्यांच्यावर रोमन बायझंटाईन सम्राट आणि पर्शियन सम्राट सत्ता गाजवीत होते. पण ही दोन्ही साम्राज्यं जुनाट झाली होती. इस्लामी एकेश्‍वरवादाचा स्वीकार करून अरबांनी स्वतःला विघटित ज्यू सांप्रदायिक बुजबुजाटातून मुक्त करून घेतलं. त्याचबरोबर त्यांची राज्यस्थापना हे बायझंटाईन आणि पर्शियन साम्राज्याविरुद्धचं लष्करी बंड होतं. ही साम्राज्यं मोडकळीलाच आलेली होती. संघटित अरबांच्या एका तडाख्यासरशी ती कोलमडली. म्हणजे, इस्लामी अरब हे इतिहासाच्या रूढ नियमांपेक्षा कुणीतरी वेगळेच होते आणि त्यांनी युगप्रवर्तक असं काहीतरी घडवलं वगैरे काहीही नाही. ‘बसेल त्याचा घोडा नि करेल त्याचं राज्य’ अशी परिस्थिती होती. अरबांनी ती संधी ओळखली, पकडली, ते परिस्थितीच्या घोड्यावर अचूकपणे स्वार झाले नि पाहता-पाहता अर्ध्या जगाने त्यांच्या पायी लोळण घेतली.
पॅट्रिशिया क्रोन बाईंचं हे पुस्तक तेव्हापासून म्हणजे १९७७ पासून आजपर्यंत गाजतंच आहे. आपल्याकडचे बरेचसे विद्वान हे खरं म्हणजे कारकून असतात. एकच कथासूत्र ताणून-ताणून तीन तीन पुस्तकंसुद्धा लिहितात. केवळ तेवढ्यावर त्यांना ज्ञानपीठंसुद्धा मिळतात. पण पश्‍चिमेत असं चालत नाही. किंबहुना तिथले खरेखुरे विद्वान असं करत नाहीत. त्यामुळे आपलं पहिलंच पुस्तक दणक्यात खपतय एवढ्यावर पॅट्रिशिया बाई संतुष्ट राहिल्या नाहीत. त्यांना इस्लामशी निगडीत आणखी प्रश्‍न सतावत होते. अरबांनी तुर्कांना गुलाम बनवलं. तुर्कांनी अफगाणांना गुलाम बनवलं. पण या गुलामांनी पुढे स्वतःची साम्राज्य स्थापन केली, हे कसं घडलं? प्रेषित मुहंमदाच्या काळी मक्का हे फार मोठं व्यापारी केंद्र खरंच होतं का? इस्लामपूर्वीचे रोमन कायदे, ख्रिश्‍चन कायदे आणि इस्लामी कायदे हे कसकसे बदलत गेले? इस्लाम धर्म हा राज्यशासनाला ‘देवाचे राज्य’ म्हणतो. तर मग इस्लामचा राजकीय विचार-पॉलिटिकल थॉट नेमका आहे तरी काय? अरबी टोळ्यांपासून अरबी साम्राज्यापर्यंत चढत-वाढत गेलेल्या या अरबांची लष्करी संघटना, राज्यव्यवस्था आणि समाज व्यवस्था होती तरी कशी? असे प्रश्‍न त्यांना पडले.
पॅट्रिशियाबाईंनी या प्रश्‍नांवर समस्याप्रधान कथा, कादंबर्‍या, नाटकं वगैरे ‘कलात्मक’ लिखाण न करता, तडाखेबंद अभ्यास करून पुस्तकं लिहिली आणि त्या प्रश्‍नांना उत्तरं दिली.
औद्योगिक क्रांतीमुळे आज जगभर सर्वत्र असंख्य अत्याधुनिक यांत्रिक वस्तू सर्वांकडे आहेत. निदान सर्वांना त्या माहीत आहेत. पण औद्योगिक क्रांतीपूर्वी जग पूर्णपणे वेगळं होतं. म्हणजे नेमकं कसं होतं? जगभरचे विविध समाज कमीअधिक मागास किंवा पुढारलेले होते. म्हणजे नेमके किती? कसं होतं त्यांचं जीवन? यावरही बाईंनी पुस्तक लिहिलेलं आहे. अशा विद्वानांना पुरस्कारांची वाट पहावी लागत नाही. मानसन्मान आपणहून त्यांच्याकडे चालत येतात. १९९७ साली पॅट्रिशिया बाईंना अमेरिकेच्या प्रिन्स्टन विद्यापीठाच्या ‘इन्स्टिट्यूट ऑफ ऍडव्हान्स्ड स्टडी’ मधून बोलावण्यात आलं. बाईंमुळे आम्हाला इस्लाम, ख्रिश्‍चानिटी आणि एकंदरच मानवी इतिहासाकडे पाहण्याची एक वेगळीच दृष्टी मिळाली, असं आज अनेक पाश्‍चात्त्य विद्वान म्हणतात. खरे विचारवंत असे असतात.

शेअर करा

Posted by on Oct 23 2016. Filed under आसमंत. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

प्रतिक्रिया नोंदवा

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

मागील बातम्या, लेख शोध

Search by Date
Search by Category
Search with Google
More in आसमंत (577 of 585 articles)


तरंग : दीपक कलढोणे सायंकाळ. स्वच्छ निरभ्र आकाशात सफरचंदी वर्णाचा सूर्यनारायण दिवसभराची पायपिट करुन मुक्कामाला निघाला होता. ते मनोहर रुपडे ...