Home » आसमंत, रसार्थ : चंद्रशेखर टिळक, स्तंभलेखक » सर्टनली नॉट इव्हन अ पेनी लेस

सर्टनली नॉट इव्हन अ पेनी लेस

•रसार्थ : चंद्रशेखर टिळक |

गुंतवणूक क्षेत्र हे साध्याभोळ्या मंडळींसाठी कधीच नव्हते. काळाच्या ओघात हे क्षेत्र जितके जास्त सुरक्षित होण्यासाठी बदलत गेले, तितकेच ते नवीन अर्थाने धोकादायकही बनत गेले. नवीन प्रभावी कीटकनाशकामुळे काही काळ उपयोग व्हावा; पण त्यालाही नंतर सरसावले जावे, असेच काहीसे सगळ्याच क्षेत्रांत सदैव होत असते. गुंतवणूक क्षेत्रही त्याला अपवाद नाही. पण, म्हणून सगळीच झुरळं नसतात.

tilak-articleआपल्या प्रत्येकाच्याच आयुष्यात काही गोष्टी अशा असतात की, दरवेळी नव्याने त्याचा वेगळाच अर्थ उमगत राहतो. त्यातून एक वेगळाच आनंद मिळत राहतो. मल्लिकार्जुन मन्सूर, भीमसेन जोशी, वीणा सहस्रबुद्धे, मालिनी राजूरकर, अश्‍विनी भिडे-देशपांडे, सावनी शेंडे-साठे यांचं गाणं, दोन स्पेशल आणि कोडमंत्रसारखी नाटके, टिकली येवढं तळंसारखी पुस्तकं ही त्या प्रकारची काही उदाहरणे.
माझ्या बाबतीत तरी याच मालिकेतील एक अस्खलित उदाहरण म्हणजे Jeffery RCHER Mo NOT PENNY MORE, NOT PENNY LESS  हे पुस्तक. १९७६ साली हे पुस्तक प्रकाशित झाले. मला अजून आठवते की, हे पुस्तक माझी बारावी कॉमर्सची वार्षिक परीक्षा झाल्यावर मी पहिल्यांदा वाचले. ( मे १९७७) त्या वेळी ते पुस्तक काहीही समजले नव्हते. ना तो विषय तेव्हा समजला, ना ती भाषा. हे एकदम स्टायलिश इंग्लिश आहे, इतकेच माझे या पुस्तकाबद्दलचे पहिले आणि एकमेव इंप्रेशन त्या वेळी होते. पण, त्यानंतर आजपर्यंत हे पुस्तक मी असंख्य वेळा वाचले.
आज पुन्हा हे पुस्तक चाळत असताना सहजच मनात आले की, हे पुस्तक शेअर-बाजारांच्या पार्श्‍वभूमीवर, नेमके सांगायचं तर त्यातल्या घोटाळ्याच्या पार्श्‍वभूमीवर घडत असले, तरी तुमच्या-माझ्यासारख्या सर्वसामान्य गुंतवणूकदारांच्या मानसिकतेचे अचूक चित्रण या पुस्तकात आहे. आपल्यापैकी कोणीच ना या पुस्तकातील घोटाळेबाज हार्वी मेटक्लाफ होऊ शकतं; ना या पुस्तकातील घोटाळेबाजाला धडा शिकवणारा डेविड केस्लर होऊ शकतं. पण, तरीही एक सर्वसामान्य, छोटा गुंतवणूकदार म्हणून आपण गुंतवणूक क्षेत्राकडे कसे पाहिले पाहिजे, यासाठी या पुस्तकातील अनेक विधानांचा आपण नक्की उपयोग करून घेऊ शकतो.
गमतीने म्हणायचे तर असेही म्हणता येईल की, जेफरी आर्चरचे हे पुस्तक विद्यार्थिदशेत पहिल्यांदा वाचताना जसे मला वाटले होते की, हा विषय काही माझा नाही; तसे आपल्याला गुंतवणूक हा आपला विषय नाही, असं सततच वाटतच असते!
त्यामुळे आयुष्याचा अपरिहार्य भाग म्हणून गुंतवणूक क्षेत्रात कार्यरत असताना जर कोणता एक नियम अंमलात आणायचा असेल, तर या पुस्तकाच्या  Not a penny more; not a penny less  या नावात बदल करायचा आणि स्वतःला असं कार्यरत ठेवायचा की, आपले उद्दिष्ट असे असावे की, Certainly Many more, but not even a penny less. जरी एखाद्या गुंतवणुकीत नुकसान झाले, तरी ते याच गुंतवणूक क्षेत्रातूनच भरून काढायचे असते, हा या पुस्तकाचा खरा मथितार्थ आहे.
Not  Penny More, Not  Penny Less   या पुस्तकाचा जर अशा तर्‍हेने विचार करायचा असेल, तर त्याची सुरुवात या पुस्तकाच्या उपशीर्षकापासून करावी लागेल.   Do not get mean, get even…    अशी ती ओळ आहे. ही ओळ एका स्वतंत्र संपूर्ण लेखाचा विषय आहे.
गुंतवणूक क्षेत्र हे साध्याभोळ्या मंडळींसाठी कधीच नव्हते. काळाच्या ओघात हे क्षेत्र जितके जास्त सुरक्षित होण्यासाठी बदलत गेले, तितकेच ते नवीन अर्थाने धोकादायकही बनत गेले. नवीन प्रभावी कीटकनाशकामुळे काही काळ उपयोग व्हावा; पण त्यालाही नंतर सरसावले जावे, असेच काहीसे सगळ्याच क्षेत्रांत सदैव होत असते. गुंतवणूक क्षेत्रही त्याला अपवाद नाही. पण, म्हणून सगळीच झुरळं नसतात. याचे हे पुस्तक त्या काळातील गुंतवणूक क्षेत्राचे वर्णन करताना शांतपणे सांगते की, संपूर्ण जग हे अरण्य आहे, काही अरण्यातील वाघ-सिंह सूट-बूट घालतात इतकेच!
गुंतवणूक क्षेत्रातील सूट-बूट घालणारे हे वाघ-सिंह खर्‍या वाघ-सिंह यांना साजेल, अशी पुढच्याच्या मनात प्रथमदर्शनीच धडकी भरवत नाहीत. उलट ते त्यांच्या रुबाबदार वागण्याने विश्‍वास संपादन करण्याच्या प्रयत्नांत असतात. तसेही या पुस्तकातील वाक्यात सांगायचे तर People never argue when they are confronted with a trained man. पण अशा वाघ-सिंह मंडळींपासून केवळ आपला बचाव करता येतो इतकेच नव्हे, तर त्यांच्यासमोर यशस्वीही होता येते, हाही याच पुस्तकात सांगितलेला धडा आहेच!
या बाबतचे पहिले सूत्र म्हणजे कोणत्याही गोष्टीवर, आर्थिक तर नाहीच नाही, पटकन विश्‍वास ठेवायचा नाही. गोंडस, अतिसकारात्मक गोष्टींवर तर निश्‍चितच नाही. या पुस्तकातील वाक्याचा आधार घेत सांगायचे, तर Never beleive that the best things in life are free. या बाबतचे दुसरे सूत्र म्हणजे नुकसानाच्या प्रत्येक पैशाचा विसर पडू द्यायचा नाही आणि नफ्याच्या पैशांची गणती करायची नाही. कारण गुंतवणूक क्षेत्राचा अलिखित नियम असा आहे की, f you can count it, then you have not get any.  शिवाय अशा नफ्यातूनच तर नुकसान भरून काढायचे असते. पण, त्यासाठी वेळोवेळी झालेला नफा कागदावर न ठेवता प्रत्यक्ष खिशात घ्यायचा असतो. If you bring home the results, you get the rewards हे या पुस्तकातील वाक्य त्या दृष्टीने महत्त्वाचे आहे. पण, आपले होते भलतेच! आपण घेतलेल्या शेअरचे भाव वाढत असतात तेव्हा काही प्रमाणात तरी profit booking करावे, असे आपल्याला कधीच वाटतच नाही ना!
एक गोष्ट कोणत्याही परिस्थितीत नक्की की, या क्षेत्रातील संभाव्य आणि प्रत्यक्ष नुकसानाचा एक पैसाही वसूल केल्याशिवाय राहायचं नाही (Not even a single penny less ).

शेअर करा

Posted by on Nov 27 2016. Filed under आसमंत, रसार्थ : चंद्रशेखर टिळक, स्तंभलेखक. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

प्रतिक्रिया नोंदवा

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)

हवामान

 • दृष्टीक्षेपात

  व्हिडीओ संग्रह

  मागील बातम्या, लेख शोध

  Search by Date
  Search by Category
  Search with Google
  More in आसमंत, रसार्थ : चंद्रशेखर टिळक, स्तंभलेखक (462 of 565 articles)

  Indian Prime Minister Narendra Modi, right, shakes hand with his British counterpart Theresa May before a meeting in New Delhi, India, Monday, Nov. 7, 2016. Modi and May have begun wide-ranging talks aimed at deepening ties between their two countries and boosting trade and investment as the U.K. plans to leave the European Union. May arrived in New Delhi late Sunday on her first bilateral visit overseas since she became prime minister in July. (AP Photo/Manish Swarup)
  राष्ट्ररक्षा : हेमंत महाजन | गेल्या काही दशकांत भारत आणि ब्रिटन या दोन देशांतील संबंध चांगले राहिले आहेत. ब्रिटनच्या पंतप्रधान ...