ads
ads
महाआघाडी म्हणजे भ्रष्ट, नकारात्मक विचारांचा मेळावा

महाआघाडी म्हणजे भ्रष्ट, नकारात्मक विचारांचा मेळावा

•पंतप्रधान मोदी यांचा घणाघाती हल्ला, नवी दिल्ली, २० जानेवारी…

आरक्षणामुळे रालोआच्या १० टक्के जागा वाढतील

आरक्षणामुळे रालोआच्या १० टक्के जागा वाढतील

•रामविलास पासवान यांचा दावा, नवी दिल्ली, २० जानेवारी –…

कुंभमेळ्यात आज पौष पौर्णिमेनिमित्त पवित्र स्नान

कुंभमेळ्यात आज पौष पौर्णिमेनिमित्त पवित्र स्नान

•लाखो भाविक येण्याची शक्यता, प्रयागराज, २० जानेवारी – उद्या…

आणिबाणी जाहीर करण्याची ट्रम्प यांची धमकी

आणिबाणी जाहीर करण्याची ट्रम्प यांची धमकी

►मेक्सिको सीमेवरील भिंतीचा वाद पेटणार, वॉशिंग्टन, १० जानेवारी –…

विक्रम मिस्री चीनमधील नवे राजदूत

विक्रम मिस्री चीनमधील नवे राजदूत

►पदभार स्वीकारताच केली द्विपक्षीय मुद्यांवर चर्चा, बीजिंग, ८ जानेवारी…

शटडाऊन सुरूच ठेवेन, आणिबाणीचाही पर्याय खुला

शटडाऊन सुरूच ठेवेन, आणिबाणीचाही पर्याय खुला

►डोनाल्ड ट्रम्प यांचा काँगे्रस सभागृहाला इशारा ►मेक्सिकोच्या सीमेवर भिंत…

डान्सबार बंदीसाठी नवा अध्यादेश

डान्सबार बंदीसाठी नवा अध्यादेश

मुंबई, १८ जानेवारी – राज्यातील डान्सबार पुन्हा सुरू करण्याचा…

समृद्धी महामार्गासाठी स्टेट बँक देणार ८५०० कोटींचे कर्ज

समृद्धी महामार्गासाठी स्टेट बँक देणार ८५०० कोटींचे कर्ज

►९५ टक्के भूसंपादन पूर्ण, मुंबई, १७ जानेवारी – स्टेट…

ओबीसी महामंडळांसाठी ७३६ कोटी!

ओबीसी महामंडळांसाठी ७३६ कोटी!

•तरुणांना मिळणार १० ते ५० लाखांचे कर्ज •सावित्रीबाई फुले…

भारताचा पुरुषार्थ प्रकट होण्यास…

भारताचा पुरुषार्थ प्रकट होण्यास…

॥ विशेष : डॉ. मनमोहन वैद्य | सह सरकार्यवाह,…

ऑगस्टा वेस्टलँड

ऑगस्टा वेस्टलँड

॥ चतुरस्त्र : स्वाती तोरसेकर | ऑगस्टा विषयाला हात…

तिसरी आघाडी की तीन आघाड्या?

तिसरी आघाडी की तीन आघाड्या?

॥ जागता पहारा : भाऊ तोरसेकर | भाजपा वा…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 07:02 | सूर्यास्त: 18:14
अयनांश:
Home » क्रीडा » आजपासून फिफा विश्‍वचषकाची जादू!

आजपासून फिफा विश्‍वचषकाची जादू!

►यजमान रशिया व सौदी अरब यांच्यात उदघाटनीय सामना आज,
वृत्तसंस्था
मॉस्को, १३ जून –

Fifa World Cup 2018

Fifa World Cup 2018

समस्त जगाचे लक्ष रशियातील वर्ल्डकप फुटबॉल महासंग्रामाकडे लागलेले आहे. दर चार वर्षांनी होणार्‍या या विश्‍व फुटबॉल महाकुंभाच्या निमित्ताने यजमान रशियासुद्धा विद्युत रोषणाईच्या झगमगाटात उजळून निघाली आहे. मॉस्कोसह अकरा शहरातील बारा स्टेडियममध्ये विश्‍व फुटबॉल सामने रंगणार आहे, ही सर्व अकरा शहरे आकर्षक सजावटीने चकचकीत करण्यात आले आहे. अप्रतिम सौंदर्यांनी नटलेली ही शहरे बघून संपूर्ण रशिया विश्‍वचषकाच्या रंगात न्हावन निघाल्यासारखे वाटत आहे. महिनाभर जोश, उत्साह, आनंद, चैतन्य आणि रोमांचकतेने भरलेल्या फुटबॉल सामन्यांची मेजवाणी समस्त जगाला मिळणार आहे. मॉस्कोतील लुजनिकी स्टेडियममध्ये १४ जून रोजी विश्‍वचषक फुटबॉल स्पर्धेचा उद्घाटन समारंभ थाटात पार पडल्यानंतर यजमान रशिया आणि सौदी अरब यांच्यात सलामीचा सामना खेळला जाणार आहे. भारतीय प्रमाणवेळेनुसार उद्या गुरुवारी सायंकाळी या विश्‍वचषकाचे मोठ्या दिमाखात उद्घाटन होणार आहे.
१४ जून ते १५ जुलैदरम्यान रंगणार्‍या या विश्‍वकरंडक फुटबॉल स्पर्धेत जगज्जेतेपदासाठी ३२ देशांचे संघ आपल्या कौशल्य व सामर्थ्यानिशी झुंजणार आहे. मास्को येथे उद्घाटन व समारोप सोहळ्यासह एकूण १२ सामने खेळविले जातील.
प्रख्यात लुजनिकी स्टेडियममध्ये सलामीचा सामना आणि उपउपांत्यपूर्व सामना, एक उपांत्य सामना आणि अंतिम सामना रंगणार आहे.
यजमान रशिया फुटबॉलमय झाले असून विश्‍वचषक फुटबॉलचा ज्वर आता संपूर्ण जगाला चढला आहे. मॉस्कोत रेड स्क्वेअरजवळ लाईट शो, उंच इमारतींवर विश्‍वचषकाचे होर्डिंग्स तसेच मनेगी संग्रहालयासमोर स्पर्धेशी संबंधित वस्तू सजविण्यात आल्या. तसेच विविध दुकानांमध्ये फुटबॉल व स्पर्धेतील सहभागी राष्ट्रांचे ध्वज लक्ष वेधून घेत आहेत.
रशियाचे अध्यक्ष ब्लादिमीर पुतिन यांनी विश्‍वचषकाचे आयोजन अत्यंत प्रतिष्ठेचे केले. चीनने बीजिंग ऑलिम्पिकचे आयोजन ज्या थाटात पार पाडले, अशाच प्रकारचे आयोजन करण्यात कुठलीही कसर शिल्लक ठेवायची नाही, असे त्यांनी आदेशसुद्धा दिले आहेत.
या विश्‍व फुटबॉल सामन्यांचा आनंद, रोमांचकता बघण्यासाठी लाखोच्या वर विदेशी प्रेक्षक येणार असून काहींचे मॉस्कोत आगमनही झालेले आहे. महिनाभर चालणार्‍या या फुटबॉल आयोजनातील ठळक नोंदी घेण्यासाठी, खेळाडूंच्या हालचाली टिपण्यासाठी जगातील हजारो पत्रकार येथे दाखल झाले आहेत.
चोख बंदोबस्त
फिफा विश्‍वचषकाला अतिरेकी आणि हुल्लडबाजांकडून असलेला धोका लक्षात घेऊन रशियाने अतिशय कडक सुरक्षाव्यवस्था तैनात केली आहे. विश्‍वचषक सामन्यांच्या यजमान शहरांमध्ये आकाशातून होणार्‍या हल्ल्यांना सामोरे जाण्याची तयारी रशियाने ठेवली आहे. मॉस्कोत लढाऊ विमानांचा ताफा कोणत्याही क्षणी उड्डाणासाठी सज्ज ठेवण्यात आला आहे. गुरुवारी उद्घाटन समारंभ व सलामीचा सामना याकरिता मॉस्कोत सुमारे तीस हजार सुरक्षारक्षक तैनात करण्यात आले आहेत.
पॉप सिंगर्सचे सादरीकरण
रशियाची नामवंत पॉप गायिका आयडा गारिफुलिनाच्या साथीने ब्रिटनचा पॉप स्टार रॉबी विल्यम्स परफॉर्म करणार आहे. ब्राझिलचा १९९४ आणि २००२ सालच्या विश्‍वचषक विजेत्या संघाचा सदस्य रोनाल्डो उद्घाटन सोहळ्याला उपस्थित राहणार आहे.
विश्‍वचषकातील ३२ संघात स्वीत्झर्लंड श्रीमंत, सेनेगाल गरीब
२१ व्या फिफा विश्‍वचषकात यंदा ३२ संघ सहभागी होत आहेत. ३२ संघापैकी सर्वात श्रीमंत संघ स्वीत्झर्ल्डंडचा आहे तर सर्वात गरीब सेनेगलचा आहे. लोकसंख्येनुसार या स्पर्धेत भाग घेणारा सर्वात मोठा देश ब्राझील आहे तर सर्वात लहान देश आईसलॅण्ड आहे.
विश्‍वचषकातील ३२ संघांना आठ ग्रुपमध्ये विभागले असून प्रत्येक गटात चार-चार संघ आहे. प्रत्येक ग्रुपमधील अव्वल ठरणारे दोन संघ बाद फेरीत प्रवेश करतील.
शुभांकर झाबिवाका आकर्षण ठरणार
रशियात आयोजित फिफा एकविसाव्या विश्‍वचषकाचे शुभांकर लांडगा असून या शुभांकराचे नाव झाबिवाका असे ठेवण्यात आलेले आहे.
पांढर्‍या व करड्या रंगांमधला हा लांडगा फिफा विश्‍वचषकाचे आकर्षण ठरणार आहे. या झाबिवाकाने रशियन राष्ट्रध्वजाच्या रंगातले कपडे परिधान केले असून त्याच्या टी-शर्टवर रशिया २०१८ असे लिहिण्यात आले आहे.
फिफाने २०१६ साली झाबिवाकाचे अनावरण केले होते. एकाटेरिना बोकारोव्हा या रशियन विद्यार्थ्याने हे बोधचिन्ह डिझाईन केले आहे. फिफा विश्‍वचषकाचे उद्घाटन जसजसे जवळ येत आहे, तसतसा सोशल मीडियावर अधिकाधिक लोकप्रिय होताना दिसत आहे.

Posted by : | on : 14 Jun 2018
Filed under : क्रीडा.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास
  • हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस
  • भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय
  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह