Home » क्रीडा » कबड्डी विश्‍वचषक: भारताची हॅटट्रिक

कबड्डी विश्‍वचषक: भारताची हॅटट्रिक

Ahmedabad: Indian players celebrate after beating Iran by 39-28 points during the final match of ''Kabaddi World Cup 2016'' in Ahmedabad on Saturday. PTI Photo (PTI10_22_2016_000219B)

हिंदुस्थान समाचार,
कर्णावती, [२२ ऑक्टोबर] – कर्णावती (अहमदाबाद) येथे सुरू असलेल्या कबड्डी विश्‍वचषकाच्या अंतिम सामन्यात भारताने इराणचा ३८-२९ अशा फरकाने पराभव करून, सलग तिसर्‍यांदा विश्‍वचषकावर आपले नाव कोरले. पहिल्या सत्रात भारत १८-१३ ने पिछाडीवर होता. भारतीय चढाईपटूंना फारसे यश मिळत नसताना बचावदेखील फारसा प्रभावी ठरत नव्हता. मात्र दुसर्‍या सत्रात भारताने सर्वच आघाड्यांवर दमदार कामगिरी केली. अजयच्या यशस्वी चढायांमुळे भारताने इराणची आघाडी हळूहळू कमी केली. भारताच्या बचावपटूंनी इराणच्या चढाईपटूंना निष्प्रभ करण्यास सुरुवात केली. त्यामुळे भारताने आघाडी घेतली. हळूहळू भारताची आघाडी वाढत गेली. पहिल्या सत्राच्या अखेरीस १८-१३ ने पिछाडीवर असणारा भारतीय संघ दुसर्‍या सत्रात इराणला भारी पडला.
याआधी भारताने २००४ आणि २००७ मध्ये कबड्डी विश्वचषकावर आपले नाव कोरले आहे. या दोन्ही स्पर्धांमध्ये भारताने अंतिम फेरीत इराणचाच पराभव केला होता.

शेअर करा

Posted by on Oct 23 2016. Filed under क्रीडा. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

प्रतिक्रिया नोंदवा

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)

हवामान

 • दृष्टीक्षेपात

  व्हिडीओ संग्रह

  मागील बातम्या, लेख शोध

  Search by Date
  Search by Category
  Search with Google
  More in क्रीडा (168 of 183 articles)


  मोहाली, [२२ ऑक्टोबर] - भारत व न्यूझीलंड संघात उद्या रविवारी पाच सामन्यांच्या मालिकेतील तिसरा एक दिवसीय आंतरराष्ट्रीय सामना खेळला ...