Home » क्रीडा » टीम इंडियाला पराभवाचा धक्का

टीम इंडियाला पराभवाचा धक्का

=रोमहर्षक ठरलेल्या सामन्यात न्यूझीलंडकडून ६ धावांनी पराभूत=
india-new-zealand-third-odi-at-delhiनवी दिल्ली, [२० ऑक्टोबर] – दिल्लीतील फिरोजशहा कोटला मैदानात टीम इंडियाला न्यूझीलंडविरुद्धच्या दुसर्‍या एकदिवसीय सामन्यात पराभवाला सामोरे जावे लागले. रंगतदार ठरलेल्या सामन्यात न्यूझीलंडने ६ धावांनी विजय प्राप्त केला.
न्यूझीलंडच्या २४३ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना भारतीय संघाकडून केदार जाधवची ४१ धावांची खेळी वगळता इतर कोणत्याही फलंदाजाला चांगली कामगिरी करता आली नाही. कर्णधार धोनीने भारतीय संघाचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला पण यावेळी तो मॅच विनर ठरू शकला नाही. साऊदीच्या गोलंदाजीवर धोनी (३९) झेलबाद झाला. त्यानंतर हार्दिक पंड्याने भारतीय संघाच्या विजयाची आशा अखेरच्या षटकापर्यंत जिवंत ठेवली होती. मात्र हार्दिक ३६ धावांवर बाद झाल्यानंतर संघाच्या विजयाच्या आशा पूर्णपणे मावळल्या. अखेरच्या षटकात टीम साऊदीने बुमराहला शून्यावर माघारी धाडून किवींनी विजयी जल्लोष साजरा केला. न्यूझीलंडने या विजयासह पाच सामन्यांच्या मालिकेत आता १-१ अशी बरोबरी साधली आहे.
तत्पूर्वी, भारताने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजीस उतरलेल्या न्यूझीलंड संघाला पहिल्याच षटकात मार्टिन गुप्टिलच्या रुपाने पहिला हादरा बसला. गुप्टिल व टॉम लाथम ही सलामी जोडी मैदनावर आली, उमेश यादवने पहिल्याच षटकातील दुसर्‍या चेंडूवर गुप्टिलचा (०) त्रिफळा उडविला. नंतर कर्णधार केन विल्यम्सनने एक टोक सांभाळीत एकाकी झुंज दिली आणि स्वतःचे शतक साजरे करीत न्यूझीलंडला सन्मानजनक धावसंख्या उभारून दिली. लाथम व विल्यम्सनने दुसर्‍या गड्यासाठी १२० धावांची भागीदारी केली. लाथम केदार जाधवच्या फिरकीवर पायचीत झाला. लाथमने ४६ चेंडूत ६ चौकार व एक षटकारासह ४६ धावा काढल्या. नंतर विल्यम्सनने रॉस टेलरसोबत (२१) ३८ धावांची, तर कोरी ऍण्डरसनसोबत (२१) ४६ धावांची भागीदारी केली आणि संघाला दोनशे धावांचा टप्पा गाठून दिला. त्यानंतर विल्यम्सनही अमित मिश्राच्या गोलंदाजीत अजिंक्य रहाणेकडून झेलबाद झाला. त्यावेळी न्यूझीलंडचीस्थिती ५ बाद २१३ धावा अशी होती. विल्यम्सनने १२८ चेंडूत १४ चौकार व एका षटकारसह ११८ धावांची खेळी केली.

शेअर करा

Posted by on Oct 21 2016. Filed under क्रीडा. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

प्रतिक्रिया नोंदवा

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

मागील बातम्या, लेख शोध

Search by Date
Search by Category
Search with Google
More in क्रीडा (180 of 186 articles)


ओडेसे, [२० ऑक्टोबर] - रिओ ऑलिम्पिक रौप्यपदक विजेती बॅडमिंटनपटू पी.व्ही. सिंधूने सात लाख डॉलर्स रोख पारितोषिकांच्या डेन्मार्क ओपन बॅडमिंटन स्पर्धेत ...