Home » क्रीडा » बीएमडब्ल्यू कार बाळगणार नाही : दीपा कर्माकर

बीएमडब्ल्यू कार बाळगणार नाही : दीपा कर्माकर

=रस्ता गुळगुळीत झाला तरीही नाही=
dipa-karmakarअगरतला, [२१ ऑक्टोबर] – ऑलिम्पिकमध्ये डोळ्यादेखत पदक निसटल्यानंतरही संपूर्ण भारतीयांच्या गळ्यातील ताईत बनलेल्या दीपा कर्माकरने त्रिपुरा सरकारची झोप उडविताच खडबडून जागे झालेल्या शासकीय अधिकार्‍यांनी दीपाचे मन जिंकण्याचा प्रयत्न केला.पण दीपा आपल्या निर्णयावर ठाम असल्याने अनेकांच्या भुवयॉ उंचावल्या आहेत.
या घटनेच्या संदर्भात मिळालेल्या माहितीनुसार
जिम्नॅस्टपरी दीपा कर्माकरकडे बीएमडब्ल्यू कार आली. ती कार दीपा परत करणार ठाम असल्याचे कळताच त्रिपुरा सरकारने त्या परिसरातील मुख्य रस्त्यांची दुरुस्ती करण्याचा तातडीने निर्णय घेतला. विशेषतः त्या परिसरातील रस्त्यांची डागडुजी केली जात आहे, जिथे दीपा राहते. परिसरात रस्ता दुरुस्तीच्या कामाचा वेग पाहून दीपाने त्या कामांची मुक्तकंठाने प्रशंसा केली. शासकीय अधिकार्‍यांनाही हायसे वाटले. पण दीपा आपल्या निर्णयावर ठाम आहे.
अभयनगर येथे दीपाच्या निवासस्थानापासून अगरतळाच्या शासकीय मेडिकल कॉलेजपर्यंतचा रस्ता गुळगुळीत केला जाणार आहे याकडे अगरतळा महानगरपालिकेचे महापौर प्रफुल्लजित सिन्हा यांनी लक्ष वेधले तर दुसरीकडे दीपा ती बीएमडब्ल्यू कार स्वत:जवळ ठेवू इच्छित नाही असे स्पष्टपणे सांगत आहें.
या रस्ता बांधकामासाठी ७८ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. या रस्त्याची लांबी २.३ किलोमीटर असून या कामाला लवकरात लवकर पूर्ण करण्याचे आदेश देण्यात आले आहे, असे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकार्‍यांनी सांगितले. या रस्त्यावर प्रवासासाठी कारने सात मिनिटांचा वेळ लागतो.
एका उत्तरात दीपा म्हणाली की, आम्ही कधीही रस्ता बनविण्यासाठी कोणालाच जलनंती केली नव्हती. रस्त्याशिवाय कारची सर्व्हिस व देखरेखसुद्धा करणे हाच मोठा प्रश्‍न आहे. त्याकडे बघता बीएमडब्ल्यू कार परत करायचीच हा माझा ठाम निर्णय झाला आहे, व त्यावर मी कायम आहे.

शेअर करा

Posted by on Oct 22 2016. Filed under क्रीडा. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

प्रतिक्रिया नोंदवा

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)

हवामान

 • दृष्टीक्षेपात

  व्हिडीओ संग्रह

  मागील बातम्या, लेख शोध

  Search by Date
  Search by Category
  Search with Google
  More in क्रीडा (175 of 183 articles)


  =बीसीसीआयची मंजूरी= मुंबई, [२१ ऑक्टोबर] - डीआरएस प्रणालीत करण्यात आलेल्या सुधारणांचे परीक्षण बीसीसीआय करणार आहे. या परीक्षणात समाधान झाल्यानंतरच बीसीसीआय ...