Home » क्रीडा » भारत-कोरिया लढत बरोबरीत

भारत-कोरिया लढत बरोबरीत

=आशियाई चॅम्पियन्स चषक हॉकी=
india-koria-hockeyक्वांटन, [२२ ऑक्टोबर] – आशियाई चॅम्पियन्स चषक हॉकी स्पर्धेत भारत आणि दक्षिण कोरिया संघातील लढत  १-१ गोलने बरोबरीत सुटली. स्पर्धेच्या पहिल्या सामन्यात भारताने जपानचा १०-२ ने धुव्वा उडविला होता. स्पर्धेत रविवारी भारताची गाठ पाकिस्तानशी पडणार आहे.
भारताने ज्या पद्धतीने जपानविरुद्धच्या लढतीत झुंज दिली होती, तशी झुंज कोरियाविरुद्ध दिसली नाही. दहाव्या मिनिटाला दक्षिण कोरियाने पहिला गोल नोंदवून सामन्यात १-० अशी आघाडी मिळविली आणि ही आघाडी मध्यंतरापर्यंत कायम राहिली. माजी विजेत्या भारताने गोल नोंदविण्याचा प्रयत्न केला, परंतु कोरियाच्या संरक्षण फळीने भारताच्या आक्रमण खेळाडूंचे प्रयत्न हाणून पाडले. मध्यंतरानंतर ३३ व्या मिनिटाला निकीन थिमैयाच्या पासवर ललित उपाध्यायने सुंदर गोल नोंदवून सामना बरोबरीत आणला. अखेरच्या क्वॉर्टरपूर्वीपर्यंत गोलफलक १-१ ने बरोबरीतच होता. अखेरच्या क्
क्वॉर्टरमध्येही दोन्ही संघांनी निर्णायक गोल नोंदविण्याचा आटोकाट प्रयत्न केला, परंतु कोणीही गोल करू शकले नाहीत आणि सामना १-१ ने बरोबरीत संपला.

शेअर करा

Posted by on Oct 22 2016. Filed under क्रीडा. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

प्रतिक्रिया नोंदवा

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)

हवामान

  • दृष्टीक्षेपात

    व्हिडीओ संग्रह

    मागील बातम्या, लेख शोध

    Search by Date
    Search by Category
    Search with Google
    More in क्रीडा (167 of 180 articles)

    swimmer-shivani-kataria
    =भारताची पदक तालिकेत आघाडी= दिल्ली, [२२ ऑक्टोबर] - श्रीलंकेत सुरू असलेल्या दक्षिण आशियाई स्पर्धेत गुडगावमधील जलपरी शिवानी कटारिया हिने सात ...