‘पद्मावती’च्या अडचणी वाढल्या

‘पद्मावती’च्या अडचणी वाढल्या

►हस्तक्षेप करण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार • मध्यप्रदेशातही बंदी ►दीपिका,…

राहुल गांधी यांच्या अध्यक्षपदाचा मार्ग मोकळा

राहुल गांधी यांच्या अध्यक्षपदाचा मार्ग मोकळा

►कॉंगे्रस कार्यसमितीच्या बैठकीत एकमताने ठराव, नवी दिल्ली, २० नोव्हेंबर…

काँग्रेसमुक्त भारतासाठी राहुलच अध्यक्ष हवे

काँग्रेसमुक्त भारतासाठी राहुलच अध्यक्ष हवे

►योगी आदित्यनाथ यांचा चिमटा, लखनौ, २० नोव्हेंबर – संपूर्ण…

रोहिंग्यांना म्यानमारचे नागरिकत्व देण्याचे संयुक्त राष्ट्रसंघाचे आवाहन

रोहिंग्यांना म्यानमारचे नागरिकत्व देण्याचे संयुक्त राष्ट्रसंघाचे आवाहन

न्यूयॉर्क, १९ नोव्हेंबर – रोहिंग्या मुस्लिमांविरोधात लष्कराने सुरू केलेली…

मानुषी छिल्लर मिस वर्ल्ड

मानुषी छिल्लर मिस वर्ल्ड

►१७ वर्षानंतर भारताला मुकुट, सान्या, १८ नोव्हेंबर – भारताच्या…

नरेंद्र मोदी यांच्या लोकप्रियतेतील महत्त्वाचे घटक

नरेंद्र मोदी यांच्या लोकप्रियतेतील महत्त्वाचे घटक

►व्यंग्यात्मक टि्‌वट, टीका करण्याची शैली, वॉशिंग्टन, १८ नोव्हेंबर –…

‘पद्मावती’चे प्रदर्शन लांबणीवर

‘पद्मावती’चे प्रदर्शन लांबणीवर

►निर्मात्यांची घोषणा, मुंबई, १९नोव्हेंबर – संपूर्ण देशात विरोध निर्माण…

कोपर्डी : तिन्ही आरोपी दोषी

कोपर्डी : तिन्ही आरोपी दोषी

►२२ ला सुनावणार शिक्षा, नगर, १८ नोव्हेंबर – संपूर्ण…

मंजुरीसाठी भन्साळींचा सेन्सॉर बोर्डावर दबाव

मंजुरीसाठी भन्साळींचा सेन्सॉर बोर्डावर दबाव

►नियमांचेही उल्लंघन : अध्यक्षांचा आरोप, मुंबई, १८ नोव्हेंबर –…

‘भारते नवजीवनम्’

‘भारते नवजीवनम्’

संस्कार भारतीचा अखिल भारतीय कलासाधक संगम ॥ विशेष :…

मोदीजी, रुद्रावतार दाखवा हो!

मोदीजी, रुद्रावतार दाखवा हो!

॥ संवाद : सोमनाथ देशमाने | जाती-पातीच्या राजकारणाला, छद्मी…

जीएसटी आणि समाजाची मानसिकता

जीएसटी आणि समाजाची मानसिकता

॥ विशेष : ॠषिकेश बदामीकर | आपण जसे आपले…

‘सिमरन’मधील नवीन गाणे प्रदर्शित

‘सिमरन’मधील नवीन गाणे प्रदर्शित

अभिनेत्री कंगना राणावत लवकरच सिमरन या चित्रपटाद्वारे प्रेक्षकांच्या भेटीला…

चिरंजीवीसोबत सिनेमा करण्यास ऐश्‍वर्याचा नकार?

चिरंजीवीसोबत सिनेमा करण्यास ऐश्‍वर्याचा नकार?

ऐश्‍वर्या राय बच्चनची सध्या बॉलीवूडमध्ये सेकंड इनिंग सुरू आहे.…

रणबीरच्या फिरण्यावर बंदी

रणबीरच्या फिरण्यावर बंदी

संजय दत्तच्या आयुष्यावर आधारित चित्रपटात रणबीर कपूर ६ वेगवेगळ्या…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:37 | सूर्यास्त: 17:48
अयनांश:
Home » क्रीडा, छायादालन » इंग्लंडचा बांगलादेशवर निसटता विजय

इंग्लंडचा बांगलादेशवर निसटता विजय

=अष्टपैलु स्टोक्स सामनावीर=
Bangladesh England Cricketचितगाव, [२४ ऑक्टोबर] – अत्यंत चुरशीच्या पहिल्या कसोटी सामन्यात बलाढ्य इंग्लंड संघाला कमकुवत बांगलादेश संघावर विजय मिळविण्यासाठी घाम गाळावा लागला. केवळ २२ धावांनी इंग्लंडने ही लढत जिंकून मालिकेत १-० ने आघाडी मिळविली. डावात एकूण ६ गडी व एकूण ९१ धावा गोळा करणारा इंग्लंडचा स्टोक्स सामनावीरचा मानकरी ठरला.
यजमान बांगलादेशसमोर पहिली कसोटी जिंकण्यासाठी दुसर्‍या डावात २८६ धावांची आवश्यकता होती. या धावांचा पाठलाग बांगलादेशच्या फलंदाजांनी मोठ्या खुबीने करताच इंग्लंड गोटात अस्वस्थता पसरली होती. चौथ्या दिवसाचा खेळ थांबला तेव्हा बांगलादेश संघाला विजयासाठी केवळ ३३ धावांची आवश्यकता होती. त्यावेळी त्याच्या हाताशी दोन गडी शेष होते.
बलाढ्य इंग्लंडला पराभूत करणे ही सहज सोपी बाब नव्हती याची जाणीव बांगलादेश संघाला खेळाच्या चौथ्या दिवशीच आली होती. पण प्रचंड जिद्द बाळगणार्‍या यजमान संघातील साबीर रहमान (नाबाद ५९) व टी. इस्लाम (नाबाद ११) या जोडीने पाचव्या दिवसाचा खेळ प्रारंभ केला. त्यावेळी दोन्ही संघात चिर शांतता पसरली होती. सामना जिंकण्याचा प्रचंड दबाव बांगलादेश संघावर होता, तर दुसरीकडे कसोटी विजयाचे दडपण इंग्लंड संघावर होते.
आज बांगलादेश संघासाठी दिवस चांगला नव्हता. विजयासाठी केवळ २३ धावा हव्या असताना ताईजूल इस्लाम याला स्टोक याने पायचित करून इंग्लंड गोटात आनंदाची लकेर उमटविली. तो केवळ १६ धावा काढून तंबूत परतला. त्याची जागा शफिउल इस्लाम याने घेतली. केवळ एक चेंडू त्याने खेळून काढला व स्टोकच्या दुसर्‍या चेंडूचा सामना करताना तो पायचित झाला. सलग दोन गडी एकाच धावसंख्येवर बाद झाल्याने यजमान संघाच्या हातून विजयाची संधी हुकली, तर इंग्लंड संघाला २२ धावांच्या फरकाने मालिकेतील पहिल्या सामन्यात विजय मिळाला. पाच सामन्यांच्या मालिकेत इंग्लंड १-० ने आघाडीवर आहे. बांगलादेश संघाला अतिरिक्त २३ धावा सहज मिळाल्या होत्या. पण त्याचा लाभ त्यांना घेता आला नाही. साबीर रहमान ६४ धावांवर नाबाद होता. त्याने २०० चेंडूंचा सामना केला व त्यातील तीन चेंडूवर त्याने चौकार मारले. दोन षटकारही खेचले. सामनावीरचा मान अष्टपैलू स्टोक याला मिळाला.
संक्षिप्त धावसंख्या अशी : इंग्लंड पहिला डाव २९३ व दुसरा डाव २४० धावा. बांगलादेश पहिला डाव २४८ धावा व दुसरा डाव सर्वबाद २६३ धावा.

शेअर करा

Posted by on Oct 24 2016. Filed under क्रीडा, छायादालन. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

प्रतिक्रिया नोंदवा

Marathi/English, press Ctrl+g  

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

मागील बातम्या, लेख शोध

Search by Date
Search by Category
Search with Google
More in क्रीडा, छायादालन (687 of 723 articles)


टोकियो, [२४ ऑक्टोबर] - जगातील सर्वात उंच शिखर अशी ओळख असलेले माऊंट एव्हरेस्ट सर करणार्‍या पहिल्या महिला गिर्यारोहक जुन्को ताबेई ...