‘पद्मावती’च्या अडचणी वाढल्या

‘पद्मावती’च्या अडचणी वाढल्या

►हस्तक्षेप करण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार • मध्यप्रदेशातही बंदी ►दीपिका,…

राहुल गांधी यांच्या अध्यक्षपदाचा मार्ग मोकळा

राहुल गांधी यांच्या अध्यक्षपदाचा मार्ग मोकळा

►कॉंगे्रस कार्यसमितीच्या बैठकीत एकमताने ठराव, नवी दिल्ली, २० नोव्हेंबर…

काँग्रेसमुक्त भारतासाठी राहुलच अध्यक्ष हवे

काँग्रेसमुक्त भारतासाठी राहुलच अध्यक्ष हवे

►योगी आदित्यनाथ यांचा चिमटा, लखनौ, २० नोव्हेंबर – संपूर्ण…

रोहिंग्यांना म्यानमारचे नागरिकत्व देण्याचे संयुक्त राष्ट्रसंघाचे आवाहन

रोहिंग्यांना म्यानमारचे नागरिकत्व देण्याचे संयुक्त राष्ट्रसंघाचे आवाहन

न्यूयॉर्क, १९ नोव्हेंबर – रोहिंग्या मुस्लिमांविरोधात लष्कराने सुरू केलेली…

मानुषी छिल्लर मिस वर्ल्ड

मानुषी छिल्लर मिस वर्ल्ड

►१७ वर्षानंतर भारताला मुकुट, सान्या, १८ नोव्हेंबर – भारताच्या…

नरेंद्र मोदी यांच्या लोकप्रियतेतील महत्त्वाचे घटक

नरेंद्र मोदी यांच्या लोकप्रियतेतील महत्त्वाचे घटक

►व्यंग्यात्मक टि्‌वट, टीका करण्याची शैली, वॉशिंग्टन, १८ नोव्हेंबर –…

‘पद्मावती’चे प्रदर्शन लांबणीवर

‘पद्मावती’चे प्रदर्शन लांबणीवर

►निर्मात्यांची घोषणा, मुंबई, १९नोव्हेंबर – संपूर्ण देशात विरोध निर्माण…

कोपर्डी : तिन्ही आरोपी दोषी

कोपर्डी : तिन्ही आरोपी दोषी

►२२ ला सुनावणार शिक्षा, नगर, १८ नोव्हेंबर – संपूर्ण…

मंजुरीसाठी भन्साळींचा सेन्सॉर बोर्डावर दबाव

मंजुरीसाठी भन्साळींचा सेन्सॉर बोर्डावर दबाव

►नियमांचेही उल्लंघन : अध्यक्षांचा आरोप, मुंबई, १८ नोव्हेंबर –…

‘भारते नवजीवनम्’

‘भारते नवजीवनम्’

संस्कार भारतीचा अखिल भारतीय कलासाधक संगम ॥ विशेष :…

मोदीजी, रुद्रावतार दाखवा हो!

मोदीजी, रुद्रावतार दाखवा हो!

॥ संवाद : सोमनाथ देशमाने | जाती-पातीच्या राजकारणाला, छद्मी…

जीएसटी आणि समाजाची मानसिकता

जीएसटी आणि समाजाची मानसिकता

॥ विशेष : ॠषिकेश बदामीकर | आपण जसे आपले…

‘सिमरन’मधील नवीन गाणे प्रदर्शित

‘सिमरन’मधील नवीन गाणे प्रदर्शित

अभिनेत्री कंगना राणावत लवकरच सिमरन या चित्रपटाद्वारे प्रेक्षकांच्या भेटीला…

चिरंजीवीसोबत सिनेमा करण्यास ऐश्‍वर्याचा नकार?

चिरंजीवीसोबत सिनेमा करण्यास ऐश्‍वर्याचा नकार?

ऐश्‍वर्या राय बच्चनची सध्या बॉलीवूडमध्ये सेकंड इनिंग सुरू आहे.…

रणबीरच्या फिरण्यावर बंदी

रणबीरच्या फिरण्यावर बंदी

संजय दत्तच्या आयुष्यावर आधारित चित्रपटात रणबीर कपूर ६ वेगवेगळ्या…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:37 | सूर्यास्त: 17:48
अयनांश:
Home » क्रीडा, छायादालन » इंग्लंड सर्वबाद २८३; भारत ६ बाद २७१

इंग्लंड सर्वबाद २८३; भारत ६ बाद २७१

=पुजारा, कोहली, अश्‍विनची अर्धशतके=
वृत्तसंस्था
मोहाली, २७ नोव्हेंबर –
kohli-ashwin-pujaraपाहुण्या इंग्लंड संघाला २८३ धावांत रोखल्यानंतर अर्धशतकवीर चेतेश्‍वर पुजारा (५१), विराट कोहली (६२), आर. अश्‍विनच्या (५७) दमदार फलंदाजीच्या जोरावर भारताने चोख प्रत्युत्तर देत तिसर्‍या कसोटी क्रिकेट सामन्याच्या दुसर्‍या दिवसअखेरीस ६ गडी गमावित २७१ धावा उभारल्या. भारत अजून १२ धावांनी पिछाडीवर असून ४ गडी शिल्लक आहे.
सलामी फलंदाज मुरली विजय (१२) लवकरच बाद झाल्याची तमा न बाळगता भारतीय फलंदाजांनी आत्मविश्‍वासपूर्वक प्रदर्शन करीत उपहारापर्यंत भारताला १ बाद ६० धावांपर्यंत पोहोचविले. आठ वर्षानंतर कसोटी संघात स्थान मिळविणार्‍या पार्थिव पटेलने आपली उपयुक्तता सिद्ध करताना ८५ चेंडूत ६ चौकारांसह ४२ धावांचे योगदान दिले. रशिदने पटेलला पायचीत केले. चेतेश्‍वर पुजारा व कर्णधार विराट कोहलीने इंग्लंडच्या गोलंदाजांचा जबरदस्तरितीने सामना केला. चहापानापर्यंतच्या खेळात भारताने २ बाद १४८ धावांची नोंद केली. पुजारा व कोहलीने नाबाद ७५ धावांची भागीदारी करीत दुसर्‍या डावात भारताच्या डावाला मजबूती प्रदान केली. त्यावेळी चेतेश्‍वर पुजाराने अपले अर्धशतक पूर्ण केले, तर कर्णधार कोहली नाबाद ४० धावांवर खेळत होता. त्यानंतर पुजारा रशिदच्या फिरकीला बळी पडला आणि वोक्सकडे झेल सोपविला. पुजाराने १०४ चेंडूंचा सामना करीत ८ चौकारांसह ५१ धावा काढल्या. भारताने दीडशे धावांचा टप्पा गाठला असतानाच अजिंक्य रहाणे (०) रशिदच्या चेंडूवर पायचीत झाला. नंतर कोहलीला साथ द्यावयास आलेला करुण नायरसुद्धा (४) झेलबाद झाला. कोहलीने अश्‍विनच्या साथीने संघाला दोनशे धावांचा उंबरठा ओलांडून दिला. मात्र अशातच कोहली बेन स्टोक्सच्या गोलंदाजीत बेअरस्टोवकडून झेलबाद झाला. कोहलीने १२७ चेंडूत ९ चौकारांसह ६२ धावांचे योगदान दिले. त्यानंतर आर. अश्‍विन आणि रवींद्र जडेजाने नाबाद ६७ धावांची खेळी करीत दिवसअखेरपर्यंत भारताला ६ बाद २७१ अशी धावसंख्या रचून दिली. खेळ थांबला तेव्हा अश्‍विन ५७ धावांवर, तर जडेजा ३१ धावांवर खेळत होते. इंग्लंडकडून  आदिल रशिदने ८१ धावात ३ बळी, तर बेन स्टोक्सने ४८ धावात २ बळी टिपले.
तत्पूर्वी, दुसर्‍या दिवशी पहिल्या सत्रात भारतीय गोलंदाजांनी अवघ्या १४ मिनिटे व २३ चेंडूत पाहुण्या संघाचे उर्वरित दोन गडी झटपट बाद करून इंग्लंडचा पहिला डाव २८३ धावांवर संपविला. आजच्या खेळात इंग्लंड संघ १५ धावांची भर घालू शकला, तर भारतीय गोलंदाजांनी २ बळी आपल्या नावावर केले. पहिल्या डावात इंग्लंडसाठी जोनाथन बेअरस्टोवने ८९, तर जोस बटलरने ४३ धावा काढल्या. भारताकडून मोहम्मद शमीने ३, उमेश, जयंत व रवींद्र जडेजाने प्रत्येकी २ बळी, तर आर. अश्‍विनने १ बळी टिपला.
धावफलक
इंग्लंड पहिला डाव ः ९३.५ षटकात सर्वबाद २८३.
भारत पहिला डाव ः मुरली विजय झे. बेअरस्टोव गो. स्टोक्स १२, पार्थिव पटेल पायचीत गो. रशिद ४२, चेतेश्‍वर पुजारा झे. वोक्स गो. रशिद ५१, विराट कोहली झे. बेअरस्टोव गो. स्टोक्स ६२,
अजिंक्य रहाणे पायचीत गो. रशिद ००, करुण नायर धावबाद (बटलर) ०४, आर. अश्‍विन खेळत आहे ५७,  रवींद्र जडेजा खेळत आहे ३१, अवांतर २१, एकूण ८४ षटकात ६ बाद २७१.
गडी बाद होण्याचा क्रम ः १-३९, २-७३, ३-१४८, ४-१५२, ५-१५६, ६-२०४.
गोलंदाजी ः जेम्स ऍण्डरसन १६-३-३६-०, ख्रिस वोक्स १५-५-४७-०, मोहम्मद अली ९-१-१९-०, आदिल रशिद २४-४-८१-३, बेन स्टोक्स १५-२-४८-२, गॅरेथ बॅटी ५-०-२९-०.

शेअर करा

Posted by on Nov 28 2016. Filed under क्रीडा, छायादालन. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

प्रतिक्रिया नोंदवा

Marathi/English, press Ctrl+g  

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

मागील बातम्या, लेख शोध

Search by Date
Search by Category
Search with Google
More in क्रीडा, छायादालन (510 of 723 articles)


वृत्तसंस्था हॉंगकॉंग, २७ नोव्हेंबर - भारताच्या रिओ ऑलिम्पिकमधल्या रौप्यपदक विजेत्या पी. व्ही. सिंधू आणि समीर वर्माला हॉंगकॉंग ओपन सुपर सिरीज ...