रामनाथ कोविंद राष्ट्रपतिपदी आरूढ

रामनाथ कोविंद राष्ट्रपतिपदी आरूढ

श्यामकांत जहागीरदार नवी दिल्ली, २५ जुलै – रामनाथ कोविंद…

सक्षम आणि नैतिक भारत घडवायचाय्

सक्षम आणि नैतिक भारत घडवायचाय्

नवी दिल्ली, २५ जुलै – मजबूत अर्थव्यवस्थेसोबतच आम्हाला समान…

भौतिकशास्त्रज्ञ यश पाल यांचे निधन

भौतिकशास्त्रज्ञ यश पाल यांचे निधन

नवी दिल्ली, २५ जुलै – वैश्‍विक किरणांच्या अभ्यासात महत्त्वाची…

चीनने घेतली अजित डोभालांची धास्ती

चीनने घेतली अजित डोभालांची धास्ती

►डोकलामवर चर्चेची दर्शवली तयारी, बीजिंग, २५ जुलै – सिक्कीम…

एकवेळ पर्वत हलेल, चिनी सैनिकांना हलविणे कठीण!

एकवेळ पर्वत हलेल, चिनी सैनिकांना हलविणे कठीण!

►भारताने चूक सुधारावी, चीनची दर्पोक्ती, बीजिंग, २४ जुलै –…

रशिया भारताला देणार मिग-३५ लढाऊ विमाने

रशिया भारताला देणार मिग-३५ लढाऊ विमाने

झुकोव्हास्की, २३ जुलै – मिग-३५ या जातीची अत्याधुनिक लढाऊ…

कर्जमाफीच्या शंखनादाने विरोधी पक्षांना धडकी

कर्जमाफीच्या शंखनादाने विरोधी पक्षांना धडकी

►शेतकर्‍यांना सुखी ठेवण्यासाठी सरकार प्रयत्नशील ►आमदार डॉ. बोंडेंनी मांडला…

खासदार उदयनराजे स्वत:हून पोलिसांत हजर

खासदार उदयनराजे स्वत:हून पोलिसांत हजर

►२ आठवड्याची न्यायालयीन कोठडी, सातारा, दि. २५ जुलै –…

कर्जमाफीसाठी १९ हजार कोटींची तरतूद

कर्जमाफीसाठी १९ हजार कोटींची तरतूद

►३३ हजार कोटींच्या पुरवणी मागण्या सादर, मुंबई, २४ जुलै…

काल दुर्गापूर, आज बशिरहाट… उद्या?

काल दुर्गापूर, आज बशिरहाट… उद्या?

डॉ. प्रमोद पाठक | एक काळ असा होता की…

बशिरहाटचे गौडबंगाल

बशिरहाटचे गौडबंगाल

•उलट तपासणी : भाऊ तोरसेकर | एव्हाना ममतांनी मागचे…

मोदीद्वेषाचा वाढता ज्वर – नॉट इन माय नेम

मोदीद्वेषाचा वाढता ज्वर – नॉट इन माय नेम

जयंत कुलकर्णी | स्वातंत्र्यानंतर सत्तर वर्षे आपण ज्या संघ…

रणबीरच्या फिरण्यावर बंदी

रणबीरच्या फिरण्यावर बंदी

संजय दत्तच्या आयुष्यावर आधारित चित्रपटात रणबीर कपूर ६ वेगवेगळ्या…

प्रियांका ठरली जगातील दुसरी सुंदर महिला!

प्रियांका ठरली जगातील दुसरी सुंदर महिला!

जगातील सर्वात सुंदर महिलांमध्ये बॉलिवूडच्या देसी गर्लला म्हणजेच प्रियांका…

रितेश बनला ‘बँक चोर’

रितेश बनला ‘बँक चोर’

यशराज फिल्मच्या ‘बँक चोर’ या चित्रपटाद्वारे मराठमोळा अभिनेता रितेश…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:05 | सूर्यास्त: 19:00
अयनांश:
Home » क्रीडा, छायादालन » इंग्लंड २ बाद ८७, आज शेवटचा दिवस

इंग्लंड २ बाद ८७, आज शेवटचा दिवस

=कसोटीवर भारताची घट्ट पकड=
वृत्तसंस्था
विशाखापट्टणम, २० नोव्हेंबर –
ashwin-jadeja-strike-late-as-india-sniff-victory-in-vizag-testपाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील दुसर्‍या लढतीत आज चवथ्या दिवशीचा खेळ आटोपला तेव्हा भारताने विजयासाठी ठेवलेल्या ४०५ धावसंख्येचा पाठलाग करताना पाहुण्या इंग्लंड संघाने २ गडी गमावून ८७ धावा केल्या. उद्या सामन्याचा पाचवा व शेवटचा दिवस असून या कसोटीवर भारताने घट्ट पकड जमविली आहे. इंग्लंडच्या दुसर्‍या डावातील सलामीची जोडी ऍलेस्टर कुक व हमीद यांना जडेजा व अश्‍विन यांनी  पायचित करून इंग्लंड गोटात खळबळ उडवून दिली.
काल तिसर्‍या दिवशीचा खेळ थांबला तेव्हा भारताने ३४ षटकात ३ बाद ९८ धावा केल्या होत्या. कर्णधार विराट कोहली (५६) व अजिंक्य राहाणे (२२) या जोडीने आजचा खेळ पुढे रेटला. ११७ धावसंख्येवर राहाणे, १२७ धावसंख्येवर रविचंद्रन अश्‍विन, १३० वर साहा बाद होताच भारताचा डाव गडगडला.
कर्णधार कोहली एका टोकाकडून धावफलक सतत हलवत होता. तो याही डावात शतक गाठणार असे वाटत असताना रशीदच्या गोलंदाजीत विराटचा झेल स्टोक्स याने टिपला. विराटने आठ चौकारांच्या मदतीने सर्वाधिक ८१ धावांची खेळी केली.
तळातील फलंदाज जयंत यादव याने नाबाद २७ धावा काढल्या. शामी व जडेजा यांनी प्रत्येकी १४ धावा जोडल्या. ६३.१ षटकात भारताचा दुसरा डाव २०४ धावात आटोपला. ब्रॉड व रशीद यांनी प्रत्येकी ४ गडी बाद केले.
विजयाचे ४०५ धावांचे आव्हान स्वीकारून इंग्लंडच्या ऍलेस्टर कुक व हमीद या जोडीने डावाचा सावध प्रारंभ केला. या जोडीने ७५ धावा जोडल्या होत्या, तेव्हा अश्‍विनच्या फसव्या चेंडूवर हमीद पायचित झाला. त्याने ५४ धावा काढल्या होत्या. त्याची जागा रूटने घेतली. पण धावसंख्येत केवळ दहा धावांची भर पडली असताना जडेजाने कर्णधार कुकला पायचित करून इंग्लंडला जबरदस्त धक्का दिला. रूट पाच धावांवर खेळत होता.
उद्या सामन्याचा शेवटचा दिवस असून भारताला ही कसोटी जिंकण्यासाठी इंग्लंडचे आठ गडी टिपावे लागणार आहेत. तर दुसरीकडे अंतिम दिवशी कसोटी जिंकण्यासाठी इंग्लंडला ३१८ धावांची आवश्यकता आहे.
धावफलक असा : भारत पहिला डाव १२९.४ षटकात ४५५ धावा व दुसरा डाव ६३.१ षटकात २०४ धावा (मुरली विजय झे.रूट गो. ब्रॉड ३, लोकेश राहुल झे. बेअरस्टोव गो. ब्रॉड १०, चेतेश्वर पुजारा त्रिफळा गो. ऍण्डरसन १, विराट कोहली झे. स्टोक्स गो. रशीद ८१, अजिंक्य राहाणे झे. कुक गो. ब्रॉड २६, रविचंद्रन अश्‍विन झे. बेअरस्टोव गो. ब्रॉड ७, साहा पायचित गो. रशीद २, रवीन्द्र जडेजा झे. अली गो. रशीद १४, जयंत यादव नाबाद २७, उमेश यादव झे. बेअरस्टोव गो. रशीद ०, मोहम्मद शामी यष्टिचित बेअरस्टोव गो. अली १९, इतर धावा १४).
गडी बाद : १-१६, २-१७, ३-४०, ४-११७, ५-१२७, ६-१३०, ७-१५१, ८-१६२, ९-१६२, १०-२०४.
गोलंदाजी :  ऍडरसन १५-३-३३-१, ब्रॉड १४-५-३३-४, रशीद २४-३-८२-४,  स्टोक्स ७-०-३४-०, अली ३.१-१-९-१.
इंग्लंड पहिला डाव १०२.५ षटकात सर्वबाद २५५ धावा व दुसरा डाव ५९.२ षटकात २ बाद ८७ धावा (ऍलेस्टर कुक पायचित जडेजा ५४, हमीद पायचित गो. रविचंद्रन अश्‍विन २५, जे. रूट खेळतो आहे ५, इतर धावा ३).
गडी बाद : १-७५, २-८७.
गोलंदाजी : मोहम्मद शामी ९-२-१६-०, उमेश यादव ८-३-८-०, रवीन्द्र जडेजा २२.२-८-२५-०, रविचंद्रन अश्‍विन १६-५-२८-१, जयंत यादव ४-१-७-०.

शेअर करा

Posted by on Nov 21 2016. Filed under क्रीडा, छायादालन. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

प्रतिक्रिया नोंदवा

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

मागील बातम्या, लेख शोध

Search by Date
Search by Category
Search with Google
More in क्रीडा, छायादालन (526 of 705 articles)


वृत्तसंस्था ह्यूस्टन, १९ नोव्हेंबर - कृत्रिम हृदयाचे प्रत्यारोपण करणारे पहिले व जगविख्यात हृदय शल्यचिकित्सक डेंटन कूली यांचे अमेरिकेत निधन झाले. ...