Home » क्रीडा, छायादालन » डेन्मार्क ओपन बॅडमिंटन : सिंधूची विजयी सुरुवात

डेन्मार्क ओपन बॅडमिंटन : सिंधूची विजयी सुरुवात

sindhuओडेसे, [२० ऑक्टोबर] – रिओ ऑलिम्पिक रौप्यपदक विजेती बॅडमिंटनपटू पी.व्ही. सिंधूने सात लाख डॉलर्स रोख पारितोषिकांच्या डेन्मार्क ओपन बॅडमिंटन स्पर्धेत विजयी सलामी नोंदविली. सिंधूने ३३ मिनिटे रंगलेल्या लढतीत सहावी सीड चीनच्या की ही बिंगजियाओला सलग गेममध्ये २१-१४, २१-१९ असे हरवून महिला एकेरीच्या पहिल्या फेरीत विजय नोंदविला.
दुसर्‍या फेरीत सिंधूलसमोर १२ वी विश्‍वमानांकित जपानच्या सायाका सातो हिचे आव्हान राहणार आहे. या दोन्ही खेळाडूंदरम्यानचा हा पहिलाच सामना राहील. सिंधूची रिओ ऑलिम्पिकनंतरची ही पहिलीच आंतरराष्ट्रीय स्पर्धा आहे. रिओहून परतल्यांतर स्वागत, सत्कार समारंभात व्यस्त राहिलेल्या भारतीय बॅडमिंटनपटू चीनच्या खेळाडूंविरुद्धची ही कारकीर्दीतली चौथी लढत होती.
११ वी मानांकित चीनच्या खेळाडूने आतापर्यंत तीनवेळा सिंधूविरुद्ध विजय नोंदविला, तर सिंधूने एप्रिल महिन्यात झालेल्या मलेशिया ओपन मध्ये पहिला व आतापर्यंतचा एकच वेळा बिंगजियाओविरुद्ध विजय नोंदविला. यासोबतच दोघींचा कारकीर्द रेकॉर्ड २-३ झाला आहे. जगात आठव्या क्रमांकावर असलेल्या सिंधूने प्रारंभापासूनच आक्रमकता दाखविली आणि पहिला गेममध्ये ३-३ ने बरोबरी मिळविली. त्यानंतर लागोपाठ चार गुण संपादन करीत १०-५ अशी आघाडी केली.

शेअर करा

Posted by on Oct 21 2016. Filed under क्रीडा, छायादालन. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

प्रतिक्रिया नोंदवा

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)

हवामान

 • दृष्टीक्षेपात

  व्हिडीओ संग्रह

  मागील बातम्या, लेख शोध

  Search by Date
  Search by Category
  Search with Google
  More in क्रीडा, छायादालन (687 of 700 articles)


  पॅरिस, [२० ऑक्टोबर ] - लियोनेल मेस्सीच्या शानदार हॅट्‌ट्रिकच्या जोरावर बार्सिलोनाने चॅम्पियन्स लीग फुटबॉल स्पर्धेत दहा खेळाडूंनिशी खेळणार्‍या मॅन्चेस्टर सिटी ...