रोहिंग्यांना भारतात थारा नाही : राजनाथ सिंह

रोहिंग्यांना भारतात थारा नाही : राजनाथ सिंह

नवी दिल्ली, २१ सप्टेंबर – म्यानमारमधून भारतात आलेले रोहिंग्या…

लक्ष्मणराव इनामदार यांच्या नावाने सहकार व मनुष्यबळ अकादमी स्थापणार

लक्ष्मणराव इनामदार यांच्या नावाने सहकार व मनुष्यबळ अकादमी स्थापणार

►जन्मशताब्दी समारंभाचे पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते उद्घाटन, नवी दिल्ली,…

नवरात्रौत्सवानिमित्त मोदी, योगींचा नऊ दिवस उपवास

नवरात्रौत्सवानिमित्त मोदी, योगींचा नऊ दिवस उपवास

नवी दिल्ली, २१ सप्टेंबर – नवरात्रौत्सवाला आज गुरुवारपासून सुरुवात…

भारतात फुटीचे राजकारण : राहुल

भारतात फुटीचे राजकारण : राहुल

न्यूयॉर्क, २१ सप्टेंबर – भारतात नरेंद्र मोदी सरकारकडून फुटीचे…

पॅरिस कराराच्या पुढे जाऊन काम करू : सुषमा स्वराज

पॅरिस कराराच्या पुढे जाऊन काम करू : सुषमा स्वराज

वॉशिग्टन, २१ सप्टेंबर – पर्यावरण रक्षणासाठी भारत वचनबद्ध असून…

पाकने शांतता, सहकार्यासाठी चर्चेचा मार्ग अनुसरावा : अश्रफ घनी

पाकने शांतता, सहकार्यासाठी चर्चेचा मार्ग अनुसरावा : अश्रफ घनी

संयुक्त राष्ट्रे, २१ सप्टेंबर – पाकिस्तानने आता शांतता, सुरक्षा…

राणे कॉंग्रेसमुक्त!

राणे कॉंग्रेसमुक्त!

►तुम्ही काय हकालपट्टी करता, मीच पक्ष सोडतो, सिंधुदुर्ग,२१ सप्टेंबर…

राज्यभरात पावसाने झोडपले

राज्यभरात पावसाने झोडपले

►हवामान खात्याचा अंदाज खरा ठरला, पुणे, १९ सप्टेंबर –…

सत्तेतून बाहेर पडण्यास २५ सेना आमदारांचा विरोध

सत्तेतून बाहेर पडण्यास २५ सेना आमदारांचा विरोध

►सरकारला दिलेल्या अल्टिमेटमची हवा निघाली ►शिवसेनेत मोठ्या फुटीची शक्यता…

ब्रह्मदेशातील बांगलादेशी

ब्रह्मदेशातील बांगलादेशी

॥ विशेष : रमेश पतंगे | ब्रह्मदेशातील बौद्ध जनता…

‘शहरी नक्षली’ गौरी लंकेश हत्या आणि त्यामागचे राजकारण…

‘शहरी नक्षली’ गौरी लंकेश हत्या आणि त्यामागचे राजकारण…

॥ विशेष : श्रीनिवास वैद्य | गौरी लंकेश या…

काट्याचा नायटा होण्याआधीच रोहिंग्यांना हकला!

काट्याचा नायटा होण्याआधीच रोहिंग्यांना हकला!

॥ वर्तमान : दत्ता पंचवाघ | बांगलादेशी मुस्लिमांनी जशी…

‘सिमरन’मधील नवीन गाणे प्रदर्शित

‘सिमरन’मधील नवीन गाणे प्रदर्शित

अभिनेत्री कंगना राणावत लवकरच सिमरन या चित्रपटाद्वारे प्रेक्षकांच्या भेटीला…

चिरंजीवीसोबत सिनेमा करण्यास ऐश्‍वर्याचा नकार?

चिरंजीवीसोबत सिनेमा करण्यास ऐश्‍वर्याचा नकार?

ऐश्‍वर्या राय बच्चनची सध्या बॉलीवूडमध्ये सेकंड इनिंग सुरू आहे.…

रणबीरच्या फिरण्यावर बंदी

रणबीरच्या फिरण्यावर बंदी

संजय दत्तच्या आयुष्यावर आधारित चित्रपटात रणबीर कपूर ६ वेगवेगळ्या…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:16 | सूर्यास्त: 18:20
अयनांश:
Home » क्रीडा, छायादालन » धोनी सेना विजयासाठी सज्ज

धोनी सेना विजयासाठी सज्ज

=आज मालिकेतील चवथा एक दिवसीय सामना=
Team India's practice sessionरांची, [२५ ऑक्टोबर] – एक दिवसीय पाच सामन्यांच्या मालिकेतील मोहालीतील तिसरी लढत जिंकून भारतीय संघाने पाहुण्या न्यूझीलंड संघावर २-१ ने महत्वपूर्ण आघाडी घेतली आहे. कर्णधार महेन्द्रसिंग धोनी याची सेना कर्णधाराच्या भूमीत खेळपट्टी गाजवण्यासाठी सज्ज झाली आहे. मालिकेतील चवथा सामना उद्या (बुधवारी) येथील देखण्या स्टेडियममध्ये खेळला जाणार आहे. विजयासह मालिका जिंकण्याचा इरादा संघातील अनेक खेळाडूंनी व्यक्त करून धोनीचे मनोबल वाढविले आहे. पहिल्या तीन सामन्यात खेळलेलाच संघ उर्वरित दोन लढतींसाठी कायम ठेवण्यात आल्याने संघात चैतन्याचे वातावरण पसरले आहे.
काल आणि आज भारतीय संघातील खेळाडूंनी सराव केला. मोहालीतील सामना विराट कोहली व महेन्द्रसिंग धोनी या जोडीने खेचून आणला होता. त्याचीच पुनरावृत्ती रांचीत होणार की, भारतीय गोलंदाज पाहुण्या किवी संघाचे कंबरडे मोडणार याकडे दर्शकांचे लक्ष लागले आहे. सामना आणि मालिका जिंकून संघातील सर्व खेळाडू धोनीला त्याच्या घरच्या मैदानावर दिवाळीची मोठी भेट देण्यासाठी आतूर झाले आहेत. रांची मैदानावर धोनीचा हा जीवनातील शेवटचा सामना ठरू शकतो याची जाणीव अनेकांना झाली आहे. या मैदानावर भारताने ३ एक दिवसीय आणि एक टी-२० लढत जिंकलेली आहे. एक सामना पावसामुळे स्थगित झाला.
एक दिवसीय सामन्यात ९ हजारावर धावा काढणारा धोनी पहिला फलंदाज ठरला आहे. मोहालीत तो अनपेक्षितपणे चवथ्या क्रमांकावर फलंदाजीला येवून कमालीची फलंदाजी करून टिकाकारांना चोख उत्तर दिले होते.
मोहालीत विराट कोहलीला प्रारंभीच जीवदान मिळाले होते. त्याचा लाभ घेत त्याने नाबाद १५४ धावांची खेळी करून सामनावीरचा मान मिळविला होता. त्याने एक दिवसीय लढतीतील २६ वे शतक पूर्ण केले हे खरे असले तरी त्यापैकी ज्या २२ सामन्यात शतके काढली त्या सर्व लढती भारताने जिंकल्या आहेत.
रविचंद्रन अश्‍विन, मोहम्मद शमी, रवीन्द्र जडेजा या दिग्गज गोलंदाजांना विश्रांती देण्यात आल्यानंतर  संघातील अन्य गोलंदाजांनी त्या तिघांची उणीव भासू दिली नाही. पार्ट टाईम गोलंदाज केदार जाधवने आतापर्यंत सहा गडी बाद करून कर्णधाराकडून यशाची पावती मिळविली आहे. केदारने फलंदाजीही चांगली केली आहे. हार्दिकने गोलंदाजी व फलंदाजीतही दमदार प्रदर्शन दाखवले आहे.
भारतासाठी रोहित शर्मा व अजिंक्य राहाणे यांनी हवा तसा खेळ सादर केला नसल्याने काहीशी चिंता वाढली आहे.
दुसरीकडे पाच सामन्यांच्या मालिकेत २-२ अशी बरोबरी साधून लढतीत कायम राहण्याचा न्यूझीलंड संघ प्रयत्नांची पराकाष्ठा करणार आहे. किवी संघातील टॉम लॅथम व कर्णधार केन विल्यम्सन यांनीच भारतीय गोलदांजांचा कसून सामना केला व धावाही काढल्या आहेत. संघातील अन्य फलंदाज धावा काढण्यात थिटे पडल्याने कर्णधार केनसमोर हाच यक्ष प्रश्‍न उभा  ठाकला आहे. अपवाद फक्त मोहालीत तळातील फलंदाज नीशाम व हेन्री हे होते. या जोडीने नवव्या गड्यासाठी विक्रमी ८४ धावांची भागी करून भारतीय संघातील खेळाडूंची दमछाक केली होती.
संभाव्य संघ असा : भारत : महेन्द्रसिंग धोनी कर्णधार, रोहित शर्मा, अजिंक्य राहाणे, विराट कोहली, मनीष पांडे, केदार जाधव, अक्षर पटेल, हार्दिक पंड्‌‌‌या, अमित मिश्रा, उमेश यादव, जसप्रीत बुमरा, जयंत यादव, धवल कुळकर्णी, मनदीपसिंह.
न्यूझीलंड : केन विल्यम्सन कर्णधार, मार्टिन गुप्टिल, टॉम लॅथम, रॉस टेलर, सी. ऍण्डरसन, ल्यूक रोंची, जे. नीशाम, मिशेल सेंटनोर, टिम साउथी, हेन्री, बाउल्ट, वॉटलिंग, ब्रासवेल, डेव्हसिच, ईश सोटी.
लढत दुपारी दीड पासून
उद्याचा सामना भारतीय वेळेनुसार दुपारी दीड वाजतापासून खेळला जाणार आहे.

शेअर करा

Posted by on Oct 26 2016. Filed under क्रीडा, छायादालन. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

प्रतिक्रिया नोंदवा

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

मागील बातम्या, लेख शोध

Search by Date
Search by Category
Search with Google
More in क्रीडा, छायादालन (673 of 714 articles)


तभा प्रतिनिधी सातारा, [दि. २५ ऑक्टोबर] - प्रकाश आणि चैतन्याचा उत्सव असलेल्या दिवाळी सणाला बुधवारी वसुबारसेने प्रारंभ होत आहे. दिवाळी ...