Home » क्रीडा, छायादालन » भारताचा पाकिस्तानवर ३-२ ने विजय

भारताचा पाकिस्तानवर ३-२ ने विजय

=आशियाई हॉकीची जबरदस्त झुंज =

MELBOURNE, AUSTRALIA - DECEMBER 09: Abdul Haseem Khan of Pakistan contests for the ball against Sardar Singh of India during the third place match between Pakistan and India on day six of the 2012 Champions Trophy at State Netball Hockey Centre on December 9, 2012 in Melbourne, Australia. (Photo by Michael Dodge/Getty Images)

क्वॉंटन, [२३ ऑक्टोबर] – आशियाई चॅम्पियनशिप पुरुषांच्या हॉकी स्पर्धेत आज परंपरागत प्रतिस्पर्धी भारत व पाकिस्तान या संघातील निकालाकडे दोन्ही देशांच्या हॉकीप्रेमींचे लक्ष लागले होते. उतार-चढावाच्या झुंजीत शेवटी बलाढ़्य भारतीय संघाने ३-२ गोल फरकाने नेत्रदीपक विजय मिळविताच संपूर्ण भारतात विजयोत्सव साजरा करण्यात आला.
पाकिस्तानविरुध्दची लढत आम्ही शांत डोक्याने डावपेच रचून जिंकू असा आत्मविश्‍वास भारताचा कर्णधार गोलरक्षक पी. आर. श्रीजेश याने सामन्यापूर्वी व्यक्त केला होता. त्याची जाणीव आज झाली. शांत डोक्याने डावपेच रचत असताना पाकिस्तानचे खेळाडूही जिवाचे रान करून लढत जिंकण्यासाठी अक्षरश: धडपडत होते.
सामना सुरू झाल्यानंतर भारताने १-० गोलची आघाडी घेतली.
ती दुसर्‍या चरणातील खेळात. त्यापूर्वी पहिल्या चरणात उभय संघ ०-० ने बरोबरीत होते. पाकिस्तानला पेनल्टी कॉर्नर मिळायचे, तेव्हा भारतीय दर्शकांचे ठोके वाढायचे. पण लगेच दक्ष गोलरक्षक कर्णधार पी. आर. श्रीजेश एकटा किल्ला लढवून भारताला सावरायचा तेव्हा जिवात जीव यायचा. एका क्षणी भारताच्या बलविंदरने जबरदस्त हिट मारली असता चेंडू गोलस्तंभाच्या बाजूने विद्युत वेगाने निघून गेला. अन्यथा…
पाकिस्तान संघातील संरक्षण फळीत ढिलाई जाणवताच त्याचा फायदा प्रदीपने अचूक घेतला व संपूर्ण शक्ती कौशल्य पणास लावून हाणलेला चेंडू थेट गोलमध्ये परिवर्तीत करताच इंडिया-इंडियाचे नारे लागले. दुसर्‍या चरणाचा खेळ आटोपला तेव्हा भारत एका गोलने आघाडीवर होता.
जलपानानंतर तिसर्‍या चरणाला प्रारंभ झाला. पाकिस्तानने आक्रामक खेळ दाखवला. त्यांनी चेंडू सतत एकमेकांकडे शिताफिने दिले. त्यावर भारतीय संरक्षण फळीचा अंदाज चुकताच रिझवान सीनियर याने क्षणाचाही वेळ न दवडता भारताच्या गोलरक्षकाला चकवून गोल केला व १-१ ने बरोबरी साधली. अत्यंत चुरशीचा सामना जिंकण्याचा विडाच दोन्ही संघातील खेळाडूंनी उचलला होता. त्यामुळे खेळाचा दर्जाही उंचावला होता. चपळ हॉकी बघावयास मिळाली. रियो ऑलिम्पिकमध्ये भारताला संधी मिळाली होती, तर दुसरीकडे पाकिस्तानला ऑलिम्पिकचे व्दार बंद झाले होते. ती खुमखुमी असल्याने पाकिस्तानला भारतावर विजय मिळविणे आवश्यक होते.
त्याचाच लाभ त्यांना झाला. त्यांनी भारतावर २-१ अशी महत्वाची आघाडी घेतली. सामना पाकिस्तानच्या बाजूने वळत नाही तोच भारताच्या रुपिंदरपाल सिंग याने चेंडू पाकिस्तानच्या गोल जाळ्यात अडकविला. तिसर्‍या चरणातील अधिकांश पेनल्टी कॉर्नर तिसर्‍या पंचाकडून देण्यात येत होते. हे येथे विशेष. भारताने २-२ अशी बरोबरी साधताच मैदानावर पुन्हा काट्याची टक्कर दिसू लागली. सामना बरोबरीत सुटणार असे वाटत असतानाच रमणदीपने भारताला आघाडीवर नेले. ३-२ हीच आघाडी शेवटपर्यंत कायम होती. भारत जिंकला. परंपरागत प्रतिस्पिर्धीला पुन्हा पराभवाची कडू फळे चाखावी लागली.

शेअर करा

Posted by on Oct 24 2016. Filed under क्रीडा, छायादालन. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

प्रतिक्रिया नोंदवा

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)

हवामान

 • दृष्टीक्षेपात

  व्हिडीओ संग्रह

  मागील बातम्या, लेख शोध

  Search by Date
  Search by Category
  Search with Google
  More in क्रीडा, छायादालन (668 of 700 articles)


  =‘नापाक’ प्रयत्नांना चोख उत्तर देऊ : अरुणकुमार= जम्मू, [२३ ऑक्टोबर] - सीमेवर सध्या वादळापूर्वीची शांतता आहे. ही शांतता कुठल्याही क्षणी ...