Home » क्रीडा, छायादालन » भारतीय हॉकी संघाचे जंगी स्वागत

भारतीय हॉकी संघाचे जंगी स्वागत

Hockey team arrives at T3 TERMIANLबंगळुरू, [१ नोव्हेंबर] – मलेशियातील क्वांटन येथे परंपरागत प्रतिस्पर्धी पाकिस्तान संघावर ३-२ गोलने धमाकेदार विजय नोंदवून भारतीय पुरुष हॉकी संघाने आशियाई चॅम्पियन्स करंडक पटकावला. या विजेत्या करंडकासह भारतीय संघातील खेळाडूंचे आज बंगळुरू विमानतळावर आगमन होताच त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले.
आपल्या दमदार कौशल्याची चुणूक दाखवत भारतीय संघाने चॅम्पियन्स करंडक पटकावला, याकडे लक्ष वेधून कर्णधार गोलरक्षक पी. आर. श्रीजेश म्हणाला की, पटकावलेला करंडक आम्ही सैनिकांना अर्पण करीत आहोत. लक्ष्मीपूजनादिवशी भारताने बाजी मारताच तो विजय आम्ही आम्ही संपूर्ण भारतवासियांना दिवाळीची भेट दिली होती याकडेही त्याने लक्ष वेधले.
अंतिम लढतीत पाकिस्तानवर तीन गोल नोंदविले. ते गोल रुपिंदरपालसिंह, अपकान यूसुफ व निकीन थिमैया यांच्या नावावर आहेत.
भारतीय संघातील खेळाडू विमानतळाबाहेर येताच तेथे उपस्थित हॉकी प्रेमींनी त्यांचे भरभरून कौतुक केले. अंतिम सामन्यात दोन्ही देशांच्या बाजूने दर्शक समसमान होते. सामना जिंकताच स्टेडियममध्ये भारत माता की जयचा जयघोष होताच विजयाचा आनंदात भर पडली. बराच वेळ भारत माता की जयचा जयघोष सुरूच होता याकडे सरदारसिंग याने लक्ष वेधले.

शेअर करा

Posted by on Nov 2 2016. Filed under क्रीडा, छायादालन. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

प्रतिक्रिया नोंदवा

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)

हवामान

  • दृष्टीक्षेपात

    व्हिडीओ संग्रह

    मागील बातम्या, लेख शोध

    Search by Date
    Search by Category
    Search with Google
    More in क्रीडा, छायादालन (591 of 665 articles)


    हिस्सार, [१ नोव्हेंबर] - येत्या ऑलिम्पिकमध्ये अधिक पदके पटकावण्यासाठी आतापासूनच सरावावर भर देण्यात यावा आणि वेळ पडली तर विदेशातील प्रशिक्षणही ...