रामनाथ कोविंद राष्ट्रपतिपदी आरूढ

रामनाथ कोविंद राष्ट्रपतिपदी आरूढ

श्यामकांत जहागीरदार नवी दिल्ली, २५ जुलै – रामनाथ कोविंद…

सक्षम आणि नैतिक भारत घडवायचाय्

सक्षम आणि नैतिक भारत घडवायचाय्

नवी दिल्ली, २५ जुलै – मजबूत अर्थव्यवस्थेसोबतच आम्हाला समान…

भौतिकशास्त्रज्ञ यश पाल यांचे निधन

भौतिकशास्त्रज्ञ यश पाल यांचे निधन

नवी दिल्ली, २५ जुलै – वैश्‍विक किरणांच्या अभ्यासात महत्त्वाची…

चीनने घेतली अजित डोभालांची धास्ती

चीनने घेतली अजित डोभालांची धास्ती

►डोकलामवर चर्चेची दर्शवली तयारी, बीजिंग, २५ जुलै – सिक्कीम…

एकवेळ पर्वत हलेल, चिनी सैनिकांना हलविणे कठीण!

एकवेळ पर्वत हलेल, चिनी सैनिकांना हलविणे कठीण!

►भारताने चूक सुधारावी, चीनची दर्पोक्ती, बीजिंग, २४ जुलै –…

रशिया भारताला देणार मिग-३५ लढाऊ विमाने

रशिया भारताला देणार मिग-३५ लढाऊ विमाने

झुकोव्हास्की, २३ जुलै – मिग-३५ या जातीची अत्याधुनिक लढाऊ…

कर्जमाफीच्या शंखनादाने विरोधी पक्षांना धडकी

कर्जमाफीच्या शंखनादाने विरोधी पक्षांना धडकी

►शेतकर्‍यांना सुखी ठेवण्यासाठी सरकार प्रयत्नशील ►आमदार डॉ. बोंडेंनी मांडला…

खासदार उदयनराजे स्वत:हून पोलिसांत हजर

खासदार उदयनराजे स्वत:हून पोलिसांत हजर

►२ आठवड्याची न्यायालयीन कोठडी, सातारा, दि. २५ जुलै –…

कर्जमाफीसाठी १९ हजार कोटींची तरतूद

कर्जमाफीसाठी १९ हजार कोटींची तरतूद

►३३ हजार कोटींच्या पुरवणी मागण्या सादर, मुंबई, २४ जुलै…

काल दुर्गापूर, आज बशिरहाट… उद्या?

काल दुर्गापूर, आज बशिरहाट… उद्या?

डॉ. प्रमोद पाठक | एक काळ असा होता की…

बशिरहाटचे गौडबंगाल

बशिरहाटचे गौडबंगाल

•उलट तपासणी : भाऊ तोरसेकर | एव्हाना ममतांनी मागचे…

मोदीद्वेषाचा वाढता ज्वर – नॉट इन माय नेम

मोदीद्वेषाचा वाढता ज्वर – नॉट इन माय नेम

जयंत कुलकर्णी | स्वातंत्र्यानंतर सत्तर वर्षे आपण ज्या संघ…

रणबीरच्या फिरण्यावर बंदी

रणबीरच्या फिरण्यावर बंदी

संजय दत्तच्या आयुष्यावर आधारित चित्रपटात रणबीर कपूर ६ वेगवेगळ्या…

प्रियांका ठरली जगातील दुसरी सुंदर महिला!

प्रियांका ठरली जगातील दुसरी सुंदर महिला!

जगातील सर्वात सुंदर महिलांमध्ये बॉलिवूडच्या देसी गर्लला म्हणजेच प्रियांका…

रितेश बनला ‘बँक चोर’

रितेश बनला ‘बँक चोर’

यशराज फिल्मच्या ‘बँक चोर’ या चित्रपटाद्वारे मराठमोळा अभिनेता रितेश…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:05 | सूर्यास्त: 19:00
अयनांश:
Home » छायादालन, प.महाराष्ट्र » सातारा जिल्ह्यात पहिल्यांदा कमळ फुलले

सातारा जिल्ह्यात पहिल्यांदा कमळ फुलले

•कर्‍हाड, वाईत थेट विजय
•सातार्‍यात उदयनराजे, फलटणला रामराजे
•म्हसवडला शेखरभाऊ, रहिमतपूरला राष्ट्रवादी
•राष्ट्रवादीने गड राखला पण पत गेली
•१४ पैकी १० जागांवर राष्ट्रवादी,
संदीप राक्षे
सातारा, २८ नोव्हेंबर –
satara-electionगेल्या १७ वर्षापासून सातारा जिल्ह्याच्या राजकारणात एकहाती सत्तेचा दबदबा राखणार्‍या राष्ट्रवादीला यंदाच्या नगरपालिका व नगरपचायती निवडणुकींमध्ये जोरदार खिंडार पडले. ८ नगरपालिका व ६ नगरपंचायती राजकीय रणधुमाळीत राष्ट्रवादीने १० स्थानिक स्वराज्य संस्था खिशात घातल्या तरी लौकिकाला साजेशी कामगिरी न झाल्याने बालेकिल्ल्यातच पत गमविण्याची वेळ राष्ट्रवादीवर पहिल्यांदाच आली. लोणंद नगरपंचायतीच्या चंचु प्रवेशानंतर भाजपने जिल्ह्यात तब्बल १४ जागा व दोन नगराध्यपदे खिशात घालत सातारा जिल्ह्यात पहिल्यांदा कमळ फुलवले. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी आमदार बाळासाहेब पाटील यांना जोरदार धक्का देत तब्बल १६ जागांवर ताबा मिळवत कॉंग्रेस जिल्ह्याच्या राजकारणात चांगलीच रिचार्ज केली. तब्बल ६३ जागांवर कॉंग्रेसने अस्तित्च घट्ट करत राष्ट्रवादीला चांगलाच दणका दिला.
जिल्ह्याच्या राजकारणाचा निकाल बराचसा धक्कादायक लागल्याने भाजप व कॉंग्रेसने राष्ट्रवादीला खर्‍या अर्थाने आत्मपरिक्षण करायला भाग पाडले. सातार्‍यात खासदार उदयनराजे भोसले यांच्या सातारा विकास आघाडीची एकतर्फी सत्ता आली, तर भाजपने सातारा शहराच्या राजकारणात सहा जागांवर मुसंडी मारत जोरदार प्रवेश केला. नगरविकास आघाडीला १२ जागांवर समाधान मानावे लागले. २२ जागांवर शिट्टी वाजली. सर्व सामान्य विरुध्द राजघराणे या अटीतटीच्या लढाईत सातार्‍यातील सर्व साधारण मतदारांनी वेदांतिकाराजे भोसले या राजघराण्यातील उमेदवाराना नाकारत माधवी कदम या सर्वसामान्य चेहर्‍याला पसंती दिली. कर्‍हाड मध्ये पृथ्वीराज चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली प्रथमच कॉंग्रेसने राष्ट्रवादीला दणका देत १६ जागा खिशात घालत आमदार बाळासाहेब पाटलांच्या सत्तेला सुरुंग लावला. पृथ्वीराज चव्हाणांनी यंदा प्रथमच कराड शहराच्या विकासाच्या मुद्यावर मतदारांना भावनिक साद घातली. आणि हा प्रयोग यशस्वी ठरला. राष्ट्रवादीला अवघ्या ६ जागांवर समाधान मानावे लागले. भाजपनेही कर्‍हाडात जबरदस्त खेळी केली. प्रदेश सरचिटणीस अतुल भोसले, सहकार परिषदेचे अध्यक्ष शेखर चरेगांवकर, जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर, एकनाथ बागडी यांनी कुठे आघाडी तर कुठे स्वबळावर किल्ला लढवत चार जागा खिशात घातल्या व नगराध्यक्षपदी रोहिणी शिंदे यांना निवडून आणून चकित करायला लावणारा निकाल दृष्टीपथात आणला. सातार्‍यातही मध्यभागात व पूर्व भागात प्रस्थापितांना घरी बसायला लावले. सहा जागांवर भाजपचे उमेदवार निवडून आले. रहिमतपूर मध्ये अपेक्षेप्रमाणे जिल्हाध्यक्ष सुनील माने व चित्रलेखा माने-कदम यांच्या मनोमिलनानुसार कॉंग्रेस-राष्ट्रवादी एकत्र आल्याने १७ पैकी १३ जागा राष्ट्रवादीने खिशात घातल्या तर ४ जागा कॉंग्रेसकडे राहिल्या. फलटणमध्ये रामराजेच्यां विरोधात रणजितसिंहराजे निंबाळकर यांनी बंड पुकारले होते, मात्र फलटणकरांनी राजे गटाला साथ देत रामराजेंना सत्तेचा कौल दिला. राजेगटाने १७ तर कॉंग्रेसने ८ जागा पटकावल्या.
वाईत मकरंद आबाच्या तीर्थक्षेत्र आघाडीने १४ जागा मिळवल्या, मात्र हा आनंद त्यांना उपभोगता आला नाही. भाजपचा नगराध्यक्ष प्रतिभा शिंदे एका मताने निवडून आल्या. त्यामुळे वाईकरांनी राजकारणातील मोठा उलटफेर अनुभवला. कॉंग्रेसने ६ जागा पटकावत राष्ट्रवादीची कोंडी केली. महाबळेश्‍वर पालिकेत कुमार शिंदे गटाच्या ११ जागा निवडून आल्या तर बावळेकरगटाला ६ जागांवर समाधान मानावे लागले. म्हसवडमध्ये शेखर गोरे गटाने १० जागा मिळवत विधानपरिषदेच्या पराभवाचे दुख: कमी केले. तर दहिवडीत ११ जागांवर कब्जा करत आमदार जयकुमार गोरे यांनी एक हाती सत्ता राखली. राष्ट्रवादीला ५ जागा मिळवता आल्या. मेढ्यात भाजप-सेना युतीने चमत्कार घडवत १३ पैकी ६ जागा खेचून आणल्या. ३ जागांवर अपक्ष निवडून आल्याने राष्ट्रवादीची जावली तालुक्यात चांगलीच कोंडी झाली. पाटण तालुक्यात पाटणकरगटांने १३ जागांवर निर्विवाद वर्चस्व मिळवले पण तिथेही सेना – भाजप, तीन जागावर निवडून आल्याने विरोधी गटाचा पर्याय निर्माण झाला. पाचगणीत लक्ष्मी कर्‍हाडकरांनी ११ जागांद्वारे सत्तेवर वर्चस्व राखले, मात्र ६ जागांवर अपक्ष निवडून आल्याने त्यांची डोकेदुखी वाढली आहे.

शेअर करा

Posted by on Nov 29 2016. Filed under छायादालन, प.महाराष्ट्र. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

प्रतिक्रिया नोंदवा

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

मागील बातम्या, लेख शोध

Search by Date
Search by Category
Search with Google
More in छायादालन, प.महाराष्ट्र (431 of 656 articles)


प्रतिनिधी, कराड, २८ नोव्हेंबर - कराड नगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी रविवारी झालेल्या ७६.६१ टक्के मतदानाची आज सोमवारी पी. डी. पाटील उद्यानाजवळील ...