Home » छायादालन, सोलापूर » सोलापूरच्या नई जिंदगीत दोन गटात हाणामारी

सोलापूरच्या नई जिंदगीत दोन गटात हाणामारी

=सिव्हीलमध्ये तलवारीने हल्लाबोल, दहाजण गंभीर जखमी=
solapur-crime-fight-with-swordविशेष प्रतिनिधी
सोलापूर, [दि. ४ नोव्हेंबर] – नई जिंदगी भागात शुक्रवारी दु. २.३० वा. रिक्षाचालक आणि अ‍ॅक्टीवाचालक यांच्यातील किरकोळ कारणावरून झालेल्या वादाचे पडसाद सायंकाळी पुन्हा उमटलेे. त्यानंतर रात्री ११ वाजण्याच्या सिव्हील हॉस्पीटलमध्ये उपचारास दाखल झालेल्या रुग्ण व नातेवाईकांवर ४० ते ५० जणांच्या जमावाने तलवार हल्ला करून सुमारे दहाजणांना जबर जखमी केले. यामुळे सिव्हीलमध्ये  तणावाची स्थिती निर्माण झाली असून पोलिसांनी प्रमुख आरोपींचा शोध घेण्यासाठी मोहीम उघडली आहं.
दुपारी गाडी समोर आली म्हणून किरकोळ वाद झाला होता. पण सायंकाळी ६ वाजता लोकमान्यनगरात सालार गटाने केलेल्या हल्ल्यात  फैजल आणि समद जहागिदार यांच्यात वाद झाला. तेव्हा सर्फराज समद जहागिरदार आणि सईद समद जहागिरदार जखमी झाले. सायंकाळी उभयतांना जखमी उपचारासाठी सिव्हिलमध्ये आणले. दरम्यान रात्री ११ वाजता सालार गटाचे ४० ते ५० जण तलवारीसह सिव्हीलमध्ये हल्लाबोल केला. यावेळी १० जण जखमी झाले, पैकी दोघे गंभीर असून त्यांना खाजगी रुग्णालयात दाखल केले आहे.
जखमींमध्ये कबीर अ. जहागिरदार वय २५ लोकमान्यनगर, इम्रान गौस शेख वय २४ आनंदनगर,  समीर बाबू जाहागिरदार वय ४२ केशव नगर, गाजी सादिक जहागिरदार वय २८ केशव नगर, बरकत इलाही जहागिदार वय ४५ मौलाली चौक. हल्ला करणारांमध्ये  वाजीद सालार याचे नाव पुढे आले आहे.
सालार व अन्य हल्लेखोरांच्या  तपासाकरिता  विजापूर वेस, नई जिंदगी येथेही कोम्बिंग सुरू केले आहे. या घटनेनंतर सिव्हीलमध्ये प्रचंड तणाव निर्माण झाला असून पोलिसांनी संयमाने स्तिथी हाताळली त्यामुळे मोठा अनर्थ टळल्याचे मानले जाते.

शेअर करा

Posted by on Nov 5 2016. Filed under छायादालन, सोलापूर. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

प्रतिक्रिया नोंदवा

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)

हवामान

  • दृष्टीक्षेपात

    व्हिडीओ संग्रह

    मागील बातम्या, लेख शोध

    Search by Date
    Search by Category
    Search with Google
    More in छायादालन, सोलापूर (619 of 721 articles)


    =भारताचा प्रथमच प्रवेश= संयुक्त राष्ट्रसंघ, [४ नोव्हेंबर] - भारतातील सर्वोच्च न्यायालयात वकिली करणारे ३३ वर्षीय ऍड. डॉ. अनिरुद्ध राजपूत यांची ...