Home » क्रीडा, छायादालन, ठळक बातम्या » अमितच्या फिरकीने किवीची दाणादाण

अमितच्या फिरकीने किवीची दाणादाण

=भारताचा विजय, मालिका जिंकली=
CRICKET-IND-NZLविशाखापट्टणम, [२९ ऑक्टोबर] – एक दिवसीय पाच आंतरराष्ट्रीय सामन्यांची मालिका भारताने ३-२ ने जिंकली. मालिकेतील पाचव्या आणि अंतिम सामन्यात भारताचा फिरकीपटू अमित मिश्रा याने पाहुण्या न्यूझीलंड संघातील फलंदाजांचे कंबरडे मोडून काढताच किवी संघाला भारतात मालिका जिंकण्याचे स्वप्न पूर्ण करता आले नाही.
मालिकेतील पहिल्या चार लढतीत दोन्ही संघ २-२ ने बरोबरीत होते, त्यामुळे आजच्या निर्णयाकडे दोन्ही देशांच्या क्रिकेट चाहत्यांचे लक्ष लागले होते. भारताच्या ६ बाद २६९ या धावसंख्येला किवीचे फलंदाज दमदार प्रत्युत्तर देतील असे वाटत असतानाच धोनी सेनेतील फिरक्या घेणारा अमित मिश्रा धावून आला. त्याच्या फिरकीवर पाहुण्या संघातील निम्या खेळाडूंची दाणादाण उडाली. पाचपैकी दोघांच्या दांडी त्याने उडविल्या. तर अन्य दोघांना शिताफिने चकवून धोनीला यष्टिचित करण्यास संधी दिली. अमित ने कमालीची निर्णायक गोलंदाजी केली. ६ षटकात केवळ १८ धावा देत त्याने पाच गडी टिपले व सामनावीरचा मान मिळविला. या मालिकेत तो त्याच्या चाहत्यांच्या गऴ्यातील ताईत ठरला.
किवी संघातील पाच फलंदाज आज भोपळाही फोडू शकले नाहीत. इतक्या प्रचंड दबाबात त्यांचा संघ पोचला होता. प्रत्युत्तर तर सोडाच, पण त्यांच्या संघातील सर्व खेळाडूंनी भारतीय गोलंदाजांसमोर अक्षरश: शरणागती पत्करली. विश्‍वास बसणार नाही इतक्या अल्प (७९) धावसंख्येवर त्यांचा डाव पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळला.
याअगोदर भारताने ५० षटकात ६ बाद २६९ धावा केल्या होत्या. अजिंक्य राहाणे व रोहित शर्मा या जोडीने डावाचा प्रारंभ केला. केवळ ४० धावा फलकावर लागल्यानंतर राहाणे केवळ २० धावा काढून तंबूत परतला. या जबर धक्क्यातून भरवशाचा फलंदाज विराट कोहली याने सावरले. रोहित शर्मासोबत खेळताना त्याने दुसर्‍या गड्यासाठी ७९ धावा जोडल्या. त्यावेळी रोहित ७० धावांवर बाद झाला. त्याने ५ चौकार आणि ३ षटकार नोंदविले होते.
भारताच्या धावसंख्येला आकार मिळताच कर्णधार धोनीने विराटसोबत तिसर्‍या गड्यासाठी ७१ धावा जोडल्या. धोनीने चार चौकार व एका षटकाराच्या मदतीने झटपट ४१ धावा जोडल्या.
विराट एक टोक सांभाळत होता. तर दुसरीकडे मनीष पांडे केवळ पाच चेंडूंचा सामना करून भोपळाही फोडू शकला नाही.
तळातील फलंदाज केदार जाधव, अक्षर पटेल यांनी क्रमश: नाबाद ३९ व २४ धावा काढल्या. जयंत यादव १ धाव नोंदवून नाबाद राहिला. न्यूझीलंडकडून बोल्ट व सोढी यांनी प्रत्येकी २ गडी बाद केले होते.
धावफलक असा :
भारत ५० षटकात ६ बाद २६९ धावा (अजिंक्य राहाणे झे. लॅथन गो. नीशाम २०, रोहित शर्मा झे. नीशाम गो. बोल्ट ७०, विराट कोहली झे. गुप्टिल गो. सोढी ६५, महेन्द्रसिंग धोनी पायचित गो.सॅण्टनेर ४१, मनीष पांडे झे बोल्ट गो. सोढी ०, केदार जाधव नाबाद ३९, अक्षर पटेल त्रिफळा गो. बोल्ट २४, जयंत जाधव नाबाद १, इतर धावा ९).
गडी बाद : १-४०, २-११९, ३-१९०, ४-१९५, ५-२२०, ६-२६६.
गोलंदाजी : साउथी १०-०-५६-०, बोल्ट १०-०-५२-२, नीशाम ६-०-३०-१, सॅण्टनेर १०-०-३६-१, सोढी १०-०-६६-२, ऍॅण्डरसन ४-०-२७-०.
न्यूझीलंड २३.१ षटकात सर्वबाद ७९ धावा (गुप्टिल त्रि. गो. उमेश यादव ०, लॅथम झे. जयंत यादव गो. बुमराह १९, विल्यम्सन झे. जाधव गो. पटेल २७, टेलर झे. धोनी गो. मिश्रा १९, जेम्स नीशाम त्रिफळा गो. मिश्रा ३, वॅटलिंग त्रिफळा गो. मिश्रा ०, ऍण्डरसन पायचित गो. जयंत यादव ०, सॅण्टनेर त्रिफळा गो. अक्षर पटेल ४, साउथी यष्टिचित गो. मिश्रा ०, सोढी झे. राहाणे गो. मिश्रा ९, बोल्ट नाबाद १, इतर धावा ६)
गडी बाद : १-०, २-२८, ३-६३, ४-६६, ५-६६, ६-७४, ७-७४, ८-७४, ९-७६, १०-७९.
गोलंदाजी : उमेश यादव ४-०-२८-१, बुमराह ५-०-१६-१, अक्षर पटेल ४.१-०-९-२, अमित मिश्रा ६-२-१८-५, जयंत यादव ४-०-८-१.

शेअर करा

Posted by on Oct 30 2016. Filed under क्रीडा, छायादालन, ठळक बातम्या. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

प्रतिक्रिया नोंदवा

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)

हवामान

 • दृष्टीक्षेपात

  व्हिडीओ संग्रह

  मागील बातम्या, लेख शोध

  Search by Date
  Search by Category
  Search with Google
  More in क्रीडा, छायादालन, ठळक बातम्या (1631 of 1750 articles)


  ♦आगीच्या तांडवात औरंगपुरा फटाका मार्केट जळून खाक ♦फटाके, वाहने मिळून ५० कोटींची हानी, १०० जण भाजल्याची भीती, [gallery ids="1263,1264,1265,1266,1267,1268"] प्रतिनिधी ...