पाकी अधिकार्‌यांच्या भेटीची गरज का भासली?

पाकी अधिकार्‌यांच्या भेटीची गरज का भासली?

►अरुण जेटली यांचा मनमोहनसिंगांना बोचरा सवाल, नवी दिल्ली, १२…

सी प्लेन ही वाहतूक क्षेत्रातील क्रांती

सी प्लेन ही वाहतूक क्षेत्रातील क्रांती

►मोदींनी प्रवास करून मुहूर्तमेढ रोवली ►नितीन गडकरी यांचा दावा,…

जनतेचे पैसे पूर्णपणे सुरक्षित : अरुण जेटली

जनतेचे पैसे पूर्णपणे सुरक्षित : अरुण जेटली

नवी दिल्ली, १२ डिसेंबर – गेल्या काही दिवसांपासून सोशल…

विराट-अनुष्काचे इटलीत शुभमंगल

विराट-अनुष्काचे इटलीत शुभमंगल

रोम, ११ डिसेंबर – टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली…

ब्रिटनने गोठवली मल्ल्याची संपत्ती

ब्रिटनने गोठवली मल्ल्याची संपत्ती

►आठवड्याला केवळ ६७०० डॉलर्स खर्चाची मर्यादा, लंडन, ९ डिसेंबर…

मुस्लिमांनी केला ट्रम्प यांचा निषेध

मुस्लिमांनी केला ट्रम्प यांचा निषेध

तेल अवीव, ९ डिसेंबर – अमेरिकी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प…

विरोधकांचा दुसर्‌या दिवशीही गोंधळ

विरोधकांचा दुसर्‌या दिवशीही गोंधळ

►विधान परिषदेचे काम बंद पाडले, नागपूर, १२ डिसेंबर –…

हे तर तुमचेच पाप आहे…

हे तर तुमचेच पाप आहे…

►मुख्यमंत्र्यांचा विरोधकांवर हल्लाबोल, नागपूर, ११ डिसेंबर – आघाडी सरकारच्या…

खाशाबा जाधवांच्या पद्मविभूषण शिफारशीची फाईल गहाळ

खाशाबा जाधवांच्या पद्मविभूषण शिफारशीची फाईल गहाळ

नागपूर, ११ डिसेंबर – प्रख्यात कुस्तीपटू खाशाबा जाधव यांचा…

बात बनेगी क्या, युवराज?

बात बनेगी क्या, युवराज?

॥ संवाद : सोमनाथ देशमाने | राहुल गांधी कॉंग्रेसचे…

कोरियामध्ये तिसर्‍या महायुध्दाची ठिणगी

कोरियामध्ये तिसर्‍या महायुध्दाची ठिणगी

॥ विशेष : अभय बाळकृष्ण पटवर्धन, निवृत्त कर्नल |…

जहॉं पानी कम था

जहॉं पानी कम था

॥ उलट तपासणी : भाऊ तोरसेकर | मागल्या दोन…

‘सिमरन’मधील नवीन गाणे प्रदर्शित

‘सिमरन’मधील नवीन गाणे प्रदर्शित

अभिनेत्री कंगना राणावत लवकरच सिमरन या चित्रपटाद्वारे प्रेक्षकांच्या भेटीला…

चिरंजीवीसोबत सिनेमा करण्यास ऐश्‍वर्याचा नकार?

चिरंजीवीसोबत सिनेमा करण्यास ऐश्‍वर्याचा नकार?

ऐश्‍वर्या राय बच्चनची सध्या बॉलीवूडमध्ये सेकंड इनिंग सुरू आहे.…

रणबीरच्या फिरण्यावर बंदी

रणबीरच्या फिरण्यावर बंदी

संजय दत्तच्या आयुष्यावर आधारित चित्रपटात रणबीर कपूर ६ वेगवेगळ्या…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:50 | सूर्यास्त: 17:52
अयनांश:
Home » छायादालन, ठळक बातम्या, राष्ट्रीय, संरक्षण » आक्रमक नसलो, तरी मवाळही नाही

आक्रमक नसलो, तरी मवाळही नाही

=मनोहर पर्रीकर यांचा इशारा, आयएनएस चेन्नईचे लोकार्पण=
वृत्तसंस्था
मुंबई, २१ नोव्हेंबर –
commissioning-ceremony-of-ins-chennai-parrikarआमचे सरकार आक्रमक नसले, तरी मवाळही नक्कीच नाही. उरी येथील दहशतवादी हल्ल्यानंतर आम्ही गुलाम काश्मिरात घुसून जो सर्जिकल स्ट्राईक केला, त्यातून आम्ही हाच संदेश जगाला दिला आहे, असा स्पष्ट इशारा संरक्षण मंत्री मनोहर पर्रीकर यांनी आज दिला.
मुंबईतील माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड येथे उभारण्यात आलेल्या आयएनएस चेन्नई या युद्धनौकेचे जलावतरण करण्यात आल्यानंतर पर्रीकर पत्रकारांशी बोलत होते. या युद्धनौकेसोबत कोलकाता श्रेणीच्या गायडेड क्षेपणास्त्र विनाशिका जहाजांची निर्मिती करणार्‍या प्रकल्पाचा टप्पाही पूर्ण झाला आहे. यावेळी नौदलप्रमुख ऍडमिरल सुनील लांबा व नौदलातील अन्य वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
उरी हल्ल्यानंतर भारतीय जवानांनी केलेले सर्जिकल स्ट्राईक आणि पाकच्या सैनिकांकडून सीमेवर सातत्याने सुरू असलेला गोळीबार या अनुषंगाने पत्रकारांनी त्यांना भारतीय सज्जतेविषयी विचारणा केली होती.
आयएनएस चेन्नईची सज्जता
१६४ मीटर लांब आणि ७५०० टन वजन असलेली आयएनएस चेन्नई युद्धनोका भारतीय नौदलातील सर्वात मोठी विनाशिका ठरली आहे. ही विनाशिका जमिनीवरून जमिनीवर मारा करणार्‍या ब्राह्मोस क्षेपणास्त्र आणि बराक-८ हे दूरपर्यंत जमिनीवरून हवेत मारा करणार्‍या क्षेपणास्त्रांनी सज्ज आहे.
शहीद होण्याची वाट पाहू नका, शत्रूचा खात्मा करा
शहीद होण्याची वाट पाहू नका. तुमच्यासमोर जर कोणी हातात बंदूक घेऊन उभा असेल, तर त्याचा आधी खात्मा करा, असे स्पष्ट निर्देश संरक्षण मंत्री मनोहर पर्रीकर यांनी जम्मू-काश्मिरातील सीमांवर आणि अन्य ठिकाणी तैनात असलेल्या सशस्त्र दलांच्या जवानांना दिले आहेत, असे मनोहर पर्रीकर म्हणाले.
संरक्षण मंत्रालयाची सूत्रे हाती घेतल्यानंतर लगेच मी सुरक्षा जवानांना स्वत:चे आणि देशाच्या सीमांचे रक्षण करण्यासाठी आवश्यक ते सर्वच अधिकार दिले आहेत. तुम्ही जेव्हा हातात मशिनगन किंवा बंदुकधारी व्यक्तीला आपल्या समोर पाहता, तेव्हा वरिष्ठांच्या आदेशाची वाट पाहण्याची किंवा शत्रूच्या गोळीबारात शहीद होण्याची वाट मुळीच पाहू नका. आधी समोर उभा असलेल्या शत्रूला ठार करा. कारण, तो तुमच्याजवळ हाय, हॅलो करण्यासाठी नक्कीच आलेला नसतो, असे पर्रीकर यांनी सांगितले.
काश्मिरात आमचे जवान सीमेपलीकडून गोळीबार करणारे पाकिस्तानी सैनिक आणि त्यांच्या मदतीने भारतात घुसखोरी करणार्‍या अतिरेक्यांचा एकाचवेळी मुकाबला करीत आहेत. आधीच्या कॉंगे्रस सरकारच्या काळात जवानांना अतिरेक्यांशी लढताना पाहिजे तसे स्वातंत्र्य देण्यात आले नव्हते. अतिरेक्यांनी गोळीबार केला, तरी जवानांनी जास्तीतजास्त संयम राखावा, अशी कॉंगे्रसची भूमिका होती. पण, केंद्रात नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील सरकार आल्यापासून चित्र बदलले आहे. जवानांचे मनोबल प्रचंड उंचावले आहे, असे पर्रीकर यांनी सांगितले.

शेअर करा

Posted by on Nov 22 2016. Filed under छायादालन, ठळक बातम्या, राष्ट्रीय, संरक्षण. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

प्रतिक्रिया नोंदवा

Marathi/English, press Ctrl+g  

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

मागील बातम्या, लेख शोध

Search by Date
Search by Category
Search with Google
More in छायादालन, ठळक बातम्या, राष्ट्रीय, संरक्षण (2552 of 3038 articles)


=पुन्हा प्रस्ताव पाठविणार= वृत्तसंस्था नवी दिल्ली, २१ नोव्हेंबर - निवडणूक आयोगाला जादा कायदेशीर अधिकार देण्यास केंद्र सरकारने नकार दिला आहे. ...