Home » छायादालन, ठळक बातम्या, राष्ट्रीय, सांस्कृतिक » आज राष्ट्रीय आयुर्वेद दिवस

आज राष्ट्रीय आयुर्वेद दिवस

bhagwan_dhanvantariनवी दिल्ली, [२७ ऑक्टोबर] – उद्या शुक्रवारी धन्वंतरी दिनानिमित्त केंद्रीय आयुष मंत्रालयाने देशभरात राष्ट्रीय आयुर्वेद दिवस साजरा करण्याचा निर्णय जाहीर केला आहे. ‘मधुमेहावर कायमचा निर्बंध आणि आळा घालण्याकरिता आयुर्वेदचा वापर’ ही या दिनाची मुख्य संकल्पना राहणार आहे. देशात मधुमेहाच्या रुग्णांची संख्या सातत्याने वाढत असल्याने ही संकल्पना विशेष महत्त्वाची ठरणार आहे.
राष्ट्रीय आयुर्वेद दिनाच्या या संकल्पनेनिमित्त राजधानी दिल्लीत राष्ट्रीय परिसंवादाचे आयोजन करण्यात आले असून, देशभरातही विविध कार्यक्रम घेतले जाणार आहेत. पंतप्रधान कार्यालयातील राज्यमंत्री डॉ. जितेंद्र सिंह या परिसंवादाचे उद्‌घाटन करणार आहेत. तर, आयुष मंत्री श्रीपाद येसो नाईक हे कार्यक्रमाचे मुख्य अतिथी राहणार आहेत.
आयुष मंत्रालय या दिनानिमित्त ‘आयुर्वेदाच्या माध्यमातून मिशन मधुमेह’ ही मोहीमही राबविणार आहे. आयुर्वेदानेच मधुमेहावर उपचार करण्याचा संदेश यातून देण्यात येणार आहे. देशभरात हे मिशन राबविले जाणार आहे, अशी माहिती जितेंद्र सिंह यांनी पत्रकारांना दिली.
हा दिवस देशभरात मोठ्या प्रमाणात साजरा केला जावा, यासाठी राज्य सरकारे, राज्यांची आयुष महासंचालनालये आणि आयुर्वेद संस्थांनाही विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यास सांगण्यात आले आहे. याबाबतचे पत्र आयुष मंत्रालयाकडून या सर्वांना पाठविण्यात आले असून, या मिशनअंतर्गत मोफत वैद्यकीय शिबिरे, लोकसंवाद आणि जनजागृती कार्यक्रमांचे आयोजन करण्यास त्यांना सांगण्यात आले आहे, असे त्यांनी सांगितले.

शेअर करा

Posted by on Oct 28 2016. Filed under छायादालन, ठळक बातम्या, राष्ट्रीय, सांस्कृतिक. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

प्रतिक्रिया नोंदवा

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

मागील बातम्या, लेख शोध

Search by Date
Search by Category
Search with Google
More in छायादालन, ठळक बातम्या, राष्ट्रीय, सांस्कृतिक (2144 of 2236 articles)


♦पाकच्या स्वप्नातील प्रकल्पाला तडा ♦आसियान विकास बँकेने निधी नाकारला, इस्लामाबाद, [२७ ऑक्टोबर] - गुलाम काश्मिरातील सिंधू नदीवर १४ अब्ज डॉलर्स ...