Home » ठळक बातम्या, दिल्ली, राज्य » आपच्या आणखी २७ आमदारांचे सदस्यत्व धोक्यात

आपच्या आणखी २७ आमदारांचे सदस्यत्व धोक्यात

=निवडणूक आयोगाने बजावली नोटिस=
election-commission-1तभा वृत्तसेवा
नवी दिल्ली, [२ नोव्हेंबर] – लाभाच्या पदाच्या मुद्यावरून निवडणूक आयोगाने आज आम आदमी पार्टीच्या २७ आमदारांवर कारणे दाखवा नोटिस बजावल्यामुळे आप सरकारच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता बळावली आहे.
आम आदमी पार्टीचे २७ आमदार लाभाच्या पदावर असल्यामुळे त्यांचे सदस्यत्व रद्द करण्याची मागणी निवडणूक आयोगाकडे जून महिन्यात करण्यात आली होती. या मागणीवर निवडणूक आयोगाने तुमचे सदस्यत्व रद्द का करण्यात येऊ नये, अशी विचारणा त्यांच्यावर नोटिस बजावून केली आहे. या नोटिसीवर आपच्या आमदारांना ११ नोव्हेंबरपर्यंत उत्तर द्यायचे आहे.
विशेष म्हणजे संसदीय सचिव पदावर असल्यामुळे आपच्या २१ आमदारांवर आधीपासूनच सदस्यत्व रद्द होण्याची टांगती तलवार आहे. त्यात आता या २७ आमदारांची भर पडली आहे.  या दोन्ही प्रकरणातील ४८ आमदारांचे सदस्यत्व रद्द झाले तर अरविंद केजरीवाल यांचे सरकार अल्पमतात येण्याची शक्यता नाकारता येत नाही.
रोगी कल्याण समितीचे अध्यक्षपद या २७ आमदारांकडे आहे. या समितीचे अध्यक्षपद हे लाभाच्या पदाच्या श्रेणीत येत असल्यामुळे या २७ आमदारांचे सदस्यत्व रद्द करण्याची मागणी कायद्याचा विद्यार्थी असलेल्या विभोर आनंदने निवडणूक आयोगाकडे केली होती. निवडणूक आयोगाने हे प्रकरण राष्ट्रपती भवनात पाठवले होते. यावर राष्ट्रपती भवन काय भूमिका घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
दरम्यान निवडणूक आयोगाने या २७ आमदारांवर आज कारणे दाखवा नोटिस बजावल्यामुळे केजरीवाल सरकारचे भवितव्य धोक्यात आले आहे. विशेष म्हणजे या २७ आमदारातील १० आमदारांकडे संसदीय सचिवाचे पदही आहे. म्हणजे त्यांच्यावर सदस्यत्व रद्द होण्याची दुहेरी तलवार लटकत आहे.
रोगी कल्याण समिती ही एक प्रकारची एनजीओ आहे, रुग्णालयाचे व्यवस्थापन पाहण्याची जबाबदारी या समितीकडे असते. या समितीत आमदार, खासदार आणि अन्य सरकारी अधिकार्‍यांचा समावेश असतो. या समितीचे सदस्यपद आमदार स्वीकारू शकतो, कारण ते लाभाच्या पदाच्या श्रेणीत येत नाही. मात्र अध्यक्षपद लाभाच्या पदाच्या श्रेणीत येते.
निवडणूक आयोगाने शिवचरण गोयल, जर्नेलसिंह, अलका लांबा, कैलाश गहलोत, अनिलकुमार बाजपेई, राजेश गुप्ता, नरेश यादव, राजेश ऋषी, मदनलाल, शरद चौहान या आमदारांकडे संसदीय सचिवासोबत रोगी कल्याण समितीचे अध्यक्षपदही आहे. तर वंदना कुमारी, अजेश यादव, जगदीप सिंह, एस के. बग्गा, जितेंद्रसिंह तोमर, रामनिवास गोयल, विशेष रवि, नितीन त्यागी, सोमनाथ भारती, पंकज पुष्कर, वेदप्रकाश, राजेंद्र पाल गौतम, राखी बिर्ला, हजारीलाल गौतम, कमांडो सुरेंद्र, मोहम्मद इशराक आणि महेंद्र गोयल या १७ आमदारांवर आयोगाने नोटिस बजावली आहे.

शेअर करा

Posted by on Nov 3 2016. Filed under ठळक बातम्या, दिल्ली, राज्य. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

प्रतिक्रिया नोंदवा

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)

हवामान

 • दृष्टीक्षेपात

  व्हिडीओ संग्रह

  मागील बातम्या, लेख शोध

  Search by Date
  Search by Category
  Search with Google
  More in ठळक बातम्या, दिल्ली, राज्य (1639 of 1793 articles)


  =व्याजदर सहा वर्षांच्या नीचांकावर= नवी दिल्ली, [२ नोव्हेंबर] - भारतीय रिझर्व्ह बँकेने गेल्या महिन्यात प्रमुख कर्जांवरील व्याजाच्या दरात पाव टक्क्याने ...