Home » आंतरराष्ट्रीय, आशिया, ठळक बातम्या » आमची भूमी दहशतवादाची जननीच

आमची भूमी दहशतवादाची जननीच

=पाकची जाहीर कबुली, मसूद व जैशसह ५१०० बँक खाती गोठवली=
masood-azhar-jaish-e-mohammadइस्लामाबाद, [२५ ऑक्टोबर] – आमच्या भूमीत दहशतवादी नाहीत आणि मौलाना मसूद अझहर हा सभ्य नागरिक आहे, अशा बाता करणार्‍या पाकिस्तानने आज स्वत:च, ‘आमची भूमी दहशतवाद्यांची जननी आहे,’ ही सत्यता मान्य केली. सोबतच पाक सरकारने जैश-ए-मोहम्मद हा अतिरेकी गट आणि त्याचा म्होरक्या मौलाना मसूद अजहरसह सुमारे ५,१०० दहशतवादी संघटनांची बँक खाती गोठवली आहेत.
आमच्या भूमीत असंख्य दहशतवादी गट सक्रिय असल्याचे पाक सरकारने अधिकृतपणे मान्य केले. या सर्व गटांचे आणि अतिरेक्यांचे बँक खाते गोठण्यासाठी पाकच्या गृह मंत्रालयाने या खात्यांची यादी देश-विदेशातील बँकांना पाठवली आहे. पाकच्या आश्रयात राहून भारतासह जगभरात दहशतवादी कारवाया करणार्‍या अनेक दहशतवाद्यांचा यादीत समावेश आहे, अशी माहिती गृहमंत्रालयातील सूत्रांनी दिली.
या दहशतवाद्यांच्या बँक खात्यांमध्ये सुमारे ४० कोटी रुपयांपेक्षा जास्त रक्कम आहे. मौलान मसूद अझहरचे खाते स्टेट बँक ऑफ पाकिस्तानमध्ये असून, ते गोठविण्यात आले आहे. यातही धक्कादायक बाब म्हणजे पाकिस्तानची राजधानी इस्लामाबादेतील विविध बँकांमध्ये २७ दहशतवाद्यांचे खाते आहेत.
पठाणकोट येथील भारतीय वायुसेनेच्या तळावर याचवर्षीच्या जानेवारी महिन्यात झालेल्या भीषण दहशतवादी हल्ल्यानंतर पाक सरकारच्या संरक्षणात्मक कोठडीत असलेला मसूदचे खाते गोठविण्यात आले होते. पण, तो केवळ एक देखावा होता, असेही आता समोर आले आहे.
खाती गोठविण्यात आलेल्यांपैकी १२०० जण दहशतवादविरोधी कायद्यांतर्गत अतिशय धोकादायक म्हणून नोंद असलेल्या ‘अ’ वर्गातील आहेत. मसूदचे नाव याच यादीत आहे. या खात्यांपैकी तीन हजारावर खाती खैबर पख्तुनख्वा प्रांतातील असून १,४४३ खाती पंजाब प्रांतातील, २२६ सिंधमधील, १९३ बलुचिस्तानमधील आणि १०६ गिलगीट-बाल्टिस्तानातील आहेत.

शेअर करा

Posted by on Oct 26 2016. Filed under आंतरराष्ट्रीय, आशिया, ठळक बातम्या. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

प्रतिक्रिया नोंदवा

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)

हवामान

  • दृष्टीक्षेपात

    व्हिडीओ संग्रह

    मागील बातम्या, लेख शोध

    Search by Date
    Search by Category
    Search with Google
    More in आंतरराष्ट्रीय, आशिया, ठळक बातम्या (1507 of 1571 articles)


    =परिवार एक, पक्ष एक: मुलायमसिंह यांचा संदेश= लखनौ, [२५ ऑक्टोबर] - उत्तर प्रदेशात सत्तेत असलेल्या समाजवादी पार्टीत आणि पक्षाचे सर्वेसर्वा ...