Home » ठळक बातम्या, महाराष्ट्र » आयआयएमसी मराठीतून अभ्यासक्रम सुरू करणार: के.जी. सुरेश

आयआयएमसी मराठीतून अभ्यासक्रम सुरू करणार: के.जी. सुरेश

तभा वृत्तसेवा
नवी दिल्ली २२ नोव्हेंबर –
k-g-suresh-iimcभारतीय जनसंज्ञापन संस्था येत्या शैक्षणिक वर्षापासून अमरावती येथील संकुलात मराठीतून जनसंज्ञापनाचा अभ्यासक्रम सुरू करणार असल्याची माहिती संस्थेचे महासंचालक के. जी. सुरेश यांनी दिली.
राज्य अधिस्वीकृती समितीची सातवी बैठक दिल्लीत सुरू असून समितीच्या सदस्यांनी आज आयआयएमसीला भेट दिली यावेळी के. जी. सुरेश यांनी ही माहिती दिली. यावेळी राज्य अधिस्वीकृती समितीचे अध्यक्ष यदुनाथ जोशी, माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे संचालक देवेंद्र भुजबळ, आयआयएमसीचे अतिरिक्त महासंचालक मयंककुमार अग्रवाल, प्रा. विजय परमार, सहयोगी प्राध्यापक डॉ. सुरभी दहिया उपस्थित होत्या.
सुरेश म्हणाले की, आयआयएमसीचे देशात एकूण ६ संकुल असून महाराष्ट्रात अमरावती येथे संकुल उघडण्यात आलेली आहे. संस्थेच्या इतिहासात प्रथमच मराठी भाषेतून जनसंज्ञापनाचा अभ्यासक्रम शिकविण्यात येणार आहे. शैक्षणिक वर्ष २०१७-१८ पासून या अभ्यासक्रम सुरू होणार आहे. महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांनी या अभ्यासक्रमाचा मोठ्या प्रमाणात लाभ घ्यावा, असे आवाहन त्यांनी यावेळी केले. राज्य अधिस्वीकृती समितीचे सदस्य, प्रसार माध्यमांचे प्रतिनिधी आणि माहिती विभागाच्या अधिकार्‍यांनी या संदर्भात जनजागृतीसाठी सहयोग करावा असे आवाहन केले.
बडनेरा येथे १६ एकर जागा
आयआयएमसी अमरावतीसाठी महाराष्ट्र शासनाने बडनेरा येथे १६ एकर जागा उपलब्ध करून दिली असून त्याबद्दल सुरेश यांनी शासनाचे आभार मानले. सध्या संत गाडगेबाबा महाराज अमरावती विद्यापीठ येथे आयआयएमसीची शाखा सुरू आहे.
मुंबई येथे नॅशनल सेंटर फॉर एक्सलन्स उभारणार
प्रसार माध्यमातील होत असलेले विविध आधुनिक बदल व प्रशिक्षणाची मागणी पहाता येत्या काळात मुंबई आयआयएमसीद्वारा नॅशनल सेंटर फॉर एक्सलन्स संस्था उभारण्यात येणार असल्याची माहिती सुरेश यांनी दिली. नवमाध्यमांचे प्रशिक्षण देण्यासाठी आयआयएमसीद्वारे ही संस्था उभारण्यात येणार असून महाराष्ट्र शासनाकडे नवी मुंबई येथे २५ एकर जागेची मागणी करण्यात आलेली आहे.

शेअर करा

Posted by on Nov 23 2016. Filed under ठळक बातम्या, महाराष्ट्र. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

प्रतिक्रिया नोंदवा

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)

हवामान

 • दृष्टीक्षेपात

   व्हिडीओ संग्रह

   मागील बातम्या, लेख शोध

   Search by Date
   Search by Category
   Search with Google