Home » ठळक बातम्या, राष्ट्रीय, संसद » आयकर दुरुस्ती विधेयक लोकसभेत पारित

आयकर दुरुस्ती विधेयक लोकसभेत पारित

तभा वृत्तसेवा
नवी दिल्ली, २९ नोव्हेंबर –
loksabhaनोटबंदीच्या निर्णयानंतर बँकात जमा करण्यात आलेल्या काळ्या पैशावर कर वसूल करण्याचा मार्ग खुला करणारे आयकर दुरुस्ती विधेयक आज प्रचंड गदारोळात लोकसभेत पारित करण्यात आले. या विधेयकानुसार स्वत:हून आपल्याजवळचा काळा पैसा जाहीर करणार्‍याला ५० टक्के राशी सरकारजमा करावी लागणार आहे. मात्र स्वत:हून आपल्याजवळाचा काळा पैसा जाहीर न करणार्‍याची ८५ टक्के राशी सरकार ताब्यात घेणार आहे.
सोमवारी अर्थमंत्री अरुण जेटली यांनी प्रचंड गदारोळात आयकर दुरुस्ती विधेयक लोकसभेत सादर केले होते. आज दुपारी २ वाजता लोकसभेच्या कामकाजाला प्रारंभ होताच हे विधेयक चर्चेला घेण्यात आले. हे विधेयक मांडण्याच्या सरकारच्या हेतूवर आणि पध्द्‌तीवर तृणमूल कॉंग्रेसचे सौगत राय यांच्यासह अनेक सदस्यांनी हरकतीचे मुद्दे उपस्थित केले.  काही सदस्यांनी या विधेयकावर दुरुस्त्याही सुचवल्या.
अर्थमंत्री अरुण जेटली विधेयकावर सरकारची भूमिका स्पष्ट करत असतांनाच  आधी हरकतीच्या मुद्यावर अध्यक्षांनी निर्णय द्यावा, अशी मागणी विरोधी सदस्यांनी केली. विरोधी पक्षांचे सदस्य घोषणा देत वेलमध्ये आहे. विरोधकांच्या घोषणबाजीमुळे सभागृहात प्रचंंड गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. या गोंधळातच अर्थमंत्री अरुण जेटली विधेयकावर सरकारची भूमिका स्पष्ट करत होते. पण विरोधक ऐकून घेण्याच्या मनस्थितीत नव्हते. ८ नोव्हेंबरला सरकारने नोटबंदीचा निर्णय जाहीर केल्यावरही काही जण आपल्याजवळील काळा पैसा पांढरा करण्याच्या प्रयत्नात आहे, त्यामुळे हे विधेयक आम्हाला आणावे लागत आहे, असे जेटली म्हणाले. यातून जमा होणार्‍या पैशाचा उपयोग विकास कामासाठी केला जाणार असल्याचे जेटली यांनी स्पष्ट केले. हे अतिशय महत्त्वाचे असे विधेयक आहे, या विधेयकावर व्यापक चर्चा होणे अपेक्षित आहे, पण सभागृहातील प्रचंड गोंधळाची स्थिती लक्षात घेता यावर चर्चा होणे अशक्य दिसते, असे सांगत सभापती सुमित्रा महाजन यांनी हे विधेयक आवाजी मतदानाने पारित केले. तत्पूर्वी सभापती महाजन यांनी या विधेयकावर सुचवलेल्या सर्व दुरुस्त्या फेटाळून लावल्या.
लोकसभेत पारित झाल्यानंतर आता हे विधेयक राज्यसभेत पाठवले जाईल. राज्यसभेत विरोधकांचे बहुमत असल्यामुळे हे विधेयक पारित होण्यात अडचण येऊ नये म्हणून या विधेयकाला वित्त विधेयकाचा दर्जा देण्यात आला आहे. राज्यसभा वित्त विधेयक अडवू शकत नाही.

शेअर करा

Posted by on Nov 29 2016. Filed under ठळक बातम्या, राष्ट्रीय, संसद. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

प्रतिक्रिया नोंदवा

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

मागील बातम्या, लेख शोध

Search by Date
Search by Category
Search with Google
More in ठळक बातम्या, राष्ट्रीय, संसद (1522 of 2099 articles)


वृत्तसंस्था पुणे, २९ नोव्हेंबर - नोटाबंदीनंतर पुणे शहरात ज्याप्रकारे उत्साह आणि समर्थन मिळाले आहे, ते पाहता पुणे हे जगातील पहिले ...