बँकाचा एनपीए ‘संपुआ’चा सर्वात मोठा घोटाळा

बँकाचा एनपीए ‘संपुआ’चा सर्वात मोठा घोटाळा

►पंतप्रधानांचा गंभीर आरोप • बँकांचे, ग्राहकांचे, देशाचे हित जपण्याचे…

कोळसा घोटाळा : मधू कोडा दोषी

कोळसा घोटाळा : मधू कोडा दोषी

►कट रचल्याचा आरोप ►गुरुवारी सुनावणार शिक्षा, नवी दिल्ली, १३…

आधारला बँकेशी जोडण्याला कोणतीही मुदत नाही

आधारला बँकेशी जोडण्याला कोणतीही मुदत नाही

►केंद्र सरकारचा निर्णय, नवी दिल्ली, १३ डिसेंबर – आधार…

नेपाळमध्ये कम्युनिस्टांची सत्ता, भारतासाठी इशारा

नेपाळमध्ये कम्युनिस्टांची सत्ता, भारतासाठी इशारा

काठमांडू, १३ डिसेंबर – पाकिस्तान आणि चीनच्या कारवायांमुळे आधीच…

विराट-अनुष्काचे इटलीत शुभमंगल

विराट-अनुष्काचे इटलीत शुभमंगल

रोम, ११ डिसेंबर – टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली…

ब्रिटनने गोठवली मल्ल्याची संपत्ती

ब्रिटनने गोठवली मल्ल्याची संपत्ती

►आठवड्याला केवळ ६७०० डॉलर्स खर्चाची मर्यादा, लंडन, ९ डिसेंबर…

संख्याबळाची दादागिरी खपवून घेणार नाही : गिरीश बापट

संख्याबळाची दादागिरी खपवून घेणार नाही : गिरीश बापट

नागपूर, १३ डिसेंबर – विधान परिषदेत कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी…

दाऊदच्या टोळीत फूट

दाऊदच्या टोळीत फूट

►छोटा शकीलची वेगळी वाट; •गुप्तचर यंत्रणांची माहिती, मुंबई, १३…

विधानसभेत तिसर्‍या दिवशीही विरोधकांचा गोंधळ

विधानसभेत तिसर्‍या दिवशीही विरोधकांचा गोंधळ

►कामकाज ३ वेळा तहकूब ►मुख्यमंत्र्यांच्या हस्तक्षेपानंतर कामकाज सुरळीत, नागपूर,…

बात बनेगी क्या, युवराज?

बात बनेगी क्या, युवराज?

॥ संवाद : सोमनाथ देशमाने | राहुल गांधी कॉंग्रेसचे…

कोरियामध्ये तिसर्‍या महायुध्दाची ठिणगी

कोरियामध्ये तिसर्‍या महायुध्दाची ठिणगी

॥ विशेष : अभय बाळकृष्ण पटवर्धन, निवृत्त कर्नल |…

जहॉं पानी कम था

जहॉं पानी कम था

॥ उलट तपासणी : भाऊ तोरसेकर | मागल्या दोन…

‘सिमरन’मधील नवीन गाणे प्रदर्शित

‘सिमरन’मधील नवीन गाणे प्रदर्शित

अभिनेत्री कंगना राणावत लवकरच सिमरन या चित्रपटाद्वारे प्रेक्षकांच्या भेटीला…

चिरंजीवीसोबत सिनेमा करण्यास ऐश्‍वर्याचा नकार?

चिरंजीवीसोबत सिनेमा करण्यास ऐश्‍वर्याचा नकार?

ऐश्‍वर्या राय बच्चनची सध्या बॉलीवूडमध्ये सेकंड इनिंग सुरू आहे.…

रणबीरच्या फिरण्यावर बंदी

रणबीरच्या फिरण्यावर बंदी

संजय दत्तच्या आयुष्यावर आधारित चित्रपटात रणबीर कपूर ६ वेगवेगळ्या…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:50 | सूर्यास्त: 17:53
अयनांश:
Home » छायादालन, ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय » आसाम, मध्यप्रदेशात भाजपाचा मोठा विजय

आसाम, मध्यप्रदेशात भाजपाचा मोठा विजय

♦लोकसभा, विधानसभेची पोटनिवडणूक
♦बंगालमधील तिन जागा तृणमूलकडे,
वृत्तसंस्था
नवी दिल्ली, २२ नोव्हेंबर
bjp-flag-rally-huge-mobसहा राज्ये आणि केंद्रशासित प्रदेश पुडुचेरीत घेण्यात आलेल्या लोकसभा आणि विधानसभा जागांच्या पोटनिवडणुकीत भाजपा आणि तृणमूल कॉंगे्रसने मोठा विजय मिळवला आहे. आसाम आणि मध्यप्रदेशातील लोकसभेची जागा भाजपाने स्वत:कडे कायम राखली आहे. नोटाबंदीच्या केंद्र सरकारच्या निर्णयावर खुश होऊनच नागरिकांनी भाजपाच्या बाजूने कौल दिला असल्याचे हे स्पष्ट संकेतच आहेत.
सर्वानंद सोनोवाल यांनी आसामचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतल्यानंतर त्यांनी या राज्यातील लखिमपूर लोकसभा जागेचा राजीनामा दिला होता. भाजपाचे उमेदवार प्रधान बारुआ यांनी कॉंगे्रसच्या हेमा प्रसंगा पेगू यांचा सुमारे १ लाख ९० हजार २१९ मतांनी दारुण पराभव केला. सोबतच, बैठालांगसो विधानसभेची जागाही भाजपाने जिंकली आहे. पक्षाचे उमेदवार मानसिंग रोंगपी यांनी कॉंगे्रसचे रूपोनसिंग रोंगहांग यांचा १६,६०० मतांनी पराभव केला.
मध्य प्रदेशातही शाहडोल लोकसभा आणि नेपानगर विधानसभेची जागा भाजपाने स्वत:कडे कायम ठेवली आहे. शाहडोल जागेवर भाजपाचे ग्यान सिंग यांनी कॉंगे्रसच्या उमेदवाराला ६० हजार मतांनी पराभव केला. या पोटनिवडणुकीत ग्यान सिंग य ांना ४,८१,३९८ मते मिळाली. नेपानगर विधानसभा क्षेत्रात भाजपाचे मंजू दादू यांनी कॉंगे्रसचे उमेदवार अंतर सिंग बरडे यांचा ४२,१९८ मतांनी पराभव केला.
बंगालमधील लोकसभेच्या दोन व विधानसभेची एक जागा सत्तारूढ तृणमूल कॉंगे्रसने जिंकली आहे. तामलूक, कूचबेहार असे लोकसभा मतदारसंघ आणि मोंटेश्‍वर विधानसभा मतदारसंघात या पक्षाने विजय मिळवला आहे.
अरुणाचल प्रदेशच्या हलुलियांग विधानसभेची जागा भाजपाप्रणीत आघाडीचे उमेदवार दासांगलू पूल यांनी जिंकली आहे. त्यांनी अपक्ष उमेदवार योम्पी क्री यांचा ९४२ मतांनी पराभव केला.
तामिळनाडूत सत्तारूढ अण्णाद्रमुकने विधानसभेच्या सर्व तिन्ही जागा जिंकल्या आहेत. यातील अरावक्कुर्चीची जागा खेचून आणताना तंजावूर आणि थिरुपरनकुंद्रम् या दोन जागा स्वत:कडे कायम ठेवल्या आहेत. सध्या अपोलो रुग्णालयात उपचार घेत असलेल्या मुख्यमंत्री जयललिता यांनी या विजयासाठी मतदारांचे आभार मानले आहे.
त्रिपुरातील बारजाला मतदारसंघात माकपचे उमेदवार झुमू सरकार यांनी भाजपाचे उमेदवार शिस्तमोहन दास यांचा पराभव केला.
पुडुचेरी येथील नेलिथोपे विधानसभेच्या जागेवर कॉंगे्रसचे नेते आणि राज्याचे मुख्यमंत्री व्ही. नारायणसामी यांनी विजय मिळवला आहे. त्यांनी अण्णाद्रमुकच्या उमेदवाराचा पराभव केला.

शेअर करा

Posted by on Nov 23 2016. Filed under छायादालन, ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

प्रतिक्रिया नोंदवा

Marathi/English, press Ctrl+g  

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

मागील बातम्या, लेख शोध

Search by Date
Search by Category
Search with Google
More in छायादालन, ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय (2534 of 3043 articles)


=राष्ट्रपतींनाही भेटणार= वृत्तसंस्था नवी दिल्ली, २२ नोव्हेंबर - नोटाबंदीच्या निर्णयाविरोधात अधिक आक्रमक पावित्रा घेण्याची रणनीती विरोधकांनी स्वीकारली आहे. उद्या बुधवारी ...