प्रत्येक ग्रामपंचायतीत वायफाय

प्रत्येक ग्रामपंचायतीत वायफाय

►साडेसात लाख ‘हॉटस्पॉट’ बसविणार ►केंद्र सरकारचा महत्त्वाकांक्षी निर्णय, नवी…

अल्लाशिवाय इतरांची पूजा करणारे मुस्लिम नाही!

अल्लाशिवाय इतरांची पूजा करणारे मुस्लिम नाही!

►•देवबंदचा आणखी एक फतवा, लखनौ, २१ ऑक्टोबर – मुस्लिम…

म्हणून निवडणुकीची घोषणा नाही

म्हणून निवडणुकीची घोषणा नाही

►मुख्य निवडणूक आयुक्तांचे गुजरातबाबत स्पष्टीकरण, नवी दिल्ली, २१ ऑक्टोबर…

दहशतवाद थांबल्याशिवाय पाकिस्तानशी चर्चा नाही

दहशतवाद थांबल्याशिवाय पाकिस्तानशी चर्चा नाही

►अमेरिकी प्रशासनाची भूमिका, नवी दिल्ली, २१ ऑक्टोबर – पाकिस्तान…

दोन वर्षांपासून बेपत्ता पाक पत्रकार सापडली

दोन वर्षांपासून बेपत्ता पाक पत्रकार सापडली

इस्लामाबाद, २१ ऑक्टोबर – मागील दोन वर्षांपासून बेपत्ता असलेली…

पाकिस्तानच्या टेहळणीसाठी भारताची मदत शक्य : अमेरिका

पाकिस्तानच्या टेहळणीसाठी भारताची मदत शक्य : अमेरिका

वॉशिंगटन, १८ ऑक्टोबर – आपला शेजारील राष्ट्र पाकिस्तानवर नजर…

साडेआठ लाख शेतकरी कर्जमुक्त

साडेआठ लाख शेतकरी कर्जमुक्त

►शेवटचा शेतकरी कर्जमुक्त होईपर्यंत योजना सुरू ►मुख्यमंत्री फडणवीस यांची…

राज्यातील एसटी-संपावर हायकोर्टात उद्या सुनावणी

राज्यातील एसटी-संपावर हायकोर्टात उद्या सुनावणी

मुंबई, १८ ऑक्टोबर – महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन मंडळाने…

दाऊदच्या मालमत्तांचा लिलाव

दाऊदच्या मालमत्तांचा लिलाव

►५ कोटी रुपये राखीव किंमत, मुंबई, १८ ऑक्टोबर –…

महासत्ता भारत : एक विचार

महासत्ता भारत : एक विचार

॥ विशेष : सतीश भा. मराठे | आपण महासत्ता…

दुमदुमले भारतमाता गौरव गान…

दुमदुमले भारतमाता गौरव गान…

॥ तरंग : दीपक कलढोणे | कुणी कुणाला आदेश…

मोदीजी, अभी नही, तो कभी नही!

मोदीजी, अभी नही, तो कभी नही!

॥ विशेष : सोमनाथ देशमाने | अयोध्येत राम जन्मभूमीवर…

‘सिमरन’मधील नवीन गाणे प्रदर्शित

‘सिमरन’मधील नवीन गाणे प्रदर्शित

अभिनेत्री कंगना राणावत लवकरच सिमरन या चित्रपटाद्वारे प्रेक्षकांच्या भेटीला…

चिरंजीवीसोबत सिनेमा करण्यास ऐश्‍वर्याचा नकार?

चिरंजीवीसोबत सिनेमा करण्यास ऐश्‍वर्याचा नकार?

ऐश्‍वर्या राय बच्चनची सध्या बॉलीवूडमध्ये सेकंड इनिंग सुरू आहे.…

रणबीरच्या फिरण्यावर बंदी

रणबीरच्या फिरण्यावर बंदी

संजय दत्तच्या आयुष्यावर आधारित चित्रपटात रणबीर कपूर ६ वेगवेगळ्या…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:22 | सूर्यास्त: 17:58
अयनांश:
Home » ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय » उत्पन्नाच्या प्रमाणात सोने बाळगणार्‍यांवर कारवाई नाही

उत्पन्नाच्या प्रमाणात सोने बाळगणार्‍यांवर कारवाई नाही

=सोन्याच्या दागिन्यासाठी कमाल मर्यादा निश्‍चित=
तभा वृत्तसेवा
नवी दिल्ली, १ डिसेंबर –
gold-jewelleryउत्पन्नाच्या प्रमाणात तुमच्याजवळ सोने असेल तर कोणीही घाबरण्याची गरज नसल्याचे आज केंद्र सरकारने स्पष्ट केले आहे. यासोबतच कोणाला आपल्याजवळ किती सोने ठेवता येईल, याचा तपशीलही जाहीर केला आहे.
काळ्या पैशाविरोधात कठोर कारवाई केल्यानंतर सरकार आता बेनामी संपत्ती आणि अवैध सोने बाळगणार्‍यांवर  कारवाई करणार अशी चर्चा सुरू झाली होती, त्या पृष्ठभूमीवर केंद्र सरकारने आज सोन्याच्या संदर्भातील आपली भूमिका स्पष्ट केली आहे. सरकारने घालून दिलेल्या मर्यादेत कोणाकडे सोने असेल तर काळजी करण्याचे कारण नाही, असे आज अर्थमंत्रालयाने जारी केलेल्या पत्रकात म्हटले आहे.
विवाहित महिला आपल्याजवळ ५०० ग्रॅम सोन्याचे दागिने ठेवू शकतात, अविवाहित महिलांसाठी ही मर्यादा २५० ग्रॅम एवढी ठरवण्यात आली आहे. पुरुषांना आपल्याजवळ जास्तीतजास्त १०० ग्रॅम सोने बाळगता येईल. या मर्यादेपेक्षा कोणाजवळ जास्त सोने आढळले तर आयकर विभाग कारवाई करू शकेल, असे या पत्रकात म्हटले आहे.
आपल्या घोषित, सवलतप्राप्त आणि बचतीच्या उत्पन्नातून करण्यात आलेल्या सोन्याच्या खरेदीवर कोणत्याही प्रकारचा कर आकारला जाणार नाही. त्याचप्रमाणे घरात पिढ्यान्‌पिढ्यापासून जे दागिने आणि सोने आहे, त्यावरही सरकार कोणत्याच प्रकारचा कर आकारणार नाही. कृषी उत्पन्नातून खरेदी करण्यात आलेल्या सोन्याच्या दागिन्यावरही कर आकारला जाणार नाही. मात्र ज्या पैशाचा हिशेब देता येणार नाही, अशा पैशातून सोन्याची खरेदी करण्यात आली असेल तर आयकर खाते त्यावर कारवाई करू शकेल, असे या पत्रकात म्हटले आहे.
८ नोव्हेंबरला सरकारने नोटबंदीचा निर्णय घेतल्यानंतर आपल्याजवळचा काळा पैसा खपवण्यासाठी काही जणांनी मोठ्या प्रमाणात सोन्याची खरेदी केली होती. त्यामुळे सरकार सोने बाळगण्यावर काही निर्बंध घालेल, अशी चर्चा सुरू झाली होती. सरकारने आयकर कायद्यात दुरुस्ती केल्यानंतर त्याचा बडगा सोने बाळगणार्‍यांवर केला जाईल, अशी चर्चा होती.

शेअर करा

Posted by on Dec 2 2016. Filed under ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

प्रतिक्रिया नोंदवा

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

मागील बातम्या, लेख शोध

Search by Date
Search by Category
Search with Google
More in ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय (2061 of 2669 articles)


•कर्मचार्‍यांचे युद्धस्तरावर काम सुरू •वितरण करण्यासाठी विमानसेवा, वृत्तसंस्था नवी दिल्ली, १ डिसेंबर - ५०० व एक हजारच्या नोटबंदी निर्णयानंतर, देशातील ...