Home » अर्थ, छायादालन, ठळक बातम्या, राष्ट्रीय » उद्यापासून एटीएममध्ये मिळणार ५००, दोन हजाराची नोट

उद्यापासून एटीएममध्ये मिळणार ५००, दोन हजाराची नोट

=आरबीआय, अर्थमंत्रालयाची माहिती=
finance-ministryनवी दिल्ली, [९ नोव्हेंबर] – काळा पैसा आणि अतिरेक्यांना नकली नोटांच्या माध्यमातून होणार्‍या आर्थिक मदतीविरोधात आगळीच सर्जिकल स्ट्राईक करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी रात्री ५०० आणि एक हजार रुपयांच्या चलनी नोटा तडकाफडकी बंद केल्या आणि त्या जागी ५०० व दोन हजार रुपये मूल्यांच्या नव्या नोटा चलनात आणण्याचा निर्णय जाहीर केला. या दोन्ही नव्या नोटा शुक्रवारपासून सर्वच बँकांच्या एटीममध्ये उपलब्ध होणार आहेत.
नरेंद्र मोदी यांच्या या ऐतिहासिक निर्णयानंतर देशभरातच संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले होते. मंगळवारी मध्यरात्रीपर्यंत लोक रस्त्यावर होते. देशभरातील एटीएम बंद पडल्याने आपण एका क्षणात गरीब झालो, अशी भावना अनेकांच्या मनात निर्माण झाली. पण, आज चित्र बदलले आहे. चलनातील ५०० आणि एक हजार रुपयांच्या नोटा रद्द करण्यात आल्या असल्या, तरी जवळ असलेल्या नोटा बदलण्यासाठी आपल्याजवळ भरपूर वेळ असल्याचे आणि बँकांमध्ये या नोटा जमा करून, त्याऐवजी नव्या नोटा मिळणार असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर गोंधळाचे वातावरण शमले आहे.
या गोंधळाचे पूर्णपणे निराकरण करण्यासाठी अर्थ मंत्रालय आणि भारतीय रिझर्व्ह बँकेतील अधिकार्‍यांनी आज तातडीने संयुक्त पत्रपरिषद बोलावली आणि मोदी सरकारच्या निर्णयाचा नेमका अर्थ विशद केला. ५०० व एक हजार रुपये मूल्याच्या नोटा अचानक रद्द करण्याची गरज का भासली, यामागचे कारणही स्पष्ट केले.
पंतप्रधानांनी जाहीर केल्याप्रमाणे ५०० आणि दोन हजार रुपयांच्या नव्या नोटा शुक्रवारपासून चलनात येतील, अशी घोषणा अर्थ खात्याचे सचिव अशोक लवासा यांनी केली. या नोटांवरील बंदीचा उद्देश नागरिकांनी समजून घ्यायला हवा. त्यांना काही प्रमाणात अडचणी जात आहेत, याची जाणीव आम्हालाही आहे. पण, ही स्थिती हाताळण्यात ते नक्कीच सहकार्य करतील, असा विश्‍वास आहे. दररोजच्या व्यवहाराकरिता लोकांना पैशाची गरज असते आणि ती लक्षात घेऊन आम्ही तातडीने नव्या चलनी नोटा सर्वच बँकांमध्ये गुरुवारी सायंकाळपर्यंतच उपलब्ध करून देत आहोत, असे रिझर्व्ह बँक अधिकार्‍यांनी सांगितले.

शुक्रवारी सकाळपासून…
बँकांच्या एटीममध्ये शुक्रवारी सकाळपासूनच या नव्या नोटा असतील, असे त्यांनी सांगितले. शुक्रवारपासून सुरू होणार्‍या आर्थिक व्यवहारांवर आरबीआयचे अतिशय बारीक लक्ष राहणार आहे. आज व उद्या (बुधवार व गुरुवार) दोन्ही दिवस एटीएम पूर्णपणे बंद राहणार आहेत. तथापि, काही शहरांमध्ये गुरुवारीच एटीएम सुरू करण्यात येणार असून, त्यात नव्या नोटांची व्यवस्था केली जाणार आहे, असे  रिझर्व्ह बँक अधिकार्‍यांनी सांगितले.

नव्या नोटांमध्ये जीपीएस नाही : आरबीआय
शुक्रवारपासून आर्थिक व्यवहारात नव्याने येणार्‍या दोन हजार रुपयांच्या नोटांमध्ये नॅनो जीपीएस चीप बसविण्यात आली नाही. अशी कोणतीही यंत्रणा त्यात नसेल, असे स्पष्टीकरण भारतीय रिझर्व्ह बँकेतर्फे आज बुधवारी देण्यात आले. या नव्या नोटांमध्ये आरबीआयने जीपीएस यंत्रणा बसविली असल्याने उपग्रहाच्या माध्यमातून ही नोट कुठे ठेवली आहे, याबाबतची माहिती मिळवता येईल, अशी अफवा आज सकाळपासून उठविण्यात आली होती. यावर आरबीआयने आपली भूमिका स्पष्ट करून या अफवांना विराम दिला आहे.
दोन हजार रुपयाच्या नोटांमध्ये जीपीएस प्रणाली असेल आणि ही नोट १२० मीटरपर्यंत जमिनीत ठेवली असेल, तरीही त्याची माहिती मिळेल, असे मेसेज सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत, हे विशेष.

शेअर करा

Posted by on Nov 10 2016. Filed under अर्थ, छायादालन, ठळक बातम्या, राष्ट्रीय. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

प्रतिक्रिया नोंदवा

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)

हवामान

 • दृष्टीक्षेपात

  व्हिडीओ संग्रह

  मागील बातम्या, लेख शोध

  Search by Date
  Search by Category
  Search with Google
  More in अर्थ, छायादालन, ठळक बातम्या, राष्ट्रीय (1645 of 1951 articles)

  rbi-logo
  =शनिवार, रविवार पूर्ण दिवस सुरू राहणार= नवी दिल्ली, [९ नोव्हेंबर] - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ५०० व एक हजार रुपयांच्या ...