त्रिवार तलाकला सुप्रीम कोर्टाची बंदी

त्रिवार तलाकला सुप्रीम कोर्टाची बंदी

►अवैध आणि घटनाबाह्य प्रथा ►घटनापीठाचा ऐतिहासिक व बहुमताचा निकाल…

आता बहुपत्नीत्वाविरुद्ध पुढचा लढा: शायरा बानो

आता बहुपत्नीत्वाविरुद्ध पुढचा लढा: शायरा बानो

नवी दिल्ली, २२ ऑगस्ट – तिहेरी तलाकविरुद्धची न्यायालयीन लढाई…

मला बॉम्बस्फोटाच्या गुन्ह्यात अडकवले: कर्नल पुरोहित

मला बॉम्बस्फोटाच्या गुन्ह्यात अडकवले: कर्नल पुरोहित

मुंबई, २२ ऑगस्ट – मला बॉम्बस्फोटाच्या गुन्ह्यात अडकवण्यात आले…

दहशवादाला थारा देऊ नका, अन्यथा परिणाम भोगा

दहशवादाला थारा देऊ नका, अन्यथा परिणाम भोगा

►ट्रम्प यांचा पाकला गर्भित इशारा ►अफगाणात शांततेसाठी भारताची भूमिका…

हसिनांच्या हत्येचा प्रयत्न; १० दहशतवाद्यांना मृत्युदंड

हसिनांच्या हत्येचा प्रयत्न; १० दहशतवाद्यांना मृत्युदंड

ढाका, २० ऑगस्ट – बांगलादेशच्या पंतप्रधान बेगम शेख हसिना…

६५० दशलक्ष वर्षांपूर्वी अस्तित्वात आला पहिला पशू

६५० दशलक्ष वर्षांपूर्वी अस्तित्वात आला पहिला पशू

►•वैज्ञानिकांच्या अभ्यासातील निष्कर्ष, मेलबर्न, १७ ऑगस्ट – आपल्या भूतलावर…

गणपती आणा मातीचे.. रक्षण होईल पर्यावरणाचे!

गणपती आणा मातीचे.. रक्षण होईल पर्यावरणाचे!

►पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आवाहनाला देऊया प्रतिसाद ►चला साजरा करुया…

मीरा भाईंदर मनपा भाजपाच्या ताब्यात

मीरा भाईंदर मनपा भाजपाच्या ताब्यात

मुंबई, २१ ऑगस्ट – काट्याची टक्कर आणि वर्चस्वाची लढाई…

राज्यात पावसाची पुन्हा हजेरी

राज्यात पावसाची पुन्हा हजेरी

►•खरीप पिकांच्या वाढीस फायदा ►धरणक्षेत्रातही संततधार, पुणे, २० ऑगस्ट…

भारत – चीन खडाजंगी

भारत – चीन खडाजंगी

डॉ. प्रमोद पाठक | आर्थिक, भौगोलिक आणि सांस्कृतिक स्तरावर…

आक्रमक चीन आणि धीरोदात्त भारत

आक्रमक चीन आणि धीरोदात्त भारत

संजय वैद्य | चीन वारंवार भारताला युद्धाच्या धमक्या देत…

स्वातंत्र्याचा अर्थ

स्वातंत्र्याचा अर्थ

•उलट तपासणी : भाऊ तोरसेकर | ही मानसिकताच रोगट…

रणबीरच्या फिरण्यावर बंदी

रणबीरच्या फिरण्यावर बंदी

संजय दत्तच्या आयुष्यावर आधारित चित्रपटात रणबीर कपूर ६ वेगवेगळ्या…

प्रियांका ठरली जगातील दुसरी सुंदर महिला!

प्रियांका ठरली जगातील दुसरी सुंदर महिला!

जगातील सर्वात सुंदर महिलांमध्ये बॉलिवूडच्या देसी गर्लला म्हणजेच प्रियांका…

रितेश बनला ‘बँक चोर’

रितेश बनला ‘बँक चोर’

यशराज फिल्मच्या ‘बँक चोर’ या चित्रपटाद्वारे मराठमोळा अभिनेता रितेश…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:11 | सूर्यास्त: 18:45
अयनांश:
Home » छायादालन, ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय » एटीएमपुढे रांगाच रांगा!

एटीएमपुढे रांगाच रांगा!

=रोख संपल्याने गोंधळ=

नवी दिल्ली, [११ नोव्हेंबर] – आज शुक्रवारी एटीएम सुरू झाल्यानंतर सुमारे दोन तासांमध्येच त्यात खडखडाट झाला. नवी दिल्लीसह मुंबई, इंदूर, भोपाळ, जयपूर, जोधपूर, पाटणा आदी शहरांमध्ये गर्दीचे दृश्य आणि ग्राहकांच्या गैरसोयीची परिस्थिती आढळून आली.
दोन दिवसांपासून बंद ठेवण्यात आलेले एटीएम आज शुक्रवारी सुरू झाले. त्यामुळे लोकांच्या रांगा लागल्या. सकाळी एटीएम सुरू होईल, असे अधिकार्‍यांकडून सांगण्यात आले होते. मात्र काही ठिकाणी दुपारपर्यंत एटीएम सुरू न झाल्याने नागरिकांची गैरसोय झाली. दुपारनंतर एटीएम सुरू होतील असे यावेळी सांगण्यात आले. परिणामी, एटीएममध्ये पैसे न  मिळालेले ग्राहक पैसे काढण्यासाठी बँकांसमोर जाऊन रांगेत उभे झाले. नोटा  बदलण्यासाठीची गर्दी त्यामुळे वाढली. काही ठिकाणी कर्मचारी आणि ग्राहक यांच्यात वादावादीही झाली. प्रमुख बँकांच्या शाखांमध्ये कामकाज शांततेत होण्यासाठी पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
बहुतांश खासगी आणि सार्वजनिक बँकांनी कामकाज दोन तासांनी वाढविले होते. शनिवार आणि रविवारी काम सुरू ठेवण्यात येईल, असे जाहीर करून बँकांनी सामान्य ग्राहकांना दिलासा दिला आहे. गुरुवारी रात्रभर एटीएममध्ये रोख पैसे भरण्याचे काम सुरू होते, हे विशेष.

बँकेपुढील रांगेत वृद्धाचा मृत्यू
मुंबई – पैसे बदलण्यासाठी बँकेत आलेल्या वृद्धाचा आज शुक्रवारी रांगेतच मृत्यू झाला. ही घटना मुलुंडमध्ये घडली. विश्‍वनाथ वर्तक हे ७३ वर्षीय ज्येष्ठ नागरिक मुलुंडमधील हरिओमनगर इथल्या स्टेट बँक ऑफ इंडियात पैसे बदलण्यासाठी  आले होते. मात्र चक्कर आल्यामुळे ते जमिनीवर कोसळले. हृदयविकाराच्या  झटक्याने त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

नोटबदलासाठी पुरेशी रोख उपलब्ध : आरबीआय
चेन्नई/मुंबई – पाचशे व हजार रुपयांच्या नोटा बदलून घेण्यार्‍या नागरिकांसाठी रिझर्व्ह बँकेने निवेदनच जाहीर केले आहे. रोख रोकमेचा पुरेसा साठा उपलब्ध असल्याचे आज शुक्रवारी जारी केलेल्या निवेदनात रिझर्व्ह बँकेने म्हटले आहे. देशभरात दोन हजार व  इतर रकमेच्या नोटा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. बँकामध्ये सर्व प्रकारच्या नोटांचा पुरेसा साठा  आहे. लोकांनी धीर सोडू नये, असे आवाहन आरबीआयने या निवेदनात केले आहे. दरम्यान, पाचशे आणि हजाराच्या जुन्या नोटा बदलल्यानंतर आता बँकांमध्ये मोठ्या प्रमाणात गंगाजळी जमा होत आहे.

स्टेट बँकेत २४ तासात ५३ हजार कोटी जमा
INDIA-ECONOMY-BANKINGजुन्या नोटा बदलून देण्याच्या व्यवहारात स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये २४ तासात ५३ हजार कोटी रुपये जमा झाले आहेत, अशी माहिती एसबीआयच्या अध्यक्ष अरुंधती भट्टाचार्य यांनी आज शुक्रवारी मुंबईमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत दिली. एसबीआयचे एटीएम पूर्णपणे सुरळीत होण्यासाठी आणखी दहा दिवस लागणार आहेत, असेही यावेळी त्यांनी स्पष्ट केले.

राहुल गांधी रांगेत
नवी दिल्ली – नवी दिल्लीतील संसद मार्गावरील स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शाखेसमोरील रांगेत कॉंग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी आज गुरुवारी उभे होते. माझ्या लोकांना त्रास होत असल्याने मी त्यांच्यासोबत उभा राहण्यासाठी आलो आहे, असे यावेळी राहुल गांधी यांनी माध्यमांच्या प्रतिनिधींना सांगितले. सरकार खरे तर सामान्य  माणसांसाठी हवे. ते फक्त मूठभर लोकांसाठी असता कामा नये, अशी टीका यावेळी राहुल गांधी यांनी सरकारवर केली. राहुल गांधी यांना बघताच बँकेबाहेर नोटा बदलण्यासाठी रांगेत उभ्या असलेल्या लोकांना आश्‍चर्याचा धक्का बसला. यानंतर राहुल गांधी रांगेत उभे राहिले. यावेळी त्यांच्यासोबत सेल्फी काढण्यासाठी लोकांनी गर्दी केली. यावेळी राहुल गांधींनी नागरिकांशी चर्चा करीत बँकेचा व्यवहार पूर्ण केला.

शेअर करा

Posted by on Nov 12 2016. Filed under छायादालन, ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

प्रतिक्रिया नोंदवा

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

मागील बातम्या, लेख शोध

Search by Date
Search by Category
Search with Google
More in छायादालन, ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय (2192 of 2540 articles)


पंतप्रधान मोदी यांनी जपानचे सम्राट अखिहितो यांची भेट घेतली आणि भारत व जपानच्या समान हितांवर आणि आशियाच्या भवितव्यावर सविस्तर चर्चा ...