Home » आंतरराष्ट्रीय, आशिया, ठळक बातम्या » एनएसजीत चीनचा पुन्हा खोडा

एनएसजीत चीनचा पुन्हा खोडा

=भारताच्या सदस्यत्वाबाबत आमची भूमिका ठाम=
nsg-nuclear-suppliers-groupबीजिंग, [७ नोव्हेंबर] – अणुपुरवठादा गटांची (एनएसजी) याच आठवड्यात जिनेव्हा येथे बैठक होऊ घातली असताना, चिनी ड्रॅगनचे शेपूट पुन्हा एकदा वळवळले आहे. एनएसजीमध्ये भारताच्या सदस्यत्वाच्या मार्गात चीनने नव्याने अडथळा निर्माण करताना, या मुद्यावरील आमच्या भूमिकेत कोणताही बदल झाला नसल्याचे स्पष्ट केले. येत्या शुक्रवारी एनएसजीची बैठक होणार आहे.
एनएसजीमधील सदस्य देशांनी अण्वस्त्र अप्रचार बंदीच्या करारात सहभागी नसलेल्या देशांना या गटात प्रवेश देण्याबाबतच्या नियमात बदल केल्यानंतरच आम्ही भारताच्या उमेदवारीवर विचार करू शकतो. या क्षणाला आम्ही आपल्या भूमिकेवर ठाम आहोत, असे चीनच्या परराष्ट्र व्यवहार मंत्रालयातील प्रवक्ते लू कांग यांनी पत्रकारांना सांगितले.
भारत आणि चीनच्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांमध्ये ४ नोव्हेंबर रोजी हैदराबाद येथे या मुद्यावर सविस्तर बैठक झाली. आम्ही भारताच्या सदस्यत्वाच्या विरोधात नाही, हे त्यावेळीही स्पष्ट करण्यात आले होते आणि आजही आम्ही त्यावर ठाम आहोत, असे त्यांनी स्पष्ट केले.

शेअर करा

Posted by on Nov 8 2016. Filed under आंतरराष्ट्रीय, आशिया, ठळक बातम्या. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

प्रतिक्रिया नोंदवा

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)

हवामान

  • दृष्टीक्षेपात

    व्हिडीओ संग्रह

    मागील बातम्या, लेख शोध

    Search by Date
    Search by Category
    Search with Google
    More in आंतरराष्ट्रीय, आशिया, ठळक बातम्या (1444 of 1679 articles)


    नवी दिल्ली, [७ नोव्हेंबर] - सोहराबुद्दिन शेख चकमक प्रकरणी भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांना क्लिन चीट देणारा विशेष न्यायालयाचा ...