Home » ठळक बातम्या, न्यायालय-गुन्हे, राष्ट्रीय » एनडीटीव्हीवरील बंदीवर ५ डिसेंबरला सुनावणी

एनडीटीव्हीवरील बंदीवर ५ डिसेंबरला सुनावणी

supreme_court_1नवी दिल्ली, [८ नोव्हेंबर] – पठाणकोट येथील दहशतवादी हल्ल्याच्या काळात संवेदनशील वार्तांकन केल्याबद्दल केंद्र सरकारने एनडीटीव्हीच्या हिंदी वृत्तवाहिनीचे प्रसारण एक दिवसासाठी बंद ठेवण्याचा आदेश दिल्यानंतर, या आदेशाला आव्हान देणार्‍या एनडीटीव्हीच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालय येत्या ५ डिसेंबर रोजी सुनावणी करणार आहे.
हे प्रकरण न्यायप्रविष्ट झाल्यानंतर केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्री एम. व्यंकय्या नायडू यांनी सोमवारी या वृत्तवाहिनीवरील बंदी आदेश तुर्तास स्थगित ठेवण्याचा निर्णय घेतला होता.
सरकारने ९ नोव्हेंबर रोजी या वृत्तवाहिनीला संपूर्ण एक दिवस प्रसारण बंद ठेवण्याचा आदेश दिला होता. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने आज हे प्रकरण सुनावणीसाठी घेतले असता एनडीटीव्हीतर्फे बाजू मांडणारे वरिष्ठ वकील फाली एस. नरिमन आणि ऍटर्नी जनरल मुकुल रोहतगी म्हणाले की, सरकारन आपला बंदी आदेश तात्पुरता स्थगित ठेवला असल्याने यावर इतक्या तातडीने सुनावणी करण्याची गरज नाही.
न्या. ए. के. सिकरी आणि न्या. एन. व्ही. रमण यांच्या दोन सदस्यीय न्यायासनापुढे सरकारची बाजू मांडताना रोहतगी म्हणाले की, एनडीटीव्ही आता आपली भूमिका आंतरमंत्री समितीपुढे सादर करणार आहे. यानंतर न्यायालयाने या प्रकरणी सुनावणीसाठी ५ डिसेंबर ही तारीख निश्‍चित केली.

शेअर करा

Posted by on Nov 9 2016. Filed under ठळक बातम्या, न्यायालय-गुन्हे, राष्ट्रीय. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

प्रतिक्रिया नोंदवा

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)

हवामान

  • दृष्टीक्षेपात

    व्हिडीओ संग्रह

    मागील बातम्या, लेख शोध

    Search by Date
    Search by Category
    Search with Google
    More in ठळक बातम्या, न्यायालय-गुन्हे, राष्ट्रीय (1432 of 1678 articles)


    चंदीगड : भाजपाच्या चंदीगड येथील खासदार आणि अभिनेत्री किरण खेर यांचे वडील कर्नल ठाकर सिंग यांचे आज मंगळवारी वयाच्या १०३ ...