पाकी अधिकार्‌यांच्या भेटीची गरज का भासली?

पाकी अधिकार्‌यांच्या भेटीची गरज का भासली?

►अरुण जेटली यांचा मनमोहनसिंगांना बोचरा सवाल, नवी दिल्ली, १२…

सी प्लेन ही वाहतूक क्षेत्रातील क्रांती

सी प्लेन ही वाहतूक क्षेत्रातील क्रांती

►मोदींनी प्रवास करून मुहूर्तमेढ रोवली ►नितीन गडकरी यांचा दावा,…

जनतेचे पैसे पूर्णपणे सुरक्षित : अरुण जेटली

जनतेचे पैसे पूर्णपणे सुरक्षित : अरुण जेटली

नवी दिल्ली, १२ डिसेंबर – गेल्या काही दिवसांपासून सोशल…

विराट-अनुष्काचे इटलीत शुभमंगल

विराट-अनुष्काचे इटलीत शुभमंगल

रोम, ११ डिसेंबर – टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली…

ब्रिटनने गोठवली मल्ल्याची संपत्ती

ब्रिटनने गोठवली मल्ल्याची संपत्ती

►आठवड्याला केवळ ६७०० डॉलर्स खर्चाची मर्यादा, लंडन, ९ डिसेंबर…

मुस्लिमांनी केला ट्रम्प यांचा निषेध

मुस्लिमांनी केला ट्रम्प यांचा निषेध

तेल अवीव, ९ डिसेंबर – अमेरिकी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प…

विरोधकांचा दुसर्‌या दिवशीही गोंधळ

विरोधकांचा दुसर्‌या दिवशीही गोंधळ

►विधान परिषदेचे काम बंद पाडले, नागपूर, १२ डिसेंबर –…

हे तर तुमचेच पाप आहे…

हे तर तुमचेच पाप आहे…

►मुख्यमंत्र्यांचा विरोधकांवर हल्लाबोल, नागपूर, ११ डिसेंबर – आघाडी सरकारच्या…

खाशाबा जाधवांच्या पद्मविभूषण शिफारशीची फाईल गहाळ

खाशाबा जाधवांच्या पद्मविभूषण शिफारशीची फाईल गहाळ

नागपूर, ११ डिसेंबर – प्रख्यात कुस्तीपटू खाशाबा जाधव यांचा…

बात बनेगी क्या, युवराज?

बात बनेगी क्या, युवराज?

॥ संवाद : सोमनाथ देशमाने | राहुल गांधी कॉंग्रेसचे…

कोरियामध्ये तिसर्‍या महायुध्दाची ठिणगी

कोरियामध्ये तिसर्‍या महायुध्दाची ठिणगी

॥ विशेष : अभय बाळकृष्ण पटवर्धन, निवृत्त कर्नल |…

जहॉं पानी कम था

जहॉं पानी कम था

॥ उलट तपासणी : भाऊ तोरसेकर | मागल्या दोन…

‘सिमरन’मधील नवीन गाणे प्रदर्शित

‘सिमरन’मधील नवीन गाणे प्रदर्शित

अभिनेत्री कंगना राणावत लवकरच सिमरन या चित्रपटाद्वारे प्रेक्षकांच्या भेटीला…

चिरंजीवीसोबत सिनेमा करण्यास ऐश्‍वर्याचा नकार?

चिरंजीवीसोबत सिनेमा करण्यास ऐश्‍वर्याचा नकार?

ऐश्‍वर्या राय बच्चनची सध्या बॉलीवूडमध्ये सेकंड इनिंग सुरू आहे.…

रणबीरच्या फिरण्यावर बंदी

रणबीरच्या फिरण्यावर बंदी

संजय दत्तच्या आयुष्यावर आधारित चित्रपटात रणबीर कपूर ६ वेगवेगळ्या…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:50 | सूर्यास्त: 17:52
अयनांश:
Home » ठळक बातम्या, राष्ट्रीय, संरक्षण » ओआरओपीवर दोन महिन्यांत तोडगा

ओआरओपीवर दोन महिन्यांत तोडगा

manohar-parrikar_99बडगाम, [३ नोव्हेंबर] – केंद्र सरकार माजी सैनिकांबाबत अतिशय संवेदनशील आहे. त्यामुळेच गेल्या ४० वर्षांपासून होत असलेली मागणी आम्ही पूर्ण केली आहे. याचा लाभ २० लाखापैकी सुमारे १९ लाख निवृत्त सैनिकांना मिळाला आहे. तर सुमारे दीड लाख माजी सैनिकांच्या कागदपत्रांची तपासणी सुरू आहे. येत्या दोन महिन्यात हे काम पूर्ण होऊन ओआरओपीचा मुद्दा पूर्णपणे निकालात निघेल, असा विश्‍वास संरक्षण मंत्री मनोहर पर्रीकर यांनी व्यक्त केला.
तसेच आत्महत्या केलेले माजी सैनिक रामकिशन ग्रेवाल यांच्या पेन्शनबाबत स्थनिक स्तरावर अडचणी होत्या. त्याचा अहवाल मागवला असल्याचेही ते म्हणाले. माजी सैनिकांच्या कल्याणाचा सरकारने केलेला वायदा पूर्ण केला असून आजअखेर ५५०७.४ कोटी रुपये देण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले होते.
परमवीर चक्र विजेते दिवंगत मेजर सोमनाथ शर्मा यांच्या स्मृतीदिनी त्यांना श्र्‌रद्धांजली वाहण्यासाठी ते आले होते. मेजर शर्मा यांनी १९४७ साली अतुलनीय शौर्य गाजवत श्र्‌रीनगर विमानतळाचा ताबा पाकिस्तानी सैन्य, बंडखोरांना घेऊ दिला नव्हता. त्यांच्या या शौर्याला परमवीर चक्र देऊन गौरवण्यात आले होते.
ग्रेवाल यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
दरम्यान, आत्महत्या केलेल्या माजी सैनिक रामनरेश ग्रेवाल यांच्या पार्थिवावर त्यांचे मूळ गाव हरियाणातील भिवानी येथील बामला गावामध्ये शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.
मात्र त्यांच्या आत्महत्येनंतर दिल्लीपासून राजकारण सुरू झाल्याने या गावात गुरुवारी सकाळपासून देशातील अनेक मान्यवर नेत्यांनी हजेरी लावल्याचे दिसून येत होते. सरकारच्यावतीने त्यांच्या परिवाराला १० लाखांची मदत आणि एक वारसाला शासकीय नोकरी देण्याचे आश्वासन देण्यात आले.
स्टेट बँकेच्या चुकीने पेन्शनमध्ये घट
त्यांचा मुलगा जसवंत याने सांगितले की, त्यांना २४,९९९ पेन्शन मिळत होती. ओआरओपीनंतर ती तीस हजार होणे अपेक्षित होते. परंतु भिवानी येथील स्टेट बँकेच्या शाखेतील चुकीच्या पद्धतीने केलेल्या हिशेबामुळे ते निराश होते.
तुटी दूर करण्यासाठी रेड्डी कमिशन कार्यरत
दरम्यान, माजी लष्करप्रमुख आणि केंद्रीय मंत्री जनरल व्ही. के. सिंग म्हणाले, या वादात पडण्याची आपली इच्छा नाही. तथापि ग्रेवाल हे कॉंग्रेसचे कार्यकर्ते होते. पक्षाच्याच तिकीटावर सरपंच झाले होते, हा मुद्दा विसरता येत नाही.
ओआरओपीसाठी साडेसात हजार कोटींची तरतूद
मंत्री पर्रीकर म्हणाले, ओआरओपी हा मुद्दा अतिशय संवेदनशील असाच आहे. गेल्या ४३ वर्षांपासून यावर तोडगा निघालेला नव्हता. अनेक सरकारांनी त्यांना आश्वासने दिली. मात्र आम्ही हा प्रश्न सोडवला आहे. यासाठी दरवर्षी साडेसात हजार कोटी रुपयांची तरतूद केली आहे. शिवाय ११ हजार कोटींची अन्य देणीही माजी सैनिकांना देण्यात आली आहेत. ओआरओपीमुळे २३ ते २४ टक्के पेन्शनमध्ये वाढ झाली आहे, असे ते म्हणाले. माजी सैनिकांशी संवाद साधत त्यांनी त्यांच्या आणखी समस्याही समजावून घेतल्या. तसेच त्या सोडवण्याचेही आश्वासन दिले. तुमच्या समस्या समजून आल्या आहेत. आज मला येथे केवळ दहा मिनिटे देण्यात आली आहेत, तथापि मी अधिकवेळ तुमच्याबरोबर थांबत आहे. पुढच्यावेळी अर्धा दिवस थांबून समस्या सोडवण्यासाठी आपण एकत्र प्रयत्न करूया. तथापि यातील अनेक समस्या स्थानिक पातळीवरच योग्य कार्यवाही झाल्यास सुटतील आणि माजी सैनिकांना त्यांचे अनुदेय लाभ मिळून जातील, असेही ते म्हणाले.

शेअर करा

Posted by on Nov 4 2016. Filed under ठळक बातम्या, राष्ट्रीय, संरक्षण. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

प्रतिक्रिया नोंदवा

Marathi/English, press Ctrl+g  

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

मागील बातम्या, लेख शोध

Search by Date
Search by Category
Search with Google
More in ठळक बातम्या, राष्ट्रीय, संरक्षण (2720 of 2887 articles)


मुंबई, [३ नोव्हेंबर] - विधानपरिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या सहा जागांसाठी होत असलेल्या निवडणुकीत कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेस आघाडचे चित्र धूसर झाले ...