Home » ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय » कन्व्हीनिअन्स शुल्क हटविण्याचा निर्णय

कन्व्हीनिअन्स शुल्क हटविण्याचा निर्णय

=रेल्वे प्रवाशांना केंद्राचा मोठा दिलासा=
वृत्तसंस्था
नवी दिल्ली, २२ नोव्हेंबर
railways-hike-fares-across-all-classes-by-20-percentनोटाबंदीनंतर सामान्यांना दिलासा देण्यासाठी केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. आयआरसीटीसीवरून तिकीट बुक करताना लागणार कन्व्हीनिअन्स चार्ज २३ नोव्हेंबरपासून हटवण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. पाचशे आणि हजार रुपयांच्या नोटा चलनातून रद्द केल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे.
ऑनलाईन तिकीट बुक करताना सध्या कन्व्हीनिअन्स चार्ज लागतो. वेगवेगळ्या क्लाससाठी हा चार्ज वेगवेगळा असतो. ई-तिकीट बुक करताना स्लीपर क्लाससाठी २० रुपये आणि एसी क्लाससाठी ४० रुपये सर्व्हिस चार्ज लागतो. इतकेच नाही तर या सर्व्हिस चार्जवर १५ टक्के आणखी एक सर्व्हिस टॅक्स द्यावा लागतो.
रेल्वेच्या या निर्णयामुळे ऑनलाईन तिकीट बुक करणार्‍या कोट्यवधी प्रवाशांना दिलासा मिळाला आहे. या निर्णयानंतर प्रत्येक प्रवाशाचे तिकिटामागे २३ रुपयांपासून ४६ रुपयांची बचत होईल.
नोटाबंदीनंतर मोठ्या संख्येने लोक काऊंटरवर जाऊन तिकीट घेत आहेत. तसेच कन्व्हीनियन्स चार्जपासून वाचण्यासाठी लोक काही वेळ रांगेत उभं राहून तिकीट घेणे पसंत करत आहेत. पण, आता आयआरसीटीसीवरून ऑनलाईन तिकीट बुक करण्यासाठी हे अतिरिक्त शुल्क आकारले जाणार नाही.

शेअर करा

Posted by on Nov 23 2016. Filed under ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

प्रतिक्रिया नोंदवा

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)

हवामान

  • दृष्टीक्षेपात

    व्हिडीओ संग्रह

    मागील बातम्या, लेख शोध

    Search by Date
    Search by Category
    Search with Google
    More in ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय (1196 of 1661 articles)


    वृत्तसंस्था लंडन, २२ नोव्हेंबर डब्ल्यूटीए कडून जाहीर करण्यात आलेल्या विश्‍व टेनिस महिला रॅकिंगमध्ये जर्मनच्ची जगविख्यात खेळाडू ऍन्जेलिक केर्बर हिला प्रथम ...