अडवाणींची स्वत:हून माघार

अडवाणींची स्वत:हून माघार

►चिन्मयानंद यांची माहिती, नवी दिल्ली, २५ जून – भाजपाचे…

‘ती’ काळरात्र कधीच विसरू शकत नाही

‘ती’ काळरात्र कधीच विसरू शकत नाही

►आणिबाणीवर पंतप्रधानांची ‘मन की बात’मधून टीका, नवी दिल्ली, २५…

मानवरहित रेल्वेफाटकांवर ‘हूटर’ यंत्रणा

मानवरहित रेल्वेफाटकांवर ‘हूटर’ यंत्रणा

►इस्रोची उपग्रह आधारित चिप प्रणाली , नवी दिल्ली, २५…

पंतप्रधानांचे अमेरिकेत शाही स्वागत

पंतप्रधानांचे अमेरिकेत शाही स्वागत

►आज राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांना भेटणार • •►‘मोदी, मोदी’च्या घोषणांनी…

युनोच्या महत्त्वाच्या संस्थेवर नीरू चंदा नियुक्त

युनोच्या महत्त्वाच्या संस्थेवर नीरू चंदा नियुक्त

वॉशिंग्टन, २५ जून – संयुक्त राष्ट्राच्या अखत्यारीत असलेल्या ‘इंटरनॅशनल…

दहशतवाद्यांना केलेल्या मदतीमुळे पाक अडचणीत

दहशतवाद्यांना केलेल्या मदतीमुळे पाक अडचणीत

►३६ विकसित देश घेणार झाडाझडती ►मुंबई हल्ल्यानंतर टाकले होते…

कर्जमाफीचा निर्णय ऐतिहासिक, पण समाधानकारक नाही : उद्धव ठाकरे

कर्जमाफीचा निर्णय ऐतिहासिक, पण समाधानकारक नाही : उद्धव ठाकरे

►शेतकर्‍यांवरील गुन्हे मागे घतले नाही तर बघतो!, नाशिक, २५…

शेतकर्‍यांचे चांगभले!

शेतकर्‍यांचे चांगभले!

►३४ हजार २२ कोटींची अभूतपूर्व कर्जमाफी ►देशाच्या इतिहासातील सर्वात…

शहीद संदीप जाधव, श्रावण मानेंवर लष्करी इतमामात अंत्यसंस्कार

शहीद संदीप जाधव, श्रावण मानेंवर लष्करी इतमामात अंत्यसंस्कार

औरंगाबाद/कोल्हापूर, २४ जून – पाकिस्तानी सैन्याच्या भ्याड हल्ल्यात शहीद…

नव्या राष्ट्रपतींची चाहुल

नव्या राष्ट्रपतींची चाहुल

•उलट तपासणी : भाऊ तोरसेकर | मोदी या निवडणूकीसाठी…

रामनाथ कोविंद : समाजचिंतक ते राष्ट्रपती

रामनाथ कोविंद : समाजचिंतक ते राष्ट्रपती

योगिता साळवी | सत्ताधारी पक्षात राज्यपाल कुणाला बनवावे या…

स्वतंत्र गोरखालँडची मागणी

स्वतंत्र गोरखालँडची मागणी

प्रा. अविनाश कोल्हे | गोरखा समाजाची मागणी स्वातंत्र्यपूर्व काळापासून…

रणबीरच्या फिरण्यावर बंदी

रणबीरच्या फिरण्यावर बंदी

संजय दत्तच्या आयुष्यावर आधारित चित्रपटात रणबीर कपूर ६ वेगवेगळ्या…

प्रियांका ठरली जगातील दुसरी सुंदर महिला!

प्रियांका ठरली जगातील दुसरी सुंदर महिला!

जगातील सर्वात सुंदर महिलांमध्ये बॉलिवूडच्या देसी गर्लला म्हणजेच प्रियांका…

रितेश बनला ‘बँक चोर’

रितेश बनला ‘बँक चोर’

यशराज फिल्मच्या ‘बँक चोर’ या चित्रपटाद्वारे मराठमोळा अभिनेता रितेश…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
रवी उदय: 05:55 | अस्त: 19:02
अयनांश:
Home » ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय » कष्टाने कमावलेला सर्व पैसा सुरक्षित : पंतप्रधान मोदी

कष्टाने कमावलेला सर्व पैसा सुरक्षित : पंतप्रधान मोदी

♦‘कॅशलेश’ होण्याचा पंतप्रधानांचा संविधान दिनानिमित्त संदेश
♦भ्रष्टाचारविरोधी लढ्यात सामान्य लोक सैनिक झाले,
वृत्तसंस्था
नवी दिल्ली, २५ नोव्हेंबर –
narendra-modi-3५०० आणि एक हजाराच्या नोटा चलनातून बाद झाल्या असल्या तरी, देशवासीयांनी कष्टाने कमावलेला सर्व पैसा सुरक्षित आहे आणि हा पैसा आपल्या इच्छेनुसार खर्च करण्याचा अधिकारही नागरिकांना आहे, असे स्पष्ट करताना, आज जग बदलत आहे. रोखीचे व्यवहार मागे पडत आहेत. काही देशांमध्ये अस्तित्वात असलेली कॅशलेश अर्थव्यवस्था आपणही स्वीकारायला हवी, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज शुक्रवारी येथे केले. संविधान दिनानिमित्त संसद भवनात आयोजित एका कार्यक्रमात ते बोलत होते.
माझ्या सरकारने काळा पैसा आणि भ्रष्टाचाराविरोधात छेडलेल्या लढाईत सर्वसामान्य नागरिक सैनिक झाला आहे. प्रत्येक नागरिकाला त्याचा कष्टाचा पैसा खर्च करण्याचा पूर्ण अधिकार आहे. कोणीही कोणाचेही धन हिरावू शकत नाही. नागरिक आता मोबाईल तंत्रज्ञानाच्या माध्यमामधूनही आपला पैसा खर्च करू शकतात. जग बदलत असल्याने आपणही कॅशलेस अर्थव्यवस्थेकडे मार्गक्रमण करायला हवे, असे पंतप्रधान मोदी म्हणाले.
५०० व एक हजार रुपयांच्या नोटा रद्द करण्याच्या निर्णयाचे पंतप्रधानांनी जोरदार समर्थन केले.

७२ तास दिले असते तर….
पंतप्रधान मोदी म्हणाले, जुन्या नोटा रद्द करण्याच्या सरकारच्या निर्णयाची माहिती काही जणांना आधीच देण्यात आली नसल्याने ते सरकारवर संतप्त झाले आहेत. कारण, आपल्याजवळील काळा पैसा पांढरा करण्याची संधी त्यांना मिळाली नाही. त्यांना जर मी किमान ७२ तासांचा अवधी दिला असता, तर ही मंडळी फार खुश झाली असती. त्यांनी माझ्या या निर्णयाची स्तुती केली असती. त्यामुळे त्यांचा संताप मी समजू शकतो, असा चिमटा काढताना, सरकारने इतका मोठा निर्णय घेताना पूर्वतयारीच केली नव्हती, हा विरोधकांचा आरोपही फेटाळून लावला.

व्हॉट्‌सऍप शिकलात, तसे कॅशलेस होणे शिका
आपल्या हातात पैसा रोख स्वरूपातच असणे आवश्यक नाही. आता रोख रक्कम नसतानाही आपले व्यवहार सुरळीतपणे होऊ शकणार आहेत. तसे अनेक पर्याय देखील आपल्याकडे उपलब्ध आहेत, असे नमूद करताना पंतप्रधानांनी देशवासीयांना कॅशलेस होण्याचा संदेश दिला. ते म्हणाले की, व्हॉट्‌सऍप शिकायला आपण कोणाचीही मदत घेतली नाही. स्वत:च आपण सर्वांनी हे तंत्रज्ञान अवगत केले होते. याच प्रकारे आता आपल्याला कॅशलेस अर्थव्यवस्थेकडेही वाटचाल करायची आहे.

राज्यघटना म्हणजेच बाबासाहेब
भारतीय राज्यघटना म्हणजे बाबासाहेब आणि बाबासाहेब म्हणजेच राज्यघटना, असे नमूद करताना घटनात्मक आदर्शांची भावना आपल्या प्रत्येकांमध्ये निर्माण व्हायला हवी, असे मतही पंतप्रधानांनी व्यक्त केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची तुलना कोणासोबतही करता येणार नाही. त्यांचे कार्य किती महान होते, याची जाणीव आपल्या सर्वांनाच आहे, असे ते म्हणाले.

शेअर करा

Posted by on Nov 25 2016. Filed under ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

प्रतिक्रिया नोंदवा

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

मागील बातम्या, लेख शोध

Search by Date
Search by Category
Search with Google
More in ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय (1593 of 2111 articles)


वृत्तसंस्था नवी दिल्ली, २५ नोव्हेंबर - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काळ्या पैशाविरोधात कठोर पावले उचलण्याची मालिका सुरूच ठेवली आहे. जास्त ...