प्रत्येक ग्रामपंचायतीत वायफाय

प्रत्येक ग्रामपंचायतीत वायफाय

►साडेसात लाख ‘हॉटस्पॉट’ बसविणार ►केंद्र सरकारचा महत्त्वाकांक्षी निर्णय, नवी…

अल्लाशिवाय इतरांची पूजा करणारे मुस्लिम नाही!

अल्लाशिवाय इतरांची पूजा करणारे मुस्लिम नाही!

►•देवबंदचा आणखी एक फतवा, लखनौ, २१ ऑक्टोबर – मुस्लिम…

म्हणून निवडणुकीची घोषणा नाही

म्हणून निवडणुकीची घोषणा नाही

►मुख्य निवडणूक आयुक्तांचे गुजरातबाबत स्पष्टीकरण, नवी दिल्ली, २१ ऑक्टोबर…

दहशतवाद थांबल्याशिवाय पाकिस्तानशी चर्चा नाही

दहशतवाद थांबल्याशिवाय पाकिस्तानशी चर्चा नाही

►अमेरिकी प्रशासनाची भूमिका, नवी दिल्ली, २१ ऑक्टोबर – पाकिस्तान…

दोन वर्षांपासून बेपत्ता पाक पत्रकार सापडली

दोन वर्षांपासून बेपत्ता पाक पत्रकार सापडली

इस्लामाबाद, २१ ऑक्टोबर – मागील दोन वर्षांपासून बेपत्ता असलेली…

पाकिस्तानच्या टेहळणीसाठी भारताची मदत शक्य : अमेरिका

पाकिस्तानच्या टेहळणीसाठी भारताची मदत शक्य : अमेरिका

वॉशिंगटन, १८ ऑक्टोबर – आपला शेजारील राष्ट्र पाकिस्तानवर नजर…

साडेआठ लाख शेतकरी कर्जमुक्त

साडेआठ लाख शेतकरी कर्जमुक्त

►शेवटचा शेतकरी कर्जमुक्त होईपर्यंत योजना सुरू ►मुख्यमंत्री फडणवीस यांची…

राज्यातील एसटी-संपावर हायकोर्टात उद्या सुनावणी

राज्यातील एसटी-संपावर हायकोर्टात उद्या सुनावणी

मुंबई, १८ ऑक्टोबर – महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन मंडळाने…

दाऊदच्या मालमत्तांचा लिलाव

दाऊदच्या मालमत्तांचा लिलाव

►५ कोटी रुपये राखीव किंमत, मुंबई, १८ ऑक्टोबर –…

महासत्ता भारत : एक विचार

महासत्ता भारत : एक विचार

॥ विशेष : सतीश भा. मराठे | आपण महासत्ता…

दुमदुमले भारतमाता गौरव गान…

दुमदुमले भारतमाता गौरव गान…

॥ तरंग : दीपक कलढोणे | कुणी कुणाला आदेश…

मोदीजी, अभी नही, तो कभी नही!

मोदीजी, अभी नही, तो कभी नही!

॥ विशेष : सोमनाथ देशमाने | अयोध्येत राम जन्मभूमीवर…

‘सिमरन’मधील नवीन गाणे प्रदर्शित

‘सिमरन’मधील नवीन गाणे प्रदर्शित

अभिनेत्री कंगना राणावत लवकरच सिमरन या चित्रपटाद्वारे प्रेक्षकांच्या भेटीला…

चिरंजीवीसोबत सिनेमा करण्यास ऐश्‍वर्याचा नकार?

चिरंजीवीसोबत सिनेमा करण्यास ऐश्‍वर्याचा नकार?

ऐश्‍वर्या राय बच्चनची सध्या बॉलीवूडमध्ये सेकंड इनिंग सुरू आहे.…

रणबीरच्या फिरण्यावर बंदी

रणबीरच्या फिरण्यावर बंदी

संजय दत्तच्या आयुष्यावर आधारित चित्रपटात रणबीर कपूर ६ वेगवेगळ्या…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:22 | सूर्यास्त: 17:58
अयनांश:
Home » ठळक बातम्या, पंजाब-हरयाणा, राज्य » कारागृहावर हल्ला करून खलिस्तानी अतिरेक्यांना पळवले

कारागृहावर हल्ला करून खलिस्तानी अतिरेक्यांना पळवले

=पाकच्या आयएसआयची नापाक चाल, कुख्यात हरमिंदर मिंटूचा समावेश=
वृत्तसंस्था
पटियाळा, २७ नोव्हेंबर –
nabha-prison-panjabपोलिसांच्या गणवेशात आलेल्या सुमारे १० बंदुकधार्‍यांनी पंजाबमधील नाभा कारागृहावर हल्ला चढवला आणि बेछूट गोळीबार करून खलिस्तान लिबरेशन फोर्स या जहाल दहशतवादी संघटनेचा म्होरक्या हरमिंदर मिंटूसह त्याच्या पाच साथीदारांना पळवून नेले. दिवसढवळ्या घडलेल्या या घटनेमागे पाकिस्तानची गुप्तचर संस्था आयएसआयचा हात असल्याची माहिती उच्चस्तरीय सूत्रांनी दिली.
या घटनेनंतर पंजाबचे मुख्यमंत्री प्रकाशसिंग बादल यांनी तातडीची बैठक बोलावली आणि राज्यात सर्वत्र हाय अलर्ट जारी केला. रेल्वे स्थानके, विमानतळ, आंतरराज्यीय बस टर्मिनस आणि अन्य महत्त्वाच्या ठिकाणांची सुरक्षाही वाढविण्यात आली आहे. सोबतच, शेजारील हरयाणातही अतिसतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे, असे या बैठकीशी संबंधित एका वरिष्ठ अधिकार्‍याने सांगितले.
सुमारे १० तरुण बंदुकधारी हे पोलिसांच्या गणवेशात आले होते. नाभा कारागृहाच्या प्रवेशद्वारावरच त्यांनी बंदुकांमधून शंभरावर फैरी झाडल्या. यानंतर त्यांनी कारागृहाच्या आत प्रवेश केला आणि मिंटू व त्याच्या पाच साथीदारांना मुक्त करून आपल्या सोबत नेले. पळ काढणार्‍या खलिस्तानवादी अतिरेक्यांमध्ये विकी गोंदरा, गुरप्रीत सेखो, नितीन देओल, विक्रमजीतचा समावेश आहे. पंजाबमधील इतर कारागृहांच्या तुलनेत नाभा कारागृह अधिक सुरक्षित मानले जाते. येथे कडेकोट सुरक्षा असतानाही बंदुकधार्‍यांनी इतके मोठे धाडस केल्यानंतर सुरक्षा व्यवस्थेवरच गंभीर प्रश्‍नचिन्ह उपस्थित झाले आहे.
या घटनेनंतर राज्यभरात अतिसतर्कतेचा इशारा जारी करतानाच पोलिस, सुरक्षा दल आणि गुप्तचर यंत्रणांनाही सतर्क करण्यात आले आहे. विविध शहरांमध्ये शोधमोहीम उघडतानाच, प्रवेश मार्गांची व बाहेर जाणार्‍या मार्गांची नाकेबंदी करण्यात आली आहे. पटियाळा जिल्ह्यात विशेष शोधमोहीम राबविण्यात येत आहे.
हरमिंदरसिंग मिंटू हा खलिस्तान लिबरेशन फोर्सचा म्होरक्या आहे. २०१४ मध्ये मलेशियातून भारतात आलेल्या मिंटूला पंजाब पोलिसांनी दिल्लीतील आंतरराष्ट्रीय विमानतळावर अटक केली होती. पाकिस्तानच्या मदतीने भारतात मोठा घातपात करण्याच्या मोहिमेवर तो आला होता. मलेशिया पोलिसांनी याबाबतची माहिती भारत सरकारला आधीच दिली होती. २००८ मध्ये सिर्सा येथील डेरा सच्चा सौदाचे प्रमुख गुरमीत राम रहिम यांच्यावरील हल्ला आणि २०१० मध्ये हलवारा वायुसेनेच्या तळावर स्फोटके पेरण्यासह १० गंभीर गुन्ह्यांमध्ये त्याचा सहभाग होता.

अधीक्षक, उपअधीक्षक निलंबित
दरम्यान, कारागृहातील सुरक्षेकडे दुर्लक्ष केल्याप्रकरणी नाभा काराृहाचे पोलिस अधीक्षक आणि उपअधीक्षक यांना सेवेतून तडकाफडकी निलंबित करण्यात आले. या घटनेच्या उच्चस्तरीय चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत, अशी माहिती सूत्रांनी दिली.
राजनाथसिंहांकडून दखल
केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह यांनी या घटनेची गंभीर दखल घेत, मुख्यमंत्री प्रकाशसिंग बादल यांच्यासोबत संपर्क साधून, संपूर्ण घटनेची सविस्तर माहिती घेतली. केंद्र सरकारकडून आवश्यक ते सहकार्य करण्याचे आश्‍वासन राजनाथसिंह यांनी यावेळी दिले.

शेअर करा

Posted by on Nov 28 2016. Filed under ठळक बातम्या, पंजाब-हरयाणा, राज्य. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

प्रतिक्रिया नोंदवा

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

मागील बातम्या, लेख शोध

Search by Date
Search by Category
Search with Google
More in ठळक बातम्या, पंजाब-हरयाणा, राज्य (1537 of 2076 articles)


=माहिती घेण्यासाठी केंद्राने पाठवली २० पत्रे= वृत्तसंस्था बर्न/नवी दिल्ली, २७ नोव्हेंबर - भारतातील काळा पैसाधारकांना जोरदार दणका दिल्यानंतर केंद्र सरकारने ...